एक्स्प्लोर

BLOG | दोन दशकांपासून असलेली मोडीची #Online प्रतीक्षा संपली!

मोडी लिपी टंकलेखानाचे किंवा मोडी छपाईची बरीच उदाहरणे अगोदरच्या ब्लॉगमध्ये दिली आहेत. पण टंकलेखन व मुद्रण हेच मुळ कारण असू शकते. कारण मोडी ही हस्तलिखीत लिपी होती.

मोडी लिपी मध्ययुगीन महाराष्ट्राचा ज्वलंत, प्रेरणादायी, वैभवशाली इतिहास सांगणारी लिपी आहे. मोडी लिपीचा वापर छत्रपती शिवरायांनी राजलिपी म्हणून केला.परकीय शब्द काढून त्याला पर्यायी मराठी शब्द तयार केले. शिवकाळात रुळलेली मोडीचे महत्व शिवकाळानंतरही अबाधीत होते. भविष्यातही मोडीचे महत्व अबाधीत राहिल ह्याचे मुळ कारण भविष्याकालीन कोणत्याही वाटचालीस भूतकाळाचा आढावा महत्वाचा असतो.

इ.स.1950 मध्ये मुंबई प्रांताच्या सरकारने मोडी लिपीला अनावश्यक जाहीर केले. मोडीला लोकव्यवहारातून पुर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला. मोडी लिपी बंद करण्यासाठी त्यांनी तीन प्रमुख कारणे दिली.

1. मोडी लिपी टंकलिखीत केली जाऊ शकत नाही. 2. मोडी लिपी वाचनास अत्यंत अवघड आहे. 3. मोडी लिपी दिसायला अत्यंत घाणेरडी आहे.

मोडी लिपी टंकलेखानाचे किंवा मोडी छपाईची बरीच उदाहरणे अगोदरच्या ब्लॉगमध्ये दिली आहेत. पण टंकलेखन व मुद्रण हेच मुळ कारण असू शकते. कारण मोडी ही हस्तलिखीत लिपी होती.

इ.स. 1960 महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना मोडीला न्याय देण्याचे कार्य केले होते. मान्यवरांच्या प्रयत्नामुळे मोडीचे अभ्यासक, वाचक ह्यात वाढ झाली, मोडी लिपीचे ऐतिहासीक महत्व लोकांना समजू लागले. पण त्याचा जितका जास्त प्रचार होणे गरजेचे होते ते झाले नाही. आजही महाराष्ट्रातील प्रमुख शहरात मोडी प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. पण ज्या क्षमतेने मोडी अभ्यासक, मोडी प्रेमी, इतिहास प्रेमी लोक तयार व्हायला पाहिजेत तितके होत नव्हते.

आज 21 व्या शतकात डिजिटल जमाना आहे. आज जवळपास प्रत्येकजण डिजीटल माध्यमाच्या संपर्कात येतोच! मोडी लिपी इ.स. 1950 च्या दशकात निघाली. त्यावेळीपासून इतिहास संशोधक, अभ्यासक, व मोडीप्रेमी लोकांपर्यंत मर्यादीत राहिलेली मोडी आज ऑनलाईन आली आहे. इ.स. 1998 ला Google ची सुरुवात झाली. इ.स 2004 ला Facebook ची सुरुवात झाली.

21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून इंटरनेटचे मायाजाल वाढत गेले. सुरुवातीस सोशल मीडीयावर मराठी टायपिंग करणे अशक्य होते, पण काही काळानंतर ही सेवा उपलब्ध झाली. मोडी प्रेमी लोकांना व इतिहास प्रेमी लोकांना वाटत असे की मोडी लिपीचा ही वापर सोशल मिडीयावर करता यावा. मग ह्यासाठी मोडी अभ्यासकांनी काही मोडीचे फाँट तयार केले. आपल्या संगणकावर मोडी टंकीत करता येणे शक्य झाले. पण तरीही हे फाँट मोडी अभ्यासकापर्यंतच मर्यादीत राहीले. मोडी साक्षर लोकांपैकी 5% लोकांपर्यंत हे फाँट पोहचायचे पण त्यांचा वापर मर्यादीत असायचा.

मी सुद्धा श्री लिपी,पुणे ह्यांच्याकडून फाँट तयार करून घेतला. त्यापासून पुस्तकांची निर्मीती केली पण तरीही ह्याचा वापर फक्त पुस्तके व इ–पुस्तकापर्यंतच मर्यादीत राहिला. ह्याने मोडीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त होत नव्हता. मोडीची वातावरण निर्मीती होत नव्हती. कोणतीही भाषा किंवा लिपी शिकत असताना आपल्याला त्याच्या सानिध्यात राहावे लागते, सहवासात राहावे लागते. महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय मराठी बोलायला शिकतात,थोडं–थोडं वाचायला शिकतात कारण त्यांना मराठी शिकण्यासाठीचे वातावरण उपलब्ध होते. तसे घरामध्ये किंवा घरातून बाहेर पडल्यापासून आपल्याला मोडीचे सानिध्य, सहवास, वातावरण उपलब्ध होत नाही त्यामुळे व्यक्तीगत पातळीवर जे काही वाचन लेखन करू तेवढच वातावरण निर्मीती होते.आपल्या शिक्षणाचा भाग असा आहे की आपण मराठी व इंग्रजी भाषा शिकत असताना वातावरण निर्माण असते. आपल्याला ह्या भाषेंचे सानिध्य मिळत असते. पण मोडीबाबत असे वातावरण उपलब्ध नसते.

मोडी लिपीतील पहिले ई–बुक राजर्षी शाहू महाराज छत्रपती ह्या पुस्तकासाठी Amazon Kindle कडे बर्‍याच विणवण्या केल्या की सदरचे पुस्तक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मोडीमध्ये दिसावे. तीन वर्षाच्या इमेल पत्रव्यवहारानंतर ही अजुन त्यांनी माझे निवेदन स्वीकारले नाही.इतर सोशल मिडीया मोडीला सपोर्ट करत नाहीत! ही आपली मर्यादा आहे. जरी मोडी की बोर्ड वापरला तरी ते त्या सोशल मिडीयावर मोडीमध्ये दिसणार नाही. कारण त्यांच्या सिस्टीममध्ये मोडी लिपी नाही. जर आपल्याकडे मोडी फाँट असेल तर संगणकावर किंवा मोबाईलवर एखादी वेबसाईट मोडीमध्ये पाहता येत होती, पण दुसर्‍याला मोडीमध्ये काही पाठवू शकत नाही. तसेच एखादा फाँट तयार करणे म्हणजे अतीशय खर्चीक गोष्ट, मग ह्या सर्व गोष्टी असताना मोडीचा वापर डिजीटल माध्यमात कसा करायचा? ह्याचा पर्याय म्हणून मॉडीफायर डॉट इन (www.modifier.in) सुरुवात केली आहे.

पहिली मोडी लिपी सोशलमिडीया वेबसाईट ज्यावर आपण मोडी लिपीचा वापर करुन चॅट करु शकता! आपण संपूर्ण ब्लॉग मोडी लिपीमध्ये लिहून इतर सर्व ठिकाणी शेअर करु शकता.आपण जसे इतर सोशल मिडीयावर फोटो, पोस्ट, व्हिडीओ, लिंक, फाईल शेअर करता तसे ह्या वेबसाईटवर ही करु शकता!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget