एक्स्प्लोर
BLOG | पोलीस हवालदार, शिपाई अन् नाईक यांच्या व्यथा..
दररोज बाहेर फिल्डवर काम करून आल्यावर घरात जाताना टेन्शन असतं की आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये. घरी गेल्यावर अंघोळ करणे, आपले कपडे धुणे, घरच्यांपासून लांब राहणे, झोपणे..
अत्यावश्यक सेवेत असलेली डॉक्टर्स आणि पोलीस सध्या कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहे. काम करताना ह्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. असं असतानाही ते कर्तव्य बजावत आहे.
नुकताच पोलीस दलातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून पोलीस दलातील विशेषतः हवालदार, पोलीस शिपाई, पोलीस नाईक यांच्यात भीतीचं वातावरण आहे.
सध्या फिल्डवर सगळ्यात जास्त वेळ काम करणारे हे पोलीस आहेत. लोकांना सामोरे जाणारे देखील पोलीस फोर्स आहे.
कोणी 12 तास काम करत आहे तर कोणी 24 तास. घरून प्रवास करून इतके तास काम केले तरी तक्रार नाही,
पण ह्या पोलिसांना भीती आहे ती आपल्या कुटुंबाची..
दररोज बाहेर फिल्डवर काम करून आल्यावर घरात जाताना टेन्शन असतं की आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये. घरी गेल्यावर अंघोळ करणे, आपले कपडे धुणे, घरच्यांपासून लांब राहणे, झोपणे..
ह्यातूनन सरकारने मार्ग काढला पाहिजे अस ह्या पोलिसांना वाटतं..
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात अनेक हॉटेल रिकामी झाली आहेत. तिथे ह्या पोलीस शिपाई, हवालदार यांची राहण्याची सोय केली तर किमान घरचे सुरक्षित राहतील असं ह्या पोलिसांना वाटतं.
जर राहण्याची व्यवस्था करता नाही आली तर किमान पोलिसांच्या कुटुंबियांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशीही विनंती पोलीस करत आहे. परराज्यातील मजुरांसाठी सरकार बसची व्यवस्था करायला तयार आहे तर पोलीस दलातील पोलिसांच्या कुटुंबियांचा सरकार सहानुभूती पूर्वक विचार करेल का? आमच्यासाठी वाहन व्यवस्था करू नका, आम्हीच करू पण किमान कुटुंबाला गावाला सोडण्याची तरी परवानगी द्यावी अशी भावना एक पोलिसाने व्यक्त केली.
दुसरी एक भावना पोलिसांनी बोलून दाखवली ती म्हणजे टेस्ट. अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस आहेत. त्यांना टेस्ट करायची असेल तर त्याची व्यवस्था लवकर झाली पाहिजे. हवालदार, शिपाई ह्यांना टेस्टच्या चार हजार देणे हे परवडत नाही. अशा वेळी टेस्टचा खर्च पोलीस फंडातून केला पाहिजे, अशीही मागणी पोलिसांकडून येत आहे.
या सर्वात मोठी कुचंबणा होत आहे ती महिला पोलिसांची. बंदोबस्तासाठी जाणाऱ्या महिला हवालदार यांना शौचालय सुविधा नाही. जवळपास कुठे टॉयलेट असेल तर विनंती करून त्यांना जावं लागतं. कुठे कोणी सहकार्य करतं कोणी नाही. सार्वजनिक शौचालयात गेल्यास संसर्ग होण्याची भीती मनात असते.
बंदोबस्त वर जाणाऱ्या महिला हवालदाराने सांगितले की ज्या भागात बंदोबस्तासाठी जातो तेथील स्थानिक पोलीस स्थानकातही कपडे बदलायला किंवा टॉयलेटला गेल्यावर तिथे विशेष चांगली वागणूक मिळत नाही. सहकार्य केले जात नाही. आम्ही पण पोलीस दलात आहोत. काम करतो मग आमच्याच दलातील लोक का अशी वागणूक देतात? असा उद्विग्न सवाल एक महिला पोलीस हवालदार यांनी उपस्थित केला.
या आणि अशा अनेक समस्यांना सध्या पोलीस हवालदार आणि शिपाई सामोरे जात आहेत. कोणीही कॅमेरासमोर येऊन बोलू शकत नाही. पण, त्यांनी आपल्या भावना आणि अडचणी मात्र नाव न सांगण्याचा अटीवर मांडल्या आहेत.
पोलीस दलात आलो तेव्हाच माहीत होतं हे काम किती जिकिरीचे आहे. कोरोनाच्या संकट समयी काम करत आहोत, त्याची भीती नाही पण कुटुंबाला तरी सुरक्षित ठेवलं तर मदत होईल अशीच भावना या पोलिसांनी व्यक्त केली. शारीरिक पेक्षा मानसिक त्रास जो होतोय तो तरी थांबेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली
(हवालदार, शिपाई, पोलीस नाईक ही तशी खालची रँक आहे, अधिकाऱ्यांना सुविधा मिळतात पण आमच्याकडे कोण बघणार अशी भावना त्यांच्या मनात आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना गावी हलवलं आहे, पण हवालदार, शिपाई ह्यांना परवानगी मिळाली नाही. कोणी पाठवलं तर कारवाई झाल्याचे पोलीस सांगत होते.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement