एक्स्प्लोर
आंदळकरांकडून एशियाड-ऑलिम्पिक गाजवण्याचा आदर्श घ्या!
महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय वैभव मिळवून देणारे हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं वयाच्या ८३व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीतल्या आंदळीत जन्मलेल्या आणि कोल्हापूरनं पैलवान म्हणून घडवलेल्या गणपतराव आंदळकरांच्या कारकीर्दीचा हा आढावा.

हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन झालं आणि महाराष्ट्राच्या कुस्तीवर जणू आभाळच कोसळलं. लाल मातीलाही हुंदका अनावर व्हावा असं दु:ख महाराष्ट्राच्या वाट्याला आलं आहे.
गणपतराव आंदळकर म्हणजे महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या कुस्ती परंपरेतलं एक मोठं नाव. महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय वैभव मिळवून देणारं, ऑलिम्पिक कांस्यविजेत्या खाशाबा जाधवांच्या परंपरेतलं नाव. मारुती माने आणि गणपतराव आंदळकर म्हणजे महाराष्ट्राच्या महापराक्रमी पैलवानांची समकालीन जोडी.
पैलवान म्हणून नाव कमावलेल्या आंदळकरांनी वस्ताद म्हणूनही तितकाच मोठा लौकिक कमावला. रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदारांनी पुण्यातल्या गोकुळ वस्ताद तालमीत आणि आंदळकरांनी कोल्हापुरातल्या न्यू मोतीबाग तालमीत पैलवान घडवलेच, पण त्या पैलवानांमधून माणसंही घडवली. त्यामुळंच महाराष्ट्राच्या कुस्तीत हरिश्चंद्र बिराजदार आणि गणपतराव आंदळकरांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.
गणपतराव हे मूळचे सांगलीतल्या आंदळी गावचे. पण कौटुंबिक कारणामुळं ते कोल्हापूरनजिकच्या पुनवत गावात स्थायिक झाले. त्या काळात कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी होती. राजर्षी शाहू महाराजांनी पैलवानांसाठी घालून दिलेली राजाश्रयाची परंपरा १९५० सालीही सुरूच होती. गणपतरावांनाही दरबारी पैलवान बाबासाहेब वीर वस्ताद म्हणून लाभले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गणपतराव कुस्तीविद्येत पारंगत झाले.
गणपतरावांचा पैलवान म्हणून भारतभरात पहिल्यांदा बोलबाला झाला तो १९६० साली. त्यांनी पंजाबच्या खडकसिंगला हरवून हिंदकेसरी किताबावर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्या वेळी गणपतरावांना मानाची गदा बहाल करण्यात आली होती.
गणपतरावांनी १९६२ सालच्या जकार्ता एशियाडमध्ये कमालच केली. त्यांनी हेवीवेट गटात ग्रीको रोमन शैलीचं सुवर्ण आणि फ्रीस्टाईलचं रौप्य अशी दुहेरी पदकांची कमाई केली. ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल शैलीचं तंत्र इतकं भिन्न भिन्न आहे की, एकाच पैलवानानं दोन्ही शैलीच्या कुस्तीवर हुकूमत गाजवणं म्हणजे आश्चर्यच म्हणायला हवं. पण १९६२ सालच्या जकार्ता एशियाडमध्ये हा दुहेरी पराक्रम दोन मराठी पैलवानांनी गाजवला एक मारुती माने आणि दुसरे गणपतराव आंदळकर. त्या दोघांच्या दुहेरी पराक्रमाचं अप्रूप वाटतं कारण महाराष्ट्राच्या पैलवानांना मॅटवर खेळण्याची संधी मिळू लागली ती ऐंशीच्या दशकात. साठच्या दशकात तर माने आणि आंदळकरांना मॅट पाहायला आणि अनुभवायला पहिल्यांदा अनुभवायला मिळालं ते थेट राष्ट्रीय शिबिरात. पण मॅटवरच्या कुस्तीच्या तंत्रात ही मंडळी एशियाडमध्ये कमी पडली नाहीत.
गणपतरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निव्वळ हिंदकेसरी किताबावर समाधान न मानता एशियाड गाजवलंच, पण १९६४ सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं. गणपतरावांच्या या कारकीर्दीचा केंद्र शासनानंही १९६४ साली अर्जुन पुरस्कारानं गौरव केला.
गणपतराव आंदळकरांसारख्या पैलवानांनी कुस्तीत दाखवलेला तो लढाऊ बाणा दुर्दैवानं आज महाराष्ट्राच्या कुस्तीत उरलेला नाही. पण त्यांनी घडवलेल्या पैलवानांनी आपल्याकडे कुस्ती अजूनही टिकून आहे, हे महाराष्ट्राचं सुदैव म्हणायचं. या मराठमोळ्या पैलवानांनी निव्वळ महाराष्ट्र केसरीवर समाधान न मानता एशियाड-ऑलिम्पिकची पदकं जिंकण्याची हिंमत दाखवली, तरच ती गणपतराव आंदळकरांना खरी श्रद्धांजली ठरेल.

View More