एक्स्प्लोर
डेटागिरीनंतर डिजीटल फ्रीडम, जिओकडून डिजीटल इंडियाच्या क्रांतीला सुरुवात
दूरसंचार कंपन्यांची झोप उडवल्यानंतर रिलायन्सने मोफत 4G फोन देऊन आता मोबाईल कंपन्यांना घाम फोडलाय. त्यानंतर आता 15 ऑगस्टपासून 'डिजीटल फ्रीडम'ची घोषणा देत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी इंडियाला डिजिटल करण्यासाठी दंड थोपटून मैदानात उतरलेत.
गांधीगिरी नव्हे तर भारत आता डेटागिरी करेन, अशी घोषणा मुकेश अंबानींनी केली. जिओनंतर सुस्त पडलेल्या आणि ग्राहकांची बिलकुल काळजी नसणाऱ्या कंपन्या खडबडून जाग्या झाल्या. आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या आघाडीच्या कंपन्यांमध्ये ऑफर्सची सध्या कशी चढाओढ सुरुय ते वेगळं सांगायला नको. दूरसंचार कंपन्यांची झोप उडवल्यानंतर रिलायन्सने मोफत 4G फोन देऊन आता मोबाईल कंपन्यांना घाम फोडलाय. त्यानंतर आता 15 ऑगस्टपासून 'डिजीटल फ्रीडम'ची घोषणा देत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी इंडियाला डिजिटल करण्यासाठी दंड थोपटून मैदानात उतरलेत.
एका 4G फीचर फोनवर ऑनलाईन पेमेंट, अकाउंट लिंक करण्याची सुविधा, पाहिजे तेव्हा डेटा, मोफत व्हॉईस कॉलिंग, येत्या काळात 99 टक्के मोबाईलधरकांना 4G देण्याचं ध्येय, सद्यस्थितीत 12 कोटी 4G ग्राहक, VoLTE म्हणजेच व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्हॉल्युशनचा वाढता प्रसार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चीन, अमेरिकेसारख्या देशांना मागे टाकत सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल येणं ही भारताच्या डिजिटल क्रांतीची सुरुवात आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा डिजीटल होण्यासाठी पाऊलं टाकली. त्याला आता जिओची साथ मिळाली आहे. भारतासारखा खेड्यांचा देश, जिथे आजही अनेक भागात वीज नाही, अशा देशाला डिजीटल करण्यासाठी आता रिलायन्स जिओ पुढे सरसावलीये. येत्या दोन वर्षात देशातील 99 टक्के नागरिकांकडे 4G असेल, अशी घोषणा अंबानींनी केली. डिजीटल होण्यासाठी जिओचं मोफत सिम आणि स्वस्त प्लॅन तर दिला. पण अनेकांकडे 4G फोनच नाहीये हे रिलायन्सच्या लक्षात आलं. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच मोफत फोन वाटण्याची घोषणा रिलायन्सने केली. हा फोन किती लोक घेतील किंवा नाही याचा अंदाज बांधण्यापेक्षा महत्वाचं हे आहे की याचा मोबाईल सेक्टरवर काय परिणाम होईल? लोकांनी जिओ फोनला पसंती देणं सुरु केलं की याचा परिणाम दिसून येईल. महागडे 4G फोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये स्वस्त 4G फोन तयार करण्याची स्पर्धा सुरु होईल. चीननंतर भारतात सर्वाधिक लोकांकडे मोबाईल आहेत. मात्र त्यापैकी किती जणांकडे इंटरनेट असेल, हा मोठा प्रश्न आहे. या इंटरनेटपासून कायम वंचित असलेल्या वर्गाला जोडण्याचा प्लॅन जिओने केलाय.
फोनवर वाट्टेल तेवढा वेळ बोलणं जिओने सोपं करुन दिलंय. आत्ताच इतर कंपन्यांनी IUC वाढवण्याची मागणी केल्याचं बोललं जातंय ज्याचा थेट परिणाम तुमच्या फोन बिलावर होईल. तर दुसरीकडे जिओ VoLTE च्या माध्यमातून मोफत कॉलिंग देण्यासाठी जोर लावत आहे. या कंपन्या कर्जबाजारी आहेत हे मान्य असलं तरी सध्या जे चाललंय त्यापेक्षा जर महाग झालं तर यांचे ग्राहक यांना सोडून जातील हे निश्चित आहे. दुसरं म्हणजे या इतर कंपन्यांनी जनसंपर्काचं महत्व ओळखणं गरजेचं आहे, जे जिओने कधीच ओळखलंय. ग्राहकांना कोणतीही समस्या आली, तरी तिचं निराकरण काही मिनिटात होईल, अशी व्यवस्था जिओने केली आहे. इकडे परिस्थिती वेगळी आहे. अनेकदा ऑफर्सची माहिती घेण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला तर त्यांनाही याची माहिती नसते. पण जिओच्या ट्विटर हँडलवर जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला काही मिनिटात रिप्लाय दिला जातो.
डिजीटल इंडियासाठी जिओचा पुढचा मेगा प्लॅन FTTH म्हणजेच 'फायबर टू द होम' असणार आहे. मोबाईल डेटा क्षेत्रात जम बसवल्यानंतर घरगुती आणि कार्यालयीन इंटरनेटला वेग देण्यासाठी जिओची ही सेवा 100 Mbps स्पीडचं नेटवर्क देणार आहे. या ब्रॉडबँडच्या लाँचिंग प्लॅनमध्येही अनेक अशा ऑफर असू शकतात ज्या जुनं नेटवर्क सोडून जिओ घेण्यासाठी भाग पाडतील. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आयडिया आणि BSNL ब्रॉडबँड कनेक्शनचं जाळं आहे. मात्र यांचं स्पीड आणि डेटा दर पाहून जिओ ग्रामीण भागाच्या डिजीटल क्रांतीची नांदी ठरणार आहे.
तुम्हाला डिजीटल इंडियात रहायचं असेल तर पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा डेटा वापरायला मिळालाच पाहिजे. मोबाईल डेटा हा डिजिटल युगाचा श्वास आहे. तो प्रत्येकाला मिळणं गरजेचंच आहे आणि जिओचे स्वस्त प्लॅन ग्राहकांना हेच मिळवून देतात. 'जे खपतं ते विकावं' याप्रमाणे जिओने आजच्या भारताची जी गरज ओळखली आहे, ती इतर कंपन्यांनीही ओळखली तर इंडियाच नाही आपला 'भारत' डिजीटल व्हायला वेळ लागणार नाही.
संबंधित बातम्या :
जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, मोफत फोन मिळवण्यासाठी काय कराल?
जिओ फोनसोबतच मुकेश अंबानींची आणखी एक मोठी घोषणा
जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही!
जिओ फोन असा बुक करा
'डेटागिरी'नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement