एक्स्प्लोर

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे वैद्यकिय शिक्षणमंत्रीही आहेत. महाजन यांना मंत्रिपद दोन-अडिच वर्षांपूर्वी मिळाले आहे. मात्र, विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करीत असताना महाजन यांनी विधीमंडळ परिसरात स्वतःची ओळख आरोग्यदूत म्हणून निर्माण केली आहे. याचे कारणही असे की, महाजन यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील सुप्रसिद्ध इस्पितळांमध्ये मतदार संघातील गरजू रुग्णांवर मोफत उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याचे विधायक मार्ग शोधून काढले आहेत. त्यांच्या या सुविधांची चर्चा झाल्यानंतर तेव्हाच्या काँग्रेस आघाडीतील मंत्रीही आपापल्या मतदार संघातील गरजू रुग्णांना महाजन यांच्या सहकाऱ्यांकडे पाठवित असत. या कार्यपद्धतीमुळे महाजन यांची आरोग्यदूत म्हणून ओळख अधिक गडद होत गेली. राज्यात भाजप नेतृत्वातील देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाजन यांचा मत्रिमंडळातील प्रवेश उशिराच झाला. महाजन यांना जलसंपदा आणि वैद्यकिय शिक्षण मंत्रालय मिळाले. यासोबत नाशिक व नंदुरबारचे पालकमंत्रीपदही मिळाले होते. वैद्यकिय शिक्षण मंत्रीपद हाती आल्यानंतर महाजन यांनी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात गरजू रुग्णांसाठी आरोग्य महाशिबीरे आयोजित केली. नंदुरबारचे पालकमंत्रीपद महाजन यांच्याकडून जयकुमार रावल यांच्याकडे नंतरच्या काळात गेले. मात्र, महाजन यांनी अलिकडेच नंदुरबार येथेही आरोग्य महाशिबीर घेऊन तेथील गरजू रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन दिल्या. महाजन यांच्या नेतृत्वात मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनीही बीड येथे आरोग्य महाशिबीर घेतले. याशिवाय, जामनेर मतदारसंघ हा मोतिबिंदू मुक्त करण्याचा आणि जळगाव जिल्ह्यात एकही गरजू रुग्णांवर महागडी शस्त्रक्रिया करण्याचे राहू नये असा संकल्प महाजन यांनी केला आहे. आपली आरोग्यदूत ही लोकउपाधी सार्थकी ठरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी जळगावात वैद्यकिय शिक्षण संकूल (मेडिकल हब) सुरु करण्याचे महत्वाकांक्षी स्वप्न बाळगले आहे. पहिल्या टप्प्यात या संकुलाच्या उभारणीस राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संकुलासाठी सुमारे 1250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. हे वैद्यकिय शैक्षणिक संकूल खान्देशातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय यांचा समावेश असेल. या संकुलासाठी मिळणाऱ्या निधीतून बांधकामे, वेतन, उपकरणे याचा खर्च होईल. याशिवाय कर्मचाऱ्यांची आवश्यक पदनिर्मिती होणार आहे. या वैद्यकिय शैक्षणिक संकुलासाठी मौजे चिंचोली शिवारातील 46.56 हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या संपूर्ण संकुलास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांच्या अनुषंगाने एकूण 12 एकर जागा हवी आहे. सन 2017 च्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकिय अभ्यासक्रम सुरू होतील असे नियोजन आहे. यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवून वापर केला जाणार आहे. मुंबई, पुण्यानंतर सध्या जळगाव शहरात खासगी वैद्यकियसेवा अत्यंत प्रगत मानली जाते. जळगावात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या वाढते आहे. शिवाय जळगावातील काही डॉक्टरांनी एकत्र येवून बहुविध सेवांची रुग्णालये सुरु केली आहेत. मात्र, जळगाव हे खासगी वैद्यकिय सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या चढ्या शुल्कांमुळे बदनाम झालेले आहे. कट प्रॅक्टीस हा शब्द वैद्यकिय सेवेत परवलीचा झाला आहे. अशा वातावरणात शासकिय वैद्यकिय संकुलामुळे खासगी सेवांचे दर रुग्णांना परवडणाऱ्या पातळीवर येतील अशी अपेक्षा आहे. जळगाव येथे शासकिय वैद्यकिय शिक्षण संकुलाचा विषय मार्गी लागत असताना नंदुरबार येथे पूर्वी मंजूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचा विषय सुद्धा चर्चेत आला आहे. नंदुरबार येथे आरोग्य महाशिबीराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यांनी नंदुरबारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करण्यासंदर्भात सुतोवाच केले. म्हणजेच जळगाव पाठोपाठ आता नंदुरबारचा विषय सुद्धा मार्गी लागू शकतो. नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित हे काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी सन 2013 मध्ये नंदुरबारसाठी वैद्यकिय महाविद्यालयाला मंजुरी मिळविली होती. परंतु आवश्यक तांत्रिक बाबींची तेव्हा पूर्तता झाली नाही. तेव्हा सलग 12 एकर जागाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाले नाही. नंदुरबार हा आजही आदिवासी बहुल वस्तीचा जिल्हा आहे. तेथील आदिवासी डोंगर-दऱ्यांत राहतात. बालमृत्यू, कुपोषण, साथींचे आजार, सिकलसेल ऍनिमिया असे या भागातील गंभीर आजार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरकारी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी वैद्यकिय महाविद्यालय उपयुक्त ठरले असते. डॉ. गावित हेही वैद्यकिय शिक्षणमंत्री होते. तेव्हा त्यांनी नंदुरबारसह बारामती, अलिबाग, चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालये मंजुर केली होती. मात्र, या महाविद्यालयांची फाईल पुढे सरकली नाही. नंदुरबार येथे वैद्यकिय महाविद्यालय करायचे तर किमान 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 200 खाटा आहेत. 100 खाटांचे महिला रुग्णालय बांधले जात आहे. वर्षभरात तेही सुरू होईल. आयुष विभागाचे 50 खाटांचे रुग्णालय मंजूर आहे. वैद्यकिय महाविद्यालय होण्यासाठी अजून 150 खाटांचे रुग्णालय हवे. अपवाद म्हणून किंवा आदिवासी भाग म्हणून 300 खाटांचे रुग्णालय असले तरी तेथे वैद्यकिय महाविद्यालय सुरु होवू शकेल. पर्याय असा काहीही काढला तरी पुरेशा जागेची अडचण आजही आहे. यासाठी एमआयडीसी परिसरात टोकरतलाव रस्ता, कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस आणि तंत्रनिकेतनची जागा हे पर्याय आहेत. जळगाव प्रमाणेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयातही महाविद्यालय सुरु करता येवू शकते. वैद्यकिय शिक्षण मंत्री स्वतः महाजन असून जळगावसाठीची अडचण ते ज्या प्रमाणे सोडवतील त्याच प्रमाणे नंदुरबारचीही अडचण सुटू शकते. भाजपत अशी चर्चा आहे की, आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर डॉ. विजय गावित यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या जर-तर च्या गोष्टी लक्षात घेवूनच जळगावसह नंदुरबारचाही वैद्यकिय शिक्षण संकुलाचा प्रश्न मार्गी लागू शकतो असे दिसत आहे. तसे झाले तर खान्देश हे वैद्यकिय शिक्षण व उपचारांच्या दृष्टीने मेडिकल हब होईल.

‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :

  ब्लॉग : नगरोत्थानात खान्देशातील 4 शहरांचा समावेश आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग ! खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच ! यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार ! खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी  खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !! खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे! खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार? खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो… खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!! खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले… खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी! खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात? खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत  
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget