एक्स्प्लोर

BLOG: जगणं समृद्ध करणारा हास्यकलाकार... चार्ली चॅप्लिन

BLOG: चार्ली चॅप्लिन, हे नाव जरी उच्चारलं तरी चेहऱ्यावरील कळी पटकन फुलते. हसून हसून पोट दुखतं तर कधी भावनाविवशही व्हायला होतं. मूकपटाच्या दुनियेतल्या या महाराजानं जगाला अगदी पोट भरून हसवलं, तेही कुठल्याही संवादाशिवाय. केवळ देहबोली आणि चेहऱ्यावरील भाव या दोनच गोष्टी प्रेक्षकांना हसवायला पुरेशा आहेत, हे चार्ली चॅप्लिननं जगाला दाखवून दिलं. मात्र, चार्लीला हे सहज साध्य झालं नव्हतं. त्यामागे होते त्यानं गरिबीत आणि अत्यंत कष्टाने काढलेले दिवस. वडिलांच्या निधनानंतर आईने केलेले कष्ट. हे त्याच्या निरागस बालपणावर इतकं कोरलं गेलं की, पुढे त्यानं जगाला जणू हसवण्याचाच विडा उचलला होता.

16 एप्रिल 1889 रोजी चार्लीचा जन्म झाला. त्याची आई आणि वडील दोघेही रंगभूमीवरील कलाकार. त्यामुळे रंगभूमीचा वारसा आपोआपच चार्लीला मिळाला होता. पण व्यसनामुळे वडील चार्ल्स सीनियर यांचं अवघ्या 37 व्या वर्षी निधन झालं. त्यावेळी चार्ली अवघा 12 वर्षांचा होता. त्यातच आईचा आवाज गेला. परिस्थिती खूप बिघडली. आवाज गेल्यामुळे त्याच्या आईला रंगभूमी सोडून कष्टाची कामे करावी लागली. त्यामुळे चार्लीचं बालपण अतिशय कष्टाचं गेलं. त्या परिस्थितीतही चार्लीनं सुरवातीला पोटासाठी रंगभूमीची कास धरली. आणि रंगभूमीवर हळूहळू जम बसवताना  मूकपटाचा पडदाही गाजवला. 1914 ते 1967 हा काळ म्हणजे तब्बल 53 वर्षे चार्ली चॅप्लिननं मोठा पडदा गाजवला. त्याचे सर्वच सिनेमे आजच्या भाषेत बोलायचं तर सुपरड्युपर हिट झाले.

चार्लीची स्टाईल स्टेटमेंट

चार्ली चॅप्लिन म्हटलं तरी समोर उभी राहते चार्लीची कपड्यांची स्टाईल. ही स्टाईल जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली. इतकी की अनेक कलाकारांनी चार्लीची स्टाईल स्टेटमेंट आपलीशी केली. डोक्यावर हॅट... आणि हातात केनची काठी... एवढं दिसलं तरी समोर उभी राहते ती चार्ली चॅप्लिनची प्रतिमा... हॅट आणि केन स्टीकशिवाय चार्ली चॅप्लिनची कल्पनाच करता येत नाही.

डाव्या हाताने केनची स्टीक फिरवणं आणि उजव्या हातानं हॅट काढून आदबीनं वाकणं हे चार्लीनंच करावं. आणि चार्ली हे इतक्या सहजतेनं करायचा की, ती चार्ली चॅप्लिनची ओळखच बनली. मात्र, हे एवढ्यावरच थांबलं नाही. चार्लीची हिटलर बाजाची मिशी ही त्याची आणखी एक खासियत होती. ही मिशी पुढे चार्लीची ओळख बनली. इतकी की चार्ली आणि हिटलर स्टाईल मिशी हे समीकरण बनलं होतं. हिटलरच्या चेहऱ्यावर कठोर दिसणारी मिशी चार्लीच्या चेहऱ्यावर मात्र, अत्यंत निरागस दिसायची. किंबहुना चार्लीच्या साधेपणात ही हिटलर बाजाची मिशीच अधिक भर टाकायची.

पडद्यावर धम्माल करणारा चार्ली स्वभावानं निरागस होता हे दाखवणारी चार्लीची आणखी एक स्टाईल म्हणजे त्यानं गबाळ्यासारखं घातलेलं जॅकेट आणि कमरेत खोचलेली ढगळपगळ पॅन्ट. एकूणच चार्लीचा अवतार गबाळ्यासारखा होता. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जायचे. त्यातूनच तो धम्माल करतानाच प्रेक्षकांना भावनाविवशही करायचा.

मूकपट आणि चार्ली

चार्ली चॅप्लिन आणि मूकपट हे अनोखं लोकप्रिय रसायन म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण तो काळच तसा होता. चार्ली चॅप्लिनचे चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाले. संवादाशिवाय संवाद साधण्याची अनोखी कला चार्ली चॅप्लिनकडे होती. म्हणूनच तो कायम प्रेक्षकांशी कनेक्टेड़ राहिला. मेकिंग अ लिव्हिंग... हा चार्ली चॅप्लिनचा पहिला चित्रपट. त्यानंतर तो लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर आला तो कायमचाच. चार्ली चॅप्लिनचे 20 मिनिटस् ऑफ लव्ह, इन द पार्क, द गोल्ड रॅश, अ वूमन, अ बिझी डे, मॉडर्न टाईम्स, लाईमलाईट, हिज फेव्हरेट पास्ट टाईम्स हे आणि असे अनेक सिनेमे गाजले तर द किड, सीटीलाईट्स, पोलीस, द सर्कस आणि द ग्रेट डिक्टेटर या सिनेमांनी चार्लीला तुफान लोकप्रियता दिली आणि जबरदस्त कमाईदेखील करून दिली.

चार्ली चॅप्लिनचा सहज आणि मोकळा अभिनय, त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, त्याच्या देहबोलीतील अस्सल विनोद आणि महत्त्वाचं म्हणजे भावनाप्रधान होण्याचं त्याचं कसब हे सारं काही अविश्वसनीय होतं. त्यातूनच चार्ली चॅप्लिन सामान्य माणसांचा हिरो बनला. द ग्रेट डिक्टेटरमधील हिटलरसारखी भूमिका, रस्त्यावरच्या मुलाला आधार देणारा 'द किड'मधला चार्ली, 'सर्कस'मधील चार्ली अशा नानाविध भूमिका करणारा चार्ली चॅप्लिन सर्वांनाचा आपलासा वाटला. किंबहुना असा चार्ली सर्वांना आपल्यातलाच एक वाटला. जगभरातल्या सिनेमाप्रेमींच्या मनावर चॅप्लिननं राज्य केलंय. आणि त्याला अजूनपर्यंत कुणीही आव्हान देऊ शकलेलं नाही.

असा हा चार्ली मूकपटांचा बादशहा होता. विसाव्या शतकात चार्ली लोकप्रिय होताच पण मृत्यूला चार दशके होऊनही त्याच्या लोकप्रियतेत किंचितही घट झालेली नाहीए. उलट त्याच्यासारख्या दिसणाच्या स्पर्धा जगभरात आजही घेतल्या जातात. याहून अत्यंत पॉप्युलर स्टाईल स्टेटमेंट कोणती असू शकेल ?

सन्मान आणि उत्तरार्ध

ऑस्कर म्हणजे अकॅडमी अवॉर्डनं चार्लीला लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कारनं गौरवलं. तर ब्रिटिश सरकारनं त्याचा सर किताबानं सन्मान केला. चार्लीचे तीन घटस्फोट झाले आणि चौथं लग्न शेवटपर्यंत टिकलं. अखेरच्या टप्प्यात चार्ली चॅप्लिन स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला. आणि 88 व्या वर्षी म्हणजेच 25 डिसेंबर 1977 रोजी झोपेतच त्यानं जगाचा निरोप घेतला.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget