एक्स्प्लोर

BLOG : 'निष्ठावान' कार्यकर्त्याहो पोटापाण्याचं बघा

काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात सुजय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आणि सुजय अहमदनगरच्या तिकिटासाठी भाजप प्रवेश करतो. भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखे पाटलांवर टीका करताना आपण हे देखील लक्षात घ्यायला हवे की दस्तुरखुद्द राधाकृष्ण विखे पाटील 1995 साली शिवसेनेतून मंत्री झाले होते. सत्तेसाठी त्यांनी तेंव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता आता पोरगा भाजपमध्ये जातोय, याचे नवल नाही. इकडे सुप्रियाताई म्हणतात आमच्या पोरांनी राजकारणात येऊ नये. पवार साहेब म्हणतात सगळे उमेदवार घरातले दिल्यावर कार्यकर्त्यांनी काय करायचं, असं म्हणतात तोवर 'कार्यकर्त्यांचा आग्रह आहे' असं म्हणत पार्थ पवारांचं मावळचं तिकीट फायनल होतं. नारायण राणे भाजपच्या तिकिटावर खासदार होतात, त्यांचे पुत्र काँग्रेसचे आमदार असतात, सरकारच्या विरोधात बोलत राहतात. कोल्हापुरात महाडिक साहेब स्वतः कॉंग्रेसमधून विधानपरिषद सदस्य होते. मुलगा भाजप आमदार, पुतण्या राष्ट्रवादीतून खासदार.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार होते, मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार होतो, रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार होतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री/खासदार होतात. "" ही आणि अशी अनेक उदाहरणं सत्ता आणि परिवारवादाची सांगड कशी घातली जाते यासाठी पुरेशी आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 2014 च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापणेच्या वेळी सुरुवातीला भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतात. तर आताची स्थिती तुम्हाला माहिती आहेच. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांना गुरू मानतात. राज ठाकरे आधी मोदींचं कौतुक करतात. आता एकही दिवस जात नाही ते मोदींवर टीका करायचा चान्स सोडत नाहीत. हेच राज ठाकरे अजित पवार आणि शरद पवारांवर सडकून टीका करतात. अजित पवार त्यांना बोलघेवडे आहेत असं सांगत त्यांच्यावर पलटवार करतात. (ठाकरे-पवार वाद गुगल करा) त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज ठाकरेंवर तुटून पडतात. आज राज ठाकरेंचा शब्द याच कार्यकर्त्यांसाठी मोलाचा झालाय.

पवार साहेबांच्या मुलाखती काय? भेटीगाठी काय? कार्यकर्त्यांकडून कौतुकाचे सोहळेच होऊ लागलेत. बाकी भाजपमधील इनकमिंग आणि सहयोगी पार्टी शिवसेनेशी असलेली अनोखी 'प्रेमकहाणी' सर्वांना परिचित आहेच. त्याबद्दल तर लिहायचीही इच्छा नाहीये इतकं पांचट झालंय, ते ही सर्वश्रुत आहेच. "" अर्थात हे सर्व कार्यकर्त्यांना माहिती नसायचं अर्थातच कारण नाही. ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत राजकीय पुढाऱ्यांच्या सोयीस्कर राज'नीती'ची आणि परिवारावाद भक्कम करणारी. यात खरी फरफट होते ती 'निष्ठावान' कार्यकर्त्यांची. ते इमाने इतबारे सतरंज्याच उचलतात. काही प्रत्यक्षात काही या आभासी दुनियेत. एकंदरीत, ही स्थिती पाहता जिवाच्या आकांताने ग्राउंड फ्लोअरवर सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते ते सोशल मीडियातून पुढाऱ्यांच्या उदोउदोत घरदारकडेही लक्ष न देणाऱ्या कार्यकर्त्यांनी सावध व्हायला हवेय. खरोखर कार्यकर्त्यांनी बंद डोळे उघडण्याची गरज आहे. खरतर ही गरज पूर्वापारपासूनचची आहे. कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष होण्याचा काळ आजचा नाहीच. त्याला मोठा इतिहास आहे. दिवसभर नेत्यांच्या मागे मागे फिरायचं, रुपडी खिशात नाही, मावा, तंबाखू खायची अन सोशल मीडियावर एडिटिंगची ऍप्स इन्स्टोल करून भाऊ, दादांचा धुरळा उडवायचा.

पोरांनी राजकीय लोकांची काम करावी पण केवळ खाण्यापिण्यासाठी नको. काहीतरी उद्देश ठेवून काम करावी, त्यांचा 'आशीर्वाद' घेऊन सक्रिय राजकारणात जावं. सरळ आपल्या स्वार्थासाठी काम करावं. उद्योग धंदा करून पैसे कमवावा.  ते आपला वापर करतात आपण त्यांचा वापर करावा.  नेत्यांची मुलं परदेशात शिकतात. त्यांना भविष्याची कसली चिंता नसते. ज्यावेळी येतात त्यावेळी बरोबर ऍडजस्ट केली जातात. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही. देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक आपल्याला भेटत असतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं, मग पक्षासाठी, देशासाठी वेळ द्यावा, असा सल्ला अलीकडेच खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र कार्यकर्ते मात्र सगळं सोडून आपल्या नेत्यांसाठी आणि पक्षासाठी दिवसरात्र 'ट्रोलिंग' करत राहतात.

"" फोटो- गेटी इमेजेस कुठंतरी वाचलेलं की,  एका माणसासाठी, एका पक्षासाठी, एका घराण्यासाठी, कुणाशीही भांडण्यास प्रसंगी मारामारी करण्यास, सार्वजनिक मालमत्ता प्रसंगी आपले घर-संसारही जाळण्यास तयार असणारा साहेबांचा माणूस म्हणवण्यात आयुष्याची धन्यता मानणारा. कुठलाही माणूस, पक्ष, विचार सदासर्वकाळ योग्य असू शकत नाही, हा साधा नियमही आम्ही लक्षात घेत नाही. निवडणुका जिंकणे हेच अंतिम ध्येय असणाऱ्या राजकारणातील एखादा पक्ष तर अजिबात नाही! एखाद्या लहान पोराला वाटतं ना, की आपला बाप कधी चुकीचा असू शकत नाही, तसेच कार्यकर्त्यालाही वाटते, आपले साहेब, पक्ष कधीच चुकीचा असू शकत नाही! अनेक कार्यकर्त्यांनी तर आपल्या बापाच्या वर देखील नेत्यांना ठेवून पाहिलेय. एव्हाना अजूनही तशा पोस्टी हल्ली सोशल मीडियावर वाचायलाही मिळतात. काही 'निष्ठावंत' कार्यकर्ते त्यांच्या 'साहेबांच्या' वागणुकीने आणि भूमिकेने कंटाळून उशिरा का होईना शहाणे झालेत. असाच एका पार्टीचा एक कट्टर कार्यकर्ता मित्र आज सांगतो की माझी निष्ठाच मी गहाण ठेवली होती. म्हणजे लोकांसाठी 'निष्ठावान' असलेला मी घरच्यासाठी मात्र अत्यंत बोगस मनुष्य होतो. मात्र खरी निष्ठा ही मायबापाप्रति, घराप्रति असल्याचा साक्षात्कार त्याला साहेबांच्या इकडून तिकडे उड्या मारण्याने झाला. ज्या पक्षासाठी, व्यक्तीसाठी राजकीय भांडणात सर्वस्व गमावले आणि ज्याच्यासाठी भांडलो तो ज्याच्याशी भांडलो त्याच्या साहेबांशी गळ्यात गळे घालून फिरताना दिसतो. त्याक्षणी राजकीय कार्यकर्ता होण्याची नशा सुटली, असं तो 'निष्ठावान कार्यकर्ता' मित्र सांगतो.

मोठ्या नेत्यांनी कार्यकर्त्याला मोठं केल्याची काही उदाहरणं आहेत. मात्र ती 'काही'च आहेत. दुसरीकडे राजकारणात फरफट झालेल्यांची मात्र अनेक उदाहरणे आहेत. सोशल मीडियात व्हायरल झालेली एक छोटीशी गोष्ट जी ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे सरांनी शेअर केली होती. ही गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटतेय. ती गोष्ट अशी... मला खूप दिवसांपासून प्रश्न पडला आहे की, बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात? उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड हत्ती, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक उंट, उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी घोडी, सर्वशक्तिमान वजीर आणि महामहीम बादशहा एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी! हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला! बरं, इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु शकतात. प्याद्यांना ती मुभा नाही. एवढंच काय जीवाच्या आकांताने एखाद्या प्याद्याने शुत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार. तसा रिवाजच आहे! थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का ते विचारायचं नाही. सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार. इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार. उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार. कारण, तसाच रिवाज असतो! ही गोष्ट प्रत्येक 'निष्ठावान' कार्यकर्त्यांनी आपापल्या डोक्यात फिट्ट करणे गरजेचे आहे. कारण आधी तुमची निष्ठा ही तुमच्या परिवाराशीच असली पाहिजे, कारण तुमच्या नेत्यांची निष्ठा केवळ 'खुर्ची'शी असते. हा इतिहास होता, वर्तमान आहे आणि भविष्यही. सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी आधी घर सांभाळलं पाहिजे. यात माझे काही मित्रही आहेत. आपल्या 'छत्र्या' होऊ देऊ नका दोस्ताहो. ते तुमचा वापर करतात, तुम्ही त्यांचा वापर करा. एकंदरीत पोटापाण्याचं बघा. #निलेश्राव

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?
Gangaram Gavankar : ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर अनंतात विलीन
MCA Election Row: 'असा कोणताही ठराव मंजूर नाही', MCA निवडणुकीवरून 28 Clubs आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला
BEST Fleet: '...आधीच्या सरकारने Best ला West केले', DCM Eknath Shinde यांचा मागील सरकारवर निशाणा
CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Embed widget