एक्स्प्लोर

फूडफिरस्ता : रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने

चित्रक, टाकळा, चिरका, शेवरी, बरकी, कारंदा (कोकणातला करांदा) भारंगी, भोकर, कुडा अश्या अनेक भाज्या एकाच जागी सापडल्या.

श्रावण महिना म्हणजे भाज्या खाणाऱ्या, पिकवणाऱ्या आणि विकणाऱ्या सगळ्यांसाठीच 'पिक' सिझन ! श्रावण महिन्याचे महात्म्य ओळखून ह्या सुमारास शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या मंडईंमधे आसपासच्या गावातून, ताज्या पालेभाज्या, फळभाज्यांची मोठी आवक होते. त्या घेणाऱ्यांचीही मोठी गर्दी पहायला मिळते. पण सहसा ह्या गर्दीत नेहमी मिळणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्याच जास्ती आढळतात. सकाळी लवकर गेलं तर रानअळू, करटुलं, हादगा ह्यांच्यासारख्या काही भाज्या निदान पुण्याच्या फुले मंडईत वगेरे बघायला तरी मिळतात. पण ज्वारी, बाजरी, मका ह्यांच्या शेतात वाढणाऱ्या अनेक रानभाज्या आजकाल मार्केटमध्ये येणं जवळपास थांबलंच आहे. आता तर त्या शहरातच नाही, तर गावातूनही दिसणं दुर्मिळ झालंय. कुर्डू, चिचुरडा, काटेमाठ ह्यांच्यासारख्या अनेक भाज्या आजकाल शहरात मिळत नाहीत. मिळत नाहीत म्हणून बनवल्या जात नाहीत. एकदा त्या बनवणं बंद झालं, की नव्या पिढीला त्यांची माहिती होत नाही, हे एक दुष्टचक्र बनलंय, ते कोणीतरी भेदायला लागतं. त्यामुळे जेव्हा पुण्याच्या मॉडर्न कॉलेजनी, निसर्ग सेवक संस्थेच्या सहयोगाने आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाची बातमी वाचण्यात आली, तेव्हा नक्की भेट द्यायचं ठरवलं. जुन्नरजवळच्या कुकडेश्वरवरुन आलेल्या गावकऱ्यांनी बनवलेल्या रानभाज्या दाखवणार आणि बनवून देणार आहेत, असं समजलं. जुन्नर, कुकडेश्वर वगैरे नावं वाचतानाच ट्रेकचे सोनेरी दिवस आठवले. सातवाहन कालापासून ज्या मार्गावरून सबंध महाराष्ट्राचा मुख्य व्यापार चालायचा त्या नाणेघाटावर टेहळणी करायला योजलेली, शिवनेरी, चावंड, हडसर आणि जीवधन ही जुन्नर तालुक्यातली किल्ल्यांची चौकडी. त्यातही साक्षात महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी, त्याच्या पायाशी इमानानी बसलेलं जुन्नर, जीवधनच्या पायथ्याशी असलेलं घाटघर, हे तिथल्या गावकऱ्यांच्या सौजन्यपूर्ण वागण्याने, नानाच्या अंगठ्यामुळे आणि नाणेघाटाच्या माथ्यावर ठेवलेल्या जकातीच्या पुरातनकालीन मोठ्ठ्या रांजणांमुळे मनात ठसलंय आणि किल्ले चावंडपासून जवळच असलेलं, गावापेक्षाही खरंतर एखादी छोटी वाडी म्हणूनच जास्ती शोभावं असं कुकडेश्वर गाव, तिथलं ते देखणं हेमाडपंथी मंदिर, त्याशेजारी वाहणाऱ्या निर्मळ पाण्याच्या झऱ्यामुळे कुकडेश्वरनी मनात कायमचं घर केलंय. ट्रेकवरुन दमून भागून आल्यावर त्या स्वच्छ झऱ्यात केलेलं सचैल स्नान आणि त्यानंतर अपरात्री मिळालेलं पिठलं भाकरीचं आयतं जेवण निव्वळ सुख ! अश्या कुकडेश्वरच्या आणि रानभाज्यांच्या प्रेमाखातीर कार्यक्रमासाठी ताबडतोब नोंदणी करुन हजेरी लावली. फूडफिरस्ता : रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने कॉलेजमध्ये शिकवला जाणारा ‘बॉटनी’ हा विषय मुळात फार ‘थियरी’ असलेला. असे विषय शिकवणारेही जर ‘पाठ्यपुस्तकात’ वाचून ‘अभ्यासक्रम’ शिकवणारे मिळाले तर, विद्यार्थीही लवकरच अश्या विषयाला कंटाळतात. (“बॉटनी छोडेंगे मॅटीनी देखेंगे” ह्या ‘लोकगीताचा’ जन्म काही उगाचच झालेला नाही) पण मॉडर्न कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विभागात शिकवणाऱ्या डॉ. प्राची क्षीरसागर, डॉ. घाटे, डॉ. भोगांवकर ह्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरुन अश्या शेकडो रानभाज्यांची नोंद केलेल्या प्राध्यापिका वेगळ्या आहेत. मला वाटतं ‘फिल्ड’ वर काम केलेल्या लोकांना त्यातून मिळणाऱ्या अनुभवाचं महत्व जास्ती समजतं. साहजिकच आपल्या विद्यार्थ्यांनाही दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्या प्रत्यक्ष बघता याव्यात, ज्यांनी रानभाज्यांचा हा ठेवा जपून ठेवलाय, त्या गावकऱ्यांना ते बनवून दाखवायची संधी मिळावी; अश्या हेतूंनी त्यांनी रानभाज्या महोत्सवाची कल्पना मांडली. त्यांना कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. संजय खरात ह्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे, कुकडेश्वर आणि पौडजवळच्या नाणेगाववरुन आलेल्या ग्रामस्थांनी आणून बनवलेल्या रानभाज्यांचा महोत्सव मॉडर्न कॉलेजमध्ये भरवला गेला. प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी ह्यांनी केलेलं प्रदर्शनाचं आयोजन नेटकं होतं. ह्या विषयाची माहिती नसणाऱ्यांसाठी, रानभाज्यांच्या प्रकार, आढळ, उपयुक्त भाग, त्यांचा सिझन अशी उपयुक्त माहिती प्रत्यक्ष नमुन्यांबरोबरच देत होते. माझ्यासारख्या ह्या विषयाशी संबंधित नसलेल्या माणसाला ही माहिती म्हणजे नव्या माहितीचा पेटाराच होता. फूडफिरस्ता : रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शनामुळे चित्रक, टाकळा, चिरका, शेवरी, बरकी, कारंदा (कोकणातला करांदा) भारंगी, भोकर, कुडा अश्या अनेक भाज्या एकाच जागी सापडल्या. हलुंदा, बरकी, कैला, फोडशी, कुळू, चित्रक, कुरूळ, नळी, शेवरी (कापसाची नाही), माकडशिंगी, अबई अशी आपल्याला मजेशीर वाटावीत, अशी अनेक नावं समजली. शहरात मिळणाऱ्या काही भाज्यांची शास्त्रीय आणि त्याहीपेक्षा इतर बोलीभाषेतली नावं समजली. मला मुख्य रस होता तो अर्थात खऱ्या अर्थाने सेंद्रीय रानभाज्यांचा आस्वाद घेण्यात! शहरातून नामशेष झालेल्या सरटोल, ‘चाव्याचा बार’, चीचुरडा, गोमेटी, साडदोडे ह्यासारख्या अनेक भाज्यांशी माझी इथे पहिल्यांदाच आणि तीही ‘डायरेक्ट तोंडओळख’ झाली. कोकणात अळूच्या देठाची दह्यातली ‘देठी’ होते, पण तो अळू (रानअळू) ‘तेरा’ ह्या नावानी फक्त तिखट मीठ पडून समोर आल्यावर, किती चविष्ट लागतो, हे इथे समजलं. तव्यावर परतलेल्या रानअळूची वडीही वेगळी पण चवीला छान होती. “गोमेटी, साडदोडे आणि आवळा” ह्यांची एकत्रित केलेली स्वादिष्ट भाजी समजली. भारंगीची इथल्या मंडईत फक्त पाने मिळतात पण हे लोक पानांबरोबर त्यांची फुलंही भाजीत वापरतात, सुरेख लागतात. कॉलेजमधल्या ‘संशोधक’ प्राध्यापिका डॉ. प्राची क्षीरसागर ह्यांच्याशी बोलण्यातून, डोंगरनिवासींच्या भाज्या बनवायच्या पद्धतीशीही चांगला परिचय झाला. फूडफिरस्ता : रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने ह्यापैकी बहुतेक वनस्पतींमध्ये स्वसंरक्षणासाठी मूलतःच काही विषारी द्रव्ये तयार होत असतात. त्यामुळे ह्या रानभाज्या “आणल्या दुकानातून आणि घेतल्या करायला”, अश्या नव्हेत. रानातून गोळा केलेल्या भाज्या बऱ्याचवेळ पाण्यात ठेऊन स्वच्छ करून घ्यायला लागतात. कंद असलेल्या भाज्या तर रात्रभर पाण्यात ठेऊन त्यातल्या कडू द्रव्यांचं प्रमाण कमी करण्यात येतं. काहींना हळद आणि मीठ लावून त्यांचे पाणी काढून फेकून दिले जाते. मुख्य काळजी म्हणजे सगळ्याच भाज्या, बऱ्याच जास्त वेळ परतल्या जातात, जेणेकरुन त्यांच्यातील विषारी द्रव्ये कमी होण्यास मदत होते. बनवताना बहुतेक पालेभाज्या फक्त कांदा, मिरची घालून परतत शिजवतात; त्याही लोखंडी कढईत, त्यामुळे त्याची चव काही ‘और’च ! तर आजकाल काही पालेभाज्या पीठ पेरून बनवतात. आंबटपणासाठी वरून लिंबू पिळून घेतात. मुळात ह्या दुर्गवासींचा ‘मसाले’ ह्या संज्ञेशी परिचयच नाही. त्यामुळे आपल्याकडे अगदी लहान मुलांनाही ठावूक असलेले लवंग, वेलची, दालचिनी असे पदार्थ त्यांच्याकडे नसतातच. तमालपत्र, जायपत्री, दगडफूल ही तर नावंही तर त्यांनी कदाचित ऐकली नसतील. हाताशी असतं कांदा, मोहरी, मीठ, तिखटासाठी म्हणून हिरव्या किंवा वाळवलेल्या मिरच्या. आजकाल थोड्या प्रमाणात मोजक्या डाळी येवढंच. पण एखादी अन्नपूर्णा जसा कोंड्याचाही मांडा करते ना? तसाच स्वयंपाक ह्या खेड्यातल्या बायका डोंगराच्या कुशीत तीन दगडांची चूल रचून करतात. त्याच्या जोडीला ज्वारी, तांदूळ सारखं जे मिळेल ते धान्य दळून केलेल्या भाकऱ्या आणि अज्ञात वाणाचा भात-चव साधारण कोकणातल्या ‘जिरग्या’ तांदुळासारखी. ह्या सगळ्याच जेवणाचे अतिशय माफक दर कॉलेजनी लावले होते. जेवण झाल्यावर निघालो. येताना मनात विचार आला की, ह्यातून अश्या अनेक गुणधर्म असलेल्या पौष्टिक रानभाज्या, जर आपल्या इथे ‘रानभाज्या थीम’ ठेऊन एखाद्या रेस्टॉरंटनी बनवणं सुरु केलं तर? त्यावर शहरी लोकांच्या अक्षरशः उड्या पडतील. फूडफिरस्ता : रानभाज्या महोत्सवाच्या निमित्ताने शहरातल्या जागांचे भाव बघता असे रेग्युलर रेस्टॉरंट सुरु करणे कदाचित इथे शक्य होणार नाही. पण निदान श्रावणासारख्या भाज्यांच्या सिझन मध्ये अश्या लोकांना सोबतीला घेऊन, एखादा रानभाज्या फेस्टिव्हल तरी घेता येईल? त्यातून त्यांनाही तात्पुरते का होईना पण चांगले उत्पन्न मिळू शकेल. निदान त्याची सुरुवात तरी होईल? हेच निसर्गाचे वरदान लाभलेल्या जुन्नरसारख्या एखाद्या गावात, ज्याला समृद्ध इतिहासाची जोड आहे. तिथे वर्षभरासाठी जरा वेगळ्या पद्धतीचे कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आणि त्यातून अश्या रानभाज्यांच्या गुणधर्माची आणि त्यांच्या चवीची महती जर लोकांना समजली; तर त्यातून किती आदिवासी आणि ग्रामस्थांच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकेल? निसर्गानी मुक्तपणे दिलेला रानभाज्यांचा हा खजिना, त्यातून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचेल. अश्या गावातल्या एखाद्या तरुण उद्योजकाने ह्याच भाज्या आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात लावायला प्रवृत्त करून, त्या शहरातल्या पंचतारांकित वगैरे हॉटेलशी ‘टाय-अप’ करून, त्यांना त्या बनवायचं ट्रेनिंग दिलं, तरी ह्यावर किती कुटुंबाची वर्षभराच्या शाश्वत उत्पन्नाची सोय होऊ शकेल? तीही त्यांच्या स्वतःच्याच गावात, स्वतःच्या जमिनीवर. अश्या कल्पना अनेक येतात, फक्त आपल्याकडे त्यावर प्रत्यक्ष ‘फिल्डवर’ काम करणाऱ्या कल्पक माणसांची कमी असते. ह्या माध्यमातून अशी वेगळी वाट पकडणारा कोणी युवा व्यक्तिमत्व पुढे आलं तर असे ब्लॉग लिहायचा आनंद खरच द्विगुणित होईल.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025  : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget