IPL 2025 MI vs SRH: मुंबईला विजयाचा "जॅक"...आव्हान कायम

IPL 2025 MI vs SRH: १९८० मधे सिप्पी ब्रदर्स यांचा बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट घेऊन शान सिनेमा आला होता..तो येणार येणार म्हणून रसिकांस कमालीची उत्सुकता होती... सिप्पी ब्रदर्स यांचा शोले बॉक्स ऑफिसवर अजून ही धुमाकूळ घालत होता..आणि आता शोले या सिनेमाचे सर्व विक्रम शान सिनेमा मॉडेल असे सांगण्यात येत होते...पण जेव्हा शान आला तेव्हा तो पडला...आणि पडताना त्याचा आवाज सुद्धा झाला नाही.....या आय पी एल स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघाकडून अश्याच मोठ्या अपेक्षा ठेवल्या गेल्या...कारण होते तगडी स्टार कॉस्ट..मोठे बॅनर.. ( अंबानी , मारण)...मोठे दिग्दर्शक ( जयवर्धने , विटोरी)....आणि ऑक्शन मध्ये रिटेन केलेले आणि विकत घेतलेले मोठे खेळाडू...काय नाही या संघाकडे...खूप अपेक्षा असलेले आय पी एल च्या बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही संघ आतापर्यंत जेमतेम कामगिरी करून आहेत....कधी ही स्पर्धे बाहेर फेकले जाऊ या भीती ने प्रत्येक सामना खेळत आहेत...याच वातावरणात काल हे दोन्ही संघ वानखेडे वर एकमेकांसमोर आले..२४४ धावांचा विजयी पाठलाग करून हैदराबाद ...तर रोमहर्षक सामन्यात दिल्ली वर विजय मिळवून मुंबई..
काल नाणेफेक जिंकून मुंबई ने प्रथम गोलंदाजी करण्याचं निर्णय घेतला..आणि हैदराबाद संघाला त्यांनी फलंदाजी साठी आमंत्रण दिले.. आय पी एल हा खेळच स्ट्राईक रेट चा आहे..तुमचे नाव मोठे आहे ... तुमच्या भूतकाळात धावा आहेत म्हणून धावफलक हालत नाही...अभिषेक शर्मा आणि हेड ही तगडी सलामीची जोडी .त्यांनी सलामी ५९ धावांची दिली...पण त्यांनी पॉवर प्ले मध्ये फक्त ४६ धावा केल्या..त्यांच्या अभिषेक शर्मा चा स्ट्राईक रेट १४२ तर हेड याचा ९६.. हे दोघे बाद झाल्यावर बोल्ट, बुमराहा आणि विल जॅक या तिघांनी हैदराबाद ला जखडून ठेवले ते अगदी शेवटपर्यंत. ...क्लासन ने ३७ धावा केल्या पण त्याचा स्ट्राईक रेट १३२ इतका होता..यावरून मुंबई संघाची गोलंदाजी काय होती याचा अंदाज येतो..शेवटी अनिकेत वर्मा याने फटकेबाजी केली पण तेव्हा उशीर झाला होता..नितीश आणि ईशान आज पण चमकदार कामगिरी करण्यात अयशस्वी ठरले. ..या आय पी एल स्पर्धेत ईशान एका शतकावर किती दिवस राहील .काल सामना संपल्यावर रोहित शर्मा सोबत बराच वेळ बोलत होता..आशा करू या ईशान फॉर्म मध्ये लवकर येईल....१६३ धावांचा आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात रोहित शर्मा ने ३ षटकार मारून चांगली केली...पण रोहित शर्मा ने पुन्हा एकदा आशाच् दाखविल्या..पण रोहित बाद झाल्यावर रिकल टन..जॅक..सूर्यकुमार ..तिलक या सर्वांनी धावसंखेत वाटा उचलला...आणि मुंबई संघाला विजय मिळवून दिला..हार्दिक ने ९ चेंडूत चमकदार खेळी केली...त्याने कमिन्स ला मारलेला एक बॅकफूट पुल काऊ कॉर्नर वरून सीमरेषे वर पाठविला..आजच्या सामन्यातील तो सगळ्यात देखणा फटका. ..हार्दिक त्याच्या ताकदी सोबत काय टायमिंग करतो हे दाखविणारा फटका..सुनील गावसकर यांच्या सोबत वेस्ट इंडिज दौऱ्यात... अशोक मंकड होते. .. दौरा संपेपर्यंत अशोक मंकड यांच्या धावा झाल्या नाहीत...शेवटच्या सामन्यात अशोक मंकड यांचे एक अर्धशतक झाले...तेव्हा ते सुनील गावसकर यांना म्हणाले ..बघितलं सनी... दौरा संपला आणि मला फॉर्म सापडला.....रोहित शर्मा याचा अशोक मंकड होऊ नये हीच अपेक्षा....
संबंधित लेख:
IPL 2025, DC vs RR: स्टार्कच्या मदतीनं दिल्लीची तीन 'अक्षर' विजयाची!

























