एक्स्प्लोर

गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण

‘गेम ऑफ थ्रोन्स’ बस नाम ही काफी है… जगभरात गेल्या सात वर्षांपासून या नावाने अनेकांना वेड लावलं आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ जगभरात सर्वात जास्त लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजेच सत्तेचा खेळ, सत्ता मिळवण्यासाठी होणारं राजकारण, स्वत:चं साम्राज्य वाचवण्यासाठीचा संघर्ष, साम्राज्य वाढवण्याची भूक असलेले एकापेक्षा एक धुरंधर राजे आणि त्यांचे सैन्य! गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण ‘वेस्टोरॉस’ साम्राज्याला जिंकण्यासाठी झालेल्या संघर्षाची कहाणी या मालिकेत आहे. जॉर्ज आर. आर. मार्टनी यांच्या ‘साँग्स ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर’ कादंबरीवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आधारित आहे. 2011 साली सुरू झालेल्या भन्नाट प्रवासातील महत्वाचा टप्पा यावर्षी जुलै महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘साँग्स ऑफ आईस अ‍ॅण्ड फायर’ कादंबरी सात भागात विभागलेली आहे. त्यानुसारच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेचेही सात भाग पाहायला मिळणार हे नक्की होते. आतापर्यंत या मालिकेचे सहा पर्व येऊन गेले. आता प्रतिक्षा आहे ती सातव्या भागाची. 16 जुलैला ही प्रतिक्षा संपणार आहे. गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण स्टार्क ऑफ विंटरफेल, ट्ली ऑफ रिव्हरन, अ‍ॅरेन ऑफ द एरी, लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक, ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड, ट्रेल ऑफ हायगार्डन, मार्टेल ऑफ सन्सस्पेअर या सात राज्यांचे मिळून वेस्टोरॉस या साम्राज्याची निर्मिती झाली आहे. सातही राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो, त्याला आयर्न ‘थ्रोन’ म्हटलं जाते. किंग्स लँडिंग ही वेस्टोरॉस साम्राज्याची राजधानी आहे. आता अर्थात सगळा खेळ सुरु असतो तो ‘आयर्न थ्रोन’ची ताकद मिळवण्याचा. मालिकेच्या पहिल्या पर्वापासून आपल्याला राजकारण पाहायला मिळते. गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण बरं राजकारणाबरोबरच ‘वेस्टोरॉस’ साम्राज्याला आणखी एका साम्राज्याचा धोका असतो. त्यापासून वेस्टोरॉसला वाचवण्यासाठी ‘वेस्टोरॉस’भोवती एक मोठी भिंत उभारली आहे. ‘वेस्टोरॉस’च्या शासनात न राहणारे लोक या भिंतीपलीकडे राहत असतात. त्यांना ‘वाईल्ड लिग्स’ म्हणतात. यांना राज्यात येण्यापासून रोखण्यासाठी भिंतीजवळ मोठी फौज तैनात केलेली असते. त्यांनाच ‘नाईट्स वॉच’ म्हणतात. ‘वेस्टोरॉस’मधील सातही राज्यांच्या संघर्षाबरोबरच ‘वाईल्ड लिग्स’सोबतचा युद्धही पाहायला मिळतो. गेम ऑफ थ्रोन्स... सत्ता, संघर्ष आणि राजकारण मालिकेतील राजकारण आणि मालिकेतील लैंगिक दृश्य. ते दृश्य चित्रित करताना दिग्दर्शकाने दोन शतकांपूर्वीच्या स्त्री-पुरुषांची शरीरसंबंधांविषयीची मानसिकता लक्षात घेतली आहे. त्यामुळे या दृश्यांमध्ये स्त्रीच्या तुलनेत पुरुष खूपच आक्रमक दाखवले आहेत. परिणामी ही दृश्य इतकी अंगावर येतात की, सर्वसामान्य प्रेक्षक उत्तेजित न होता, त्याच्या मनात स्त्री पात्राविषयी सहानुभूतीची भावना निर्माण होते. पण विशेष म्हणजे शरीरसंबंधाच्या या दृश्यांमधून त्या स्त्रीवर अत्याचार होत नसल्याचंही नेमकं व्यक्त करण्यात आलं आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची पटकथा आणि दिग्दर्शन हे त्याच्या अफाट यशाचं प्रमुख कारण आहे. दिग्दर्शक डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वाईस यांनी गेल्या सहा सत्रामध्ये मालिकेवर खुप घेतलेली मेहनत यामधून दिसून येते. महाभारतात जशा भीष्म, भगवान कृष्ण, अर्जुन, कर्ण, भीम अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वत:ची एक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा थेट परिणाम शेवटी हस्तिनापूरचे साम्राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धात दिसून येतो. महाभारताप्रमाणे ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्येही अशीच काही पात्र आणि त्यांच्या कहाण्या पाहायला मिळतात. उत्साह, हिंमत, जबरदस्त संगीत, अत्याधुनिक तंत्रज्ञान, थ्रीडी अ‍ॅनिमेशन, चित्रीकरणासाठीचे भव्य सेट, आकर्षित करणारी वेशभूषा यामधून सजणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका दिग्दर्शक आणि कलाकारांच्या आयुष्याला कलाटणी आहे. असो. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ जगातील असंख्य सिनेरसिकांच्या मनात अनेक वर्षे जिवंत राहणार हे नक्की... गेम ऑफ थ्रोन्स’च्या सातव्या भागाचे ट्रेलर :
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
विधिमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ पक्षातील फूट असा होतो का? निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Embed widget