एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ५०० व १००० च्या नोटा बंद केल्याच्या उलट सुलट प्रतिक्रिया समाजातील विविध घटकांत उमटत आहे. मात्र, राज्यातील आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या मनपांसाठी नोटा बंदी इष्टापत्ती ठरली आहे. राज्यभरातील मनपांमध्ये जुन्या नोटा स्वीकारून कर वसुलीस परवानगी दिल्यानंतर जवळपास ८०० कोटी रुपयांची कर वसुली झाली आहे. हा आकडा न भूतो न भविष्यती आहे. खान्देशातील धुळे मनपाची जवळपास ९ कोटी व जळगाव मानपाची १० कोटींची वसुली शनिवार अखेर झाली होती. दिवाळीनंतर मनपासाठी हा धन लाभाचा मुहूर्त साधला गेला आहे. Khandesh-Khabarbat-512x395 धुळे व जळगाव या दोन्ही मनपा ड वर्गातल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या, पिचलेल्या अशी दोन्ही मनपांची स्थिती आहे. दोन्ही मनपांवर कर्जाचे आणि घेणेकऱ्यांचे कोट्यवधींचे ओझे आहे. अशा स्थितीत अचानकपणे हाती आलेले ९/१० कोटी रुपये कर्मचारी वेतन व त्यांचे इतर देणी यातच वळते होणार आहे. हा निधी कोणत्याही विकास कामावर खर्च होणे शक्य नाही. मात्र, नागरिकांनी करा पोटी भरलेल्या रकमा यात मनपांप्रति खुशी किंवा आनंद नाही. धुळे व जळगाव या दोन्ही महानगरांची ओळख आज बकाल व अस्वच्छ शहरे म्हणून आहे. सार्वजनिक स्वच्छता हा विषय दोन्ही ठिकाणी ठप्प आहे. नागरिकांची प्राथमिक सुविधांविषयी ओरड असतानाही केवळ बंद झालेल्या ५००/१००० च्या नोटा द्यायच्या म्हणून नागरिकांनी कर भरले आहेत. दोन्ही ठिकाणची लोकसंख्या प्रत्येकी ५ लाख आहे. अस्वच्छतेमुळे दिवाळीपूर्वी दोन्ही शहरांवर डेंग्यूसह इतर आजारांचे थैमान होते. आजही स्थिती फारशी निवळलेली नाही. दि. २४ नोव्हेंबर पर्यंत कर वसुली सुरु राहिली तर वसुलीचा आकडा दोन्ही ठिकाणी २० कोटीपर्यंत जावू शकतो. धुळे येथे मनपा आयुक्त श्रीमती संगिता धायगुडे व त्यांचे सहकारी तसेच जळगाव येथे आयुक्त जीवन सोनवणे व त्यांचे सहकारी यांनी कर वसुलीसाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले. यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना इलेक्ट्रॉनिक, वृत्तपते या माध्यमांचाही वापर केला गेला. नागरिकांनीही जुन्या नोटा वापरुन कर भरायला मुदत वाढ मागीतली. त्यामुळे कर वसुली वाढत गेली. धुळ्यात वसुली सोबत थकबाकीदार करदात्यांची यादी मनपाने जाहिर केली. यादीच मनपाने याआधी जाहीर केली होती. नंतर मालमत्ता कर, व्यापारी गाळ्यांचे भाडे वसुलीसाठी मालमत्तांना सील करणेसह जप्तीचे इशारे दिले. थकबाकीदारांवर दबाव निर्माण केला. यात धुळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप नाही केला. त्यामुळे वसुली वाढली. जळगावात मात्र मनपा प्रशासन जप्ती मोहिमेचा धाक दाखवून सर्व सामान्यांना घाबरवत राहिले. शहरातील कर थकबाकीदारांची नावे आयुक्तांनी जाहिर केली नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक कर भरत असताना पुन्हा कशाला घाबरवता ? असा प्रश्न उपस्थित झाला. वास्तविक मनपाच्या मालकिच्या २२०० गाळेधारकांकडे तीन वर्षांपासून भाडे थकीत आहे. त्याच्या वसुलीचे प्रयत्न प्रशासनाला करता आले नाही. आता धुळे व जळगावकर या अचानक झालेल्या धन लाभातून रस्ते, गटारी व इतर विकास कामाची अपेक्षा करीत आहे. पण ते शक्य नाही. दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांची देणी थकली आहेत. ठेकेदार पेमेंटकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. तेव्हा मनपा काही ठोस करू शकेल असे मुळीच नाही. जळगावात नगरसेवकही थकीत मिटींग भत्ता मागत आहेत. धुळ्यात आयुक्त श्रीमती संगिता धायगुडे व महापौर सौ. कल्पना महाले तर जळगावात आयुक्त जीवन सोनवणे व महापौर नितीन लढ्ढा यांचे छान जमते आहे. आता यातूनच विकास कामांच्या लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. धुळ्यात आमदार अनिल गोटेंच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामांसह अद्यावत चौपाटीसह फुटपाथ, जॉगिंग ट्रॅक, नानानानी पार्क आणि मार्केट बांधणीचे प्रस्ताव मंजूर आहेत. जळगाव शहरातही २५ कोटींच्या रस्त्यांची कामे मंजूर आहेत. नानानानी पार्कही मंजूर आहे. मात्र कामांचा प्रारंभ गतीने होत नाही. धुळ्यात केंद्रीयमंत्री गडकरी येवून गेले. भूमिपूजन झाले. जळगाकरांना अद्याप प्रतिक्षाच आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे फार काही प्रभावी काम करु शकत नाही. उलट, बीॲण्डसी मार्फत ज्या कामांचे टेंण्डरिंग होत आहे, त्या कामाला अशासकीय पत्राने स्थगितीची मागणी आमदार भोळे करीत आहेत. अशा प्रकारे आसोदा रस्ता काम व पोलीस वसाहतीतील गटारी, रस्त्यांचे काम रखडले आहे. धुळ्यात आमदार गोटेंनी पांझरा नदीच्या उत्तर व दक्षिण काठाच्या भागात रस्त्यांची कामे मंजूर करुन आणली आहेत.  नदीच्या दोन्ही बाजूस बाराशे एलईडी दिवे लागतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साडेचार हजार झाडे लावली जाणार आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या, टायर हे डांबरमिश्रणात टाकूण मजबूत रस्ता तयार करण्यात येणार आहे. याच पध्दतीने जळगावात मेहरुण तलाव सुशोभिकरणाचे काम महापौर नितीन लढ्ढा व उपमहापौर ललित कोल्हे करुन घेत आहे. परिसरात रस्ता, वृक्ष लागवड व एलईडी दिवे लागाले आहेत. यासाठी कलेक्टर सौ. रूबल अग्रवाल यांनी पुढाकार घेवून ५० लाखांवर निधी मिळवून दिला आहे. जळगाव, धुळ्यातील नागरी प्रश्न जवळपास सारखेच असून आता कर भरणाऱ्या नागरिकांना आता सुविधा हव्यात. दोन्ही ठिकाणी आगामी काळात रस्त्यांचा मुद्दा हा कळीचा ठरणे शक्य आहे. रस्त्यासोबत गटारी बांधणे आवश्यक असते. ही कामे नाही झाली तर मनपा प्रशासनाला लोक क्षोभाला तोंड देण्याची वेळ येवू शकते. पदाधिकारी व प्रशासनाने सावध होण्याचा पुढील काळ आहे.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget