एक्स्प्लोर

आगळीवेगळी कांगा लीग क्रिकेट स्पर्धा

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, ओली निसरडी खेळपट्टी, वाढलेलं गवत आणि ठिकठिकाणी चिखलाने माखलेली आऊटफिल्ड ही आहेत क्रिकेट विश्वातल्या एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेची वैशिष्टे. ही स्पर्धा आहे पावसाळी मोसमात खेळवली जाणारी जगातील एकमेव अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कांगा लीग क्रिकेट स्पर्धा.

रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, ओली निसरडी खेळपट्टी, वाढलेलं गवत आणि  ठिकठिकाणी चिखलाने माखलेली आऊटफिल्ड ही आहेत क्रिकेट विश्वातल्या एका आगळ्या  वेगळ्या स्पर्धेची वैशिष्टे. ही स्पर्धा आहे पावसाळी मोसमात खेळवली जाणारी जगातील एकमेव अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची कांगा लीग क्रिकेट स्पर्धा. मुंबई ही भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. याच मुंबईने आजवर अनेक खेळाडू भारताला दिलेत. किंबहुना मुंबईच्या खेळाडूंशिवाय भारतीय टीम पूर्णच होऊ शकत नाही असा भारतीय क्रिकेट मधील एक मोठा समज आहे. आतापर्यंत अनेक मुंबईकर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केल आहे. यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री,संदीप पाटील, वासीम जाफर, जहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे या रथीमहारथींचा समावेश आहे. मुंबईतून असे उत्तमोत्तम खेळाडू देशाला लाभतायत याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतलं स्थानिक क्रिकेट. मुंबईतील क्रिकेट हंगाम सुरू होतो तो ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महिन्यात. कांगा लीग ही मोसमातील पहिली स्पर्धा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष डॉ. एच. डी. कांगा यांच्या नावाने ही स्पर्धा 1948 पासून खेळवली जाते. कसे आहे कांगा लीग स्पर्धेचे स्वरूप...? सर्वसाधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या स्पर्धेतील सामने पार पडतात. लीग पद्धतीने चालणार्‍या या स्पर्धेत ए बी सी डी इ एफ जी असे 7 गट असतात. प्रत्येक गटात 14 संघ असे एकूण 98 संघ या स्पर्धेत भाग घेतात. गटातील प्रत्येक संघास 13 सामने खेळावे लागतात. सर्वात शेवटी सर्वाधिक गुणांच्या आधारावर प्रत्येक गटातील विजेत्याची निवड केली जाते. कांगा लीग स्पर्धेवेळी मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 49 सामने खेळवले जातात. हे  सामने मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, माटुंग्यातील दडकर मैदान, शिवाजी पार्क, मरीन लाईन्स वरील जिमखाने, विरार आणि पालघर येथील मैदानांवर पार पडतात. प्रतिकूल परिस्थितित होणार्‍या या सामन्यांमध्ये खेळाडूंचा अक्षरशः कस लागतो. ओल्या  खेळपट्टीवर खेळताना भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल होते. त्यामुळे बहुतांशी सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहते आणि फार कमी धावसंखेचे सामने बघायला मिळतात. कांगा लीगच्या इतिहासात आतापर्यंत 4 गोलंदाजानी   एकाच डावामध्ये 10 गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज विठ्ठल पाटील यांनी कांगा लीगमध्ये सर्वाधिक 759 गाडी बाद केले आहेत. तर 1948 पासून 2002 पर्यन्त सलग  55 वर्ष प्रत्येक कांगा लीग स्पर्धेत खेळून माजी कसोटीपटू माधव आपटे आपटे यांनी 5046 धावा कुटल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम आजही अबाधित आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी जॉन ब्राइट या क्रिकेट  क्लब कडून पहिल्यांदा या स्पर्धेत खेळाला  होता. तर  अशी  ही आगळी  वेगळी  क्रिकेट स्पर्धा  यावर्षी  9 जुलै ते 1 ऑक्टोबर  या कालावधीत होत आहे. खर तर मुंबई  क्रिकेट  असोसिएशन वर्षभरात अनेक क्रिकेट स्पर्धांचं  आयोजन  करते. पण कांगा लीग चे  महत्व  आणि वेगळेपण  पूर्वीइतकच आजही  टिकून  आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
ABP Premium

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Embed widget