खुशखबर! लवकरच मिळणार PM किसानचा 17 वा हप्ता, पैसे मिळवण्यासाठी काय कराल?
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे.
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Farmers) तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचं काम करते. यातील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). दर चार महिन्याला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येतो. आत्तापर्यंत 16 हप्ते जमा झाले आहेत. 17 वा हप्ता कधी मिळणार? याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. पण लवकरच 17 वा हत्पा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. लोकसभा निवडणुकीच्या या काळातच 17 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळातच मिळणार 17 वा हप्ता
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या काळात सर्वच राजकीय पक्षांचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. आत्तापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. चौथा टप्पा येत्या 13 मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे.
PM किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत
देशातील गरिब शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत हप्त्यांच्या स्वरुपात दिली जाते. दर चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
मे महिन्यामध्ये PM किसानचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये PM किसानचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. कारण मागचा म्हणजे PM किसानचा 16 हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळं आता 17 वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा
जर तुम्हाला पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्याचबरोबर सर्व कागदपत्रांची पूर्तता करा. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या e-KYC पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. खाली दाखवलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल. यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यावर तुम्हाला OTP मिळेल. OTP मिळवण्यासाठी, तुम्हाला 'Get OTP' वर क्लिक करावे लागेल, OTP भरा आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचे ई-केवायसी केले जाईल.
महत्वाच्या बातम्या: