एक्स्प्लोर

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन

दूरदूरपर्यंत वाळवंटात एखादं झुडूपही तग धरु शकत नाही. मात्र या परिस्थितीतही इथल्या लोकांचं मन मात्र हिरवंगार आहे. इथे पुरेसं पाणी नाही... मात्र या लोकांचं दिल दरिया आहे आणि पाण्यासारखं निर्मळही. जे जसं आहे, ते तसं स्वीकारून आनंदाने जगायला शिकवतात इथली माणसं. अरवलीची हिरवीगार पर्वतरांग मरुभूमी वाळवंटाला आपल्या कवेत घेऊन इथेच आनंदानं नांदते.

जयपूरला 'पिंक सिटी' म्हणजेच 'गुलाबी शहर' म्हणतात. कारण या शहराचं जसं तन गुलाबी आहे तसंच मनही प्रेमळ आहे. गुलाबाच्या शेतीचा आणि जयपूरचा  काहीही संबंध नसला तरी इथल्या लोकांचा स्वभाव मात्र गुलकंदासारखा मधुर आहे. याचा अनुभव मला आज सकाळीच आला. 19 जुलैची सकाळ! माझा राजस्थान दौऱ्याचा हा शेवटचा दिवस. आज सिटी पॅलेस, हवा महल आणि इतर ठिकाणी मस्त फिरुन रात्री अमृतसरला निघणार होतो. त्यामुळे सकाळीच हॉस्टेलमधून चेक आऊट केलं. सिटी पॅलेस सकाळी नऊ वाजता उघडत.  मी माझ्या दोन बॅग घेऊन रिसेप्शनला आलो. दिवसभर या दोन बॅग घेऊन फिरणं अवघड होतं.  इथेच बॅग ठेवून संध्याकाळी जाताना त्या  घेऊन जाव्यात, असं एकदा वाटलं..  पण म्हटलंं नकोच, माझ्या बॅगची जबाबदारी हे लोक कशाला घेतील? हे विचार मनात सुरु असतानाच हॉस्टेलचा मालक प्रितम आपणहून म्हणाला, "अरे, आपकी गाडी तो रात में है ना?  तो ये सामान दिनभर कहा रखोगे? ऐसा किजिए, यही रख दिजिएI दिनभर आराम से घुम लिजिए और शाम को यहीं से स्टेशन चले जाईए"
मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. किती गोड लोकं आहेत ही! प्रितमचे आभार मानून मी सिटी पॅलेसकडे निघालो.हॉस्टेलपासून सिटी पॅलेस अगदी जवळ म्हणजे चालत 20 मिनिटांवर  होता. पण वातावरणात प्रचंड उकाडा होता. नऊलाच उन इतकं तापायला लागलं, की घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यामानाने कालचा दिवस  बरा होता. काल दिवसभर आम्ही बाईकवर फिरलो. आकाशात ढग असल्याने तशी बऱ्याापैकी सावली मिळाली. पण आज काही खैर नव्हती. मी मुख्य बाजारातून आडोशाने चालत सावलीतून रस्ता काढत सिटी  पॅलेस गाठला.
 राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन प्रत्येक शहाराची एक ऐतिहासिक ओळख असते. तशी जयपूरच्या खानदानी राजकीय वैभवाची कहाणी सांगणारा हा सिटी पॅलेस. दोनशे रुपयांचं तिकिट काढून मी सिंहद्वारातून प्रवेश केला तसे चार पाच जण माझ्याकडे धावत आले. एव्हाना मी या प्रकाराला सरावलो होतो. "गाईड चाहिए? गाईड लिजिए?" असा गलका सुरू केला.  त्यातला एका शहाण्याने तर  सरळ माझा हात पकडून थेट पॅलेसचा इतिहासच सांगायला सुरूवात केली. शेवटी मी विनंतीवजा दम भरत माझी सुटका करुन घेतली. सामान्यपणे प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेली असते आणि नसली तरी  गूगल आहेच की! त्यामुळे मला गाईडची वगैरे कधीच गरज भासत नाही. पण सिटी पॅलेसमधले गाईड् हे राजाचे पिढ्यान् पिढ्या सेवक असलेल्यांचे वंशज आहेत,  असं मला नंतर कळलं. जुन्या जयपूर शहराच्या मध्यभागी वसलेल्या  यासिटी पॅलेसवर राजस्थानी आणि मुुगल वास्तूकलेचा प्रभाव आहे. संगमरवरी स्तंभांवरची नक्षीदार फुलं आणि भिंतीवरच्या विविध आकृत्या  नजरेत भरतात. इथे वेगवेगळी संग्रहालयं आहेत. इथे राजा महाराजांचे पोषाख, मुघल आणि राजपुतांची शस्त्रास्त्रं, इंग्रजांच्या काळातल्या बंदुका, दुर्मीळ हत्यारं आहेत. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन चन्द्रमहालाची सुंदर वास्तू सिटी पॅलेसच्या सौंदर्यात भर घालते. यामध्ये दोनच मजले पर्यटकांसाठी खुले आहेत. सगळ्यांत महत्वाचा चौथा मजला.  इथे सोनं, काचा आणि अभ्रकाची सुंदर कलाकारी आहे. सर्वांत वरच्या मजल्याला मुकूट महाल म्हणतात. कारण तो मुकूटासारखा भासतो.
मुबारक महल हा पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराजा माधो सिंह द्वितीय यांनी उभारला. महाराजा माधो सिंह हे इंग्लंडला गेले असताना चांदीच्या घड्यामध्ये पिण्यासाठी गंगाजल घेऊन गेले होते. गिनीज बुकात सर्वांत मोठे घडे म्हणूनही यांची नोंद आहे. त्या चांदीच्या विशालकाय घड्यांचं इथे दर्शन होतं.राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन जवळच प्रीतम चौक नावाचं दालन आहे याचे  चारही दरवाजे सुंदर अलंकृत आहेत. हौशी फोटोग्राफर्ससाठी हे चारही दरवाजे एकदम खास आहेत. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन सिटी पॅलेसमध्ये अनेक दुकानंही आहेत. पण बाहेरच्या मार्केटमध्ये त्याच वस्तू कमी दरात मिळतात. त्यामुळे तिथे खरेदी करायचं मी टाळलं. दीड-दोन तास सिटी पॅलेस बघायला लागतात. मी 12 च्या सुमारास बाहेर पडलो. सिटी पॅलेसच्या गेटच्या समोरच जंतर मंतर आहे.
दिल्लीचं जंतर मंतर आपण बऱ्याचदा बातम्यांमध्ये ऐकतो. ती  आंंदोलन करण्यासाठीची जागा आहे की काय असा  आपला  समज असतो . परंतु तसं नाही. जंतर मंतर ही एक खगोल वेधशाळा आहे. ताऱ्यांची स्थिती आणि गती मोजण्यासाठी, किती वाजलेत हे बघण्यासाठी, एवढंच नाही तर ग्रहण कधी होणार हे सुद्धा अचूकपणे सांगणारी ही अद्भूत वेधशाळा. दिल्लीनंतर उभारलेली ही देशातली दुसरी वेधशाळा आहे. महाराजा सवाई जयसिंह यांनी 1724 मध्ये जंतर मंतरची वीट रचली. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1734 साली वेधशाळेचं काम पूर्ण झालं. इथे उभारलेली यंत्रं बघून,  भारतीय लोकांच्या गणित आणि खगोलशास्त्राच्या संकल्पना किती सटीक होत्या, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. स्वत: सवाई जयसिंह खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांच्या योगदानाविषयी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकात सविस्तर लिहिलंय. दिल्ली आणि जयपूरमधल्याच या जंतर मंतर वेधशाळा अजून सुस्थितीत आहेत.  उज्जैन, वाराणसी आणि मथुरामधल्या वेधशाळा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र जयपूरची वेधशाळा आजही अचूक अंदाज वर्तवत असल्याने युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये जयपूर जंतर मंतरनं स्थान मिळवलंय. इथे एकूण 14 यंत्रं आहेत. ही समजून घेण्यासाठी नीट वेळ द्यायला हवा.राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन जंतर मंतरमधून बाहेर पडल्यावर आता जाऊयात हवा महलकडे.. खरंतर हवा महल हे जयपूरचं खास आकर्षण. अगदी चालत पाच मिनिटांत मी हवा महलजवळ  पोहोचलो. मुख्य बाजारपेठेत 50 फूट उंच असणारी ही पाच मजली इमारत एखाद्या राजमुकुटासारखी दिसते. हा खरंतर हवा महलचा मागचा भाग आहे. मागचा भाग हा जास्त प्रेक्षणीय असणारी ही पहिलीच इमारत असेल.  याच बाजूने तिचे फोटो काढले जातात. ही इमारत जर मुख्य बाजारपेठेच्या ऐवजी एका स्वतंत्र ठिकाणी असती तर जास्त भाव खाऊन गेली असती,  असं मनात येऊन जातं. पण बाजारपेठेतच ही इमारत उभारण्यामागे एक खास कारण होतं. ते मला नंतर कळलं. राजघराण्यातल्या महिला या हवा महलमध्ये बसून त्या छोट्या छोट्या जाळीदार खिडक्यांमधून बाजाराचं निरीक्षण करत. शहरात नेमकं काय घडतंय हे बघत असत. कारण पर्दा प्रथेमुळे त्यांना थेट लोकांमध्ये मिसळता येत नसे. वाह, काय कमाल डोकं  चालवलंय राजाने. 1798 साली सवाई प्रताप सिंह यांनी या महालाची निर्मिती केली. या महालाला 953 छोट्या जाळीदार खिडक्या आहेत. लांबून मधमाशीच्या पोळ्यासारखं आपल्याला तो  दिसतो. खिडक्यांमधून गार वारं येतं. म्हणूनच याला नाव दिलं 'हवा महल'. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन दुपारी दीडच्या सुमारास भूक लागली. राजस्थान टूरमधल्या शेवटच्या  दिवशी माझ्या आवडत्या दाल-बाटी, चुरमावर ताव मारायलाच हवा.  शहराच्या या मध्यवस्तीत मस्त राजस्थानी रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. एके ठिकाणी जाऊन मी मेन्यू कार्ड न बघता दाल बाटी ऑर्डर केली. काही मिनिटांतच डिश समोर तयार. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन ज्या प्रदेशात झाडाला देव मानलं जातं. जिथे माणिकमोत्यापेक्षा ग्लासभर पाण्याला जास्त महत्व आहे, अन्नधान्य आणि हिरव्या भाज्या जिथे दुर्मिळ असतात अशा या राजस्थानी प्रदेशात खाणं लोकांना अगदी प्रिय असणं, हे स्वाभाविक आहे. इथल्या खाण्यात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या फार आढळत नाहीत. दाल बाटी हा एक खास प्रकार. खरंतर दाल बाटीची निर्मिती ही गरजेतूनच झाली. एकदा कणकेचे गोळे करून  ते वाळूमध्ये खड्डा करून पुरून ठेवायचे. कडक उन्हात वाळू तापल्यावर त्या कणकेच्या गोळ्यांची बाटी तयार व्हायची. युद्धकाळात सैन्याला हेच खाद्य असायचं. नंतर त्यात बरेच प्रयोग होऊन दाल बाटी ही राजस्थानच्या स्वयंपाकघराची शान बनली. जेवण झाल्यावर मी रिक्षाने अल्बर्ट म्युझियमला गेलो. हे राजस्थानमधलं सगळ्यात जुनं संग्रहालय आहे. अल्बर्ट हॉलची वास्तू रामनिवास बागेमध्ये महाराजा राम सिंह यांनी उभारली. 6 फेब्रुवारी 1876 रोजी महाराजा एडवर्ड (सातवे) प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आले. त्याप्रित्यर्थ अल्बर्ट हॉलचं निर्माण कार्य सुरू झालं. ही इमारत फारसी वास्तूशैलीमध्ये उभारण्यात आली.  अल्बर्ट हॉलसोबतच या वास्तूला सरकारी केंद्रीय संग्रहालय म्हणूनही ओळखलं जातं. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन अल्बर्ट हॉलमधे गेल्यावर तुम्हाला संपूर्ण राजस्थानचा इतिहास एका खोलीत सांभाळून ठेवलाय, असं वाटतं. काय नाही या संग्रहालयात? राजा महाराजांच्या ताट,  वाटी,  कपड्यांपासून ते युद्धात वापरल्या जाणाऱ्या अजस्त्र शस्त्रास्त्रांचा मोठा संग्रह इथे आहे. यासोबतच प्राचीन शिल्पं, चित्रं, हस्तीदंत, महागडे पाषाण असा प्रचंड मोठा संग्रह अल्बर्ट हॉलमध्ये आहे. अश्मयुगापासून ते अगदी आतापर्यंतच्या अनेक नव्या जुन्या वस्तूंचं हे संग्रहालय सवड काढून बघायला हवं. प्रत्येक वस्तू, चित्र, शिल्प आपला इतिहास सांगू पाहतं अल्बर्ट हॉलवरून निघाल्यावर त्याच रस्त्यानं पुढे 2  किमीवर बिरला मंदिर आहे. लक्ष्मीनारायणाचं हे पांढरं शुभ्र संगमरवरी मंदिर जयपुरला येणऱ्या प्रत्येकाला मोहवतं. मंदिराची वास्तूकला आणि आणि लक्ष्मीनारायणाची मूर्ती सुबक आणि सुंदर आहे. या मंदिरावर दक्षीण शैलीचा प्रभाव आहे. गुलाबी शहरात बिरला मंदिर एखाद्या सफेद कमलपुष्पासमान भासतं. लक्ष्मीनारायणाच्या दर्शनानंतर माझी जयपूर यात्रा आणि एकुणच राजस्थान टूर आता समारोपाकडे वळते. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन दुपारचे 4 वाजत आले होते. रात्री 9 वाजता गाडी असल्याने थोडा वेळ होता. इथल्या बाजाराविषयी बरंच ऐकलं होतं. काल आमेरला जाताना आम्ही त्याच बाजारातून गेलो होतो. पण फिरणं झालं नव्हतं.  त्यामुळे मी बापू बाजार गाठला. बापू बाजार म्हणजे जयपुरचा सर्वांत जुना बाजार. इथे प्रामुख्याने चादरी, बेडशीट, कपडे, साड्या, दुपट्टे, बॅग्ज मिळतात. मी उदयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि पुष्करच्या बाजारातही फिरलो होतो. त्या तुलनेत मला जयपूरचा बाजार थोडा महाग वाटला. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन इथे शेजारीच जौहरी बाजार आहे.  दागिने खरेदीसाठी लोक तिथे येतात. त्रिपोलिया बाजारात ट्रॅडिशनल स्टोन्स मिळतात. शिवाय नेहरु बाजारातही तुम्ही खरेदी करु शकता. मी मात्र वेळेअभावी बापू बाजारात फेरफटका मारुन परत हॉस्टेलला आलो. संध्याकाळी 6 वाजता हॉस्टेलवर पोहोचलो. रात्री सव्वा आठ वाजता अमृतसरसाठी गाडी होती. दिवसभर माझी बॅग ठेवू दिल्याने हॉस्टेलचा मालक प्रितमचे मी आभार मानले.  तो म्हणाला "आपकी गाडी को अभी बहोत टाईम है बैठ जाईए, यहां से स्टेशन 15 मिनट में पोहोच जाओगे आप!"
मग आम्ही जरा गप्पा मारत बसलो. प्रितम आणि त्याच्या तीन मित्रांनी जॉब न करता हॉस्टेल इंडस्ट्रीत व्यवसाय करायचं ठरवलं. सध्या फार काही हातात येत नाही,  पण लवकरच जम बसेल अशी त्यांना आशा आहे. सध्या या हॉस्टेलवर 30 परदेशी विद्यार्थी एका एनजीओच्या कामासाठी भारतात आले होते. ते चांगले महिनाभर इथेच राहत होते. संध्याकाळी ते आल्यावर प्रितम आणि त्यांचे मित्र एकत्र गेम खेळतात, जेवण बनवतात अगदी घरच्यासारखं वातावरण. हॉस्टेलचा उठण्या-बसण्याचा कॉमन एरिया खूप सुंदर आहे. इथे सगळी मुलं संध्याकाळी धमाल करतात. मी मुंबईचा म्हटल्यावर त्यांनी मला सजेशनही विचारलं.  गप्पांत वेळ छान  गेला आणि दिवसभराच्या थकव्यानं मी थोडासा रिलॅक्सही झालो.   7 वाजता rapido app वरून बाईक बोलावून प्रितम आणि त्याच्या मित्रांना शुभेच्छा देत निरोप घेतला. पुढच्या 15 मिनटांत मी जयपूर स्टेशनला पोहोचलो.गेले दहा दिवस मी धावत पळत प्रवास केला. एकटाच सगळीकडे फिरलो,  पण कधीच भीती वाटली नाही. काही अपवाद वगळता इथल्या लोकांचा मृदू स्वभाव समोरच्याला आपलंसं करतो. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे फार उद्योगधंदे राजस्थानमध्ये नाहीत. त्यामुळे टुरिझम हाच त्यांचा मुख्य व्यवसाय बनला. हे लोक अतिथीला देवासमान मानतात ते  उगीच  नाही. दूरदूरपर्यंत वाळवंटात   एखादं झुडूपही तग धरु शकत नाही. मात्र या परिस्थितीतही इथल्या लोकांचं मन मात्र हिरवंगार आहे. इथे पुरेसं पाणी नाही... मात्र या लोकांचं दिल दरिया आहे आणि पाण्यासारखं  निर्मळही. जे जसं आहे,  ते तसं स्वीकारून आनंदाने जगायला शिकवतात इथली माणसं. अरवलीची हिरवीगार पर्वतरांग मरुभूमी वाळवंटाला आपल्या कवेत घेऊन इथेच आनंदानं नांदते. सांस्कृतिक विविधता, बोलीभाषा, वेशभूषा, खानपान मैलामैलांवर बदलत जाते. दिवसभर कितीही तप्त वाटली, असह्य वाटली तरी रात्रीच्या अंधारात हिच वाळू गार होऊन आपल्या लेकरांना कवेत घेते. इथले गड, किल्ले, राजवाडे, महाल, वाळवंटातही तग धरुन असलेले तलाव आपल्या पूर्वजांचं शौर्यगीत मोठ्या अभिमानान गात असतात. निसर्ग भलेही इथे कोपलेला असेल पण आपलं कर्तृत्व, कलाकुसर, संगीत, खाद्यसंस्कृती आणि समृद्ध इतिहास या सामर्थ्यावर राजस्थान आजही समृद्ध आणि सुखी आहे. दहा दिवसांत राजस्थानच्या या जाडजूड पुस्तकातलं एक पानही मला धड वाचता आलं नाही. अजूनही कुंभलगड, रणथंबोर, बिकानेर, बाडमेर, कोटा-बुंदी, गागरोन, जालोर, जुनागड, अचलगड, अजबगड, सज्जनगड, हल्दी घाटी, अलवर, रणकपूर, राजसमंद, झालावार अशी अनेक ठिकाणं फिरायचं राहून गेलंच. पण काय करणार? कुठेतरी थांबावं लागतंच. हे सगळं पुढच्या दौऱ्यात फिरायचं ठरवून मी अमृतसरकडे निघालो. गाडी सुटली रुमाल हलले... अशी भावना दाटून आली. दहा दिवसांतल्या असंख्य आठवणी मनात साठवून माझा राजस्थानचा हा प्रवास इथेच संपला. पण कानात अजूनही मांगनियारांचं ते गाणं ऐकू येत होतं. साजन साजन मैं करूँ, तो साजन जीवज़डी। साजन फूल गुलाब रो, सुंघुँ घडी घडी। केसरिया बालम आवोनी, पधारों म्हारे देस!
आजचा खर्च --------------- सिटी पॅलेस तिकिट - 200 रु जंतर मंतर तिकिट - 50 रु हवामहल तिकिट - 100 रु दुपारचं जेवण - 150 रु अल्बर्ट हॉल संग्रहालय तिकिट - 100 रु रिक्षा आणि इतर खर्च 100 रु
जयपूर ते अमृतसर ट्रेन तिकीट - 425 ---------------- एकूण खर्च - 1125 रु ----------------
तळटीप - भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच.. हे ही वाचा
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
Operation Hawkeye : तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर; अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
अमेरिकेचा सीरियावर मोठा हवाई हल्ला; तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूनंतर ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
Operation Hawkeye : तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर; अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
अमेरिकेचा सीरियावर मोठा हवाई हल्ला; तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूनंतर ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
Indranil Naik : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांना नवी जबाबदारी?
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; इंद्रनील नाईकांना 'कॅबिनेट' मिळण्याची शक्यता, तर आमदार सना मलिकांना नवी जबाबदारी?
R. Madhavan On Akshaye Khanna: 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नामुळे आर. माधवन झाकोळला गेलाय? मॅडी म्हणाला, 'मी अंडरडॉग, पण तो वेगळ्याच लेव्हलवर...'
Pune News: तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक…राजकारणापलीकडची मैत्री, फुरसुंगी उरळी देवाचीमध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक, कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष
तीन वर्गमित्र, तीन पक्ष अन् प्रभाग एक…राजकारणापलीकडची मैत्री, फुरसुंगी उरळी देवाचीमध्ये पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक, कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष
Team India Squad For T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाणार?; अजित आगरकरांची पत्रकार परिषद, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज घोषणा
सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाणार?; अजित आगरकरांची पत्रकार परिषद, टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज घोषणा, कोणाकोणाला मिळणार संधी?
Embed widget