एक्स्प्लोर

विमान निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवणारा अवलिया, अमोल यादव

सुरुवातीला अमोलनं दोन विमानं बनवली पण त्याता त्याला यश आलं नाही. पण संघर्ष करायचाच ही वृत्ती असलेल्या अमोलनं तिसरं विमान बनवण्यासाठी कंबर कसली.

मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है… पंखो से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है… या ओळी तंतोतंत लागू होणारी व्यक्ती म्हणजे डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव.. फक्त स्वप्न पाहत बसण्यापेक्षा ती सत्यात उतरवण्याची धमक ज्यांच्या मनगटात असते त्याच व्यक्ती इतिहास घडवतात. असाच इतिहास अमोल यादव या अवलियानं घडवला आहे. मध्यवर्गीय कुटुंबातील लोकं जिथं विमानात केव्हातरी बसायला मिळावं यासाठी वर्षानुवर्ष प्लॅनिंग करतात तेव्हा वयाच्या अठराव्या वर्षी आणि ते देखील मध्यमवर्गीय कुटुंबातील अमोल मात्र विमान बनवण्याचं स्वप्न पाहत होता. स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरवणं यात जमीन-आस्मानचा फरक असतो. पराकोटीच्या संघर्षाची तयारी असल्यास स्वप्न सत्यात उतरतात. असाच पराकोटीचा संघर्ष अमोलनंही केला. आजही त्याचा संघर्ष सुरुच आहे. जेव्हा स्वप्न सत्यात उतरवायचं असा निश्चय होतो, तेव्हा त्याला प्रचंड मेहनतीची गरज असते. पण अनेकदा प्रचंड मेहनत करुनही अपयश हाती येतं. त्यातूनच धडा घेऊन जे पुन्हा भरारी घेतात. तेच यशस्वी होतात. असंच थोडसं अपयश पदरी घेत, कधी धडपडत पण अजिबात विचलित न होता अमोलनं आपला प्रवास सुरुच ठेवला. Amol_Yadav वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजेच बारावी पास झाल्यानंतर अमोल वैमानिकाच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. त्याचवेळी अमेरिकेत एक जुनं विमान विक्रीसाठी असल्याचं त्याला समजलं. तेव्हा त्यानं आणि त्याच्या मित्रांनी चक्क ते विकत घेतलं. हेच विमान अमोल दररोज पुसून काढायचा. त्यासाठी त्याला तब्बल दोन तास लागायचे. यातूनच अमोलची मेहनती वृत्ती दिसून येते. अमोलनं अमेरिकेत घेतलेलं विमान छोटसचं होतं. पण याचवेळी आपण स्वत: विमान बनवावं. हे त्याच्या मनात आलं आणि इथूनच सुरु झाला त्याच्या स्वप्नाचा प्रवास! अमेरिकेतून वैमानिकाचं शिक्षण पूर्ण करुन आल्यानंतर स्वत:चं विमान बनवायचं हे त्याच्या डोक्यात कायम होतं. विमान बनवायचं म्हटल्यावर कुणीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण याच वेळी त्याला त्याच्या घरच्यांनी खंबीर पाठिंबा दिला. विमानाच्या इंजिनासाठी अमोलच्या आईनं तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून अमोलला पैसे दिले होते. याची जाणीव ठेऊन अमोल टप्प्याटप्प्यानं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होता. पण विमान बनवणं म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नव्हती. त्यामुळे यासाठी पैसे त्याला अपुरे पडू लागले. तेव्हा त्यानं नोकरी करण्याचा निर्णय घेतला. जेट एअरवेज सारख्या प्रतिष्ठित विमान कंपनीत तो रुजू झाला. त्यामुळे अगदी ऐषोआरामी जीवन जगणं त्याला सहज शक्य झालं असतं. पण त्याच्या डोक्यात घोंघावत होतं ते स्वत:चं विमान... या नोकरीतून अमोलला बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. तेव्हा पुन्हा एकदा त्यानं विमान बनवण्याचं काम सुरु केलं. सुरुवातीला अमोलनं दोन विमानं बनवली पण त्याता त्याला यश आलं नाही. पण संघर्ष करायचाच ही वृत्ती असलेल्या अमोलनं तिसरं विमान बनवण्यासाठी कंबर कसली. कधी जागेची अडचण, कधी पैशाची चणचण या सगळ्यावर मात करत अमोलनं चार वर्षाच्या अथक प्रयत्नानं स्वत:चं विमान तयार केलं. आकाशात उडणारं विमान, अमोलनं घराच्या गच्चीवर बनवलं! अखेर हे विमान तयार झालं आणि ‘मेक इन इंडिया’ वीकमध्ये ते सादरही केलं. तेव्हा त्याच्या या कामगिरीनं अनेकजण अवाक् झाले. Amol_Yadav_1 आजही भारतात विमान तयार करणारी कंपनी नाही. एक विमान आपण 1000-1000 कोटींना विकत घेतो. विमान तयार करण्याच्या या प्रोजेक्टसाठी अमोलनं फक्त 200 कोटीचं बजेट दिलं आहे. देशासाठी फायटर प्लेन आणि छोट्या शहरांना जोडणारी विमानं तयार करणं हे अमोलचं खरं स्वप्न आहे. सरकारकडून अमोलला पालघरमध्ये 157 एकर जागा मिळाली असून आता विमानाचा कारखाना तिथं लवकरात लवकर उभा राहावा यासाठी तो अहोरात्र झटत आहे. विमानं तयार करायची ती देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी... हे जेव्हा अमोल म्हणतो तेव्हाच त्याची या मातीशी नाळ जोडलेली आहे हे सहज लक्षात येतं. ‘स्वप्न पाहण्याला कोणाचीच बंदी नाही. ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती हवी. तुमच्या स्वप्नाला तुम्ही दिलेली 'किंमत' हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे,’ असं म्हणणाऱ्या अमोलची इच्छाशक्ती किती जबरदस्त असेल हे देखील यानिमित्तानं दिसून येतं. त्यामुळे विमानाप्रमाणेच अमोलनंही उंचच उंच भराऱ्या घ्याव्यात आणि आकाशाला गवसणी घालावी. हीच अपेक्षा... एकीकडे सरकार मेक इंडिया, डिजीटल इंडिया यासारख्या योजना राबवत आहेत. पण आजही अमोलसारख्या अनेक क्रिएटिव्ह तरुणांना सरकारकडून, समाजाकडून खरी गरज आहे ती प्रोत्सहनाची. फक्त सरकारच नाही तर समाज म्हणून आपण आजही कमी पडतो. पण तरीही अमोलसारखे तडफदार तरुण याची तमा न बाळगता आपली स्वप्न सत्यात उतरवतात... तेव्हा त्यांची ही स्वप्नं तुम्हा-आम्हाला एक चपराक असते. माझा कट्टा : विमान बनवणाऱ्या अमोल यादव यांच्याशी गप्पा
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget