एक्स्प्लोर

BLOG : मुंबईचा दुसरा चेहरा - कुपोषित मुंबई

जयेद हा याच वस्तीतला तीन वर्षाचा मुलगा...त्याचं वजन आठ किलो आहे... त्याची आई सांगते, जयेद नेहमी जुलाब आणि अशक्तपणाने आजारी असतो... अजून बोलू शकत नाही...दिवसभर एकतर शांत, रडारड किंवा चिडचिड करत असतो...

झगमगाट.. रोषणाई... श्रीमंती याही पलिकडे मुंबईचा एक दुसरा चेहरासुद्धा आहे... इथे असेही काही भाग आहेत जिथे मोठमोठ्या इमारती झोपडीत बदलत जातात... मोठमोठाले रस्ते लहान गल्ल्या होत जातात... आणि जिथे सरकारच्या काही योजना सुद्धा साथ सोडून देतात... असाच हा एक मुंबईतील ‘एम वॉर्ड’...
'अपनालय' या आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या रिपोर्ट नुसार,
इथल्या महापालिकेच्या शाळेत शिकणारी 50% मुले कुपोषित आहेत...
शहरातील सर्वात कमी... 0.5 पेक्षाही कमी मानव विकास निर्देशांक या विभागात नोंदवला गेलाय... अनेक आफ्रिकन देशांपेक्षाही ही परिस्थिती वाईट आहे...
इथल्या परिस्थितीचा, राहणीमानाचा, विशेषतः लहान मुलांचा आढावा घेतला असता काही बाबी समोर येतात...
समुद्राच्या दलदलीचा हा भाग... एकेकाळी राहण्यासाठी योग्य नसलेला... असुरक्षित म्हणून गणला गेलेला...
1970 च्या दशकात महापालिकेने बऱ्याच झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन मुख्य शहरामधून या भागात, शिवाजी नगर परिसरात केले...जसजसा शहराचा विस्तार होत गेला तेव्हा बांद्रा येथील कत्तलखाना आणि त्यानंतर धारावीचं डंपिंग ग्राउंडसुद्धा या वॉर्ड मध्ये हलवणयात आलं... सध्या इथली लोकसंख्या सहा लाख आहे... त्यातील 77 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात...
दाटीवाटीनं वसलेली घरं...अगदी लहान लहान खोल्या...दिवसाही घरात लाईटची गरज... इथल्या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक घरांसमोर निळे ड्रम पाहायला मिळतात...कारण पाण्याची बोंबाबोंब... पाणी रेशन पद्धतीने आणलं जातं... पाच रूपयांना एक ड्रम... त्यामुळे आंघोळ ही इथली प्रायोरिटी कधीच नसते...टॉयलेट्सची तर नियोजनाअभावी दुरवस्था...
BLOG : मुंबईचा दुसरा चेहरा - कुपोषित मुंबई
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमाणानुसार 50 लिटर पाणी प्रति व्यक्ती प्रति दिन वापरणे आवश्यक असते... पण 95 टक्के झोपडपट्टीधारक त्यापेक्षा खूप कमी पाण्यात आपली कामं आटोपतात... असं बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय...
स्वच्छ पाणी आणि पुरेशा स्वच्छतेअभावी अतिसार, जुलाब यासारखे रोग होतात...जे पाच वर्षाच्या आतील मुलांच्या मृत्यूचं न्युमोनिया नंतरचं दुसरं मुख्य कारण आहे...
‘अपनालाय’च्या 2017 च्या रिपोर्ट नुसार
  • या वस्तीतली 35 टक्के कुटुंबं महिन्याला चार ते सहा हजार रुपयांपर्यंतच कमाई करतात..
  • 22 टक्के कुटुंबांचं उत्पन्न सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे...
  • 19 टक्के कुटुंबाचं मासिक उत्पन्न आठ ते दहा हजार रुपये आहे...
  • अल्प उत्पन्नामुळे ५९ टक्के लोकांना कसंतरी दोन वेळेचं जेवण मिळतं...
दहा टक्क्यांपेक्षा कमी लोक असे आहेत ज्यांना रोजच्या आहारात दूध, मासे, अंडी, फळे यांसारखे पौष्टिक पदार्थ मिळतात...बऱ्याच कुटुंबांमध्ये दूध हे फक्त चहासाठीच वापरलं जातं...
BLOG : मुंबईचा दुसरा चेहरा - कुपोषित मुंबई
अल्प उत्पन्नाचा थेट परिणाम अन्नाच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर होतो...आणि त्यामुळे दिसणारा परिणाम हा भयानक आहे....
या परिसरातील चार पैकी दोन बालकं कुपोषित आहेत...
या विभागात पाच वर्षाखालील 45 टक्के बालकांची शारीरिक वाढ त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी झाली आहे.
35 % बालकं कमी वजनाची आहेत...
म्हणजेच जवळपास या विभागातल्या अर्ध्या बालकांची वाढ खुंटलीय.
मोठे कुटुंब हीसुद्धा इथली एक मोठी समस्या पण धार्मिक, सांस्कृतिक कल आणि महिलेच्या मताला न मिळणारी किंमत यामुळे कुटुंब नियोजनाला इथे वाव नाही...
जयेद हा याच वस्तीतला तीन वर्षाचा मुलगा...त्याचं वजन आठ किलो आहे... त्याची आई सांगते, जयेद नेहमी जुलाब आणि अशक्तपणाने आजारी असतो... अजून बोलू शकत नाही...दिवसभर एकतर शांत, रडारड किंवा चिडचिड करत असतो...
जयेद कुपोषित आहे... अतितीव्र कुपोषित... त्याला इतर आठ भावंडं...सर्वात मोठा 15 वर्षांचा तर सर्वात लहान जयेदहून दोन वर्षांनी लहान... सगळेच अंगकाठीने अगदीच बारीक... परिसरात जवळ अंगणवाडी नाही म्हणून ही भावंडं अंगणवाडीतही जात नाहीत... घरात जयेदचे वडील एकटेच कमावते....महिना दहा हजारांपेक्षा कमी उत्पन्नात यांचं घर चालतं...म्हणजे चालवलं जातं...
malnutrition
रोजच्या जेवणाविषयी विचारलं असता जयेदची आई सांगते, मुलांना पौष्टिक अन्न देण्याचा खूप प्रयत्न करते पण महिन्याला मिळणाऱ्या 8 ते 10  हजार रुपयांमध्ये इतकं मोठं कुटुंब चालवणं शक्य नाही.
‘अपनालय’च्या आरोग्य सेविका डॉक्टरच्या सहकार्याने अशा मुलांच्या आरोग्याचा पाठपुरावा करतात... मेडिकल न्यूट्रिशन ट्रीटमेंट (MNT) म्हणजेच वैद्यकीय पोषण उपचार त्यांना पुरवले जातात...हा आपल्या श्रीखंडाच्या लहान डब्यासारखा एक डबा असतो ज्यात सोयाबीन व इतर पौष्टिक पदार्थांची पेस्ट असते... याची चव खूप वाईट असल्याने मुलंही हे खायला टाळाटाळ करतात...
शिक्षणाच्या अभावामुळे इथले लोक लसीकरणाचं महत्त्व जाणत नाहीत...त्यामुळे लसीकरणासाठी सुद्धा इथल्या लोकांना खूप विनवणी करावी लागते...
इथे महिला साक्षरतेचे प्रमाण 69 टक्के आहे... तर पुरुष साक्षरता 78 टक्के आहे.
सरकारी सुविधांचा पुरेशा प्रमाणात न मिळणारा लाभ ही सुद्धा इथल्या इतर समस्यांसोबतची  एक समस्या. सहा लाख लोकसंख्येसाठी इथे चार प्राथमिक आरोग्य केंद्रं आहेत... तर 145 अंगणवाड्या आहेत...
BLOG : मुंबईचा दुसरा चेहरा - कुपोषित मुंबई
या अंगणवाड्यांच्या जागेसाठी सरकारतर्फे फक्त 750 रुपये भाडं मिळतं. त्यामुळे एवढ्या कमी भाड्यात मिळणाऱ्या छोट्याश्या खोल्यांमध्ये या अंगणवाड्या भरतात... 30 ते 40 मुलं तिथं दाटीवाटीनं बसलेली असतात...ना बसायला पुरेशी जागा..ना खेळायला पुरेसं अंगण...
सरकारी नियमानुसार दर एक हजार मुलांमागे एक अंगणवाडी असावी. पण इथल्या सहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत इथे 600 ऐवजी फक्त 145 आंगणवाड्या आहेत... एखाद-दुसरा अपवाद वगळता इतर अंगणवाड्या आपली कामं योग्य रितीने पार पाडतात...
कुपोषणासाठी बालकाची जन्मानंतरची काळजी ही एकच गोष्ट कारणीभूत नाहिए... तर स्त्री गरोदर असताना बाळाच्या जन्मापर्यंतचे  37 आठवडे तिची योग्य काळजी घेणे, हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे.
सामान्य स्त्रीला दिवसाला 1800 ते 2000 कॅलरीज् ची आवश्यकता असते, तर गरोदर स्त्रीला दिवसाला 2200 ते 2400 कॅलरीज् ची आवश्यकता असते... आईचा आहार हा बाळाच्या जन्मासाठी नक्कीच महत्वाचा असतो... गरोदरपणात आई जितकी तंदुरुस्त असेल त्यावर बाळाचं जन्मानंतरचं आरोग्य अवलंबून असतं... आईचा पोषक आहार... कामाचा कमी ताण... या गोष्टी इथे महत्त्वाच्या ठरतात...
नवजात शिशू मृत्यू (Neonatal death ), वेळेआधी बाळाचा जन्म (premature child) या दोन गोष्टीही या विषयात तितक्याच महत्त्वाच्या...
जन्मानंतर 27 आठवड्यांच्या आत बालकाचा मृत्यू झाला तर त्यास नवजात शिशू मृत्यू (Neonatal death ) म्हणतात... याला अनेक कारणं आहेत... आई कुपोषित असेल... तिने गरोदरपणात वेळेवर Iron Tablets  व इतर गोळ्या घेतल्या नसतील...बाळाच्या जन्मावेळी आईला काही इन्फेक्शन झालं असेल... आईची डिलिव्हरी दवाखान्याऐवजी घरी झाली असेल... दवाखान्यात झाली असल्यास तिथे योग्य स्वच्छता नसेल किंवा बाळाची योग्य काळजी घेतली गेली नसेल, तर बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता असते..
तसेच, बाळ प्री-मॅच्युअर असेल... म्हणजेच नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाचा जन्म झाला असेल तर बऱ्याचदा बाळाच्या जीवासाठी हे धोक्याचे असते... वेळेआधी जन्म झाल्याने बाळाच्या शरीरातील अवयवांची योग्य वाढ न झाल्याने बाळ दगावण्याची शक्यता असते...
या सर्व गोष्टींबरोबच बाळासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईचं दूध... बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत त्याच्यासाठी आईच दूध हेच सर्वस्व असतं आणि असावं... बाळाला जन्मानंतर अर्ध्या तासात आईचं दूध द्यावं...कारण हे सुुरुवातीचं चिकाचं दूध (Colostrum) बाळासाठी लसीकरणाचं काम करतं... बाळाला सहा महिन्यांपर्यंत फक्त दूधच द्यावं...त्याशिवाय पाणीही देऊ नये असं सांगितलं जातं...कारण आईच्या दूधात बाळासाठी आवश्यक सर्व प्रतिजैविकं (Antibodies),  प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फॅट योग्य प्रमाणात असतात… बाहेरील पदार्थ किंवा पाणी दिल्याने बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते कारण बाळाची रोग प्रतिकारकशक्ती अजून विकसित झालेली नसते.
BLOG : मुंबईचा दुसरा चेहरा - कुपोषित मुंबई
वरील सर्व गोष्टी या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत... त्याच्यावर जनजागृती करणं गरजेचं आहे... नाहीतर वाट कुपोषणाकडे जाणारी आहे...
एखाद्या कुपोषित मुलाचा जोपर्यंत मृत्यू होत नाही, तोपर्यंत यावर विचार होत नाही...आणि त्यानंतरही काही दिवसांनी या चर्चांना पूर्णविराम मिळतो...
कुपोषित बालकांना किमान दोन वर्ष योग्य आहार दिल्यास त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ होऊ शकते...
त्यासाठीच सरकारी सुविधा असूनही 'अपनालय' सारख्या संस्थांची अशा भागांमध्ये गरज आहे...जी एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) आणि महापालिकेच्या मदतीने परिसरात जागरुकता करण्याचं काम करेल.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
ABP Premium

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Embed widget