एक्स्प्लोर

लहान भावाची भूमिका घेऊन काँग्रेस सावरू शकेल?

पाच राज्यांच्या निवडणुकानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नाराज नेत्यांचा जी २३ समूह आक्रमक होणार असे भाकित आम्ही केलेच होते. पाच राज्यातील दारुण पराभवानंतर काँग्रेसला नेतृत्व बदल करावाच लागेल असेही आम्ही म्हटले होते. पण पराभवाचे खापर फोडण्यासाठी गांधी नाव आवश्यक असल्याने अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबाकडेच काँग्रेसते सुकाणू सोपवण्याचा निर्णय घेतलाय. ऑगस्ट महिन्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होऊ शकेल असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. जी२३ समूहातील नेत्यांच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्यात आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा जी२३ चे नेतृत्व करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेणार असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीतीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी मात्र २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी विविध राज्यात लहान भावाची भूमिका स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे.

पी. चिदंबरम यांचे हे वक्तव्य काँग्रेस आज किती मोडकळीस आलेय आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकते हे दाखवणारे आहे. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस तडजोड करण्यास तयार झाल्याचे चिदंबरम यांनी जरी म्हटले असले तरी इतर काँग्रेस नेते याला तयार होतील का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून काँग्रेसची सत्ता उलथवणाऱ्या आम आदमी पार्टीशी आणि काँग्रेसविना तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत युती करून लहान भाऊ म्हणून निवडणुका लढवण्यास तयार आहे असे धक्कादायक वक्तव्य पी. चिदंबरम यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्या आघाडीवर बोलताना काँग्रेसला अनुल्लेखाने मारले असले तरी काँग्रेस लाचाराप्रमाणे ममतांच्या वळचणीला जाण्यास तयार झाल्याने अनेक काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे.

लहान भावाची भूमिका स्वीकारण्यास तयार झालेली ती ही काँग्रेस आहे जी अनेक दशके संपूर्ण देशावर राज्य करीत होती. आता काँग्रेसकडे आज राजस्थान आणि छत्तीसगढ अशी फक्त दोन राज्ये उरली आहेत. तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आघाडी करून काँग्रेस सत्तेत आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस सत्तेत असली तरी खरे राज्य राष्ट्रवादी आणि शिवसेनाच करीत आहे. काँग्रेसची केवळ गरज असल्याने त्यांना जवळ केलेय आणि काँग्रेसलाही सत्ता हवी असल्याने ते सर्व सहन करून सत्तेत बसले आहेत. याची काही उदाहरणे म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य. मात्र काँग्रेसने डोळे वटारताच संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले होते.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण प्रदेशअध्यक्ष सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्यातील वादात काँग्रेस नेतृत्वाने योग्य तोडगा काढला नाही आणि कॅप्टन अमरिंदर यांनाच काँग्रेसबाहेर काढले. याचा जो परिणाम व्हायचा तो झालाच. काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा आपने उचलला आणि पंजाबमध्ये झाडू फिरवून काँग्रेसला साफ केले. ज्या उत्तर प्रदेशने देशाला काँग्रेसी पंतप्रधान दिले त्या ४०० आमदारांच्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या. यापेक्षा जास्त जागा तर म्हणजे ५ तर मणिपूरमध्ये काँग्रेसला मिळाल्या.

काँग्रेसची ही पडझड २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरु झाली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांचा चेहरा बनवून भाजपने देश हलवून सोडला. २०१४ नंतर देशभरात एकूण ४५ मोठ्या निवडणुका झाल्या आणि त्यापैकी फक्त ५ निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजय मिळालाय. यावरूनच एक स्पष्ट होते आणि ते म्हणजे जनतेला आता काँग्रेस नकोशी झालेय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वात बदल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा चेहरा निवडण्याऐवजी सोनिया गांधींक़डेच हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले. आजारपणामुळे सोनिया गांधींनी निवडणुक प्रचारात भाग घेतला नाही आणि राहुल, प्रियांकांवर जनतेचा विश्वास नसल्याने काँग्रेसचा मोठा पराभव झाला.

ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, यावेळी तिसऱ्या आघाडीबाबत विचारले असता ममता बॅनर्जी यांनी तिसरी आघाडी? कुठे आहे तिसरी आघाडी? असा प्रश्न करीत काँग्रेसला टोला लगावला होता. एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांनंतर तर काँग्रेसने तृणमूलमध्ये स्वतःला विलीन करावे असेही टीएमसीच्या एका नेत्याने म्हटले होते.

अशा स्थितीत पी. चिदंबरम यांनी तृणमूलच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये आणि केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, पंजाबमध्ये निवडणुका लढवण्याबाबत वक्तव्य केले आहे. काँग्रेसची स्वतःची स्थिती अत्यंत वाईट असताना त्यांच्याशी युती करण्यास हे पक्ष तयार होतील का असा प्रश्न उभा राहातो. काँग्रेसने यापूर्वी केंद्रात काही पक्षांना पाठिंबा देऊन सत्तेत वाटा मिळवला होता. १९७९ मध्ये काँग्रेसच्या मदतीने जनता दल (सेक्युलर)चे केंद्रात सरकार होते. त्यानंतर १९९० मध्येही समाजवादी जनता पार्टीचे सरकार काँग्रेसच्या मदतीने केंद्रात आले होते. १९९६ मध्ये युनायटेड फ्रंट या १३ पक्षांच्या आघाडीचे सरकार केंद्रात आले होते. परंतु नंतर काँग्रेसने या सरकारचे समर्थन काढले आणि देवेगौडा सरकार कोसळले होते. यानंतर काँग्रेसने सत्तेवर आलेल्या इंद्रकुमार गुजराल यांना काँग्रेसने समर्थन दिले होते.

लवकरच गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ़,  मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत काँग्रेस नेतृत्वात बदल करून काँग्रेसची फेररचना करण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी छोट्या भावाच्या भूमिकेत जाण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार आहे. लहान भावाची भूमिका स्वीकारून काँग्रेस सावरू शकेल का असा प्रश्न यामुळेच पडतोय. काँग्रेसकडे आता जिंकण्याचा आत्मविश्वास दिसत नाही हेच पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यातून सूचित होत आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping :  स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar:  सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied:  'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
Embed widget