एक्स्प्लोर

हार्दिक पटेल गुजरातचा बाळासाहेब ठाकरे होऊ शकेल?

(एबीपी माझाचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा ब्लॉग ऑगस्ट 2015 मध्ये प्रकाशित झाला आहे. ) रात्रीचे साडेदहा वाजले होते...फोन करतो असं सांगूनही काही फोन येण्याची चिन्हं दिसत नव्हती....शेवटी थेट घरच गाठायचं ठरवलं...अहमदाबादमध्ये बोपल नावाच्या परिसरात सिद्धी नावाची इमारत आहे....त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही पोहचलो....तिथं सात ते आठ लोकांच्या घोळक्यात हार्दिक पटेल बसलेला होता....साधा पांढरा शर्ट आणि नाईट पँटवर....आजूबाजूचे लोक त्याला सतत काहीतरी अपडेट देत होते...कुठे वातावरण बिघडलंय...पोलिसांकडून कुणाला मारहाण होतेय...पीडितांच्या नातेवाईकांना कधी भेटायचं... अशा प्रकारच्या चर्चा चालू होत्या....थोडीशी संधी साधून आम्ही शिरकाव केला....मुंबईवरुन आलोय...महाराष्ट्रीयन चॅनेलसाठी मुलाखत हवीय म्हटल्यावर त्यानंही थोडासा वेळ काढला...आणि मग आमच्या गप्पा सुरु झाल्या.... गेल्या दोन दिवसांपासून त्याला भेटण्याचे प्रयत्न सुरु होते. हिंसाचार भडकू लागल्यानंतर अहमदाबादमध्ये पोहचलो. आपण मोदींच्या गुजरातमध्ये चाललोय, अहमदाबादमध्ये चाललोय, एका 22 वर्षांच्या मुलानं पुकारलेल्या बंदचा अजून किती इफेक्ट असणार असा एक विचार मनात होता. संध्याकाळपर्यंत सगळं शांत होईल असंही वाटत होतं. पण अहमदाबाद एअरपोर्टवर पोहचल्यावरच पहिला धक्का बसला. प्री-पेड टॅक्सी सेवा बंद असल्यानं प्रवाशांचे हाल होते. पटेलांचा प्रभाव असलेल्या भागात जायलाही अनेक टॅक्सीवाले तयार नव्हते. दिवसभर एखादी टपरीही उघडी नसल्यानं खाण्याचे हाल झाले ते वेगळेच. अहमदाबाद हे असं वातावरण 2002 नंतर पहिल्यांदाच अनुभवत होतं. गोध्रा हत्याकांडानंतरची पहिली संचारबंदी. अहमबादमध्ये पोहचल्यानंतर पहिलं काम सुरु होतं ते कुठल्याही परस्थितीत हार्दिक पटेलला भेटणं. सातत्यानं त्याचा फोन ट्राय करत होतो.पण फोन नुसता वाजत होता....कुणी उचलत नव्हतं. रात्री एकदा त्यानं फोन उचलला. पण अभी मै बापूनगर एरिया मैं हूं. यहां पे पुलिस के लोगोंने हंगामा किया है, मीटिंग चल रहीं है, मैं आपको बाद में फोन करता हूँ असं म्हणून त्यानं फोन ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या गावात, वीरमग्राममध्ये जायचं होतं. तिथं गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना भेटलो. त्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहिती नव्हता. कुठं आहे ते सांगत नाही, पण जिथं आहे तिथं ठीक आहे एवढंच सांगतो असं ते म्हणत होते. जाताना त्यांनी त्याच्या चिराग नावाच्या एका मित्राचा नंबर दिला. ज्या सिद्धी अपार्टमेंटमध्ये आम्ही शेवटी भेटलो ते या चिरागचं घर. आंदोलनाच्या काळात जो काही निवांत वेळ मिळेल तेवढ्यात हार्दिक इथं येऊन जायचा. गुजरातबाहेरच्या लोकांनी त्याचं नाव सुरत, अहमदाबादच्या रॅलीवेळीच ऐकलं....पण गुजराती मीडियात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून छोट्या छोट्या बातम्या येत होत्या....कारण आरक्षणाच्या मुदद्यावर त्यानं गावागावात जुलै महिन्यापासून 120 रॅलीज घेतलेल्या आहेत. सुरतच्या रॅलीला तब्बल 5 लाख लोकांची गर्दी झाली...आणि देशभरातल्या मीडियात चर्चा सुरु झाली कोण आहे हा हार्दिक पटेल? हार्दिक पटेलच्या व्यक्तिमत्वात खरंतर भारावून जाण्यासारखं काहीही नाही. ना त्याच्याकडे भाषणाची अमोघ शैली आहे ना घरात कुठली राजकीय पार्श्वभूमी....त्याला मिळालेला प्रतिसाद नेमका कशामुळे आहे, कोण त्याच्या पाठीमागे आहे हा सध्या सगळीकडे चर्चिला जाणारा प्रश्न आहे.....पण गुजराती, नॅशनल मीडियालाही त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही...प्रत्येकजण आपल्यापरीनं थिअरी मांडतोय.... प्रवीण तोगडियांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर फिरतायत....पण असेच फोटो भाजपच्या नेत्यांसोबतही आहेत...सरकारनं आयबीला कामाला लावूनही त्याचं  थेट राजकीय कनेक्शन शोधण्यात अद्याप तरी यश आलेलं नाही...घऱात आजवर कुठल्याच मोठ्या पक्षाच्या नेत्यानं पाऊल ठेवलेलं नाही असं त्याचे आईवडीलही सांगत होते...विशेष म्हणजे अहमदाबादच्या रॅलीसाठी तब्बल सात-साडेसात लाख गर्दी जमल्याचं सांगितलं जातं....आणि या सभेसाठी जे प्लॅनिंग झालं ते केवळ मॅनेजमेंट नव्हे तर या मायक्रोमॅनेजमेंट या कॅटगरीत येतं...त्यामुळेच अहमदाबादसारख्या शहरात अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय हे कोण करु शकणार अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.... अहमदाबादपासून 60 किमी अंतरावर असलेलं वीरमग्राम हे हार्दिकचं मूळ गाव. .हे तालुक्याचं ठिकाण आहे.....ओबीसी, आदिवासी, मुस्लिम यांच्याइतकीच गावात पटेलांची संख्या....मात्र पटेलांची वस्ती लगेच ओळखू येईल अशी...इतरांपेक्षा तुलनेनं नीट...याच ठिकाणी झालावाडी नावाच्या सोसायटीत त्याचं घर आहे....आंदोलन सुरु झाल्यापासून अनेक सरकारी गाड्या इकडे फिरकत असतात...त्यामुळे आता एखादी नवी गाडी आली की शेजारचे लगेच हार्दिकच्या घराचा रस्ता दाखवतात..... पटेल, आणि भाजपचे कार्यकर्ते असं म्हटल्यावर जी इमेज डोळ्यासमोर येते त्यापेक्षा हार्दिकचे वडील एकदमच वेगळे आहेत...अतिशय साधं असं कुटुंब....सरदार पटेलांचा एकमेव फोटो वगळला तर कुठलाच फोटो भिंतीवर दिसत नाही....चंदननगरी या मूळ गावात त्यांच्या कुटुंबियांची शेती आहे पाच बिघा...त्याशिवाय दुसरं उत्पन्नाचं साधन म्हणजे वडिलांची मजुरी....बोअरवेलचे खराब झालेले पाईप उपसायचे आणि दुरुस्त करुन आणले की ते पुन्हा बसवायचे हेच त्यांचं काम....असं एखादं काम मिळालं की दोन-तीन मजूर हाताशी घेऊन ते निघतात..त्यासाठी घराच्या बाहेर पाईप-दावं टाकून ठेवलेली एक जीप तयार असते... हार्दिकबद्दल सगळ्यात विशेष बाब कुठली असेल तर या बँकग्राऊंडमधून येऊन अवघ्या 22 व्या वर्षी त्यानं आपलं आंदोलन यशस्वी बनवलंय. त्याचं नेतृत्व अपरिपक्व आहे, जे अण्णांच्या आंदोलनाचं झालं तेच याचंही होईल अशा चर्चा सुरु आहेत...त्यातलं काय खरं ठरतं हे काही दिवसांत स्पष्ट होईलच....पण अशा प्रकारे एका साध्या कुटुंबातून येऊन, कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय एवढं मोठं आंदोलन उभं करणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. अर्थात या आपल्या भावी नेतृत्वाची झलक हार्दिकनं कधी कॉलेजमध्ये दाखवली नव्हती...अहमदाबादच्या सहजानंद कॉलेजमध्ये त्यानं बी कॉमची पदवी घेतली. पण क्रिकेटपटू ही ओळख सोडता तो फारसा कुणाला माहिती नव्हता असं त्याचे कॉलेजचे शिक्षक सांगतात....थोडंफार नियोजन कौशल्य दाखवलं ते गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करताना. पण त्याच्या समाजकारणाची सुरुवात झाली ती सरदार पटेल ग्रुपमुळे( एसपीजी)....लालजी पटेल नावाच्या व्यक्तीनं या ग्रुपची स्थापना केली....या एसपीजीच्या वीरमग्राम युनिटचा तो अध्यक्ष होता....पण त्यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यानं पाटीदार अनामत आंदोलन समितीची स्थापना केली....गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पटेल समुदायातल्या व्यक्तींना संघटित करण्याचं काम या माध्यमातून सुरु होतं....अहमदाबादच्या रॅलीत जे लोक व्यासपीठावर होते त्यात एक लालजी पटेलही होते...पण या रॅलीनंतर हार्दिकनं जो उपोषणाचा निर्णय घेतला तो त्यांना मान्य नव्हता...त्यामुळे या दोघांमधले मतभेद आणखी वाढल्याचं दिसलं..आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी अशा घटना स्थानिक मीडियात चर्चिल्या गेल्या...त्यामुळे हार्दिकचं नेतृत्व अपरिपक्व असल्याचीही टीका अनेकांनी केली.... पटेल समुदायातले 20 लोक अतिशय समृद्ध आहेत....पण त्यांचा विकास म्हणजे संपूर्ण जातीचा विकास नाही....अजूनही 70 टक्के पाटीदार हा हलाखीत जगतोय अशी हार्दिकची मांडणी आहे....पण मग गुजरात मॉडेलमध्ये त्यांचा विकास झाला नाही का असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर आहे विकास झाला..पण तो शहरापर्यंतच झाला.... मुलाखत झाल्यानंतरही आमच्या ज्या गप्पा सुरु होत्या...त्यात त्यानं महाराष्ट्राबद्दलचे अनेक प्रश्न विचारले.... बाळासाहेब हे माझे आयडॉल आहेत असं त्यानं आमच्या मुलाखतीतच पहिल्यांदा सांगितलं होतं...पण मुलाखतीनंतर बाळासाहेब ठाकरे हे नेमक्या कुठल्या जातीचे, ते मराठाच आहेत ना असा प्रतिप्रश्न त्यानं केला....मी नाही म्हटल्यावर त्यानं मला आपण तरीही त्यांचे फॅन असल्याचं आवर्जून सांगितलं. आपल्यालाही त्यांच्यासारखंच राजकारण करायचंय, सरकारचा रिमोट कंट्रोल हातात ठेवायचाय असं तो सांगत होता. आंदोलनाबद्दल महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटतायत, शरद पवार कुठल्या जातीचे आहेत असे इतरही काही प्रश्न त्यानं मला विचारले. मुलाखतीनंतर जितका वेळ आम्ही बोलत होतो तितक्या वेळात सारखं कुणी ना कुणी त्याला येऊन भेटत होतं. एकदा तर दोन लहान मुलं हातात पेन आणि कागद घेऊन त्याचा ऑटोग्राफ घ्यायला आली. या मुलांचे वडीलही सोबत होते. तुम्ही आलाय हे कळल्यावर ही मुलं कशी धावत सुटली, चपला घालायचंही त्यानं कसं भान राहिलं नाही असं काहीतरी गुजरातीमध्ये ते सांगत होते. काहीजण त्याच्यासोबत सेल्फी काढण्यास उत्सुक होते. एका रात्रीत स्टारडम मिळालेल्या स्टारसारखी त्याची अवस्था होती.. त्याचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मनात विचार आला...बाळासाहेब ठाकरे हे आपले आदर्श आहेत असं हा पठ्ठ्या म्हणतोय....पण खरंच हा गुजरातचा बाळासाहेब ठाकरे होऊ शकेल का?  बाळासाहेबांच्या शैलीबद्दल, त्यांच्या विचारसरणीबद्दल अनेकांचे मतभेद असतील...पण त्यांनी जातीचं राजकारण केलं नाही, संघटन बांधताना कधी जात पाहिली नाही...पण इथं हार्दिकचं राजकारणच मुळी जातीच्या समीक समीकरणावर आधारलेलं आहे. हा मूलभूत फरक असल्यानं ही संदिग्धता आहे. (एबीपी माझाचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा ब्लॉग ऑगस्ट 2015 मध्ये प्रकाशित झाला आहे. )
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget