एक्स्प्लोर

‘न्यूड’... एक अनुभव!

अम्मा आत आली. त्या मोठ्या वर्गाचे भले मोठे आणि प्रचंड दार लावण्यात आले... मध्यभागी टेबलाद्वारे तयार केलेल्या स्टेजवर चढली आणि इकडे तिकडे न बघता आपले कपडे काढू लागली.. सगळेच मान खाली घालून बसून होते.. अम्माला सरांनी कमरेवर हात ठेऊन उभी राहाण्यास सांगितलं आणि आम्ही नकळत मान वर करुन पेन्सिल हातात घेऊन स्केचिंग करु लागलो..

कापड हे फक्त शरीर झाकण्यासाठी चढवलं जातं. आत्मा कशानेच झाकला जात नाही, हे वाक्य ‘न्यूड’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधलं. ‘न्यूड’ नावाचा चित्रपट आणि त्यावरुन निर्माण झालेले वाद... चित्रपटाचा ट्रेलर बघताना मी आणि माझ्यासारखे कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या अनेकांना, आयुष्यातले ते ‘न्यूड’चे तास नक्कीच आठवले असतील. माझं शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधलं. सुरुवातीला विद्यार्थ्यांना पुतळ्यांवरुन फिगर स्केचिंगचा सराव करायला सांगायचे. अनेक तांत्रिक गोष्टी शिकवल्या जायच्या. काही स्वतःच्या दृष्टीने टिपायला लागत असत. पुढे पेंटिंग हा विषय निवडला आणि महिन्याभरातच तो ‘न्यूड’ चा दिवस आला.. एक स्त्री, मध्यमवयीन, तजेलदार, रंग सावळा, अंगकाठी स्थूलतेकडे झुकणारी, कपाळावर मध्यम आकाराची टिकली, केसात अबोली आणि चमेलीचा फुटावर मिळणारा गजरा, अंग झाकण्यासाठी भडक नायलॉनची साडी तिने नेसली होती.. चेहऱ्याने अतिशय रेखीव होती ही अम्मा... अम्मा कारण आम्हाला येणाऱ्या प्रत्येक न्यूड मॉडेल या तेलुगू होत्या. त्या दिवशी भीती, लाज, कुतूहल सगळंच मनात दाटलं होतं.. आदल्या आठवड्यात पुढल्या आठवड्यात कोणता विषय आहे, हे कळलेलं असल्याने मनाची ही स्थिती असावी. फक्त माझीच नाही, तर अनेकांच्या मनात प्रश्नांचा काहूर माजला असावा. आमचे शिक्षक प्रभाकर कोलते वर्गात आले. बरं आमचे वर्ग म्हणजे भल्या मोठ्या खोल्या... इतर कॉलेजमधल्या वर्गांपेक्षा खूप वेगळे. उंच छप्पर, लाकडी दरवाजे, लाकडी फळ्यांची जमीन. या भल्या मोठ्या वर्गात इझेल मांडलेले... कोणत्याही दिशेला उभे राहावं किंवा बसावं असं मुक्तं वातवरण... मात्र त्या दिवशी आमचे इझेल्स गोलाकार पद्धतीने मांडून ठेवले होते.. कोलते सरांनी आम्हाला न्यूड स्केचिंग त्याचं महत्वं आणि लाईव्ह मॉडेल बद्दल सांगितलं.. थोडी भीती गेली, पण तरी मन ओशाळलं होतं... अम्मा आत आली. त्या मोठ्या वर्गाचे भले मोठे आणि प्रचंड दार लावण्यात आले... मध्यभागी टेबलाद्वारे तयार केलेल्या स्टेजवर चढली आणि इकडे तिकडे न बघता आपले कपडे काढू लागली.. सगळेच मान खाली घालून बसून होते.. अम्माला सरांनी कमरेवर हात ठेऊन उभी राहाण्यास सांगितलं आणि आम्ही नकळत मान वर करुन पेन्सिल हातात घेऊन स्केचिंग करु लागलो.. विद्यार्थी आपापसात बोलत नव्हते.. अनेकांच्या मनात मात्र बोलणं सुरु असावं.. त्या दिवशी खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळकदेखील कानात गोंगाट करताना जाणवत होती. माझ्या मनात अनेक प्रश्नांचा काहूर माजला होता.. यंत्रासारखी मी स्केचिंग करत होते.. आमचा एक विषय संपूर्ण आठवडा चालत असे.. त्यातले दोन दिवस निघून गेले.. कदाचित माझ्या मानतली चलबिचल माझ्या वडिलांना जाणवली असावी. त्यांनी विचारलं आणि मी न्यूड स्केचिंगबद्दल सांगितलं. माझे हात आखडतायेत. स्केच येतच नाही असं सांगितलं.. त्यावर त्यांनी एका वाक्यात मला समजावलं.. शरिराच्या प्रत्येक भागावरची दिसणारी वळी हे एक सुंदर वळण आहे असं समज.. ती स्त्री किती सुंदर आहे ते जाणून घे.. तिसऱ्या दिवशी मी जेजेच्या पोर्चमध्ये बसले असताना अम्मा तिथे आली.. ती शांतपणे आपला डब्बा उघडून खात होती.. माझ्या शेजारीच पायऱ्यांवर बसली होती.. मला ओशाळल्या सारखं झालेलं पाहून तिनेच माझ्याशी संवाद साधला.. हळूहळू माझ्या मनातले प्रश्न परत वर डोकं काढू लागली.. तिचं नाव, ती कुठे राहाते, मूळची कोणत्या गावची.. मुंबईत का आली.. आणि हे काम का करते.. तिला काय वाटत असेल.. तिला कदाचित हे परिचयाचं होतं.. त्यामुळे अम्मा आपणहून बोलू लागली.. पोटा-पाण्याचा प्रश्न आहे.. नवरा आजारी, लहान मुलगी घरात.. खरचं कसं भागवणार.. वगैरे… ती सांगत होती, अन् मी मन लावून ऐकत होते. अम्मा म्हणाली सुरवातीला खूप भीती, लाज आणि वाईट वाटत असे.. पण आपण फक्त वरचं शरीर दाखवतोय.. एका पुतळ्यासारखे… लोकांना आपल्या शरिराची वळणं रेखाटायला आवडतात, आपल्या मनातली वळणं कोणालाही ठाऊक नाहीत.. मग काय हरकत आहे वरचं रुप दाखवायला.. असं कळलं आणि लाज गेली.. कालांतराने सवय झाली.. आता कामाला जावं तसं मी येते, काम करते पैसे घेते आणि घरी जाते. अम्मा सहज सांगत होती.. माझ्या मनात तिच्या बद्दलचा आदर वाढला होता.. कारण शेवटी आपल्या घराला वाचवण्यासाठी, संसाराला हातभार लागावा म्हणून इतर स्त्रियांसारखी ती देखिल मेहनत करत होती.. पहिलं न्यूड स्केच अर्धवट राहिलं.. दुसऱ्या ‘न्यूड’च्या आठवड्यात अम्मा परत आली.. स्टेजवर चढली कपडे काढले, पोझ घेतली आणि माझ्याकडे पाहून स्मित हासली.. त्या दिवशी तिच्या शरिरावर पडलेल्या वळ्या, सुंदर वळणं दिसू लागली.. तिच्या काळ्या रंगात अधिक तेज दिसू लागलं.. हातात असलेली पेन्सिल सहज न अडखळता रेखाटू लागली..  त्या दिवसापासून मला माझ्या नग्न शरिराची कधीही लाज वाटली नाही.... ते चित्र पूर्ण झालं…
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget