एक्स्प्लोर
Advertisement
सिनेमेनिया : आता बुरख्यातील लिपस्टिक दिसणार !!
जेमतेम चार महिन्यांपूर्वी ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आणि देशभरात पडसाद उमटले... चार महिलांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं पोस्टरच इतके बोलके होते की सेन्सॉरची कात्री चालणार हे नक्की होते.
पहिल्या ट्रेलर रिलीजपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटला प्रदर्शनापासून रोखले होते. सेन्सॉरच्या निर्णयानंतर निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क मिळवले.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेले बोल्ड सीन्स तज्ज्ञांना जेवढे खटकले, तेवढंच त्याचं नावही. चित्रपटाच्या नावातील ‘बुरखा’ या शब्दामुळे देशभरातील मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्या होत्या.
न्यायालयाच्या निर्णयानंतर चित्रपटाचा दुसरा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला. सव्वा दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. त्यामध्ये किसिंग सीन्सपासून बेडरुमपर्यंतचे सगळेच सीन्स असल्यानं सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शन रोखत चित्रपटाला थेट 'असंस्कारी'च घोषित केले होते.
दिग्दर्शक प्रकाश झा यांची भाची अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शनाचा इंद्रधनुष्य पेलला. अलंकृता श्रीवास्तव यांनी यापूर्वी तिशीतल्या महिलांवर आधारीत ‘टर्निंग 30’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, आहना कुमार, प्लबिता बोरठाकूर यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याच्याबरोबरच विक्रांत मैसी, सुशांत सिंह, शशांक अरोडा, वैभव तत्ववादीसुद्धा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
ट्रेलरमध्ये मुख्यत्वे, देशातील पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रभावी भाष्य करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात.
‘अगर लड़की ने लिपस्टिक लगा ली, तो अफेअर हो जाएगा, अगर उसने जीन्स पहन ली, तो स्कँडल हो जाएगा, ऐसा क्या हो जाएगा? आप हमारी आजादी से इतना डरते क्यों हैं?’ असे घणाघाती भाष्य करणारे डायलॉगही आपल्याला ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. एका छोट्या शहरातील चार महिलांवर आधारित हा चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयोगटातील चारही महिला स्वतंत्र्याच्या शोधात असतात. एका टप्प्यावर चौघीही एकत्र येतात आणि समाजाच्या सर्व रुढी-परंपरांना लाथाडत आयुष्य जगतात. यामध्ये समाजातील लोकांकडून होणाऱ्या जाचालाही त्यांना सामोरं जावं लागतं.
सेन्सॉर बोर्ड, मुस्लीम संघटना यांसारखे अडथळे पार करत अखेर बुरख्यातील लिपस्टिक 21 जुलैला पाहायला मिळणार हे नक्की...
‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा दुसरा ट्रेलर :
‘सिनेमेनिया’मधील याआधीचे ब्लॉग :
सिनेमेनिया : भाईजानचा 'ट्यूबलाईट' नक्कीच लख्ख प्रकाशणार! 'सिने'मेनिया : गिफ्टेड चित्रपटाचा रिव्ह्यू शिशुपाल कदम, एबीपी माझा, मुंबई सलमानचा ‘लिटल बॉय’ हीट होणार?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement