एक्स्प्लोर

BLOG | डोळे हे जुलमी गडे ....

डोळे हा शरीराच नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा इतर गॅजेट्सवर घालवत असतील. त्यामुळे डोळ्यांच्या व्याधी होण्याची जास्त शक्यता आहे.

>> संतोष आंधळे

डोळ्यांची निगा कशी राखावी यावर आजपर्यंत अनेक तज्ज्ञ मंडळींनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेच. मात्र कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या या काळात एकदंरच देशभरात 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेवर आधारित बरेच लोकं घरून काम करीत आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप, मोबाईल मीटिंग याचा वापर वाढला आहे. बरं हा प्रकार फक्त काम करण्याऱ्या लोकांपर्यंत सिमीत नसून ज्या लोकांना घरात काही काम नाही आणि सक्तीने घरी बसावं लागलेले आहे अशा लहानग्यांपासून ते वरिष्ठ नागरिकापर्यंत बरेच जण या अत्याधुनिक सर्व साधनांचा वापर आपला वेळ घालवण्याकरीता करत आहे. यामुळे या साधनांचा अतितेकी वापर होत असून लोकांना विशेष करून डोळ्याचे आजार जडण्याची शक्यता नाकारत येत नाही. याबरोबर काही लोकांना मानेचे आणि कंबरेचे आजारही भेडसावू शकतात. याकरिता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना पश्चात ही लोकांना आजार होऊ शकतात, हे नागरिकांनी वेळीच ओळखले पाहिजे.

या सर्व प्रक्रियेत, डोळ्यांवर निष्कारण ताण पडून डोळ्याचे विकार बळवत असून त्यातील एक म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम (Computer vision syndrome). सरकारी धोरणांमुळे अनके व्यवहार आता ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी लोक मोबाईल आणि संगणकाचा वापर विविध कामासाठी करत असतात. फक्त मोबाईलच नाही तर टॅबचा सुद्धा मोठा सहभाग यामध्ये आहे. बहुतांश लहान शाळकरी आणि कॉलेजची मुले घरी बसून ऑनलाईन अभ्यास करत आहेत. अभ्यास झाल्यानंतर फावल्या वेळेत ते लॅपटॉप किंवा संगणकावर चित्रपट पाहणे, ऑनलाईन चॅटिंग करणे आणि गेम्स खेळण्यात मग्न आहेत.

या प्रकरणी, ग्रांट मेडिकल कॉलेज आणि सर जे जे रुग्णालयाच्या, नेत्रविभागाच्या प्रमुख डॉ रागिणी पारीख, सांगतात की, " ज्यावेळी आपण संगणक किंवा मोबाईल, टॅबलेटवर काम करतो, त्यावेळी या सर्व उपकरणांमधून डोळ्यामध्ये प्रकाश पडतो. या उपकरणातील प्रकाशामुळे डोळ्याच्या बाहुल्या आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांतील स्नायूमध्ये स्पासम होऊन विविध तक्रारींची सुरुवात होते. डोळे जळजळणे, दुखणे अशा व्याधी सुरु होतात. त्यामुळे काही वेळ काम केल्यानंतर लगेच डोळ्यांचा थकवा जाणवायला सुरवात होते. या विषयवार अनेक वेळा आम्ही संवाद साधत असतो. खूप वेळा अनेकजण तासंतास संगणकावर काम करत असतात. यावेळी आपण डोळ्यांची उघड झाप पण कमी प्रमाणात करतो. यामुळे डोळे 'ड्राय' होण्याच्या तक्रारी सुरु होतात. तसेच सतत चष्म्याचे नंबर बदलणे आणि अचानक लांब पाहताना नजर स्थिर न होणे अशा स्वरूपाची समस्या निर्माण होते. "

त्या पुढे असेही सांगतात की, " साध्या घरगुती गोष्टी करून तुम्ही डोळ्याची काळजी घेऊ शकता. संगणकावर काम करता काही वेळा नंतर ब्रेक घेतला गेला पाहिजे. सातत्याने काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. हाताचे दोन्ही तळवे काही मिनिटांकरिता डोळ्यावर ठेवावेत, त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. नियमित संगणकावर काम करताना शक्य झाल्यास चष्मा वापरावा.

अनेक वेळा आपण पाहिलं असेल की, पालक दोघेही कामात व्यस्त असताना ज्यावेळी त्या दोघांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही, तेव्हा ते स्वतःच आपल्या मुलांनाही मोबाईल, व्हिडीओ गेम्समध्ये गुंतवून टाकतात. मात्र या सर्व गोष्टी आता बहुतांश मध्यमवर्गीय घरात सहजासहजी उपलब्ध झाल्याने डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टर सांगतात. हे कुठे तरी आता थांबणायची गरज आहे.

हिंदुजा हॉस्पिटल येथील नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. प्रीतम सामंत सांगतात की," सध्या बाजारात विविध गॅजेट्स उपलब्ध आहेत की, ज्यामुळे लहान मुलेच काय तर मोठी मंडळाची सुद्धा बराच वेळ या उपकरणांवर घालवतात. त्यामुळे डोळ्यांच्या व्याधी होतात, हे आता काय नव्याने सांगायला नको. आपण स्वतःहून काही गोष्टींवर निर्बंध आणले पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे धोके संभवतात हे आपण विसरता काम नये. जास्त वेळ टी.व्ही पाहू नये. आता तर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक या उपकरणाचा आधार घेऊनच दिवस काढत आहेत. मात्र या सर्व प्रक्रियेत त्यांनी डोळ्याची काळजी घेणे गरजेचं आहे, लोकांनी रात्री झोपण्याच्या वेळेस अंधारात मोबाईल घेऊन बसणे हे अत्यंत्य धोकादायक आहे.

डोळ्यांच्या व्याधींप्रमाणे ही उपकरण सतत वापरल्यामुळे मान, कंबर, पाठ आणि डोकं दुखतं. यावर ससून रुग्णालयाचे ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. रविकांत चोले, सांगतात की, "आपण अनेक वेळ एका स्थितीत बसलो की शरीरातील स्नायू जखडून दुखू लागतात. त्यामुळे काही वेळ हात पाय वर-खाली करावे. काही वेळ बसण्याची पद्धत बदलावी. कॉम्पुटर आणि लॅपटॉप हा काम करताना डोळ्यांच्या सामान पातळीवर असावा. त्यामुळे ह्या व्याधी कमी होऊ शकतात.

अंदाजे साधारण व्यक्ती मिनिटाला 10-15 वेळा डोळ्याची उघड-झाप करत असते. ते डोळ्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. डोळा हा शरीरातील नाजूक अवयव असून त्याची काळजी घेणे गरजेचं आहे. कारण त्याच्यावर तुमची दृष्टीत आधारित आहे. त्यामुळे कोरोनाची काळजी घेत असताना इतर अवयवाची काळजी घेणे आपले काम आहे. त्यामुळे स्वस्थ राहा आणि मस्त राहा.

   संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ लिस्ट, GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग , गुंतवणूकदार मालामाल
IKS च्या आयपीओचं GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग, गुंतवणूकदारांना 42 टक्के परतावा
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभूJayant Patil Vidhanbhavan : मी शांत नाही, मला पोहोचायला उशीर झाला - जयंत पाटीलAaditya Thackeray Nagpur : अमित शाहांनी तातडीने माफी मागावी - आदित्य ठाकरेRam Shinde Vidhan Parishad : राम शिंदेंची विधान परिषद सभापतीपदी एकमताने निवड

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ लिस्ट, GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग , गुंतवणूकदार मालामाल
IKS च्या आयपीओचं GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग, गुंतवणूकदारांना 42 टक्के परतावा
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
रशियाकडून कर्करोगावरील लसीची निर्मिती, देशवासियांना मोफत देणार; पुतिन सरकार म्हणाले, हा शतकातील सर्वात मोठा शोध!
Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी
Almatti Dam Height : कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा
Rupee Falls : डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, फेडच्या निर्णयानंतर शेअर बाजारही घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
डॉलरच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर, एका डॉलरसाठी किती रुपये लागणार? फेडच्या निर्णयानंतर घसरण
Ram Shinde : राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
राम शिंदेंची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीस, शिंदे, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
संघाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक, निलम गोऱ्हे म्हणाल्या,अजितदादांसह प्रमुख नेत्यांची फारकतच
Parliament Winter Session: संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
संसदेत धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
Embed widget