एक्स्प्लोर

World No Tobacco Day: रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस!

World No Tobacco Day : धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू ही जगभर असलेली गंभीर समस्या आहे. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization – WHO) दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून घोषित केला आहे. प्रत्येक वर्षी तंबाखू वापराच्या एका विषयावर लक्ष वेधले जाते. यावर्षीचा विषय आहे "We Need Food Not Tobacco" जगभरात अन्नटंचाई वाढली आहे. त्यासाठी तंबाखू ऐवजी पर्यायी पीक घण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. 

तंबाखूमध्ये अनेक रसायने आहेत. यामध्ये निकोटीन व अन्य अनेक हानिकारक व कर्करोगास कारणीभूत रसायने उदा. Tobacco Specific Nitrosamines TSNA  समावेश आहे. जेव्हा शेतकरी तंबाखूची पाने हाताळतात तेव्हा त्यांना Green Tobacco Sickness हा आजार होऊ शकतो. यामध्ये तंबाखूच्या पानातील निकोटीन हे त्वचेतून शरीरात शोषले जाते व त्यामुळे मळमळणे, चक्कर येणे, डोके जड होणे, उलट्या होणे, पोट दुखणे अश्या तक्रारी येतात. साधारण याचे प्रमाण 25% म्हणजे चार शेतकऱ्यांमधील एकाला हा त्रास होतो. आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय तंबाखूच्या शेतीमध्ये स्त्रिया आणि मुले ही काम करताना आढळतात. गरोदर स्त्रिया तंबाखूच्या शेतीवर काम करत असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. याशिवाय लहान मुले जर तंबाखूच्या शेतात काम करत असतील तर त्यांच्या त्वचेमधून त्यांच्या वजनाच्या तुलनेत जास्त निकोटीन शरीरात जाऊन मुलांना आजार होतात. 

तंबाखू साठी खते व जंतूनाशकांचा वापर केला जातो (Fertilisers and Insecticides) त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची आरोग्य तक्रारी वाढू शकतात. याशिवाय तंबाखूच्या शेतीमुळे पर्यावरणाचीही हानी होते. जमिनीची कस कमी होते व नंतर इतर पिके घेणे अवघड होऊ शकते. यासाठी संयुक्त राष्ट्राच्या विविध संस्था एकत्रितरीत्या विविध देशांमधील सरकारांबरोबर काम करत आहेत. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO), WORLD FOOD PROGRAM, FOOD AND AGRICULTURAL ORGANIZATION (FAO) यांचा समावेश आहे. पर्यायी पिकांविषयी आपल्या सरकारने करत असलेले प्रयत्न आणि उपाय योजनांबाबत या निमित्त जागृती होणे गरजेचे आहे.

आपल्या शरीरातील जवळ जवळ प्रत्येक अवयवावर तंबाखूचा दुष्परिणाम होऊ शकतो. भारतात तोंडाचा कर्करोग, जो तंबाखू वापरण्यामुळे होतो, ह्याचे प्रमाण चिंताजनक आहे. असंसर्गजन्य आजार  म्हणजेच Non – Communicable Diseases (NCD) . यामध्ये कर्करोग, हृदयरोग, श्वसन मार्गाचे आजार आणि डायबीटीस यांचा समावेश आहे. या आजारांसाठी तंबाखू सेवन एक धोक्याचा घटक (Risk factor) आहे. असंसर्गजन्य आजार यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत असल्याचे शास्त्रीय अभ्यासात नमूद केले आहे. असंसर्गजन्य आजार  विकसीत देशांमध्ये पन्नाशी ते साठीच्या वयोगटात आढळतात तर भारतीयांमध्ये साधारण चाळीस ते पन्नास अथवा याही पेक्षा कमी वयात आढळतात असे लॅन्सेट (Lancet) ह्या जगविख्यात वैद्यकीय नियतकालिकेतील एक  शोध निबंधात नमूद केले आहे.

आपल्या देशात जागरूकता दोन पैलूंवर होणे महत्वाचे आहे 

1. कोणत्याही स्वरूपातील तंबाखू सेवन (धूरासहित SMOKED TOBACCO PRODUCTS उदा. सिगारेट, बिडी, धूररहित SMOKELESS TOBACCO उदा. तंबाखू, तंबाखू आणि चुना यांचे मिश्रण चघळणे, तंबाखू असलेले पान, दातांना मिसरी लावणे), हे हानिकारकच आहे.  

2. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंबाखू सेवन थांबवता येते.  तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल प्रत्येकाने जागरूक राहून तंबाखू सेवन करत असल्यास ते सोडणे महत्वाचे आहे.

कोणत्याही स्वरुपात तंबाखूचा वापर थांबवण्यासाठी या नंबरवर Call -National Toll Free Tobacco Quitline 18001123556 अथवा 011-22901701 या नंबरवर Missed Call दिल्यास SMS द्वारे तंबाखू सुटण्यासाठी समुपदेशन विविध भाषांमध्ये केले जाते. NATIONAL TOBACCO CONTROL PROGRAM(NTCP) याची सविस्तर माहिती ntcp.mohfw.gov.in वर उपलब्ध आहे. शासनाच्या, तंबाखू सेवन कमी होण्यासाठी च्या प्रयत्नांना, तंबाखूमुक्त राहून हातभार लावू या! 

डॉ. निता घाटे
M.S DNB
कान, नाक, घसा तज्ञ संस्थापक अध्यक्ष
Association for Tobacco Use Hazards Awareness &
Preventive Measures (ATHAPM)

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget