एक्स्प्लोर

फूडफिरस्ता : पुण्यातले स्ट्रीट फूड - थोडा भूतकाळ, थोडे वर्तमान - भाग ४

काहीही असेल तरी ह्या लोकांनी कर्नाटकी इडली, चटणी मात्र घरोघरी पोचवण्यात मोठा हातभार लावला ही मात्र वस्तुस्थिती नाकारता कामा नये.

पुण्यात उडपी हॉटेल्सचं आगमन साधारण पन्नासच्या दशकात झालं. त्याही आधी रास्ता पेठेत सुरु झालेल्या साऊथ इंडियन कॅंटीनवरचा Abp माझा वर लिहिलेला ब्लॉग वाचला असेल असं गृहीत धरतो. पण उडपी लोकांनी आणलेले डोसा, उत्तप्पा, अनेक वर्ष फक्त मोजक्या उडपी हॉटेलांपुरतेच मर्यादित होते. हातगाड्यांवर यायला त्यांना ऐशींच्या दशकाची वाट बघायला लागली. इडली-चटणी, मेदूवडा ह्यांना सगळ्यात आधी "रस्त्यावर आणलं", ते माझ्यामते उडपीच्याच बाजूनी आलेल्या तुळू भाषिक लोकांनी. साधारण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यात ‘तुळू’ भाषिक लोकांचं शेकड्याने आगमन झालं. त्याचं कारण देवच जाणे पण ह्या लोकांबद्दल होणाऱ्या चर्चा लहानपणी ऐकलेल्या आठवतायत मला. मध्यम उंची, शेलाटा बांधा, गुडघ्यापर्यंत पंचासदृश्य शुभ्र लुंगी नेसलेले अण्णा' लोक, डोक्यावर वेताच्या टोपल्या घेऊन पुण्याच्या गल्लीबोळात दिसायला लागले. घरी बनवलेल्या इडल्या, चटणी डोक्यावरच्या टोपलीत घेऊन, पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या रस्त्यांवर संध्याकाळी फिरताना दिसायचे. त्या लोकांना पाहून आता ‘यं’ वर्ष झाली पण अजूनही कै. बाळासाहेब ठाकरेंनी, “बजाव पुंगी, हटाव लुंगी”, ही घोषणा वाचनाच्या ओघात कधी समोर आली तर त्या अण्णा लोकांचीच आठवण होते. इतपत ती मूर्ती डोळ्यापुढे आहे. फूडफिरस्ता : पुण्यातले स्ट्रीट फूड - थोडा भूतकाळ, थोडे वर्तमान - भाग ४ बोलायला भाषेची अडचण येत असल्याने असेल कदाचित पण एका हाताने रिक्षाच्या भोंग्यासारखा रबरी भोपू वाजवत, अम्मा, अप्पा म्हणून इडलीचे भाव सांगण्यापुरते कामचलाऊ हिंदी बोलत, तंगडतोड करुन हे अण्णा लोक इडल्या विकायचे. त्या इडल्या आईने निव्वळ औत्सुक्यापोटी विकत घेतलेल्याही चांगल्याच आठवतायत. त्या इडलीची चव काही ‘विशेष’ असायची अशातला काहीच भाग नव्हता. पण त्यावेळेच्या पुण्यातही त्या शेकड्यांनी खपत असाव्यात. मला वाटतं त्याकाळच्या, “घ्यायचं तर घ्या नाहीतर चालू लागा” छाप पुण्यात खाण्याचे तयार जिन्नस दरवाज्यावर आणून आपल्याला कोणीतरी विकतय तेही विनम्रपणे ! ही 'कन्सेप्ट’च लोकांना प्रचंड भावली असावी. पण हा विनम्रपणा तुळू भाषिक लोकांना मात्र फार काळ परवडला नसावा. ही लोकं लवकरच दिसेनाशी झाली. कदाचित पुढे निरनिराळ्या उडपी हॉटेलात कामाला लागली असावीत. काहीही असेल तरी ह्या लोकांनी कर्नाटकी इडली, चटणी मात्र घरोघरी पोचवण्यात मोठा हातभार लावला ही मात्र वस्तुस्थिती नाकारता कामा नये. सँडविच ह्या मूळच्या युरोप-अमेरिकन