एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : जीएसटीसह व्यापारही बाळसे धरणार !

भारतातील कर आकारणी प्रणालीत दि. 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाला. अर्थ व्यवहाराच्या क्षेत्रातील हा दुसरा ऐतिहासिक निर्णय आहे. सहा महिन्यांपूर्वी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा पहिला ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याचा परिणाम काही काळ बाजारपेठेवर आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर जाणवला. त्यानंतर भूखंड आणि तयार घरे खरेदी विक्री व्यवहारात आजही मंदी आहे. त्यापाठोपाठ आलेल्या जीएसटीमुळेही बाजारपेठेतील व्यवहार थंडावलेले आहे. अर्थात, नव्या करप्रणालीशी जुळवून घेण्याच्या काळात व्यापारी वर्गाने स्वतःच स्वीकारलेली ही मंदी आहे. जीएसटीमुळे व्यापारी आणि ग्राहक यांचा काय फायदा होणार किंवा कोणती अडचण येणार ? याचा लगेच अंदाज येणार नाही. मात्र, जीएसटी लागू होण्याबरोबरच खान्देशातील धुळे व जळगाव मनपांना कोट्यवधीच्या अनुदानाची लॉटरी लागली आहे. हे अनुदान जकात, त्यानंतर एलबीटी बंदी पोटी मिळणारे आहे. फरक एवढाच आहे की, अनुदानाची रक्कम वाढली आहे. राज्यातील 26 मनपांना जीएसटीचे 1,385 कोटी 27 लाख अनुदान देण्यात आले आहे. यात जळगाव मनपाला 8.78 व धुळे मनपाला धुळे 7.34 कोटींचे अनुदान मिळाले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या दोन्ही मनपांना आषाढी एकादशीला विठ्ठल पावला असेच म्हणायचे. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार येथील व्यापारी संघटना व मंडळांनी जीएसटीचे स्वागत करीत त्यानुसार कार्यवाहीची तयारी केली आहे. विक्रीकर आणि इतर विभाग यांच्यासह व्यापारी संघटनांनी जीएसटी संदर्भात व्याख्याने, कार्यशाळा व शिबिरे घेवून व्यापारी, व्यावसायिकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार केले आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ व फाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीएसटी अंमलबजावणीपूर्वी अनेक सूचना महाराष्ट्र सरकारकडे पाठविल्या. महाराष्ट्र सरकारने नंतर केंद्राकडे जीएसटीत सुधारणेच्या 14 सूचना केल्या. त्यातील 11 मान्य झाल्या. एकंदरित खान्देशात जीएसटीपूर्व आणि कायदा लागू झाल्यानंतरचे वातावरण समाधानकारक आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडाळाचे सरचिटणीस व फामचे उपाध्यक्ष ललित बरडीया जीएसटीची पाठराखण करीत म्हणतात, ही कर प्रणाली नक्कीच चांगली आहे व ती यशस्वी होईल. यामुळे व्यापार, व्यवसायात आर्थिक समतोल निर्माण होईल. चार्टर्ड अकाऊंटंटची कामे सोपी होतील. अर्थ व्यवहार करताना नवी पिढी पारदर्शक होत आहे. कर चुकवेगिरी नव्हे तर कर भरण्याकडे कल वाढतोय. 20 लाखापर्यंतचे उत्पन्न दाखविणे शक्य झाले आहे. यामुळे व्यापारी, व्यावसायिक आता कागदावर व्यवहार दाखवतील आणि त्यांची बँकींग व्यवहारात पत निर्माण होईल. बरडीया यांनी म्हटल्यानुसार खान्देशात सर्वच व्यापारी वर्गाने जीएसटीचे स्वागत करुन आपापल्या प्रतिष्ठानात संगणकिय प्रणाली अपडेट करणे सुरु केले आहे. जीएसटीमुळे बाजारपेठेतील व्यवहार संगणकीकृत होण्याची क्रिया वाढली आहे. भविष्यात याचा लाभ कैशलेस व ई बिझिनेस वाढायला होईल. जीएसटी कायद्याला नव्हे पण त्यात डाळींवरील कर आकारणीच्या टक्केवारीला जळगाव येथील 110 दाल मील मालकांनी विरोध केला आहे. ब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के लावलेला कर मागे घेतला जावा म्हणून दाल मील असोसिएशनने एक दिवस बंद पाळला. ब्रॅण्डेड डाळींवर कर वाढला तर बाजारात पैकिंगमधील डाळ बंद होवून खुल्या पध्दतीने डाळ विक्री सुरु होईल असा इशारा संघटनेने दिला आहे. जीएसटीमुळे जवळपास 23 प्रकारचे कर एकत्र केले असे सांगण्यात आले आहे. मात्र, यात दोन राज्यांमधील सीमेवर असलेला आरटीओचे परवाना शुल्क रद्द होणार की नाही असाही प्रश्न समोर आला आहे. खान्देशातील तीनही जिल्ह्यांच्या सिमा मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना लागून आहेत. त्यामुळे पाच ठिकाणी चेकपोस्टवर आकारल्या जाणाऱ्या परवाना शुल्क विषयी खुलासा व्हायला हवा असे व्यापारी म्हणतात. मात्र, हा परवाना कर वस्तू वाहतुकीवर नसून तो परप्रांतिय वाहनास प्रवेशाचा व नियमाने वजन वाहण्याचा परवाना देण्यासाठी आहे. हा कर वस्तू वाहतूक करणाऱ्याने नव्हे तर मोटार मालकाने भरणे अपेक्षित आहे असे आरटीओचे स्पष्टीकरण आहे. जीएसटीच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीत आता अनेक प्रश्न किंवा अडचणी समोर येतील. त्यात सोयीने सुधारणेची तयारी राज्य व केंद्र सरकारने ठेवली आहे. एक गोष्ट व्यापारी व व्यावसायिक मान्य करतात. ती म्हणजे, जीएसटी प्रणाली यंत्र व तंत्र उपलब्धतेनुसार व्यवहारात असली तर कर आकारणी कार्यालयातील बाबुगिरी जवळपास संपणार आहे. जीएसटी ही सोपी व सुटसुटीत प्राणाली आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी बाजारात व्यापारी खरेदी मंदावली होती. कारण दि. 30 जून अखेर शिल्लक मालावरील जीएसटीचा प्रश्न होता. त्यामुळे गृहपयोगी वस्तू व किराणा दुकानात 20 ते 50 टक्के सवलतीत मालाची विक्री झाली. आता जीएसटीनंतर काही वस्तूंचे दर वाढले आहेत तर काही कमी झाले आहेत. सर्वाधिक चर्चा ही हॉटेलिंग महागल्याची आहे. ज्या वस्तुंचे दर जीएसटीमुळे कमी झाले त्याची जाहिरात करण्याची सूचना संबंधित विभागाने विक्रेता व पुरवठादारांना केली आहे. हा विषय ग्राहकांसाठी नक्कीच लाभाचा आहे.

खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : खडसेंच्या वापसीची तूर्त आशा!

खान्देश खबरबात : शिवसेना खान्देशात नक्कीच वाढू शकते…

खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !

ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप

आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !

खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !

यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !

खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 

खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
ABP Premium

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Embed widget