Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात वाढ, चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
Gold Silver Price Today: सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी सोन्याच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे
Gold Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात, आज (08 डिसेंबर, 2022) सोने आणि चांदीच्या नव्या किंमती (Gold and Silver Rates) जारी करण्यात आल्या आहेत. आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात घट झाली आहे. भावात वाढ झाल्यानंतर सोन्याने 54 हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याचवेळी भावात घसरण झाल्यानंतर चांदीचा भाव 66 हजारांवर आला आहे. सध्या देशात लग्नसराईचा (Wedding Season) हंगाम सुरू आहे. अशा वेळी मौल्यवान दागिन्यांची मागणी खूप असते. त्यामुळे सोन्याच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील .
आज सोन्याचा भाव काय?
राष्ट्रीय स्तरावरील सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 220 रुपयांनी महागला असून तो 54,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 200 रुपयांनी महागून 49650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्याचवेळी चांदीच्या दरात आज घसरण झाली असून ती 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदी 65,500 रुपये प्रति किलोवर आली आहे.
प्रमुख शहरांमध्ये किंमत, प्रति (10 ग्रॅम)
चेन्नई : 50150 (22K), 54720 (24K)
मुंबई : 49500 (22K), 54000 (24K)
दिल्ली : 49650 (22K), 54150 (24K)
कोलकाता : 49500 (22K), 54000 (24K)
जयपूर : 49650 (22K), 54150 (24K)
लखनौ : 49650 (22K), 54150 (24K)
पाटणा : 49550 (22K), 54050 (24K)
भुवनेश्वर : 49500 (22K), 54000 (24K)
चांदीचा दर
चांदीचा आज सरासरी भाव 65,500 रुपये प्रति किलो आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौ इत्यादी शहरांमध्ये 65500 प्रति किलो भाव आहे. तर चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी शहरांमध्ये किंमत 71000 रुपये आहे.
मौल्यवान दागिने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
सोन्या-चांदीच्या वर दिलेल्या किमती सूचक आहेत. त्यावर जीएसटी किंवा अन्य कोणताही कर जोडलेला नाही. अचूक किंमतीसाठी तुमच्या स्थानिक सराफा किंवा ज्वेलरशी संपर्क साधा. सोन्याच्या दागिन्यांमध्ये ज्वेलर्स किंवा उत्पादक स्वतंत्रपणे शुल्क आकारतात. खरेदी करताना याची माहिती जरूर घ्या. मेकिंग चार्जेस ज्वेलर्स बदलतो. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे. खरेदी करताना हॉलमार्किंगची खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी आहे.
सोन्याच्या किमती कशा ठरवल्या जातात?
बाजारात सोन्याची किंमत ठरवण्यासाठी अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये व्याजदर, सोन्याची मागणी, चलनवाढ, सरकारी धोरण, चलनात बदल इत्यादी आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ते सोन्याचे दागिने, गोल्ड म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड इत्यादी स्वरूपात करू शकता किंवा तुम्ही गोल्ड बॉण्ड देखील घेऊ शकता.