झटपट खाण्याचे वेडे आपल्याकडेही कमी नाहीत. कॅंपमधे मित्रांच्या संगतीने सायकल हाणत फक्त ‘मार्जो-रिन’चे चटणी सॅण्डविच (आणि ‘नाझ’चे सामोसे) खायला जाणाऱ्यात, कोणे एकेकाळी अस्मादिकही सामील होते. पण गाडीवर मिळणारे सँडविच म्हणले की पहिल्यांदा बोहरी आळीत सोन्या मारुती चौकाच्या अलीकडच्या गाडीवरचे आठवतात. पुढे डेक्कनला संभाजी पार्कात सॅण्डविचची एक गाडी लागायला लागली ती तर अगदी आमच्या समोर. सॅंडविचचं हे लोण नंतर डेक्कनवर झपाट्यानं पसरलं. मोजक्याच जनतेला ओळख माहिती असलेला हॉटेल वैशालीमधला एक कर्मचारी, साधारण २००७-०८ पर्यंत कमला नेहरु पार्कांच्या दत्त मंदिराबाहेर वैशालीमधला एक कर्मचारी बाकडं लावून सँडविचचा व्यवसाय करायचा. त्यांच्याकडचे चटणी सँडविच उत्तम असायचे. ते सॅंडविच खाऊन शेजारी शिरीष बोधनींकडचे आईसक्रीम किंवा खिशाच्या ऐपतीप्रमाणे ५ किंवा १० रुपयांची फ्रूट प्लेट खाणे म्हणजे कॉलेजच्या दिवसात एक ‘ट्रिट’ असायची. सकाळची वेळ असेल तर मात्र फर्ग्युसन रस्त्यावर ‘रुपाली’ पलिकडच्या इंदोरी नमकीनकडच्या सामोस्यांकडे मोर्चा वळवला जायचा, असो ! जागतिकीकरणानंतर २००५-०६ पर्यंतचा काळ हा पुण्याच्या खाद्यव्यवसायाकरताही मोठ्या स्थित्यंतराचा काळ. ह्या मधल्या काळात पुण्यात, महाराष्ट्राबाहेरुन विशेषतः उत्तर भारतातली ‘जनता’ मोठ्या प्रमाणावर दाखल झाली. येताना आपापली संस्कृती, पदार्थ घेऊन आली. मूळच्या पुण्याच्या व्याप्तीत आणि संस्कृतीत बरेच बदल घडले. वेगवेगळ्या प्रांताच्या,देशोदेशीची 'क्युझिन्स' देणारी हॉटेल्स सुरु झाली. त्याच्या पुढे जाऊन हेच खाणे स्ट्रीट फूडमध्येही आले. स्ट्रीट फूड्सचं पूर्वीच 'रस्त्यावरचं खाणं' हे स्वरूप बदलून त्याला आता ग्लॅमर आलं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधे काम करणाऱ्या अनेकांनी नोकऱ्या सोडून स्टार्टअप्स म्हणून 'फूड ट्रक्स' सुरु केले. त्यातल्या अनेकांनी ते यशस्वी करुन लवकरच ते हॉटेल्समध्ये बदलले. सकाळच्या नाश्त्यापासून ते व्हेज नॉनव्हेज रॅप्स, बर्गर्स, पिझ्झा, श्वारमा, ब्रोटापर्यंत काँटिनेंटल पदार्थ करुन विकणारे अनेक 'फूड ट्रक्स' विमाननगर, खराडी, कोरेगाव पार्कपासून ते बाणेर, बालेवाडीपर्यंत पसरत गेले. अधिकृत माहितीप्रमाणे आजच्या घडीला असे ५०० च्या आसपास फूडट्रक्स पुण्यात व्यवसाय करतात. (नेमका अंदाज इथे सांगणे योग्य नसले तरी ही संख्या ह्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे आणि ती दर आठवड्याला पुण्यातल्या दुचाकींच्या संख्येसारखीच वाढते आहे.) फूड इंडस्ट्रीचा एक घटक, अभ्यासक म्हणून बोलायचं झाल तर स्ट्रीट फूडची इथून पुढे होणारी वाटचाल मला हळूहळू फिंगर फूडकडे होत जाताना स्पष्ट दिसते आहे. हा बदल होतानाही पुण्यातली पारंपारिक मराठी पदार्थांची क्रेझ संपलेली नाहीये. सकाळी पेठ भाग, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता किंवा डेक्कनला पाहिलंत तर हजारोंच्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी रस्त्यावरच्या ठेल्यांवर उभे राहून पोहे, उपमा, शिरा, खिचडी सारखे पदार्थ कागदावर खाताना दिसतील. फक्त ह्या पदार्थांच्या जिवावर पुण्यातली किमान पाचेक हजार गरजू कुटुंब (फक्त सकाळी ४ तास काम करुन) चांगले उत्पन्न मिळवतायत. फूडफिरस्ता : पुण्यातले स्ट्रीट फूड - थोडा भूतकाळ, थोडे वर्तमान - भाग ४ विरोधाभास म्हणून सांगायचं झालं तर, संध्याकाळी ‘कॅड- बी‘, ‘फ्रोझन बॉटल’ सारख्या जॉईंटवर दिसणारी मुलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पोहे, उपमा खाताना आणि दुपारी ग्रुपने अमृततुल्य (आजकाल तंदूर चहाच्या) रांगेत चहाचे घुटके घेत दिसतील. खरं म्हणजे मी अनुभवलेल्या पुण्याची सुरुवात ८० च्या दशकापासूनची. म्हणजे मध्यमवर्गातल्या मुलांना 'पॉकेटमनी' हे नाव माहिती व्हायलाही अजून एकदीड दशक जायचे होते तेव्हाची! ज्यावेळी शाळकरी मुलांना सुट्टीच्या दुपारी खेळायला कॅरम, ल्युडो किंवा पत्त्यांचे बदाम सात, लॅडीज, ३०४ सारखे खेळ खेळायला देऊन घरोघरीच्या आई, झोप काढायला जायच्या. हमखास काही वेळातच रस्त्यावर एखादा फेरीवाला 'जॉय' ची अडीच फुटी गाडी ढकलत 'आईस्फ्रुटSSS' ची आरोळी मारत यायचा. खेळताना एकमेकांवर आरडाओरडा करुन घशाला कोरड पडल्याची जाणीव खऱ्या अर्थानं त्या क्षणाला व्हायची. खेळातून सामुदायिक 'टॅम्पलीज' घेतली जायची. घरातला स्वयंपाक, उन्हाळ्याची वाळवणं करून दमून झोपलेल्या आईला उठवायचं काम कोणी करायचं? ह्यावर थोडा 'खल' चालायचा. तो निर्णय व्हायच्या आत ‘जॉय'वाला निघून जाऊ नये म्हणून अर्धी टीम त्याच्याशी रस्त्यावरच पाय भाजत असतानाही अनवाणी उभी राहून काहीतरी बोलत थांबायची. खरं सांगायचं तर आईकडून बजेट सॅंक्शन करून घेऊन, लाकडी गाडीवरची ‘आईसकँडी’ खाण्यात किंवा आठ आण्यात (आजकालच्या मुलांना तर ५० पैसेही माहिती नसतात.) पेप्सी कोला खाण्यात जो ‘जॉय’ असायचा तो आता नायट्रोजनवाली कँडी लॅन्ड, मॅजिक पॉपसारखी ‘किड्स स्पेशल’ खाण्यात मिळत नाही. अशावेळी पुलंना स्मरुन पुन्हा एकदा हनुमान टेकडीवर जाऊन किंवा शिशुवर्गात बसून म्हणावसं वाटतं, "पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही" ! ( समाप्त ) संबंधित ब्लॉग

रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान - भाग 1

रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान - भाग -२

फूडफिरस्ता : रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान भाग- 3

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात  अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
Embed widget