एक्स्प्लोर

खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी

एकदा तरी आशीर्वादला जेवून बघा, इथे जेवण्याच्या सुखाबरोबरच समाधान फ्री मिळेल!

कोकणातून आलेल्या आचाऱ्यांनी मनापासून बनवलेल्या आणि वाढप्यांनी न कंटाळता आग्रहानी वाढलेली शुद्ध शाकाहारी थाळी जेवण्यात, निराळंच सुख असतं. ९०च्या दशकानंतर पुण्यात डझनावारी उडपी हॉटेल्स सुरु झाली आणि अस्सल मराठी पद्धतीचे जेवण प्रेमानी वाढणाऱ्या खानावळी लुप्त होत गेल्या. आतातर ही परंपरा टिकवणारी मोजकीच हॉटेल्स शिल्लक राहिले आहेत. पुण्याचं सर्वात प्रमुख उपनगर असलेल्या कोथरूडमध्ये तर ही संख्या आधीच मोजकी होती. पण त्यात वर्षभरापूर्वी नव्या मॅनेजमेंटच्या देखरेखीखाली पुन्हा सुरु झालेलं आशीर्वाद सर्वात वरचे नाव. पानात एखादीच पण चविष्ट सुकी भाजी, वाटीत उसळ किंवा रसभाजी, तव्यावरून येऊन पानात गरम वाढल्या जाणाऱ्या घडीच्या पोळ्या, वरती आमटी किंवा वरण भात. तोंडी लावायला कोशिंबीर, चटणी, भाजलेला उडदाचा पापड आणि सोबतीला मिक्स लोणचं आणि हे सगळं सुरु असताना एकीकडे वाढलं जाणारं मधुर चवीचं ताक हे कुठल्याही भूकेजलेल्या जीवाचा आत्मा तृप्त करायला खूप झालं. जगातल्या कुठल्याही चवीच्या जेवणापेक्षा मी तरी अश्या महाराष्ट्रीयन थाळीचा भोक्ता आहे. खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी आशीर्वाद मधल्या थाळी मध्ये पहिल्या घासाला जाणवते ती खोबऱ्याच्या वाटणाची सुरेख चव. इथल्या पहिल्या घासाला तुम्हाला खात्रीने संगमेश्वरमधल्या एखाद्या घरगुती खानावळीची याद येऊन जाईल. देवरुख, संगमेश्वर ह्या भागातले स्वयंपाक करणारे आचारी म्हणजे कोकणी पद्धतीचे जेवण बनवण्यात एकदमच ‘वल्ड फेमस’. चिपळूण ते देवरुख पट्ट्यातल्या अनेक आचाऱ्यांनी पुण्या-मुंबईत येऊन आपल्या हाताच्या चवीवर हॉटेल आणि केटरिंग लाईन गाजवलेली आहे. तीच परंपरा चालवणारे आशीर्वादचे दोन्ही पार्टनर हेमंत राजवाडे आणि सुबोध थिटे मुळचे देवरुखचेच. हेमंतनी सुरुवातीचे शिक्षण गावातच घेऊन, हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पुण्यात पूर्ण केलं. काही काळ गणपतीपुळे इथल्या MTDC मध्ये उमेदवारी करून पुण्यात स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय सुरु केला. तर सुबोधचा पुण्यातच इंजिनियरिंगपर्यंत शिक्षण घेतल्यावर सुरु केलेला स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी हेमंत पुण्यात आल्यापासून गेले वीस वर्ष दोघांची मैत्री. एकत्र व्यवसाय करायचा दोघांचा अनेक महिने विचार सुरु होता. कोथरूडमधल्या ग्राहकांची चांगल्या डायनिंग हॉलची गरज ओळखून त्यांनी आशीर्वाद डायनिंग हॉल चालवायला घेतला. हेमंतचा हॉटेल आणि केटरिंग व्यवसायातला अनुभव आणि त्याला सुबोधच्या इंजिनियरिंगची जोड ह्यामुळे वर्षभरातच आशीर्वाद चांगलाच नावारूपाला आला आहे. रोज दोन्हीवेळा बदलता मेन्यू, रोज ताज्या भाज्या, वाजवी दर असल्याने फक्त नोकरदारच नाही तर हॉस्टेलमधल्या मुलांचीही इथे गर्दी असते. त्यामुळे जवळपास फक्त कोथरूडच नाही तर पुण्यातल्या पेठेतूनही फक्त जेवायला लोक इथे येतात. ज्येष्ठ नागरिक संघ, भिशी पार्टीचे घरगुती जेवण इथे होतं तसंच अनेक जणांची केळवणंही इथे होतात ते केवळ इथल्या घरगुती चवीमुळेच. एकेकटे आणि कुटुंबांसमवेत येणाऱ्यांसाठी इथे स्वतंत्र प्रकारच्या टेबलांची व्यवस्था केलेली आहे. रोज केवळ शंभर रुपयात मिळणारी रेग्युलर आणि रविवारी १३० रुपयात लिमिटेड स्वीटसह मिळणारी स्पेशल थाळी म्हणजे पैसा वस्सूल! चतुर्थीला मिळणारे मोदक म्हणजे घरची आठवण (कोकणात मोदक म्हणजे फक्त उकडीच्याच मोदकांना म्हणतात) पुण्यातलेच असाल किंवा येणार असाल तर एकदा तरी आशीर्वादला जेवून बघा, इथे जेवण्याच्या सुखाबरोबरच समाधान फ्री मिळेल! पत्ता–आशीर्वाद डायनिंग हॉल शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड वेळ सकाळी – ११ ते २.३० संध्याकाळी – ७ ते रात्री १०.३० बुधवारी साप्ताहिक सुट्टी

खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग:

खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी

खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा

खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम

खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी

खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!

खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tarakka : घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarakka : घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
High Court Names : शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
Embed widget