एक्स्प्लोर

BLOG : अंधेरीतील निकालानं राजकीय समीकरणं बदलतील?

अंधेरीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके जिंकल्या. शिवसेनेतील फुटीनंतर चिन्हावर लढवली गेलेली ही पहिली निवडणूक. त्यात मशाल चिन्हावरचा ठाकरे गटानं विजय मिळवला. शिंदे गटाला ढाल तलवार चालवायची संधी मिळाली नाही. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहिली. अनेक अडथळे पार करून ऋतुजा लटके यांना मिळालेला विजय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा असला तरी मुंबई महापालिकेचं रणमैदान तितकं सोपं नसेल हेदेखील वास्तव आहे.

या निवडणुकीत भाजपनं का माघार घेतली याचं उत्तर या निकालात मिळालं. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान होऊनही ऋतुजा लटके यांनी रमेश लटके यांच्यापेक्षा अधिक मतं मिळवली. पोटनिवडणुकीत ८६ हजार ५७० मतदारांनी म्हणजे केवळ ३१.७४ टक्के मतदारांनी मतदान केलं. उलट गेल्या निवडणुकीत १ लाख ४७ हजार ११७ मतदारांनी म्हणजे ५३.५५ टक्के मतदान केलं होतं आणि रमेश लटके यांना त्यापैकी ६२ हजार ७७३ मतं मिळाली होती. म्हणजे तब्बल ६० हजार इतकं कमी मतदान होऊनही ऋतुजा लटके यांनी रमेश लटके यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवली. ऋतुजा लटके यांना ६६ हजार ५३० मतं मिळाली. याचा अर्थ रमेश लटकेंपेक्षा त्यांनी ३ हजार ७५७ अधिक मतं मिळवली. कागदावरचं हे गणित पाहता ही निवडणूक भाजपसाठी सोपी नव्हती. आणि पराभव टाळण्यासाठीच त्यांनी माघार घेतली हे या आकडेवारीतून स्पष्ट होतं.

अंधेरी मतदारसंघात भाजपने गेल्या दोन निवडणुकांत साधारण ३० ते ३१ टक्के मतं मिळवली. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर लढले तेव्हा भाजप उमेदवार सुनील यादव यांना ४७ हजार ३३८ म्हणजे ३०.९४ टक्के मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या रमेश लटके यांना ५२ हजार ८१७ म्हणजे ३४.५२ टक्के मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना ३७ हजार ९२९ म्हणजे २४.७९ टक्के मतं मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत युती असली तरी भाजपच्या मुरजी पटेल यांनी बंडखोरी केली होती आणि भाजपने सारी ताकद त्यांच्या मागे उभी केली होती. या निवडणुकीत मुरजी पटेल यांना ४५ हजार ७८८ म्हणजे ३१.१४ टक्के मतं मिळाली. तर रमेश लटके यांना ६२ हजार ६८० म्हणजे ४२.६७ टक्के मतं मिळाली. काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांना २७ हजार ९२५ म्हणजे १९ टक्के मतं मिळाली. यावेळी नोटाला मिळालेली अधिकची मतं ही भाजपच्या नगरसेवकांच्या मतदारसंघात मिळाली हे लक्षवेधी आहे. नोटाला मतं मिळावीत म्हणून प्रचार झाल्याचे व्हीडिओही भाजप विरोधकांनी समोर आणले होते. असं असलं तरी भाजपचा उमेदवारच नसल्यानं त्यांचा पारंपरिक मतदार या निवडणुकीपासून दूरच राहिला. निवडणुकीत भाजपनं माघार घेतली नसती तर मतदानाची टक्केवारीही वाढली असती. या मतदारसंघात भाजपची ताकद प्रत्येक निवडणुकीत वाढत असली तरी यावेळी रमेश लटके यांच्या निधनामुळे असलेली सहानुभूती आणि शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती यामुळे ऋतुजा लटके यांनाच अधिक फायदा झाला असता आणि भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळेच भाजपनं माघार घेतली असावी हे या निकालातून दिसून येतं. कारण विजयाची थोडी जरी खात्री असती तरी भाजपनं प्रयत्नांची शिकस्त केली असती हे आताच्या भाजपचं निरीक्षण करणारा कुणीही सांगू शकेल.

या निकालामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असलेला जनाधार किमान अंधेरीत तरी बऱ्यापैकी कायम आहे असं दिसतं. जिथं आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत तिथं मात्र अशीच स्थिती असेल असं म्हणता येणार नाही. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अंधेरीत मिळालेली मतं उद्धव ठाकरेंचं आव्हान अजूनही कायम आहे हे दाखवणारी निश्चितच आहेत. या निवडणुकीत ठाकरे गट गाफिल नव्हता असं आकडेवारी सांगते. कमी मतदान होऊनही त्यातलं सुमारे ७७ टक्के मतदान ऋतुजा लटके यांना झालं. ठाकरे गटाच्या केडरचं हे यश आहे. त्यांनी ६६ हजार मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणलं. कमी मतदान होतं तेव्हा ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची फौज आहे त्याला अधिक फायदा होतो. तो ठाकरे गटाला या निवडणुकीत झाल्याचं दिसतं. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हाच संघर्ष आणि प्रयत्न यश मिळवून देतात हे आजवर स्पष्ट झालंय. पण पुढच्या महापालिका निवडणुकीत त्यावरच ठाकरे गटाची भिस्त आहे.

या निवडणुकीत ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून मेहनत घेतली आहे. त्यांच्यासाठी ही महापालिका निवडणुकीची रंगीत तालिमच होती. सगळे पदाधिकारी कामाला लागले होते. त्यात एकेका मतदारसंघात अनेकजण इच्छुक असतील. आणि ज्यांना तिकीट मिळणार नाही ते काय भूमिका घेतील हे आताच सांगणं कठीण आहे. त्यांच्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे दरवाजेही खुले असतील. तिकीट वाटपानंतर नाराजी वाढली आणि फाटाफुट झाली तर ठाकरे गटासमोर आव्हान उभं राहील आणि आता दिसलेलं यश तसंच राहील याची खात्री देता येणार नाही. अर्थात प्रत्येक वॉर्डनुसार ही परिस्थिती वेगवेगळी असेल. यावेळी यश मिळवायचंच अशा निर्धारानं निवडणुकीत उतरणारे भाजप नेते यावेळी प्रत्येक वॉर्डात मिळालेल्या संधीचा फायदा उठवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे ठाकरे गटासमोरचं आव्हान कायम असेल.

या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शिंदे गटाचा. शिंदे गट या निवडणुकीपासून दूर राहिल्यानं हा गट एक्पोज होण्यापासून वाचला. किंबहुना भाजपच्या नेत्यांनी त्यांना उघडं पडू दिलं नाही. ऋतुजा लटके यांना शिंदे गटात खेचण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून शेवटपर्यंत केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. दुसरं म्हणजे ऋतुजा लटकेच नव्हे तर या मतदारसंघातला अन्य कुणी पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागला नाही. मुंबईत शिंदे गटासमोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. ४० आमदार फोडले तरी मुंबईत ४ नगरसेवकांनाही अजून गटात आणता आलं नाही हे शिंदे गटाचं अपयश आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर कदाचित काही नगरसेवक शिंदे गटाचा रस्ता धरतीलही. पण मुंबईत गटाचा विस्तार करण्यासाठी तूर्त त्यांच्याकडे फारशी फौज नाही, हे स्पष्ट आहे. एकतर अंधेरी मतदारसंघ भाजप त्यांना सोडणं शक्य नाही आणि सोडला असता तरी शिंदे गटाला मोठा झटका बसला असता आणि त्यातून वेगळा संदेश गेला असता. ऋतुजा लटके यांची अडवणूक केल्याचं वातावरण निर्माण झाल्यानं आधीच नकारात्मक प्रतिमा झाली. पण निवडणुकीपासून दूर राहिल्यानं शिंदे गटाची नामुष्की टळली, भाजप नेत्यांनी स्वतःच्या पक्षाबरोबरच शिंदे गटालाही वाचवलं असं निकालावरून म्हणता येईल.

आता मुद्दा ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या राज ठाकरे यांचा. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अंधेरी पूर्व मतदारसंघात २५ हजारांहून अधिक म्हणजे १८ टक्के मतं मिळाली होती. २०१४ साली ती साडेनऊ हजाराच्या आसपास म्हणजे ६ टक्क्यांवर आली. आणि २०१९ मध्ये मनसेनं या मतदारसंघात उमेदवारच दिला नाही. या पोटनिवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका बिनविरोध निवडणुकीसाठी एक पत्र लिहून भाजप-शिंदे-पवार आणि उद्धव ठाकरे यांना गुंत्यातून सोडवण्याइतकीच होती. आता महापालिका निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटाबरोबर युती झाली नाही तर मनसेसमोर इथं अस्तित्वाचं आव्हान असेल.

राहता राहिला मुद्दा काँग्रेसचा. २००९ पर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं. गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांना जवळपास २८ हजार मतं मिळाली होती. यावेळी प्रथमच काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला. काँग्रेसची मतं शिवसेनेला ट्रान्स्फर होत नाहीत, असा शिवसेनेतला एक मतप्रवाह आहे. त्यामुळेच मुंबईत महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्यास ठाकरे गट इच्छुक नसल्याचं कळतं. पण या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना मिळालेली मतं पाहता काँग्रेसची काही मतंही ठाकरे गटाकडे वळल्याचं दिसतं. माजी मंत्री सुरेश शेट्टी हेदेखिल उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटासोबत दिसले. ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्यात अडचण आली तर ठाकरे गटानं सुरेश शेट्टी यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यास तयार राहण्यास सांगितलं होतं असं कळतं. शेट्टी आणि अन्य काँग्रेस नेत्यांशी ठाकरे गटाच्या नेत्यांनी समन्वय ठेवला होता. त्याचा फायदा निकालात झाला असावा असं आकडेवारीतून दिसतं. यातून महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या युतीची चर्चा सुरु होईल का हेदेखिल येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

एकूणच अंधेरीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पडद्यामागेही बरंच काही घडलं. या निवडणुकीच्या निकालातून भविष्यातली गणितं मांडणं सोपं नसलं तरी निकालातून नवी राजकीय समीकरणं उदयाला येऊ शकतील. त्यातही महापालिकेची निवडणूक भाजप आणि ठाकरेंसाठी ही निवडणूक चुरशीचीच असेल आणि अंधेरीत पेटलेली मशाल धगधगत ठेवणं उद्धव आणि आदित्य ठाकरेंसाठी मोठं आव्हान असेल.

  

ही बातमी देखील वाचा

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
ABP Premium

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget