एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेत अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी आहेत. कुठे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची रिक्तपदे, कुठे इमारतींचे प्रश्न तर कुठे सेवा– सुविधांविषयक तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाण आरोग्य यंत्रणेविषयी ग्रामस्थ नाराजी व्यक्त करताना दिसतात. मात्र, राज्य सरकारने ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात खान्देशातील ग्रामीण आरोग्य सुविधा सुधारण्याची शक्यता आहे. राज्य सरकार नव्याने ७४ आरोग्य उपकेंद्र, २० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय, दोन जिल्हा रुग्णालय, चार स्त्री रुग्णालय व सहा ट्रॉमा केअर युनिट अशा १११ नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देत आहे. त्यासाठी १,३३२ पदे नव्याने निर्माण केली आहेत. Khandesh-Khabarbat-512x395 नव्याने निर्माण होणाऱ्या आरोग्य संस्थांमध्ये ७४ आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यात नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात काही उपकेंद्र सुरू होतील. त्यासाठी आरोग्य सेवक, एएनएम, अंशकालीन स्त्री परिचर अशी २२२ नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. यासोबत राज्यात २० ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्यात येत असून यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वाधिक १२ प्राथमिक आरोग्य केंद्र हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहेत. त्यासाठी एकूण २४० पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणे येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नंदुरबार व धुळे येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. जळगाव शहरात या रुग्णालयाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. धुळे येथील १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी व तेथील दहा विशेषोपचार कक्षासाठी पद निर्मित्ती करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयाची संख्या ३०० खाटांवरून ४०० खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ४८ पदे निर्माण केली जाणार आहेत. नवनिर्मित १,३३२ जागांमध्ये गट-अ दर्जाचे २६७ वैद्यकीय अधिकारी असून उर्वरित १०६५ इतर पदे आहेत. जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यंतरी केला. त्यांनी काही रिक्त पदे मंजुरीसाठी थेट आरोग्यमंत्र्यांशी संपर्क केला. मात्र, आता आरोग्य मंत्रालयाने सर्वच ठिकाणच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू केली आहे. अलिकडे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जळगावला येवून गेले. त्यांनाही मंत्री महाजन व माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आरोग्य यंत्रणेतील अडचणी सोडविण्याची विनंती केली. जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाचा विस्तार, स्त्री रुग्णालयाचे बांधकाम रेंगाळले आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे मंत्री पाटील यांनी मान्य केले. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने मध्यंतरी स्वच्छता विषयक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तेथील सुसज्ज महिला कक्ष, अपघात विभाग, अत्यानुधिक बाल अतिदक्षता विभाग याची सरकार स्तरावर देखल घेतली गेली. परंतु जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व्यवस्थेविषयी अनेक तक्रारी सध्या जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. ६ पैकी चार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची पदेही रिक्त होती. २९ प्राथमिक आरोग्य केंद्रात गट अ आणि ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही रिक्त होती. पदे रिक्त असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. याकडे मंत्री रावल लक्ष देत आहेत. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विषयक यंत्रणेविषयी फारशी समाधानकारक स्थिती नाही. मात्र, राज्य सरकाने आता वाढवून दिलेल्या सुविधांमुळे काही स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. धुळे येथील बंद असलेल्या जन्या जिल्हा रूग्णालय जागेत २०० खाटांचे रूग्णालय सुरू होणार आहे. यासाठी केंद्रीयमंत्री सुभाष भामरे यांनी लक्ष घातले आहे. या रुग्णालयासाठी रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने १११ नवीन आरोग्य संस्थाना मंजुरी दिली आहे. त्यात धुळ्याच्या या जुन्या जिल्हा रूग्णालयाला नवसंजिवनी मिळणार आहे. धुळे शहरात मनपाचे सुसज्ज हॉस्पिटल नाही. त्यामुळे जुने जिल्हा रुग्णालय सुरू होणे हे जिल्हावासियांसह शहरवासियांसाठी उपयुक्त ठरणार आहे. खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग : खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

 खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार? खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो… खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!! खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले… खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी! खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात? खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
ABP Premium

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले,  ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget