एक्स्प्लोर

Blog: शेअर बाजारातील मराठी माणूस

शेअर बाजार हे नाव समोर आलं की दोन प्रकारच्या शंका नेहमीच उपस्थित केल्या जातात. एक म्हणजे शेअर बाजारात खूप नुकसान होतं आणि त्यात कधीच फायदा होत नाही. आणि दुसरी शंका म्हणजे शेअर बाजारात मराठी माणसाचं अस्तित्व काय?

आकडेवारीच बघायची असेल तर आज घडीला देशात एकूण 10 कोटी डिमॅट खाती उघडली गेली आहेत आणि त्यातील सर्वाधिक डिमॅट खाती ही महाराष्ट्रात आहे आणि बीएसई च्या आकडेवारीनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्म वर महाराष्ट्रातून गुंतवणूक करणार्‍यांचं प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे शेअर बाजारात मराठी माणूस कुठे आहे याचं उत्तर मिळालं असेल. 

पण आपला आजचा विषय विशेष आहे जो प्रत्येक मराठी माणसाला विचार करायला लावणारा आहे. आज आपण अशा एका सामान्य मराठी माणसाचा शेअर बाजारातील प्रवास जाणून घेणार ज्यामध्ये वर नमूद केलेल्या दोन्ही शंकांची उत्तरं मिळतील.

महादेव कुटरेकर! मुंबईस्थित एक सामान्य नोकरदार मराठी माणूस. महादेव कुटरेकर यांचा 1955 सालचा जन्म. महादेव कुटरेकर यांनी 1978 साली मुंबईत Pidilite Industries या कंपनीत नोकरी सुरू केली. आजही Fevicol ची जाहिरात अनेकांच्या स्मरणात असेल. ते Fevicol हे उत्पादन बनवणारी कंपनी म्हणजे Pidilite Industries. 

महादेव कुटरेकर यांनी 1978 साली कंपनीत नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना कंपनीने 1989 साली कर्मचार्‍यांना काही शेअर्स देऊ केले. त्यामध्ये महादेव कुटरेकर यांनी एकूण 2000 रुपये गुंतवणूक करत 40 शेअर्स मिळवले. म्हणजे अंदाजे 50 रुपयांना एक शेअर मिळाला. आजच्या काळातही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी दहावेळा विचार केला जातो पण महादेव कुटरेकर यांनी तेंव्हा शेअर्समध्ये गुंतवणूक केली. खरं तर हा निर्णय घेणे हेच सर्वात मोठं धाडस असतं. ते महादेव कुटरेकर यांनी केलं. स्वतः त्या कंपनीत कार्यरत असल्याने त्यांना कंपनीच्या उज्वल भवितव्याबाबत खात्री होतीच. जग आर्थिक उदारीकरणाच्या उंबरठ्यावर उभं होतं आणि भारतातही आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. शेअर बाजार हे या वातावरणात ठळकपणे उठून दिसणारं क्षेत्र. त्यावेळी आजसारखे डिमॅट अकाऊंट नव्हते. शेअर्सचे व्यवहार कागदोपत्री व्हायचे ज्याला आपण शेअर सर्टिफिकेट म्हणतो. 

जोपर्यंत महादेव कुटरेकर यांना पैशांची गरज भासत नव्हती तोपर्यंत त्यांनी शेअर्स विकण्याचा विचार केलाच नाही. काही काळाने त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांच्याकडील 40 पैकी 20 शेअर्स त्यांनी विकून टाकले.
कंपनीच्या शेअर्सचं बीएसई वर पब्लिक लिस्टिंग हे 1993 साली झालं. ज्याला आपण आयपीओ म्हणतो तोच हा प्रकार.

साधारणपणे 1959 साली बळवंत पारेख यांनी मुंबईत या कंपनीची सुरुवात केली होती. कालांतराने या कंपनीने आपला व्यवसाय वाढवला आणि आज Pidilite ही या क्षेत्रातील एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. काळानुसार कंपनीची ग्रोथ सुरूच होती. कंपनीने Fevicol, Dr- Fixit, M-Seal सारखी मागणी असणारी उत्पादने सुरू ठेवली आणि कंपनीच्या यशाचा आलेख वाढतच गेला. कंपनीचा नफा वाढत गेला आणि पर्यायाने शेअर्सचे भाव सुद्धा वाढत गेले. ज्यावेळी कंपनीची ग्रोथ होत असते त्यात होणार्‍या लाभात भागधारकांचाही सहभाग असतो. कारण शेअर्स अर्थात समभाग म्हणजे आपण त्या कंपनीचा एक हिस्सा खरेदी केलेला असतो. कंपनीची वाढ म्हणजे भागधारकांची वाढ! याच सूत्रानुसार महादेव कुटरेकर यांचीही ग्रोथ होतच होती. त्यांची 2000 रुपयांची गुंतवणूक वाढत होती. 

दरम्यानच्या काळात Pidilite कंपनीने Corporate Action अंतर्गत Bonus आणि Split जाहीर केला ज्या प्रक्रियेत भागधारकांना अतिरिक्त शेअर्स मिळाले. 1996 साली कंपनीने 1:1 प्रमाणात बोनस जाहीर केला ज्यामध्ये महादेव कुटरेकर यांच्याकडे असलेल्या 20 शेअर्सचे 40 शेअर्स झाले. परत एकदा 2000 साली 1:1 बोनस जाहीर केला ज्यामध्ये 40 चे 80 शेअर्स झाले. त्यानंतर 2005 साली कंपनीने 10 ची Face Value 1 केली म्हणजे ज्याच्याकडे 1 शेअर होता त्यांचे 10 शेअर्स झाले. महादेव कुटरेकर यांच्या 80  शेअर्सचे 800 शेअर्स झाले. परत एकदा कंपनीने 2010 साली 1:1 बोनस जाहीर केला. ज्यामध्ये त्यांचे एकूण शेअर्स 1600 इतके झाले. 
सप्टेंबर 2022 मध्ये Pidilite च्या शेअरची किंमत आहे 2800 रुपये आहे. म्हणजे त्या शेअर्सची सध्याची किंमत साधारणपणे 45 लाख इतकी आहे. जेमतेम 2000 रुपयांची गुंतवणूक आणि आज त्याचे 45 लाख झाले आहेत.
ही कथा इथेच थांबत नाही. दरम्यानच्या काळात Pidilite ने लाभांश सुद्धा जाहीर केला आहे ज्याचा फायदा आपण या गणितात अजून गृहीत धरला नाही. आत्तापर्यंत मिळालेला लाभांश हा मूळ गुंतवणूक रकमेपेक्षा अधिक आहे. अजून एक फायदा म्हणजे Pidilite च्या शेअरहोल्डर्सना Vinyl Chemical चे शेअर्ससुद्धा मिळाले होते. तसे शेअर्स महादेव कुटरेकर यांनाही मिळाले आहेत.

एकंदरीत शेअर बाजारातील गुंतवणूक महादेव कुटरेकर यांच्यासाठी खूप लाभदायी ठरली. यावरून हेच स्पष्ट होईल की शेअर बाजार हा श्रीमंतीचा राजमार्ग आहे. अर्थातच, याच्या विपरीतही अनेक उदाहरणे सापडतील. ज्यावेळी श्री महादेव कुटरेकर यांना शेअर्स मिळाले त्यावेळी त्यांच्यासोबत काम करणार्‍या अनेकांना कमी-अधिक प्रमाणात शेअर्स मिळालेच होते. पण त्यातील बहुतांश गुंतवणूकदारांनी ते शेअर्स अल्पावधीतच विकून टाकले. अल्प नफ्याचा विचार केल्याने एकप्रकारे त्यांचं नुकसान झालं. महादेव कुटरेकर यांनी इतकी वर्ष ते जपून ठेवले हे शिकण्यासारखं आहे. गुंतवणूक ही आज-उद्याचा विचार करून नाही तर लांबचा विचार करून करावी हेच पुन्हा एकदा अधोरेखित होतं.

यातून हेच सांगता येईल की शेअर बाजारात मराठी माणूस गुंतवणूक करत नाही आणि इथे फक्त नुकसानच होतं असं म्हणणं ही अंधश्रद्धा आहे. आपल्याला चांगला व्यवसाय करणार्‍या, चांगला बिझनेस असणार्‍या, चांगली मॅनेजमेंट असणार्‍या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे आणि दीर्घकाळ ते शेअर्स आपल्याला जपायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण आपली प्रॉपर्टी जपतो तोच विचार इथेही करायचा आहे. अल्पावधीत श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणे गैर नाही पण आपली गरज ओळखून गुंतवणुकीचं उत्तम क्षेत्र म्हणून आपल्याला याकडे बघायचं आहे. तर आणि तरच या क्षेत्रात मराठी माणूस पुढे जाईल आणि जास्तीत जास्त नफा मिळवेल!

( लेखक शेअर ब्रोकर व शेअर बाजार अभ्यासक आहेत)

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : 'लाडकी'ला खात्री म्हणून मदतीला कात्री, शेतकऱ्यांची मदत रखडलीSpecial Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nitin Gadkari Speech Amravati | तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी चालेल- गडकरीAditya Thackeray Cricket | राजकारणानंतर क्रिकेटच्या मैदानावर आदित्य ठाकरेंची षटकारबाजी ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
Embed widget