एक्स्प्लोर

जागे व्हा मुंबईकर... जागे व्हा!

तुमचं स्टेटस, पोस्ट, फोटो टाकून आणि हो आदरांजली वाहून झाली असेलचं... आता तरी जागे व्हा, सुजाण व्हा, सजग व्हा, तत्पर व्हा! त्या मोबाईलच्या दुनियेतून खऱ्या माणुसकीच्या दुनियेत या आणि आपल्या हक्कासाठी लढा

काय झालं का तुमचं स्टेटस, पोस्ट, फोटो टाकून आणि हो आदरांजली वाहून... आता तरी त्या मोबाईलमधून बाहेर या आणि जागे व्हा! अरे लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. गुरुवारी सीएसएमटी जवळील पूल कोसळला. यात निष्पाप तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची बातमी ऐकली आणि धक्का बसला. पण या घटनेनंतर मनाला भांबावून टाकणारी आणखी एक घटना घडली. एरवी आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदतीचा हात देत धावणाऱ्या मुंबईकरांच वेगळं रूप पाहायला मिळालं. काल ही घटना घडली आणि मुंबईकर पुन्हा एकदा थांबले, पण या वेळी मदत करण्यासाठी नसून तर मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यासाठी. का आणि कशासाठी? हाच एक प्रश्न माझ्या मनात आला. म्हणून मुंबईकर या नात्याने मला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आपण किती निष्ठूर होत चाललो आहोत? ह्या मोबाईलने एवढं वेड लावलं आहे की आपण माणुसकीसुद्धा विसरत चाललो आहोत. आपल्यासमोर दिवसभरात एवढं काही घडत तरीही आपण त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करत पुढे निघून जातो. काल एवढी मोठी घटना घडली पण एकाही माणसातली माणुसकी काही पाहायला मिळाली नाही. जर ती माणुसकी दिसली असती तर काही लोकांचा जीव वाचला असता. मृत जाहिद खानच्या भावानेच याबद्दल वक्तव्य केलं आहे. आणि हो मी तर म्हणेन की मुंबईकरांनी मदत देखील केली असेल पण वेळ निघून गेल्यावर केलेल्या गोष्टींचा उपयोग शून्यच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दुर्घटना आणि आपलं निष्क्रिय प्रशासन! ज्या पुलाच्या ऑडिटमध्ये पूल धोकादायक नाही असा उल्लेख होतो. तोच पूल कोसळतो. मग रेल्वे आणि महापालिका प्रशासनाची एकमेकांवर चिखलफेक सुरू होते. पण आमचा मुंबईकर मात्र मुंबई स्पिरिट म्हणत दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागतो. काही असतात ते आपलं मतं व्यक्त करतात तर काही मेणबत्त्या घेऊन शोक. पण या विरुद्ध कोणताही सामान्य मुंबईकर आवाज उठवत नाही. मागे सुद्धा अशाच घटना घडल्या. एल्फिन्स्टन पूल, अंधेरी पूल याच घटना घ्या. घटना घडल्यानंतर अनेक चौकश्या झाल्या, अनेक ऑडिट झाले, नवीन पूल बांधले. पण प्रत्यक्षात यातून निष्पन्न काय झालं काहीच नाही. आणि so called मुंबईकर सगळं विसरून आपलं रोजच आयुष्य जगू लागला. पण ठोस असं काहीच केलं नाही. आता तरी सुजाण, सजग, तत्पर अशा मुंबईकरांनी आवाज उठवायलाच हवा. किती दिवस असे किड्या मुंग्यांसारखे मरत राहणार? आता हीच वेळ आहे उठा जागे व्हा त्या मोबाईलच्या दुनियेतून खऱ्या माणुसकीच्या दुनियेत या आणि आपल्या हक्कासाठी लढा... एवढीचं आशा!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget