एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Destroy The Makeup आणि आपण भारतीय स्त्रिया

दक्षिण कोरीयात एक नवी चळवळ बाळसे धरत आहे ती म्हणजे Escape The Corset. मेन स्ट्रीममधील बाह्य सौंदर्यविषक संकल्पनांच्या बळी ठरत असलेल्या कोरीयातील महिला खोट्या सौंदर्यविषयक संकल्पनांना फाट्यावर मारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

समाजाच्या मुख्य प्रवाहाने ठरवून दिलेल्या कोणत्याही मापदंडांमध्ये सामील होण्यासाठी प्रवाहाबाहेरील वर्गाला जेवढी ऊर्जा खर्च करावी लागते तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ऊर्जा त्या मापदंडांविरोधात बंड उभं करण्यासाठी लागते. आणि निर्भिडपणे या बंडाचा झेंडा हाती घेणे स्त्रियांसाठी तर कधीच सोपे नसते. जगव्यापी मीटू चळवळीच्या यशस्वीतेनंतर दक्षिण कोरीयात एक नवी चळवळ बाळसे धरत आहे ती म्हणजे Escape The Corset. मेन स्ट्रीममधील बाह्य सौंदर्यविषक संकल्पनांच्या बळी ठरत असलेल्या कोरीयातील महिला खोट्या सौंदर्यविषयक संकल्पनांना फाट्यावर मारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. जून २०१८ मध्ये लीना बेई नावाच्या कोरीयन ब्यूटी ब्लॉगरने यू ट्यूब या सोशल नेटवर्कींग साईटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला. काही तासातच या व्हिडीओला लाखो हिट्स आणि व्ह्यूज मिळाले. काय वेगळं होतं या व्हिडीओत? 'प्रत्येक स्त्रीने मेकअप केलाच पाहिजे. तिने प्रेझेंटेबल दिसलेच पाहिजे' अशी रिस्ट्रीक्शन असणाऱ्या देशात लीना बेईने चेहऱ्यावर लावलेले मेकअपचे थर पूसून टाकत "मी जशी आहे तशीच बरी आहे." म्हणण्याचं धाडस दाखवलं होतं. काही दशकांपूर्वी परंपरावादी भारत देशातील स्त्रीने मंगळसूत्र घालायला, कुंकू लावयला दिलेला नकार इथल्या समाजासाठी जितका धक्कादायक होता तितकचं कोरीयन लोकांसाठी धक्कादायक होतं लिना बेईचं चेहऱ्याला करण्यात येणाऱ्या रंगरंगोटीला नकार देणं. तिच्या अशा स्टेटमेंटनं नाइलाज म्हणून आपला अमूल्य वेळ आणि पैसा मेकअपवर खर्च करणाऱ्या कोरियातील अनेक स्त्रिया प्रभावीत झाल्या. त्यांनी EscapeThe Corset हा हॅशटॅग वापरून मेकअपविरूद्ध बंड पुकारलं. आपापल्या मेकअपच्या किट्स डिस्ट्रॉय करतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले. सोळाव्या शतकात साऊथ कोरियामध्ये शरीर व्यवस्थित शेपमध्ये बसविण्यासाठी स्त्रियांकरता कोरसेट नावाच्या कंपनीने काही पट्टे बाजारात आणले होते. कोरीयन स्त्रियांचं सौंदर्याच्या चुकीच्या मापदंडांना बळी पडणं तिथूनच सुरू झालं म्हणून या चळवळीला हे नाव दिलं गेलं. महिलांनी डायरेक्ट कॉस्मेटीक वापरायलाच नकार दिल्यानं जगातील आठव्या नंबरची कॉस्मेटीकची मोठी इंडस्ट्री असणाऱ्या साऊथ कोरीयातील व्यापारी वर्गाचं धाबं दणाणलं नसेल तर नवलंच. सतत सुंदर दिसण्यासाठी कोणतीही किंमत चुकवणाऱ्या स्त्रियांनी या चळवळीला का पाठिंबा दिला असावा? या प्रश्नाच्या मुळाशी जाताना काही मूलभूत गोष्टी समोर येतात ज्यांचा अतिरेक या चळवळीला कारणीभूत ठरला असं खात्रीने म्हणता येऊ शकतं. आपल्या न्याय-हक्कांसाठी जागृत झालेल्या स्त्रीचा अजूनही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच वापर होतोय हे नुकत्याच येवून गेलेल्या metoo चळवळीच्या वादळावरून कळलेच आहे. ही चळवळच Escape The Corset ची प्रेरणा आहे. प्रसारमाध्यमांमधून स्त्रीचा जो काही वापर केला जातोय त्याचा अर्थही 'Woman is only An OBJECT' असाच होतो. पुरूषांची मक्तेदारी असलेली प्रसारमाध्यमं स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या ठरवून देतात आणि त्या व्याख्येत स्वतःला फिट बसवण्यासाठी स्त्री स्वतःची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शक्ती खर्च करते. स्त्रीचं खरं सौंदर्य हे 'सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानेच सिद्ध होतं' असा बुद्धीभेद प्रसाधन उत्पादकांनी सुरू केला. आणि स्त्री त्याला बळी पडली. या कंपन्यांनी आधी समाजातील वरच्या वर्गातील महिलांना टार्गेट केलं. तुम्हांला सुंदर दिसायचं असेल तर सौंदर्य प्रसाधनं वापरायलाच हवीत असा अपप्रचार करत त्यांना आपला कायमचा ग्राहक बनवलं. वरच्या वर्गातील स्त्रीयांप्रमाणे सुंदर दिसण्याचा हट्ट खालच्या वर्गातील स्त्रिया धरू लागल्या व त्या प्रसाधनांच्या वापरांकडे वळल्या. त्यावर वाट्टेल तितका पैसा उधळू लागल्या. आपण जशा आहोत त्यापेक्षा पुरूषांना आपण कशा दिसायला हव्या आहोत याचा विचार स्त्रिया अधिक करतात हे म्हणणं धाडसाचं असलं तरी खरं आहे. 'सुंदर दिसणाऱ्या, सुंदर नसल्या तरी मेकअपचे थरावर थर लावून सुंदर दिसू पाहणाऱ्या, सतत अप टू डेट राहणाऱ्या स्त्रीलाच समाजात मान प्रतिष्ठा आहे. तुम्ही तशा नसाल तर तुमच्यातल्या टॅलेंटला कुणी विचारत नाही. 'हे आजचं जगभरातलं वास्तव चित्र आहे. हे चित्र निर्माण व्हायला जेवढी पुरूषप्रधान संस्कृती जबाबदार आहे तेवढंच जबाबदार आहे स्त्रीवर्गाचं आंधळेपणानं भांडवलशाहीने तयार केलेले कोणतेही चुकीचे ट्रेंड फॉलो करणं. सौंदर्याचा वापर करून हवं ते काबीज करता येतं, जिंकता येतं हे स्त्रियांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. स्वतःतला सिद्ध करण्यासाठी आपलं सौंदर्य विकणाऱ्या स्त्रिया आहेत. ते विकत घेणारी बाजारपेठही आहे कारण कोणतीही वस्तू विकायची असेल तर बाजारपेठ चलनी नाणं म्हणून स्त्रीचा वापर करते मग ती वस्तू पुरूषाने वापरायचीही असू देत अथवा स्त्रीने. पण हा ट्रेंडकाही स्त्रियांनी सेट केला नाही तर प्रसारमाध्यमांचे दोर हाती असणाऱ्या पुरूषवर्गानं केला. त्वचेला व एकूणच शरीराला हानीकारक असणाऱ्या प्रसाधनांचा मारा करून आपल्याला केवळ एक वस्तू म्हणून मार्केटमध्ये उभं केलं जातय. ही भांडवलशाहीची गल्लेभरू चाल स्त्रियांच्या लक्षात येत नाही का? तर येते. काही स्त्रियांना या सौंदर्याच्या बाजारात आपली शोभेचे बाहुली होऊच द्यायची असते, आत्मसन्मान गहाण टाकून आर्थिक कमाई करायची असते तर काहींना सेट असलेल्या ट्रेंडचा मनस्वी तिटकाराही असतो. पण मुख्य प्रवाहात राहायचं असेल तर त्या प्रवाहाचा ट्रेंड फॉलो करणं त्यांना भाग असतं. काही ज्या बोटावर मोजण्याइतक्या स्त्रिया असतात त्या हे कायदे-कानून, नियम धुडकावून लावतात. इतर स्त्रियांनाही हे करायला भाग पाडतात. मुख्य प्रवाहाचे सगळे नियम धाब्यावर बसवून आपला आत्मसन्मान जपू पाहणारी ती कधी अलिसा मिलानो (मीटू चळवळीची उद्गाती) असते तर कधी लीना बेई असते. पुरूषांना सेवा देणारी आपण केवळ एक उपभोग्य वस्तू होतोय हे त्यांच्या ध्यानात आलेलं असतं. आपल्या शरीराचा उपभोग घेतला जातोय , घातक उत्पादनांचे आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतात याबद्दल त्या अवेअर झालेल्या असतात. शिवाय आपण जशा आहोत तसं स्वीकारण्यासाठी त्यांचं शरीर आणि मनही आनंदानं तयार झालेलं असतं. आपल्या भारतीय स्त्रियांनीही स्वतःच्या न्यायहक्कांसाठी मोठी चळवळी उभी केली. कधी ती सनातन संस्कृतीविरूद्ध होती, कधी तथाकथित पुरूषी वर्चस्वाविरूद्ध , कधी स्त्री-पुरूष असमानतेविरूद्ध तर कधी आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाविरूद्ध होती. आज सर्व क्षेत्रांत स्त्रीचा जो मुक्तसंचार आहे तो त्यांनी केलेल्या या चळवळींमुळेच आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मीटू चळवळतही भारतीय स्त्रियांनी हिरीरीने भाग घेतला. आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात इथल्या बड्या बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडलं. उशीरा का होईना हे धाडस दाखवणारी भारतीय स्त्री कौतुकाचा विषय ठरली. सध्यातरी दक्षिण कोरीयातलं 'Escape The Corset' चं वारं आपल्याकडे येणार नाही हे नक्की. पण कधीच येणार नाही का? कॉस्मेटीक साधनांची आयात करणाऱ्या देशांत भारत देशही काही मागे नाही. मागच्या काही वर्षात भारतातील स्त्रियांकडून सौंदर्य प्रसाधनांचा वापर प्रचंड वाढला आहे हे विविध सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. स्त्री नोकरी करणारी असो अथवा गृहिणी असो किंवा शाळकरी मुलगी असो त्यांचे ड्रेसिंग टेबल कॉस्मेटीकच्या साहित्यांनी खचाखच भरलेले असतात. त्यातल्या किती वस्तू खरंच गरजेच्या असतात? साऊथ कोरीयात जे सौंदर्याचे मापदंड आहेत तितके काटेकोर मापदंड भलेही सध्या भारतात नसतील पण भारतीय स्त्रीचं वरचेवर होणारं वस्तूकरण बघता येणाऱ्या दिवसात भारताचं साऊथ कोरीया होणार नाही कशावरून? बाह्यसौंदर्यातला तकलादूपणा, पुरूषी वर्चस्ववाद्यांकडून ऐनकेनप्रकारे घेतला जाणारा उपभोग, आपलं वरचेवर होणारं वस्तुकरण तासाभराच्या एखाद्या इव्हेंटसाठी हजारो-लाखो रूपये मेकअपवर खर्च करणाऱ्या स्त्रियांच्या जोवर नीटपणे लक्षात येत नाही तोवर त्यांचे टेबल्स, त्यांच्या पर्स आरोग्याला हानी पोहचवणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांनी ओसंडून वाहणार आहेत.आणि ' Woman is only An OBJECT' यावर वारंवार शिक्कामोर्तब होणार आहे. - कविता ननवरे.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget