एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

खान्देश खबरबात : जळगावात जिल्हाधिकाऱ्यांचे ऊलगुलान!

सहा वर्षे बाळगलेला अस्वच्छतेचा नासूर एका झटक्यात संपला. नाक दाबले की तोंड उघडते याचा प्रत्यय जिल्हाधिकारी व मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आणला.

व्यवस्थेतील बदलाच्या संघर्षाला क्रांती, परिवर्तन असे शब्द सहजपणे वापरले जातात. व्यवस्था बऱ्याचवेळा प्रस्थापितांची सरकारी किंवा खासगी असते. व्यवस्थेने नाकारलेला, दुर्लक्षिलेला, पिचलेला माणूस जेव्हा व्यवस्थेलाच आव्हान देऊन उभा राहतो तेव्हा तो उठाव असतो. अशा प्रकारचा असंतोष केवळ एखाद्या बदलाचे कारण ठरतो. पण, जेव्हा काही बदल एकाचवेळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक पातळीवर समग्र क्रांतीचा निश्चय करुन केले जातात तेव्हा त्याला चपखलपणे व्यक्त करणारा शब्द आहे ऊलगुलान. म्हणजेच, दुर्लक्षितांच्या जगण्या मरण्याचा एकाच वेळी अनेक हक्कांसाठी संघर्ष. जळगाव शहरात नागरी जिव्हाळ्यांच्या अशक्य कोटीतील "अ" कारांशी संघर्षाचा विडाच जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी उचलला आहे. निंबाळकर यांनी नागरीकांसाठी अशक्य वाटणारे अतिक्रमण हटाव आणि अस्वच्छता भगाव या 2 विषयांना थेट हात घालून 2 सार्वत्रिक चमत्कार करुन दाखवले. यात सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा अनेक विषयांमधील बेधडक बदल अवघ्या 6 तासांमध्ये करुन दाखवले. एखादा पोलीस आधिकारी बेधडक वागत असेल तर त्याला "सिंघम" उपाधी दिली जाते. सिंघम नावाने अजय देवगणचा चित्रपट गाजला आहे. एखादा पुढारी 24 तासात परिवर्तनाचे प्रयत्न करीत असेल तर त्याला "नायक" संबोधले जाते. नायक हा अनिल कपूरचा गाजलेला चित्रपट. पण, प्रशासनातील एखादा अधिकारी अवघ्या 6 तासात बदल घडवून दाखवत असेल तर त्यासाठे "राजे" नावानेच चित्रपट काढावा लागेल. कारण जळगावचे जिल्हाधिकारी व मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे आहेत. त्यांना जळगावकर लवून मुजरा करीत राजे संबोधू लागले आहेत. शोले चित्रपटात गब्बरसिंग असलेला अमजद खानचा एक डायलॉग होता, बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा! जळगावात गोलाणी संकुलात कचरा करणाऱ्याला इतर व्यापारी म्हणतात, कचरा डस्बिन में डाल वरना राजे आ जाएगा! अजिंठा चौकात अतिक्रमण करणाऱ्याला इतर म्हणतात, पसारा आवरुन घे नाहीतर राजे येईल. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने घडविलेले हे ऊलगुलान आहे. गोलाणी मार्केट हे जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तेथे 1050 दुकाने आहेत. रोज किमान 10 ते 15 हजारावर नागरिक या संकुलात येतात. गेल्या 5 वर्षांपासून या संकुलातील साफसफाई बंद होती. मनपाची 17 मजली इमारत याच संकुलाचा भाग आहे. म्हणतात ना, दिव्याखाली अंधार तसे गोलाणीतील सफाईचे होते. सहा वर्षे गोलाणीचा उकिरडा झाला होता. दि. 18 जुलैला स्वतः निंबाळकर यांनी गोलाणीत ठाण मांडून अवघ्या 6 तासात 500च्या वर ट्रॅक्टर ट्रॉली कचरा साफ केला. सहा वर्षे बाळगलेला अस्वच्छतेचा नासूर एका झटक्यात संपला. नाक दाबले की तोंड उघडते याचा प्रत्यय त्यांनी आणला. अस्वच्छतेचे कारण ठरलेले गोलाणी संकुल 3 दिवस बंदची नोटीसच जळगाव प्रांताधिकाऱ्यांनी दिली. मग काय, अस्वच्छतेत व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शहाणपण आले. सफाईसाठी प्रत्येकी 1100 रुपये द्यायला तयार झाले. आता नियमित पैसे देत ठेकेदारामार्फत सफाई होणार आहे. अस्वच्छतेचा हा लढा यशस्वी झाला. राष्ट्रीय महामार्ग 6 आणि औरंगाबाद राज्य मार्ग यांच्या चौफुलीला अजिंठा चौक म्हणून ओळखले जाते. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या या चौकातून दिवसभरात किमान 30 हजारावर वाहनांची वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत औरंगाबाद रोड परिसरात आणि राष्ट्रीय महामार्गलगत नागरी वस्ती वाढली. त्यामुळे अजिंठा चौफुली हे हातगाडी, टपरी, रिक्षा आदींच्या अतिक्रमणासाठी स्वस्तातले ठिकाण झाले. कारण, महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात आहे आणि त्यांचे कार्यालय धुळ्यात आहे. त्यामुळे दर तासाला अजिंठा चौकात वाहतूक खोळंबली तरी वाहतूक पोलीस, मनपा आणि रामप्रा हे काहीही कार्यवाही करु शकत नव्हते. महामार्ग व औरंगाबाद रस्ता खोळंबला की मुंबई, नागपूरसह औरंगाबाद, पुणे सोबत जळगाव एमआयडीसी व जळगाव बाजार समितीकडे होणारी अवजड वाहतूकही खोळंबायची. अशा वाहतूक कोंडीत सापडते हा मनस्ताप देणारा वाहनातील सक्तीचा कारावास असायचा. परिसरातील व्यापारी, दुकानदार आदी सर्वच मनपाकडे अतिक्रमण हटावची मागणी करीत. रामप्रा कधी तरी कार्यवाही करायचे. पुन्हा जैसे थे स्थिती व्हायची. अजिंठा चौफुलीवरील कायमच्या दुखण्यावर अक्सीर इलाज निंबाळकर यांनी अवघ्या 6 तासात काढला. चौकालगतचे अतिक्रमण निंबाळकरांच्या तिहेरी भूमिकेत निघाले. जिल्हाधिकारी, प्रभारी मनपा आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी. मनपा कर्मचाऱ्यांचा ताफा आणि तगडा पोलिस बंदोबस्त सोबत असताना अवघ्या ६ तासात अजिंठा चौक अडचणीची झाडे मोडून आणि कृष्ण मंदिराचे अतिक्रमण साफ करुन खुला झाला. ही कारवाई करताना निंबाळकर यांचे सोबत पोलीस अधीक्षक, रामप्राचे अधिकारी होते. 150/200 जणांचा जमाव पाहत होता. महापौर नितीन लढ्ढा व आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. रस्त्यावर अडथळा ठरणारे मंदिर हे आमदार भोळेंच्या नातेवाईकाचे होते. त्यामुळे तेही तेथे हजर होते. अतिक्रमण काढायला मदत करीत असल्याबद्दल तेथेच आमदाराचा सत्कार निंबाळकर व लढ्ढा यांनी केला. आमदार सत्कार घेऊन गेल्यानंतर निंबाळकर यांनी कृष्णमंदिरात आरती करुन मूर्ती हलविली. ती सन्मानाने दुसरीकडे ठेवली आणि अतिक्रमणात असलेला मंदिराचा ढाचा निंबाळकरांनी जमिनदोस्त केला. निंबाळकरांची ही कारवाई ऊलगुलानच आहे. भाजपच्या आमदाराच्या शहरात त्याच्याच नातेवाईकाचे अतिक्रमित मंदिर पाडले गेले. अतिक्रमणात असलेली इतर धर्मस्थळांची ढाल बाळगणाऱ्या मंडळींना हा इशारा आहे. अजिंठा चौकातील अतिक्रमण हटावचा समारोप असा झाला. अर्थात, उपकथानक नंतर सुरु झाले. मंदिरच पाडून टाकल्याचे कळल्यावर आमदार सुरेश भोळेंनी निंबाळकरांवर शाब्दिक हल्ला करीत म्हटले, माझा विश्वासघात केला. दुसऱ्या दिवशी निषेधाचे निवेदन घेऊन आमदार निंबाळकरांकडेच गेले. स्व जातीयांचा दबाव गट तयार करुन अतिक्रमित पाडलेले मंदिर पुन्हा उभारायचा आग्रह आमदार भोळेंनी धरला. अर्थातच, जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन देणे भाग होते. जळगाव शहराने टपरी हटाव प्रकरणात हट्टाला पेटलेल्या एका आमदाराचे गर्वहरण पाहिले आहे. त्यानंतर आमदार भोळे दुसरा इतिहास लिहिण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक रहदारीस अडथळे ठरणारे देवस्थानांचे अतिक्रमण हटवा असे आदेश मुंबई हायकोर्ट व दिल्ली सुप्रीम कोर्टने दिले आहे. तरी सुध्दा आमदार भोळे अतिक्रमीत व पाडून टाकलेल्या मंदिरासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. हे करताना आमदार भोळे म्हणतात, माझा विश्वासघात केला. हे म्हणताना आमदार भोळे जळगावकरांचा विश्वासघात करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही का? जळगाव शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे एका रात्रीत मनपाला हस्तांतर करुन दारु दुकानांना संरक्षण कोण देत होते? जळगाव मनपा व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांसाठी दुकाने भाड्याने देण्याचा रितसर ठराव केलेला असताना त्याला विरोधाची भूमिका भाजपच्या एका माजी आमदाराने घेतली होती. व्यापाऱ्यांकडून पैसा गोळा करुन त्यांची दिशाभूल केली होती. या प्रकरणातही आमदार भोळेंनी उलटसुलट पत्रापत्री करुन व्यापाऱ्यांनी फितवले. नंतर काय घडले, तर हायकोर्टने व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव करायचे आदेश दिले. मुख्यमंत्री विशेष निधीतून मिळालेल्या 25 कोटींसाठीही आमदार भोळेंनी उलट-सुलट पत्रापत्री केली आहे. आता 25 कोटींची कामे बांधकाम विभाग करणार असा आमदार भोळेंचा आग्रह आहे. आमदार भोळेंना या सर्व कोलांटउड्या आगामी निवडणुकीत त्रासदायक ठरतील. अंदाज असा आहे की, आमदार भोळे हे भाजपचे उमेदवारही असणार नाहीत. जळगावचे भाजप आमदार मंदिराच्या अतिक्रमणासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असताना धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी मात्र मंदिराचेच अतिक्रमण काढण्यासाठी तेथील शिवसेनेशी पंगा घेतला आहे. दुसरीकडे आमदार गोटेंनी संरक्षण दिलेली पांझरापात्रातील चौपाटी धुळे मनपा व प्रशासनाने हटविली आहे. अगदी आलिकडे नकाणे रोडवरील अतिक्रमित व वादग्रस्त हॉटेल कुणाल परमिटरूम व बिअरबार मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केला आहे. हे अतिक्रमण काढायला महिला सरसावल्या होत्या. आमदार गोटेंनी शहरातील 19 अतिक्रमणे काढायला पुढाकार घेतला होता. जळगावचे आमदार भोळे मात्र अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने असल्याचे चित्र समोर आले आहे. (ता. क. - वरील मजकूर ऑपरेट करीत असताना जळगाव मनपा आयुक्तपदी मनोहर हिरे यांच्या नियुक्तीची चर्चा होती. मात्र तसे काही नंतर समोर आले नाही.) खान्देश खबरबातसदरातील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : बदनामीच्या फेऱ्यात धुळे, जळगाव जिल्हा परिषदा

खान्देश खबरबात : जीएसटीसह व्यापारही बाळसे धरणार !

खान्देश खबरबात : खडसेंच्या वापसीची तूर्त आशा!

खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते…

खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !

ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप

आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !

खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !

यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !

खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 

खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची ट्वेंटी 20 विश्वचषकात कमाल, कुटुंबाशी खास बातचीतSunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची ऐतिहासिक कामगिरी; तिसऱ्यांदा घेतली 'अवकाशभरारी'Saurabh Netravalkar :  सौरभ अमेरिकेच्या क्रिक्रेट संघात कसा पोहोचला? ABP MajhaSpecial Report Neet Exam Scam : नीट परीक्षेच्या मार्कांवर कुणी घेतला आक्षेप?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
Embed widget