एक्स्प्लोर

काल रात्री बाराचा पाऊस...

ती स्पर्धा काल रात्री "बाराच्या ठोक्याला" संपली, तेव्हा इतकी वर्ष लयीत एकापाठोमाग एक चाललेल्या ह्रदयाच्या करोडो ठोक्यांपैकी "एक ठोका" मात्र नकळत चुकलाच...

आईच्या उदराचा स्वर्ग सोडून जगात येतानाही 'कदाचित' जे रितेपण मनाला वाटलं असेल, तेच रितेपण पुढं कोणतीही मोठी गोष्ट संपताना कायम टिकलं, चौथीची परीक्षा संपल्यावर, रमत गमत घरी येताना, पेन पेन्सिल, खोडरबर सगळं दोनदा आठवनीने सोबत घेतलं असतानाही... मागे बघत "काहीतरी आपण परीक्षा हॉल मधेच विसरलोय" अशी घरी पोचेपर्यंत मनात आलेली भावना... दहावीच्या निरोप समारंभानंतरच्या गोंगाटातही ह्रदयाची झालेली एकलकोंडी घालमेल... दहावीच्या शेवटच्या पेपरनंतर एकूणच शरीरात तयार झालेली निर्वात पोकळी, त्यात भिरभिरणाऱ्या असंख्य भावना... बारावीच्या शेवटी काढलेल्या ग्रुप फोटोनंतर, आयुष्याचं एक पर्व संपल्याची आलेली unsatisfying फीलिंग... दहावी, बारावी, इंजिनीअरिंगमधल्या शेवटच्या गॅदरिंगनंतर डोळ्यांनी एकट्यात केलेला प्रचंड ओक्साबोक्सीपणा, इंजिनीअरिंगच्या शेवटच्या पेपरनंतर अंगावरचा शर्ट फाडतानाच्या आनंदात-कुठंतरी लपलेलं ईवलंसं प्रचंड दुःख. आयुष्यातला पहिला जॉब सोडताना लास्ट डे ला, घरी जाताना भयान संध्याकाळच्या गर्दीत रोडवर फुटपाथ वरनं चालताना, डोळ्यात डोकावलेले दोन थेंब, भावा, बहिणी, जवळच्या मित्र मैत्रिणीच्या, लग्नात 10 दिवस-रात्र केलेली प्रचंड धावपळ अन् लग्न झाल्यावर सगळे निघून गेल्यावर सुन्या झाल्या मंडपाच्या झालरीसारखं एकट्यात फडफडणारं मन... स्वतः पुढाकार घेऊन पार पाडलेल्या एका मोठ्या यशस्वी समारंभानंतर ह्रदयात निर्माण झालेला डोंगराएव्हढा पोकळपणा...... हे सगळेच्या सगळे आनंदाचे क्षण असूनही, शेवटी सगळं संपल्यानंतर मात्र जोराजोरात भिरभिरणारं मन तेव्हा e=mc2 मधल्या m इतकं न मोजता येण्याऐवढं अवजड होतंच होतं... अगदी तसंच गेले 45 दिवस जी गावं स्पर्धेत अहोरात्र झटली, ज्या 7 लाखाच्या वर लोकांनी आपलं घरदार सोडून श्रमदानाच्या ठिकाणालाच आपल्या घराचा उंबरा बनवलं, ती स्पर्धा काल रात्री "बाराच्या ठोक्याला" संपली, तेव्हा इतकी वर्ष लयीत एकापाठोमाग एक चाललेल्या ह्रदयाच्या करोडो ठोक्यांपैकी "एक ठोका" मात्र नकळत चुकलाच... पण हेही तितकंच खरंय की लयीतल्या या करोडो ठोक्यांपेक्षा ,सगळ्यांच्या आयुष्यभर सोबत अन् लक्षात राहिल तो हाच एक 'चुकलेला" ठोका... अनेक ठिकाणी थंड वारा न लागताही, कित्येकांच्या डोळ्यातला काही थेंब पाऊस, या गरम तापल्या जमिनीवर पडलाच पडला.............. एक रुपयाही कोणाला न देता, असा पाऊस पाहायचं भाग्य ज्या पानी फाऊंडेशन चळवळीला लाभलं-- त्याचं खरंच अभिनंदन... सचिन अतकरे यांचे याआधीचे ब्लॉग : अपयशावरचा पहिला घाव..!! धमन्या पेटलेले 40 सैनिक... जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई सलाम दोस्तहो... ...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...! द ग्रेटेस्ट वॉटर हिरो - अजित देशमुख
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
ABP Premium

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Embed widget