एक्स्प्लोर
पुरातील देवदूत
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसला. आलास गावात जर कोणी गेलं तर एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे धुळाप्पा आंबी यांची. 2005 मध्ये आलेल्या पुरात देखील त्यांनी हजारो लोकांना आपल्या बोटीतून वाचवलं.. यावर्षी देखील आंबी यांनी 5000 हून अधिक लोकांना वाचवलं..
कोल्हापूर आणि सांगलीतील पूर ओसरला आहे..पण त्यानंतर आता पुराच्या काळात सामान्य लोकांनी दाखवलेल्या साहसाच्या गोष्टीची चर्चा आता गावागावात होत आहे.
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसला. आलास गावात जर कोणी गेलं तर एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे धुळाप्पा आंबी यांची. आंबी यांनी अनेक लोकांना वाचवलं, सतत होडी चालवत होते.. ऐकून त्यांना शोधत त्यांच्या घरी पोहोचले.
अतिशय साधं घर, गणपती बाप्पाची पूजा नुकतीच झाली होती. अतिशय छोट्या घरात राहणाऱ्या आंबी यांनी घरात बोलवलं... पाणी दिलं.. आणि गप्पा मारायला सुरुवात केली..
धुळाप्पा आंबी नाविक आहेत, गेली चाळीस वर्षे ते बोट वल्हवतात. त्यांच्या उदरनिर्वाहाचे ते एक साधन आहे. 2005 मध्ये आलेल्या पुरात देखील त्यांनी हजारो लोकांना आपल्या बोटीतून वाचवलं.. यावर्षी देखील आंबी यांनी 5000 हून अधिक लोकांना वाचवलं..
शिरोळ तालुक्यातील आलास गावात पाणी भरायला सुरुवात झाली.. गावातील उंच ठिकाणी जमतील तितकी जनावरं, महिलांना हलवण्यात आलं.. पण पाणी वाढत होतं.. NDRF ची मदत पोहोचली नव्हती. आंबी यांनी आपल्या दोन्ही मुलं आणि गावातील काही मुलांच्या सहाय्याने बोटीतून लोकांना गावातून बाहेर काढायला सुरुवात केली. आलास गाव ते कवठेबुलदमाळ या ठिकाणी लोकांना सुरक्षित हलवायचे होते.. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे अंतर अडीच किमी होतं.. बोटीत 40-45 जण असायची..कोणालाही त्रास होऊ नये, सगळ्यांनी सुरक्षित राहावं याची काळजी धुळाप्पा यांनी घेतली.
ते सांगत होते, "पाणी कसं आहे, कुठे करंट आहे हे पाहून नाव वल्हवत होतो. मोठी फेरी मारावी लागली तरी मारली..पण लोक सुरक्षित राहिली पाहिजे.. जीव महत्त्वाचा आहे. "सकाळी वल्हवायला सुरु करायचो, संध्याकाळी डोळ्याला दिसेल तोपर्यंत नाव चालवायचो"
त्यांच्या बाजूला बसलेली त्यांची बहीण कौतुकाने सांगत होती 8 तारखेपासून 17 तारखेपर्यंत भावाने नाव वल्हवली.. खायला काही मिळायचं नाही..कोणी काही दिलं तर बिस्कीट पाण्यात बुडवून खाल्ली.. धुळाप्पा मात्र मी माझं काम केलं सांगत होते..गावात पाणी भरल्यावर सगळ्यांनी पुढे येऊन मदत केली, लोकांनी लोकं वाचवलं हे आवर्जून धुळाप्पा सांगतात..
पण एकप्रसंग त्यांनी सांगितलं.. गावातील जनावरांना चारा घेऊन जायचा होता.. तर गावातील दोन पक्षातील नेत्यांमध्ये भांडण झालं.. तू त्याचा चारा घेऊन जातो, माझा नाही असा वाद झाला. "मी चारा घेऊन जाणार सगळ्यांसाठी.. चारा ह्याचा किंवा त्याचा नाही.. तुमचं राजकारण माझ्या नावेच्या बाहेर ठेवा," असं धुराप्पांनी त्यांना स्पष्ट सांगितलं. पुरासारख्या कठीण परिस्थितीत माणूस, जनावरं सगळ्यांचे जीव महत्वाचे हे या नाविकाने आपल्या कृतीतून दाखवून दिलं..
धुळाप्पा यांच्या कामाचं कौतुक झालं.. कुठे सत्कार झाले..पण जे काही आहे देवाची कृपा, आपण काम करत राहायचा हा निस्वार्थ भाव त्यांच्या बोलण्यात होता.. दिवसाला 10-15 फेऱ्या, सतत नऊ दिवस.. कोणाच्याही जीवाला धोका न होता.. धुळाप्पा आंबी आलास गावासाठी देवदूत ठरले हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement