एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

चवदार खाण्याला स्थळ काळाची मर्यादा नसते, जिभेची तृप्ती करणारा चवदार चटकदार पदार्थ कुठेही कधीही मिळू शकतो, अगदी पंचतारांकित हॉटेलच्या हायएण्ड रेस्टॉरन्टपासून तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीपर्यंत कुठेही.. खरं तर कुठलाही अभिनिवेश, डेकोरेशन, प्लेटिंग असा फापटपसारा नसतानाही अगदी कागदावर मिळणारे पदार्थ खाऊन तृप्त व्हावं ते रस्त्याच्या कडेच्या पदार्थांचा आस्वाद घेऊनच.  तोंडाला चव आणणारे सगळे गाडीवरचे चमचमीत पदार्थ एकाच रस्त्यावर किंवा गल्लीत मिळाले तर आणखी काय हवं खवय्यांना, त्यांच्यासाठी ती गल्ली म्हणजे खाऊगिरीचा स्वर्गच.. अशा खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या खाऊगल्ल्या हे मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांमधलं एक ठळक वैशिष्टय. मुंबईला समुद्रकिनारा असल्याने चौपाटी आणि तिथल्या खास चौपाटी स्पेशल पदार्थांचा ऑप्शन असतांनाही मुंबईतल्या खाऊ गल्ल्यांनी मुंबईकरांमध्ये जबरदस्त लोकप्रियता मिळवलीय.. फोर्ट, झवेरी बाजारपासून मुंबईच्या जवळपास सगळ्या भागात अशा छोट्या मोठ्या खाऊगल्ल्या तिथल्या स्थानिकांची चमचचमीत पदार्थांची भूक भागवत असतात, पण त्यातही काही खाऊगल्ल्यांमधल्या चवी चाखण्यासाठी दूरदूरच्या भागातून लोक येतात, त्याचं कारण काही खाऊगल्ल्यांमध्ये मिळणारे युनिक पदार्थ आणि इतर कुठेही मिळणार नाहीत अशा भन्नाट चवी.. सध्या तर सर्वाधिक चर्चा असते ती  घाटकोपरच्या ऑल व्हेज खाऊगल्लीची. घाटकोपर स्टेशनच्या अगदी जवळ पूर्वेला सिंधुवाडी नावाचा मोठा भाग आहे, खरं तर हा सगळा परिसरच खाऊगल्ली म्हणावा असा आहे, कारण जिकडे बघावं तिकडे छोटी छोटी रेस्टॉरन्टस, रस्त्याच्या क़डेला स्टॉल्सची रेलचेल नुसती, पण त्यातही एखाद्या नवख्यानी विचारल्यावर पटकन कुणीही सांगतं सध्या घाटकोपरमधल्या सगळ्यात फेमस जागेचा, म्हणजेच खाऊगल्लीचा पत्ता... अर्थात त्या गल्लीजवळ पोहोचल्यावर मग पत्ता विचारायची गरजच पडत नाही कारण एखाद्या जत्रेत असावी तशी गर्दी आपल्याला दुरुनच दिसते, त्या गर्दीतून जागा करत करतच आपल्याला आपल्या आवडत्या पदार्थाच्या स्टॉलपर्यंत पोहोचावं लागतं, एवढी इथल्या पदार्थांची लोकप्रियता आहे. जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ इतके विविध पदार्थ या गल्लीत मिळतात पण खरी गर्दी असते ती अख्ख्या मुंबईत प्रसिद्ध असलेल्या इथल्या डोसेवाल्याकडे, त्याला डोसेवाला म्हणावं की डोसेवाले असा खर तर प्रश्न आहे कारण एक नाही दोन नाही दहा तवे पाच पाचच्या दोन रांगांमध्ये लावलेले असतात आणि त्या दहा तव्यांवर दहा माणसं अखंड कुठल्या ना कुठल्या प्रकारचा डोसा करत असतात.. आणि त्यांच्या इतकीच इतर माणसं दुसरी कामं करत असतात कुणी चटणी वाट्यांमध्ये भरत असतं, कुणी तयार डोसा प्लेटमध्ये ठेवत असतं, कुणी फक्त ऑर्डर घेत असतं. तर कुणी फक्त रस्त्यावर अनिर्बंध होणारी गर्दी आवरत असतं.. प्रचंड डिमांड असणारं उघड्यावरचं रेस्टॉरन्टच आहे ते, त्याला गाडी म्हणायची तर हिम्मतच होत नाही, बरं तिथे डोशांचे प्रकारही थोडेथोडके नाहीत, ७०-८० प्रकारच्या डोशांची नावं पाहिली की नक्की कोणता डोसा खायचा असा प्रश्नच पडतो थोडावेळ.. जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ साधा डोसा, मसाला डोसापासून थेट पावभाजी डोसा, नुडल्स डोसा, मंचुरियन डोसा, शेजवान डोसा, अगदी पास्ता डोसासुद्धा इथे खाता येऊ शकतो. हे हटके ड़ोसे खाण्याची पद्धतही वेगळीच असते, आपण जर मंचुरियन डोसा ऑर्डर केला, तर डोसेवाला थेट डोशावरच मंचुरियन शिजवतो, पण एरव्ही जशी डोशाच्या आता भाजी भरली जाते, तसं मंचुरियन डोशात काही भरलं जात नाही, उलट डोशावर शिजलेलं मंचुरियन एका छोट्या डिशमध्ये काढलं जातं आणि चटणीच्या जोडीला डोशाबरोबर दिलं जातं, हाच प्रकार पाव भाजी डोसा, म्हैसूर मसाला, पास्ता डोसा यांच्या बाबतीतही. अशा डोशांची ऑर्डर दिल्यावर त्या चवीचा डोसा तर मिळतोच पण त्याबरोबर आपल्या आवडता नुडल्स, पास्त्यासारखा पदार्थही खाता येतो, खादाडीचा एकदम टू इन वन अनुभव.. जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ या सगळ्या डोशांमध्ये सगळ्या युनिक आणि लोकप्रिय डोसा आहे तो जिनी डोसा.. नावंच किती वेगळंय, तितकीच हा ड़ोसा बनवण्याची पद्धत आणि चव दोन्हीही हटके.. तव्यावर डोसा टाकल्यावर एखादा पिझ्झा सजवावा तसा हा डोसा सजवला जातो, आधी पिझ्झा सॉस, त्यावर डोशावरच मॅश केलेल्या भाज्या, त्यावर चिज अशी ती सजावट. खालून डोसा कडक झाला आणि वरचं चिज वितळाय़ला लागलं की हातातल्या सराट्यानी तो पिझ्झा उभा कापला जातो आणि त्याचे रोल करुन डिशमध्ये टॉवरसारखे उभे केले जातात, त्या उभ्या रोलमधून ओघळणारं चिज आणि पिझ्झाची चव असा हा अनोखा घाटकोपर स्पेशल जिनी डोसा म्हणजे त्या खाऊ गल्लीतला सर्वात फेवरेट पदार्थ. grill डोसेवाल्याच्या आजुबाजूला इतर अनेक पदार्थांची रांगच आहे, डब्लुटीसी पास्ता नावाच्या छोट्याशा स्टॉलवर गरमागरम पास्ता, व्हाईट सॉस, रेड सॉसमधल्या इथल्या पास्ताची चव कुठल्याही इटालियन रेस्टॉरन्टशी स्पर्धा करेल अशी, तितकाच भारी या पास्ताच्या शेजारीच असलेला ग्रिलचा स्टॉल,पनीर, आणि इतर भाज्या ग्रील करायला निखाऱ्यावर ठेवलेल्याच असतात आणि रोटीमध्ये गुंडाळून किंवा थेट पनीर आणि भाज्यांचे ग्रील केलेले तुकडे हिरव्या चटणीबरोबर खाता येतात ते ही अगदी रास्त दरात.. (कारण अशा बार्बैक्यू ग्रीलसाठी इतर ठिकाणी चांगलाच खिसा रिकामा करावा लागतो.) panipuri या पदार्थांची चव चाखत असतांनाच या खाऊगल्लीत प्रचंड व्हरायटी मिळते ती आपल्या लाडक्या पाणीपुरीची. हायजिन, स्वच्छता याच्या विचारामुळे आपल्याला पाणीपुरी आवडत असतानाही टाळली जात असेल तर अशा लोकांसाठी एका चाटच्या स्टॉलवर थेट मिनरल वॉटरची पाणीपुरी विकत मिळते..डोसेवाल्याच्या शेजारचा पाणीपुरीवाला तर त्या भागात सर्वात प्रसिद्ध आहे, कायम त्याच्याभोवती ३० -४० लोकांची गर्दी असतेच. या गल्लीत एका ठिकाणी जैन लोकांसाठी खास जैन पाणीपुरीही मिळते. जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ पण सगळ्यात जोरदार आणि वेगळी पाणीपुरी मिळते ती थेट गल्लीच्या तोंडाशी, एका छोटयाशा टेबलवर स्वच्छ काचेच्या गोल बरणीत ठेवलेल्या पुऱ्या आणि त्याच्याशेजारी सात उभी स्टीलची भांडी ठेवलेली असा हा स्टॉल आणि त्याला गुंडाळलेली पाटी लगेच लक्ष वेधून घेते. त्यावर लिहीलेलं आहे, स्पेशल मल्टीग्रेन पुऱ्या आणि सात फ्लेवरची पाणीपुरी.. आता हे वाचून खरा पाणीपुरीचा चाहता त्या सात प्रकारच्या पाण्याची चव चाखणार नाही असं कसं होईल, विविध पिठं वापरुन केलेल्या कुरकुरीत अशा प्रत्येक पुरीत वेगळं पाणी टाकून तो पाणीपुरीवाला आपल्याला एकेक पुरी देतो.. पुदीना, हाजमा हाजम, खजूर इमली, कोथिंबिर लिंबू, रेड चिली, लसूण आणि चाट मसाला अशा सात चवी एक प्लेट पाणीपुरीत, आहे की नाही पाणीपुरीचा भन्नाट प्रकार.. itembomb असाच एक वेगळा इतर कुठेही मिळणार नाही असा पदार्थ म्हणजे अँटमबॉम्ब.. नाव ऐकूनच दचकायला होतं, पण खाताना खरंच तोंडात स्फोट होतात तेव्हा त्याचं नाव अगदी सार्थ वाटतं.. गल्लीच्या अगदी मधोमध इथला प्रसिद्ध भेळवाला आहे त्याच्याकडे हा अँटमबॉम्ब मिळतो,हा अँटमबॉम्ब हातात आल्यावर प्रथमदर्शनी शेवपुरी वाटते, पण नीट पाहिल्यावर कळतं की छोटे छोटे बटाटे ग्रील करुन त्याचा मधला भाग कोरुन त्या बटाट्याला पुरीसारखं खोलगट करुन मग त्यात चटण्या, दाणे, दाबेलीसारखा मसाला असं सगळं भरुन वर कांदा आणि शेवेची मनसोक्त पेरणी असा हा बटाटा आणि चटकदार चवींचा अँटमबॉम्ब घाटकोपरच्या खाऊगल्लीतला मस्ट इट पदार्थ आहे.. या भेळवाल्याकडे भेळेचेही असे काही विविध प्रकार मिळतात की त्यातले एक दोन तरी प्रकार चाखायलाच हवेत. जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ कचोरी भेल हा असाच एक भेळेचा प्रकार, यात छोट्या कचोऱ्या कुस्करुन टाकलेल्या असतात आणि एक व्हेज भेळ नावाची भेळ म्हणजे डाएट कॉन्शस लोकांसाठी उत्तम पर्याय, या भेळेत फ्लॉवर,काकडी अशा भाज्याच असतात कुरमुरे फरसाणाच्या जागी. पंजाबी भेळ,चिज भेळ अशा वेगळ्या भेळेची टेस्ट घ्यायची ती याच खाऊगल्लीत. icecream भेळवाल्याच्या शेजारी रोलरकोस्टर आईस्क्रीमचं छोटसं दुकान आहे, एक मोठ्या गोलाकार सिलेंडरमध्ये बर्फ भरला जातो. ते बर्फ भरलेलं सिलेंडर एका लोखंडी बारवर चढवलं जातं आणि त्याच्या कोपऱ्याला असलेल्या हॅण्डलनी एकजण ते सिलेंडर फिरवू लागतो, दुसरी व्यक्ती त्या सिलेंडरवर दुध आणि हव्या त्या आईसक्रीमच्या फ्लेवरचं सिरप टाकते, फिरवण्याच्या जोर वाढला की वरचं दूध आणि सिरप गोठून त्याचं आईस्क्रीम व्हायला लागतं, मग टोकदार चमच्यानी ते वाटीत काढलं जातं, वाटीत आल्यावर अगदी किसलेल्या खोबऱ्यासारखं दिसतं ते आणि चवीलाही एकदम बेस्ट.. franky या खाऊगल्लीत पाव भाजी, इडल्या, वडे, मिसळ, ज्युस, मिल्कशेक, फ्रँकी, गार्लिक ब्रेड, पिझ्झा याच्याबरोबरच इथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सॅण्डविच स्टॉल्स, ग्रील्ड सॅण्डविच किंवा मसाला सॅण्डविचच्या स्टॉललाही चांगलीच गर्दी असते, या सगळ्या प्रकारांइतकाच लोकप्रिय आहे गल्लीच्या अगदी दुसऱ्या टोकाला असलेला खिचिया पापडवाला, सगळ्या वयोगटातले खवय्ये हा पापड खायला आलेले दिसतात, या पापडवाल्याकडे मिळणारा चिज खिचिया पापड तर बच्चेकंपनीचा सगळ्यात फेवरेट.. या चटपटीत गल्लीत शिरल्यावर दुसऱ्या टोकाच्या शेवटच्या खाऊस्टॉपला पोहोचायला चांगला दोन तीन तासांचा वेळ लागतो आणि गल्लीची सफर संपेपर्यंत तिथल्या अजब गजब पदार्थांनी पोट अगदी तृप्त झालेलं असतं, चविष्ट पदार्थ चाखण्यासाठी गल्लीत गर्दीतून वाट काढत उभ्याने खाण्याची तयारी असेल तर ही गल्ली बेस्टच, अर्थात शाकाहारी गुजराती बहुल भाग असल्यानं ही खाऊ गल्ली पूर्णपणे शाकाहारी आहे, पण खरं तर खाऊ गल्लीत मिळणारे पदार्थ प्रामुख्यानं शाकाहारीच असल्याने मांसाहार आवडीने खाणाऱ्यांनीही या खाऊगल्लीत खाद्यभ्रमंती करायला हरकत नाही.. ‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget