IPL 2025 MI vs LSG: नवाबांना विजयाचा तिलक

आज लखनौ आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई ने चाहत्यांना एक प्रकारचा एप्रिल फुल केले...हातात असलेल्या सामना तिलक वर्माच्या अथक प्रयत्नातून त्यांनी लखनौ संघाला बहाल केला...असाच एक सामना मुंबई संघ गेल्या आय पी एल मधे हरले होते आणि तिथे सुद्धा तिलक होता...तेव्हा ड्रेसिंग रूम मध्ये खूप काही झाल्याची चर्चा होती. नाणेफेकीचा कौल मुंबई संघाने जिंकून त्यांनी लखनौ संघाला फलंदाजी साठी आमंत्रण दिले..आज संघात रोहित नव्हता.. फ्रेंचायसी क्रिकेट क्रूर असते..इथे तुम्ही रोहित शर्मा जरी असाल तरी तुमचे नशीब विराट आणि धोनी सारखे असेल तर आणि तरच तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक असता अन्यथा कॉर्पोरेट वाले त्यांचे नियम तुम्हाला दाखवितात.
लखनौ संघाने पहिल्या षटकापासून आपले इरादे स्पष्ट केले...मिचेल मार्श ने सलामीला येऊन ट्रेन बोल्ट आणि दीपक चाहर च्या गोलंदाजीवर हल्ला चढवला...तिसऱ्या षटकापासून मिचेल मार्श ने सीमारेषा हवेतून ओलांडायला सुरुवात केली... तिसऱ्या षटकात बोल्ट चां एक चेंडू त्याने लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळताना नजाकत दाखवली...आणि नंतर २७ चेंडूत अर्धशतक झळकविले....तो फटक्यांची आतषबाजी करीत असताना माक्रम काही वेळ शांत होता...विघ्नेश च्या गोलंदाजीवर जेव्हा मार्श झेलबाद झाला तेव्हा मुंबई संघाने सुटकेच निश्वास टाकला...त्यानंतर लखनौ संघाने दोन बळी झटपट गमाविले..ते दोन्ही बळी हार्दिक ने मिळविले...पंत २७ कोटी इतक्या किमतीत घेतला गेला आणि चार सामन्यात त्याच्या धावा आहेत १९....सध्या पंत ची एक धाव जितकी महाग आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट महाग नाही. आयुष बदोनी किती सुंदर खेळतो.. सॅटनर ने जे १४ वे षटक टाकले त्यात पहिला चेंडू इन साईड आउट एक्स्ट्रा कव्हर वरून चौकार..दुसरा चेंडू स्वीप खेळून स्क्वेअर लेग वर चौकार आणि तिसरा चेंडू स्क्वेअर कट करून डिप पॉइंट सीमारेषे बाहेर चौकार...लक्ष्यात घ्या तो मिचेल सेटनर आहे..जागतिक कीर्तीचा डावखुरा गोलंदाज.. प्रत्येक वेळी चेंडू टाकताना त्याने आपल्या लाईन आणि लेन्थ मध्ये बदल केले. आणि प्रत्येक चेंडूवर आयुष बदोनी ने तेवढेच चोख उत्तर दिले. माकरम आणि बदोनि यांच्या भागीदारी मुळे.त्यात मकरम याने अर्धशतक पूर्ण केले.आणि मिलर च्या छोट्या केमिओ मुळे लखनौ संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला...खरे तर ते अधिक धावा करू शकले असते पण हार्दिक ने अप्रतिम गोलंदाजी करून गोलंदाजीत आपल्या पहिल्या पंचकाला गवसणी घातली.
धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाला सुरवातीला दोन धक्के मिळाले....आणि याचे श्रेय कर्णधार ऋषभ पंत ला द्यावे लागेल...दोन्ही झेल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर बिश्नोई च्या हातात गेले दोन्ही वेळेला फलंदाज तोच फटका खेळले.. त्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई चा डाव सावरला नमन धीर याने २४ चेंडूत ४६ धावांची वेगवान खेळी करून बाद झाला...त्याच्याकडे असलेली हाय बॅकलिफ्ट आणि बॅटचा स्विंग त्याला मोठे फटके खेळण्याची परवानगी देतो...आज त्याने ३ षटकार मारून तो मुंबई संघात का खेळतो याचे उत्तर दिले...नमन बाद झाल्यावर तिलक मैदानात आला पण आज तो खूपच अडखळत खेळत होता त्याचा परिणाम सूर्यकुमार वर झाला आणि सूर्यकुमार बऱ्याच बाहेरच्या चेंडूवर छोटी सीमारेषा बघून खेळायला गेला आणि बाद झाला..सूर्याने ४३ चेंडूत ६७ धावांची देखणी खेळी केली .ज्या चेंडूवर तो बाद झाला तो चेंडू तो ऑफ साइडला सहज टोलवू शकत होता....पण गडकरी यांना जसा अनुप्रास अलंकाराचा मोह असायचा तसाच सूर्यकुमार याला तश्या फटक्यांचा मोह कायम असतो, त्यानंतर जेव्हा हार्दिक आला तेव्हा सरासरी १३ झाली आणि नंतर ती १५ पर्यंत गेली....हार्दिक ने प्रयत्न केले पण शार्दुल ठाकूर याने १९ वे षटक अप्रतिम टाकले .त्याच षटकात तिलक वर्मा याला रिटायर्ड हर्ट चा निर्णय किती योग्य होता हे मुंबई व्यवस्थापनच सांगू शकेल...कारण शेवटच्या षटका मध्ये हार्दिक ने एकेरी धाव घेण्यास मनाई केली मग तिलक राहिला असता तर काय फरक पडला असता...फक्त ७ धावा शार्दुल ने दिल्या बऱ्याच वेळी २०/२० मधे १९ वे षटक महत्त्वपूर्ण ठरते..आणि या वेळेस शार्दुल ने ती जबाबदारी लखनौ संघासाठी घेतली .शेवटच्या आवेश च्या षटका मध्ये 22 धावा हे अवघड समीकरण मुंबई संघाला पार करता आले नाही. ..आणि त्यांचा पराभव झाला..तिलक वर्मा याने २५ धावा काढण्यासाठी २३ चेंडू घेतले आणि तेच पराभवाचे कारण बनले...दिग्वेश चे विशेष कौतुक कारण त्याने चार षटकात केवळ 21 धावा देऊन दोन बळी मिळविले... कॅरम बॉल वर नमन चा उडवलेला त्रिफळा अफलातून होता...आजच्या सामन्यानंतर लखनौ ड्रेसिंग रूम मध्ये गोयंका साहेब आनंदात असतील.. तर मुंबईच्या ड्रेसिंग रूम सुतक असेल...आज लखनौ संघाने विजय मिळविला...कॉर्पोरेट मधे त्याला पूल टार्गेट झाले असे म्हणतात..गोयंका साहेब आज आनंदात राहून उद्या सकाळी संघामधील कमजोर कडी शोधतील...आणि रिव्ह्यू घेतील..आत्ताच्या घडीला लखनौ संघाची कमजोर कडी ऋषभ पंत आहे.

























