एक्स्प्लोर

BLOG : कोरोनानंतरचा शेअर बाजार! 

BLOG : 2020 च्या सुरुवातीला जग नवीन दशकाचं स्वागत करत होतं आणि नेमकं त्याच वेळेस एक प्रचंड भयंकर महामारी मानवी समाजात दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज होत होती. चीनच्या वूहान शहरातून कोरोना नामक विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत होता. या विषाणूने भारतातही प्रवेश केला होता. कोरोनाच्या भीतीने जगभरात ‘टाळेबंदी’ अर्थात Lockdown लागू केला आणि जग नव्या संकटाला सामोरं जात होतं. या बदलाचे जगाच्या राजकारणात, समाजकारणात आणि अर्थकारणात पडसाद उमटणे साहजिकच होतं. आणि नेमकी हीच घटना भारतीय शेअर बाजारासाठी नवं वळण देणारी ठरली!

मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता आणि सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. याचे पडसाद सर्वच क्षेत्रात उमटणे साहजिकच होतं. त्याचप्रमाणे शेअर बाजारावरही त्याचे पडसाद उमटले. 23 मार्च 2020 या दिवशी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्यात प्रचंड प्रमाणात विक्रीची लाट आली व पडझड वाढतच गेली. निफ्टी व सेन्सेक्स हे निर्देशांक, सोबतच विविध शेअर्सना लोअर सर्कीट लावत शेअर बाजार बंद करावे लागले. 

जानेवारीत 12,500 चा शिखर गाठणारा निफ्टी निर्देशांक अक्षरशः 7,500 अंशांपर्यंत खाली कोसळला आणि सेन्सेक्सने 42,200 पासून 25,700 पर्यन्तचा नीचांक गाठला. दोन्ही निर्देशांक मार्च 2016 च्या पातळीवर जाऊन थांबले. वाढीचा प्रवास हा चार वर्षांचा होता आणि पडझडीचा प्रवास अवघ्या काही दिवसांचा!   

देश बंद झाला होता आणि काही क्षेत्रात वर्क फ्रॉम होम संस्कृती उदयास आली. काहींकडे कामच न उरल्याने वेळच वेळ उपलब्ध होता. आणि याचवेळी “Online Demat Account” सुरु करण्याची सुविधा उपलब्ध होती. अनेकांनी अगदी एका क्लिकवर घरबसल्या नवीन डिमॅट सुरू केले आणि येथूनच भारतीय शेअर बाजाराचा नवीन प्रवास सुरू झाला. 

सेबीच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 नंतर अनेक जणांनी नव्याने डिमॅट अकाऊंट सुरू करून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एकूण डिमॅट खात्यांची संख्या साधारणपणे 3.5 कोटी इतकी होती जी नोवेंबर 2021 च्या अखेरपर्यन्त वाढ होऊन 7.8 कोटी इतकी झालेली आहे.  एकंदरीतच वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाऊनमुळे घरबसल्या सहज शक्य असलेलं शेअर ट्रेडिंग, स्वस्तात मिळणारे शेअर्स आणि शेअर बाजारातून अतिरिक्त पैसा मिळवण्याची संधी यामुळे सामान्य माणूस शेअर बाजाराकडे वळू लागला. 

शेअर बाजारातील सामान्य माणसाच्या, ज्याला आपण रिटेल इन्वेस्टर म्हणतो, या वाढत्या सहभागामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा आला आणि बाजारातील गुंतवणूक वाढली. या सर्वाचा थेट फायदा CDSL, BSE, Angel One, IIFL अशा कंपन्यांना झाला. या कंपन्या शेअर बाजारातील महत्वाच्या संस्था आहेत. CDSL ही Depository आहे, BSE हे Exchange आहे आणि Angel One हा DP अर्थात Broker आहे. या आणि यांसारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्स त्यामुळेच गेल्या दोन वर्षात अनेक पटीने वाढलेले दिसून येतील कारण त्यांचा व्यवसायही नवीन गुंतवणूकदारांमुळे वाढला होता. 

ज्या पद्धतीने शेअर बाजारात सामान्य माणसाचा रस वाढला होता त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाणही बर्‍याच अंशी वाढलं आहे. AMFI च्या आकडेवारी नुसार जानेवारी 2022 च्या शेवटाला Mutual Fund मधील Monthly SIP (मासिक सिप) चा आकडा हा 11,500 कोटी इतक्या सर्वोच्च पातळीवर पोचला आहे. या क्षेत्रात सेवा देणार्‍या CAMS या कंपनीचा शेअरही दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आला. 

बँकेतील ठेवींवर कमी झालेले व्याजदर असतील किंवा वाढती महागाई यामुळे सामान्य माणूस हा आता गुंतवणुकीसाठी विविध मार्ग चोखंदळत आहे. असं असलं तरीही इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍या लोकांचं प्रमाण एकूण लोकसंखेच्या तुलनेत कमीच आहे. पण आकडेवारी नुसार हे वाढत जाणार आहे हेही दिसून येईल. जसा जसा सामान्य माणूस अर्थसाक्षर होत जाईल तसा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ वाढत जाईल हे निश्चित आहे. 

मार्च 2022 मध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि काहीच महिन्यांत शेअर बाजार पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल करू लागले. मार्च 2022 मध्ये निफ्टी ने 7500 चा स्तर दाखवला आणि तिथून नंतर 18,500 चा आत्तापर्यंतचा सर्वोच्च स्तरही दाखवला. सध्या रशिया-युक्रेन युद्ध व इतर काही कारणांनी जगभरातील शेअर बाजारात पडझड होत आहे. त्यांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारात तितक्या प्रमाणात पडझड झालेली नाही. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने विक्री करूनही आपला बाजार टिकून आहे याला कारण सामान्य गुंतवणूकदारांची वाढणारी गुंतवणूक हेसुद्धा आहेच. हा कल टिकून राहिला तर भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा नवीन शिखरावर जाईल हेच मार्च 2020 ते मार्च 2022 चा प्रवास सांगतो! 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget