एक्स्प्लोर

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1

1876 साली महाराजा सवाई रामसिंह यांनी इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्टच्या स्वागतासाठी या शहराला गुलाबी रंगानं रंगवलं. तेव्हापासून हे शहर गुलाबी शहर झालं.

"अरे भैया,  उठो, आ गया अजमेर स्टेशन!" खिशातून 50 ची नोट रिक्षावाल्याच्या हातात देत बॅग पाठीवर घेत मी स्टेशनवर उतरलो. रात्री पुरेशी झोप झाली नव्हती.  त्यामुळे  पुष्कर ते अजमेर या 13 किमीच्या फक्त 20 मिनटांच्या प्रवासातही  मला चक्क झोप लागली होती. सकाळी 7 वाजता भोपाल-जयपूर ट्रेन अजमेरला येते. पुढच्या अडीच तासात ती आपल्याला जयपूरला सोडते. खरंतर मला जयपूरला जाण्याआधी मध्ये रस्त्यात लागणाऱ्या तिलोनिया गावातल्या बेअरफूट कॉलेजला भेट देण्याची फार इच्छा होती. चेहऱ्यावरचा घुंघट सावरत काम करणाऱ्या, इंग्रजीचाच काय तर धड हिंदीचाही गंध नसलेल्या या बेअरफूट कॉलेजातल्या महिला आपल्या दृष्टीने  अशिक्षित... अडाणी असतीलही. पण बेअरफूट कॉलेजचे संस्थापक बंकर रॉय यांनी या महिलांना प्रशिक्षित आणि स्वावलंबी बनवलंय. आपल्या नजरेत अडाणी असलेल्या इथल्या महिला सोलर उपकरणं स्वतःच्या हातानं बनवतात. इतकंच नाही, तर एखादा डेन्टिस्ट जितक्या शिताफीनं रुट कॅनाल करतो तितकंच सराईतपणे या महिला दातांचा रुट कॅनाल करतात. अधिक काही सांगत  नाही. पण या भेटीत इथे जाणं राहून गेलं. मी पुढच्या वेळी इथे भेट दिल्यावर याबद्दल सविस्तर लिहिणार आहे. पण आपण कधी जयपूर किंवा आजमेरच्या आसपास असाल तर तिलोनियाच्या या कॉलेजला नक्की जा.

अजमेरहून तिसरं स्टेशन तिलोनिया! मध्ये चार पाच स्टेशन्स लागतात. आतापर्यंत पाहिलेल्या राजस्थानमध्ये हा भाग जरा सधन वाटला. बऱ्याच गावांमध्ये औद्योगिक वसाहती होत्या. ट्रेनमध्ये येणारे...उतरणारे प्रवासी नोकरी करणारे,  उद्योग करणारे होते. शेजारी बसलेल्या एका  तरुणाला मी विचारलं, "जयपूर रोज जाते हो?" तो म्हणाला, "हां,  कॉलेज भी वही है और नौकरी भी." मला गंमत वाटली. विशीतला तो मुलगा नोकरी आणि कॉलेज दोन्ही करत होता. मी म्हटलं, " रोज दो घंटे आना, दो घंटे जाना, उसमें कॉलेज और नौकरी.. दोनों कैसे अॅडजेस्ट करते हो?" त्यावर तो म्हणाला," क्या करुं? 10 बजे से 2 बजे तक कॉलेजI उसके बाद पास में ही टायपिंग का काम कर लेता हुं, रात को 10 बजे घर पहुंचता हुंI पिताजी सरकारी बस ट्रान्स्पोर्ट सर्विस में ड्रायव्हर थेI तीन साल पहले उनका अॅक्सिडंट हुआI एक पैर पुरा टूट गयाI घरमें बस हम दोनों रहते हैंI अभी जिम्मेदारी तो मुझे उठानी ही पडेगी."

हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. अशा लोकांशी बोलल्यावर आपल्यालाच बरं वाटतं. जयपूर स्टेशन आलं तेव्हा सकाळचे साडे नऊ वाजले होते. मी rapido app वरुन एकाला स्टेशनला बोलावलं. अगदी पाचव्या मिनिटाला माझा हा कॅप्टन  नरेंद्र सिंह मला घ्यायला आला. बाईकवरून त्याने मला माझ्या हॉस्टेलला सोडलं. साडेचार किलोमीटरचे फक्त 20 रुपये झाले. मला आज जयपूर शहराच्या बाहेरचे गड, किल्ले फिरायचे होतेच. त्यामुळे नरेंद्रशी मी ऑफलाईन डील केलं. 400 रुपयात 3 किल्ले आणि मंदिर....असा प्रस्ताव समोर ठेवला. थोडासा नाराजीनेच तो म्हणाला, की "देखीए,  ये किले पहाड पर हैं. इतने पैेसे में कोई नहीं आयेगाI लेकिन ठिक है,  मैं चलता हूंI आपको बाद में लगा तो कुछ थोडे पैसे दे दिजिए."

मी 'हो' म्हंटलं.  बरोबर तासाभराने, म्हणजे अकरा वाजता निघायचं ठरलं. बॅकपॅकर्स हेडक्वार्टर या हॉस्टेलला माझा एकच दिवसाचा स्टे होता. पटकन तयार  झालो आणि बाईकवाल्या नरेंद्रला फोन करुन बोलावलं. साधारण सव्वा अकरा वाजता आमचा जयपूरच्या किल्ल्यांच्या दिशेने बाईकवरून प्रवास सुरु झाला.

अजमेरी गेटमधून प्रवेश करताच नरेंद्र मला शहराची माहिती देऊ लागला. हे एक बरं असतं.  स्थानिक माणूस आपल्यासोबत असला,  की गाईडची गरजच पडत नाही. 18 व्या शतकात वसलेलं हे शहर राजस्थानच्या इतर शहरांपेक्षा तरुण वाटतं. 1727 मध्ये आमेरचे राजा जयसिंह यांनी आपली राजधानी दौसाहून जयपूरमध्ये स्थलांतरीत केली. देशातल्या सगळ्यात सुनियोजित आणि शिस्तबद्ध वसवलेल्या शहरांमध्ये जयपूर अग्रस्थानी आहे. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 इकतंच नाही तर जगातल्या सर्वात सुंदर 10 शहरांमध्ये जयपूरनं स्थान मिळवलंय. शहराच्या चारही बाजुंना भिंत आहे. या भिंतीना चांदपोल, सूरजपोल, अजमेरी गेट, नया गेट, सांगानेरी गेट, घाट गेट, सम्राट गेट, ज़ोरावर सिंह गेट असे 7 दरवाजे आहेत. हे सात दरवाजे जर बंद केले तर मुख्य शहरात कुत्रंही आत जाऊ शकत नाही.

जयपूरला पिंक सिटी गुलाबी शहरही म्हणतात. रस्त्याने जाताना त्याचा अनुभव मी घेतला. अर्थात गुलाबी रंग जाऊन तो आता हलक्या ब्राऊन कलरमध्ये परावर्तीत झालाय. पण तरी उंचावरून बघितलं, तर ते आजही गुलाबी दिसतं. जुनी घरं आणि इथले महाल गुलाबी धौलपुरी दगडांनी उभारलेले आहेत. यांच्या रुपात राजस्थानी स्थापत्यकलेची प्राचिन परंपरा कायम राहिली आहे. 1876 साली महाराजा सवाई रामसिंह यांनी इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्टच्या स्वागतासाठी या शहराला गुलाबी रंगानं रंगवलं. तेव्हापासून हे शहर गुलाबी शहर झालं. शहराविषयी आपण पुढे बरंच काही बोलणार आहोत. पण तूर्तास भूक लागल्याने मी नरेंद्रला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. तो म्हणाला, "भैया रुकिएI  अगले चौकमें बढिया पकौडेवाला हैI  उसके पास आपको ले चलता हुँ."

आज दिवसभर तीन किल्ले बघायचे असल्यानं जेवायला वेळ मिळेल, की नाही माहित नव्हतं. त्यामुळे आताच काय ते खायचं ठरलं. जयपूरला आणि एकूणच राजस्थानमध्ये कचोरी हा प्रकार खवय्यांसाठी खास आहे. मूंगदाल कचोरी, प्याज की कचोरी ही तर इथली स्पेशालिटीI इथली कचोरी कात्रीनं कापली जाते. मग त्यावर टाकली जाते कढी! वाह, वाह काय कॉम्बिनेशन आहे! कचोरी सोबतच इथला मिर्ची वडा तुम्ही खायलाच पाहिजे. मोठी मिर्ची बेसनात बुडवून तळली जाते. नंतर ती कापून त्यावर कढी टाकून खातात. कढी हा मारवाडी खाद्यसंस्कृतीत अत्यंत महत्वाचा प्रदार्थ आहे. जेवताना पाण्याचा ग्लास सोबत नसला तरी एक वेळ चालेल; मात्र कढीची वाटी ताटात पाहिजेच.

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 आता, आमेरकडे जाण्यासाठी आम्ही दुसऱ्या गेटमधून बाहेर पडलो. थोड्याच अंतरावर जलमंदिर लागलं. इथे आत जाण्याला परवानगी नाही. त्यामुळे बाहेरुनच फोटो काढला. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 अरवलीच्या पर्वतरांगेत 'चिल के टिले' या पहाडावर आमेरचा किल्ला आजही मोठ्या डौलाने उभा आहे. इथेच अम्बिकेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे. त्यावरुन या किल्ल्याला अंबर किल्ला किंवा आमेर किल्ला हे नाव पडलं. 4 किमी चा हा भव्य किल्ला जयपूरच्या इतिहासाचा सर्वांत जुना साक्षीदार आहे. इ. स. 967 मध्ये हा किल्ला उभारण्यात आला. मात्र 1558 साली कच्छवाह राजा मानसिंह आणि त्यानंतर सवाई जयसिंह यांनी आमेरच्या किल्ल्याचं पुनर्निर्माण केलं. 'जोधा अकबर' सिनेमात आमेरचा किल्ला आपण बघितला असेलच. जोधा आणि अकबरच्या लग्नाची तडजोड इथेच झाली. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 चार भागांमध्ये विभागलेला या किल्ल्याला चार दरवाजे आहेत. ऐसपैस किल्ल्यात मोठी अंगणं आहेत. दिवान- ए -आम, दिवान -ए -खास, शीश महल, सुख निवास हे भाग पर्यटकांचं खास आकर्षण आहेत. आमेरच्या किल्ल्यात गेल्यावर गणेश द्वारावर फोटो काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 हिंदू वास्तू शैलीतला हा किल्ला जगभरातल्या पर्यटकांना आपल्याकडे अक्षरशः  खेचून आणतो. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्येही आमेरच्या किल्ल्याला स्थान मिळालंय. अनेक हिंदी सिनेमांचं चित्रिकरण किल्ल्यात झालंय. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी दगडी रस्ता बनवण्यात आलाय. तो आजही तसाच आहे. किल्ल्याच्या खाली मावठा सरोवर आहे. समोरुन बघितल्यावर असं वाटतं, जसं आमेरचा किल्ला स्वतःचं प्रतिबिंब बघतोय. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 हे सारं वैभव मनात साठवून आम्ही किल्ल्याकडे निघालो. खरंतर जयगड हा आमेर किल्ल्याचाच एक भाग आहे. आमेरच्या शेजारीच पहाडावर जयगड उभारण्यात आलाय. आमेर किल्ल्याच्या आणि महालांच्या सुरक्षेसाठी जयगडाची निर्मिती 1726 साली राजा जयसिंह द्वितीय यांनी केली. आमेर ते जयगड या दोन किल्ल्यांना जोडणारा एक भुयारी मार्ग आहे. हा युद्धकाळात विपरीत परिस्थितीमध्ये वापरला जायचा. आजही  तसाच आहे. पर्यटकही त्या मार्गाने आमेरवरुन जयगडावर येत असतात. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 तिकिट काढून मी किल्ल्यात प्रवेश केला. तेवढ्यात एक जण माझ्याजवळ धावत येऊन म्हणाला,  "आपको एक  गाईड मिलेगा, इसके कोई पैसे नही लगेंगेI जो आपने टिकट लिया है इसमें ये इन्क्लूड है" मला पण वाटलं, चला माहिती देण्यासाठी माणूस येत असेल तर बरंच आहे. मग तो माणूस माझ्यासोबत आला. किल्ल्याविषयी माहिती देत देत तो किल्ल्यावरच्या कपडे आणि शूजच्या दुकानात मला घेऊन गेला. किल्ल्याच्या गेटजवळच हे दुकान होतं. मला म्हणाला "किला तो हम देख लेंगे पहेले आप ये राजस्थानकी कलाकारी तो देख लिजिएI राजस्थानकी असली चिजें यहीं मिलती हैI" मला त्या क्षणी त्याचा सगळा प्लॅन लक्षात आला. त्याचं काम मला फक्त दुकानात पोहोचवणं एवढंच होतं. मी दुकानात गेलो. एक राऊंड मारुन काहीही खरेदी न करता बाहेर पडलो. अपेक्षेप्रमाणे फ्री मध्ये सोबत आलेला गाईड आता गायब झाला होता. तो बिचारा त्याचं काम करुन गायब झाला. आपण यांच्या भुलथापांना बळी पडता कामा नये. असो, तर मी एकट्यानं किल्ला फिरायला लागलो. हा किल्ला फिरता फिरता तुम्ही दमून जाल एवढा विशाल आहे. किल्ल्यातल्या भुलभुल्लैयामध्ये तुम्ही कोणत्या खोलीतून कुठे बाहेर पडाल, याचा अंदाज लागणं अशक्य आहे. वरच्या बाजूनं पूर्ण जयपूर शहर नजरेस पडतं. जयगड किल्ल्यात शस्त्रास्त्र आणि तोफगोळ्यांचा साठा केला जायचा. इथे तोफांचा कारखाना प्रसिद्ध होता. जयगड किल्ल्यातच जगातली सर्वांत मोठी तोफ आजही ताठ मानेनं उभी आहे. ही तोफ 20 फूट लांब आहे, तर हिचं वजन तब्बल 50 टन आहे. आजपर्यंत या तोफेचा वापर कुठल्याही युद्धात करण्यात आला नाही मात्र परिक्षणासाठी 100 किलोचा तोफगोळा या तोफेतून सोडण्यात आला होता.  तो 35 किलोपर्यंत गेला. चाकसू गावाजवळ हा तोफगोळा जाऊन पडल्यानं तिथे मोठा खड्डा पडला. आज त्याचं रुपांतर तलावात झालंय. विजयालक्ष्मीला या तोफेचं खास पूजन केलं जातं. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 या किल्ल्यानं मला सर्वांत जास्त थकवलं. एकतर डोक्यावर सूर्य तापत होता. त्यात या किल्ल्यात प्रचंड चालावं लागतं. त्यामुळे जयगड बघण्यासाठी तुम्ही येणार असाल तर भरपूर वेळ काढून या. इथून आम्ही 4 वाजताच्या सुमारास बाहेर पडलो. आमेर, जयगडनंतर शेजारीच असलेला तिसरा किल्ला म्हणजे नाहरगड.. जयगडप्रमाणेच नाहरगडसुद्धा आमेर किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आला. 1734 साली सवाई राजा जयसिंग यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. असं म्हणतात, की नाहर सिंह नावाच्या एका राजपूत व्यक्तीचा आत्मा या परिसरात भटकत असे.  किल्ल्याची उभारणी करतानाही अनेक वेळा संकटं आली. त्यानंतर तांत्रिकांच्या सल्ल्यानुसार या गडाला 'नाहर' नाव देण्यात आलं आणि ही भूतबाधा दूर झाली. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 19 व्या शतकात सवाई राम सिंह आणि सवाई माधो सिंह यांनी किल्ल्यामध्ये महाल बांधले. ते आजही सुस्थितीत आहेत. आता किल्ल्यातच रेस्टॉरंट्स आहेत आणि वॅक्स म्युझियमसुद्धा! नाहरगडावरुन सूर्यास्त बघण्यासाठी लोक गर्दी करतात. आम्ही मात्र त्याआधीच बाहेर पडलो. तीन किल्ले एका दिवसात फिरणं हे अशक्य आहे. मी जरा वेगानंच हे किल्ले बघून बाहेर पडलो, असं मला परतीच्या प्रवासात  होतं. पुन्हा येऊ तेव्हा किमान दोन दिवस या किल्ल्यांसाठी देऊ, असं मनात ठरवलं. आता आम्ही मंकी टेम्पलकडे प्रवास करत होतो. सकाळी फार काही खाल्लं नसल्याने जलमंदिरच्या चौपाटीजवळ खाण्यासाठी थांबलो. इथे संध्याकाळी खाऊगल्लीच असते. पाणी पुरी, भेळ, कचोरी, कच्छी दाबेलीच्या गाड्यांवर लोक भूक भागवतात. आपला बाईकवाला मित्र नरेंद्र आणि मी कच्छी दाबेली दाबेली मागवली. तोपर्यंत मस्त गप्पा मारत बसलो. मी म्हटलं, "नरेंद्र भाई, क्या चल रहा है? पढाई करते हो या जॉब?" "अरे भाई जॉब तो नही है. इसिलिए तो ये काम करना पडता है अभी स्टाफ सिलेक्शन की एक्जाम दे रहा हुं." थोडासा नाराजीनेच तो बोलत होता. मी म्हटलं, "मिल जायेगी नोकरी, टेन्शन मत लो. वैसे घर में कौन कौन है?" "भैया, यहा तो मैं और मेरी बिवी रहेते है. बाकी फॅमली गाव में है." याचं लग्न झालंय हे ऐकून मला जरा आश्चर्य वाटलं. "अरे, आपकी शादी हो गई? उम्र तो आपकी कम लगती है?" तो म्हणाला "हा भैया उम्र तो 24 साल है. घरवालोंने जबरदस्ती कर दीI हमारे यहां 25 साल से पहले शादी करवा देते हैI मेरी बिवी अभी B.Com पढ रही है." मी म्हटलं "सब अच्छा होगा. कच्छी दाबेली खाओ." संध्याकाळी साडे पाच वाजताच्या दरम्यान आम्ही मंकी टेम्पलच्या डोंगराची बाईकवरून चढाई सुरु केली. हे मंदिर शहराच्या बाजूलाच 10 किमी अंतरावर आहे. या मंदिराला गालताजी मंदिर या नवानं ओळखलं जातं. पण इथे खूप  वानर असल्यानं 'मंकी टेम्पल' म्हणूनच सगळे ओळखतात. छोटासा डोंगर पार करून आपल्याला जावं लागतं. इथे जास्ती पर्यटक येत नाहीत. कारण हा डोंगर छोटासा असला तरी अवघड आहे. शिवाय रिक्षावालेही इथे येण्याचं टाळतात. नशिबानं आज मी बाईकवरून फिरत असल्याने हा डोंगर आम्ही सहज पार केला. घनदाट झाडीमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर दुरून एखाद्या राजवाड्यासमान भासतं. इथे राम, कृष्ण, हनुमान या देवतांची मंदिरं आहेत. मंदिराच्या परिसरात सात पाण्याचे कुंड आहेत. ज्यापैकी गालता कुंड हा सर्वांत पवित्र मानला जातो.  जो कधीही कोरडा पडत नाही. इथले अनेक वानर मंदिर परिसरात उड्या मारत असतात. अनेेक भाविक आपल्या हाताने या वानरांना प्रसाद भरवतात. दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. जयपूरला येणाऱ्या प्रत्येकानं आवर्जुन इथे यावं. राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर भाग- 1 दिवसभर उन्हामुळे थोडासा कंटाळा आला होता खरा पण संध्याकाळी बाईकवरुन जाताना गार वारं सुटलं. शहरही दिव्यांनी उजळून निघालं. गल्ली बोळातून आमची बाईक हॉस्टेलला पोहोचली. बाईकवाला नरेंद्र आता मित्र बनला. जाता जाता नरेंद्र म्हणाला "आपकी वजह से मैं पहली बार मंकी टेम्पल गयाI नही तो कौन जाता है? दिनभर अपनी परेशानीयोंमें उलझा रहता हुं. आपसे मिलके अच्छा लगा." हसतमुखानं हात मिळवत आम्ही एकमेकांचा निरोप  घेतला. हॉस्टेलवर आल्यावर मी मस्त तासभर आराम केला. रात्रीच्या जेवणासाठी शेजारीच एक मस्त रेस्टॉरन्ट शोधलं. कारण दिवसभरात पोटभर जेवण झालं नव्हतं. "पधारीए साहब" म्हणतात. हसतमुखानं रेस्टॉरन्टच्या मालकानं माझं स्वागत केलं. राजस्थानच्या लोकांचं हे मात्र मला फार आवडलं. आदरआतिथ्यामध्ये ही लोकं कुठलीच कसर सोडत नाही. "क्या खाना पसंद करोगे?" मी म्हटलं, "आपके रेस्टॉरन्टमें जो सबसे बढिया बनता है वही बनाईए". क्षणाचाही विलंब न करता मालकानं "गट्टे की सब्जी बनाओ साहब के लिए!" अशी परस्पर ऑर्डर देऊन टाकली. गट्टे की सब्जी म्हणजे आपल्या बेसनाचे छोटे छोटे गोळे करुन केलेली भाजी. दाल बाटीनंतर ही भाजी राजस्थानमध्ये सगळ्यांत लोकप्रिय आहे. मस्त जेवण झाल्यावर मालक म्हणाला "पसंद आया खाना?" मी म्हटलं, "हा,  जी बहोत पसंद आया" नंतर बिलाचे पैसे देताना ते म्हणाले "सिटी पॅलेस देखा? कैसा लगा?" "नही आज तो मैने किले देखें, कल सिटी पॅलेस और हवा महल देखना है." माझं वाक्य पूर्ण झाल्या झाल्या ते म्हणाले, "जरुर जाईए; हमारे जयपुरकी शान है यह महल. और कल भी खाना खाने यही आईएगा" हातात हात मिळवत मी निरोप घेतला. आजचा दिवस तसा धावपळीचा गेला.  उद्या या राजस्थान दौऱ्यातला माझा शेवटचा दिवस होता. थोडी खुशी थोडा गम अशी माझी मनस्थिती होती. पण उद्याच्या दिवसाची उत्सुकताही होतीच.

आजचा खर्च ---------------- पुष्कर ते अजमेर रिक्षा -50 रु. अजमेर ते जयपूर रेेल्वे तिकिट - 75 रु. हॉस्टेल भाडं - 200 रु. रिक्षा भाडं - 450 रु. स्नॅक्स आणि इतर - 150 रु.  आमेर किल्ला तिकिट - 100 रु.  जयगड किल्ला तिकिट - 100 रु.  नाहरगड किल्ला तिकिट - 70 रु.  रात्रीचं जेवण - 150 रु.  --------------------- एकूण खर्च 1345 रु. ------------------------

तळटीप - भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच.. हे ही वाचा
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 08 March 2025Vaibhavi Deshmukh Police Statement | वैभवी देशमुखचा काळीज पिळवटणारा जबाब, वडिलांचा सल्ला, तो फोन कॉल, वैभवीने सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 08 March 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा 08 March 2025 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Embed widget