एक्स्प्लोर

BLOG: माझी आई ही 'वन मॅन आर्मी' : सावनी रवींद्र

माझी आई डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे माझं सर्वस्व आहे. किंबहुना मी या क्षेत्रात येण्याचं कारणच माझी आई आहे. आईकडून मी अनेक गोष्टी शिकलेय. ती संगीत रंगभूमीवरची नायिका, गायिका आहे. तिच्या तालमीत मी तयार झाले. आज मी आई झाल्यावर आईने जे कष्ट माझ्यासाठी घेतलेत, ते मला प्रकर्षाने जाणवतात. तेव्हा ती मला विंगेत झोपवत असे.

मी आईचं जणू शेपूटच होते, आईच्या मेकअपरुममध्येही मी संचार करायचे. या क्षेत्राची जवळून ओळख करुन दिली

ते दिवस मला आठवतात.

संगीत रंगभूमीला तिने योगदान दिलंय. मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं चरित्र तिने लिहिलंय. म्युझिकमध्ये पीएचडी केलंय. हे सगळं तिने माझं पालनपोषण करत केलंय. 

तेव्हाची एक आठवण मी आवर्जून सांगेन. माझी आई शिक्षिका असल्याने तिला शनिवारचा हाफ डे, रविवारची सुटी असायची. त्याही दिवसात मी गाणं शिकावं, यासाठी ती मला मुंबईत ज्येष्ठ संगीतकार-गायक पंडित यशवंत देव यांच्याकडे घेऊन येत असे. म्हणजे शनिवारी आम्ही संध्याकाळी पुण्यातून निघत असू. शनिवारचा मुक्काम मुंबईत. रविवारी गाणं शिकून झाल्यावर परत पुण्यात. असं आम्ही दर शनिवार-रविवार सुमारे सात वर्षे केलंय. तिने अनेक गोष्टींचा त्याग केलाय. ज्या ती कदाचित बोलूनही दाखवणार नाही.

आमची फॅमिली कोकणात आहे, तर माझ्या वडिलांकडच्या आजी-आजोबांचं दुर्दैवाने लवकर निधन झालं. त्यामुळे माझा सांभाळ करण्यासाठी आईला मनुष्यबळ फारसं उपलब्ध नव्हतं. तरी या गोष्टीचा तिने कधी इश्यू केला नाही.

जिद्द आणि चिकाटी हे आईचं बलस्थान आहे. अडचण हीच संधी हे आईचं ब्रीदवाक्य आहे. स्पोर्टिंग स्पिरीट, शो मस्ट गो ऑन. याची कास तिने आयुष्यभर धरलीय. तेच फायटिंग स्पिरीट तिने माझ्यातही रुजवलंय. माझी आई ही माझी उत्तम टीकाकार, समीक्षक आहे. तिने माझ्या तोंडावर माझी भरभरून कधीही स्तुती केली नाही. तरीही माझ्या करिअरचं समाधान तिच्या डोळ्यात मला दिसतं. नुकताच मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यावेळी तो राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना आई-बाबांच्या डोळ्यातले भाव तर मी विसरुच शकणार नाही.

आयुष्यातल्या अनेक क्षणांमध्ये तिने जिगरबाज वृत्ती दाखवलीय. एक प्रसंग तर मला कायमचा लक्षात राहिलाय. २०१२ मध्ये संगीत नाट्य महोत्सव सुरु होता. त्यावेळी माझ्या बाबांना मंचावरच हार्ट अटॅक आला. त्यांना अटॅक आलाय, हे कळायला आम्हाला काही अवधी लागला. काही वेळाने याचं निदान झालं, मग त्यांची पुढची ट्रीटमेंट सुरु झाली.

प्रसंग खूप कठीण होता. कारण, दुसऱ्या दिवशी आईबाबांची भूमिका असलेला नाट्यप्रयोग होता. ज्यात आयत्या वेळी दुसऱ्या नटाला बोलवून घेऊन आईने त्या कलाकारासोबत प्रयोग केला, तर तिसऱ्या दिवशी पंडित हृदयनाथ मंगेशकरांसोबत माझा संगीत कार्यक्रम होता. आईची मानसिक कणखरता पाहून मीही तिसऱ्या दिवशी गाण्याचा कार्यक्रम केला.

कष्टाला पर्याय नाही, मेहनतीला शॉर्टकट नाही, हे तिने मला वेळोवेळी सांगितलंय. तिचा हाच संस्कार मला माझ्या मुलीमध्ये बिंबवायचाय. ती अध्यात्मिक वृत्तीची आहे. त्यामुळे मला तिला बारा ज्योतिर्लिंग किंवा अशा एखाद्या धार्मिक ठिकाणी घेऊन जायला आवडेल. ती अतिशय सुगरण आहे. तिचा कामाचा उरक अवाक् करणारा आहे. एखादा नाट्यप्रयोग झाल्यानंतर घरी येऊन ३० माणसांचा स्वयंपाक हसतमुखाने करुन त्यांना तितकंच प्रेमाने जेवू घालणं हे आईच करु जाणे. मला तिने केलेला वरणफळ हा पदार्थ खूप आवडतो, असं संवादाची सांगता करताना सावनीने म्हटलं.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget