एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे

आजच्या तरुणाईचं सगळं काही इतरांपेक्षा जरा वेगळंच असतं. त्यांच्या गप्पांचे विषय वेगळे, त्यांच्या आनंद साजरा करण्याच्या कल्पना वेगळ्या, त्यांच्या फिरायला जाण्याच्या जागा वेगळ्या आणि अर्थातच त्यांच्या चवीही वेगळ्या..त्याबरोबरच कुटुंबासोबत न जाता केवळ मित्रमैत्रिणींबरोबर हॅंगआऊट करण्याच्या जागाही वेगळ्या..या तरुणाईच्या जागांच्या चॉईसमध्ये सगळ्यात वरचा नंबर लागतो तो म्हणजे तासनतास गप्पा मारत बसता येईल अशा जागेचा... अशाच जागांपैकी एक 'डी क्रेप्स' कॅफे

आजच्या तरुणाईचं सगळं काही इतरांपेक्षा जरा वेगळंच असतं. त्यांच्या गप्पांचे विषय वेगळे, त्यांच्या आनंद साजरा करण्याच्या कल्पना वेगळ्या, त्यांच्या फिरायला जाण्याच्या जागा वेगळ्या आणि अर्थातच त्यांच्या चवीही वेगळ्या..त्याबरोबरच कुटुंबासोबत न जाता केवळ मित्रमैत्रिणींबरोबर हॅंगआऊट करण्याच्या जागाही वेगळ्या..या तरुणाईच्या जागांच्या चॉईसमध्ये सगळ्यात वरचा नंबर लागतो तो म्हणजे तासनतास गप्पा मारत बसता येईल अशा जागेचा..अर्थात चविष्ट गप्पांबरोबर चविष्ट खाद्यपदार्थ आणि गारेगार किंवा गरमागरम पेय हीसुद्धा या कॉलेजवयीन क्राऊडची आणखी एक डिमांड. जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे तरुणाईची ही आकर्षणं लक्षात घेऊनच गेल्या काही वर्षात ‘कॅफे संस्कृती’ आधी मोठ्या आणि त्यानंतर हळूहळू लहान शहरांमध्येही चांगलीच लोकप्रिय झाली.. या कॅफेंमध्ये सगळ्यात आकर्षक असते ती तिथली आसनव्यवस्था..इतर रेस्टॉरन्टसारख्या टेबलखुर्चीऐवजी मस्त आरामदायक सोफे, आरामशीर खुर्च्या अशी काहीशी निवांत करणारी बैठक आणि त्यासोबत चहा, कॉफी, कोल्डकॉफी, स्मुदीज, मिल्कशेक्स, ज्युस आणि मॉकटेल्स हा या कॅफेजचा सर्वात महत्त्वाचा मेन्यू.. Cold Coffee-compressed सीसीडी, बरिस्ता, मोका कॅफे असे कॅफेचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स म्हणूनच तर इथे भारतात अल्पावधीतच लोकप्रिय झाले, पण या ब्रॅण्डेड कॅफेजमध्ये भूक भागवण्यासाठी मात्र फार काही मिळत नाही हे लक्षात आल्यावर मग भारतीय कॅफे कल्चर नव्याने निर्माण झालं...या कॅफेमध्ये कॉफी ते मॉकटेल्स या सगळ्या पेयांबरोबर मेन्यू कार्डात दिसू लागले युवागर्दीला आवडणाऱे सगळे पदार्थ..अगदी मल्टीक्युझिन रेस्टॉरन्टच्या मेन्यूकार्डाला लाजवतील असे मोठाले मेन्यूकार्ड असतात आजकाल कॅफेचे..पण इथेसुद्धा जबरदस्त स्पर्धा वाढलीय..अगदी गल्लोगल्ली कॅफेच्या पाट्या दिसू लागल्या आणि म्हणूनच आणखी पुढे जाऊन ‘स्पेशालिटी कॅफे’चा सध्या जमाना आलाय..या स्पेशालिटी कॅफमध्ये इतर कॅफेची सगळी वैशिष्ट्य असतातच पण त्याबरोबर एखाद्या खास पदार्थासाठी तो कॅफे प्रसिद्ध असतो.. इतर पदार्थांसोबत एखाद्या कॅफेत खूप वैशिष्ट्यपूर्ण बर्गर्स मिळतात, तर दुसऱा कॅफे पास्तासाठी फेमस असतो..स्पेशालिटी कॅफे म्हणता येईल अशी पूर्व उपनगरात सध्या एका कॅफेची चेन निघालीय ‘डी क्रेप्स’ नावाची, ठाण्यात हिरानंदानी आणि वसंत विहारला दोन ब्रॅंचेस आणि मुलुंडला एक अशा तीन ठिकाणी ‘डी क्रेप्स’ कॅफे आहे..तीनही ठिकाणं दिवसाच्या सर्वच वेळांना तरुणांची जबरदस्त गर्दी खेचतात, पण संध्याकाळी मात्र ‘डी क्रेप्स’ अगदी फुल असतं.. Interior-compressed ‘डी क्रेप्स’ या नावावरुन काहींच्या लक्षात आलंच असेल की खास क्रेप्स नावाच्या पदार्थासाठी प्रसिद्ध असलेला हा कॅफे आहे..चायनिज, कॉन्टिनेन्टल आणि आता मेक्सिकन खाद्य संस्कृतीला आपण भारतीय खवय्ये एव्हाना चांगलेच रुळलोय, पण त्या मानाने खास युरोपियन ते ही फ्रान्स, ग्रीससारख्या देशातली खाद्यसंस्कृती अजून आपल्याला तितकीशी परिचित झालेली नाही..निदान गल्लोगल्ली तरी फ्रेन्च किंवा ग्रीक रेस्टॉरन्टस दिसत नाहीत चायनिजसारखी..क्रेप्स हा नेमका फ्रेन्च पदार्थ..पाहिल्याबरोबर पातळ डोसा किंवा धिरड्याचा भास होतो..याची कृतीही अगदी धिरड्यासारखीच. Crapes-compressed गव्हाचं किंवा बकव्हिटचं (ज्याला हिंदीत कुट्टू म्हणतात) पीठ पातळसर भिजवून फ्राईंगपॅनवर त्याचे पातळ डोसे किंवा धिरडे घातले जातात, या डोशांना किंवा धिरड्यांनाच क्रेप्स म्हणतात...फ्रेंच लोकांचा हा सर्वात आवडता ब्रेकफास्ट, आगदी फ्रान्सची राष्ट्रीय डिश असंही संबोधलं जातं क्रेप्सना. एकतर अतिशय पौष्टिक पिठांपासून हे क्रेप्स तयार केले जातात आणि चवीप्रमाणे गोड किंवा खारे म्हणजे सेव्हरी अशा दोन पारंपरिक पद्धतींनी हे तयार केले जातात. तयार झालेल्या क्रेप्समध्ये गोड असतील तर फळं, फ्लेक्स आणि क्रेप्स गोड नसतील खारे असतील तर त्यामध्ये विविध भाज्यांपासून चिकन, मटण, फिश आणि अंड्यापर्यत काहीही स्टफ करुन चवदार आणि तितकाच पैष्टिक असा स्टफ्ड क्रेप तयार केला जातो. वरुन आणखी चव आणायला गोडावर मध किंवा चॉकलेट सिरपसारखे सॉस असतात तर गोड नसलेल्या क्रेपवर चिज, तिखट सॉस किंवा ग्रेवीचं ऑप्शन असतं. जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे स्टफिंग डोशासारखं भरलं असलं तरीपण डोशापेक्षा वेगवेगळ्या प्रकाराने या क्रेप्सच्या घड्या घातल्या जातात, त्या घड्याही देशाप्रमाणे बदलतात म्हणजे युरोपात.. तर असे हे पारंपरिक पद्धतीचे क्रेप्स सर्व्ह कऱणारी ही डी क्रेप्स नावाची जागा.. हॅंगआऊट करणारा प्रत्येक ग्रुप आपल्या आवडीनुसार एक तरी क्रेप्सची डीश मागवतोच..अर्थात हे क्रेप्स तर मेन कोर्स झाला पण त्याआधी कितीतरी चवदार स्टार्टर्स ही डी क्रेप्सची मोठी खासियत आहे.. Apple Pi-compressed एकाच पदार्थाचे तीन चार अवतार डी क्रेप्समध्ये बघायला मिळतात.. म्हणजे अगदी सगळे नेहमी खातात तो गार्लिक ब्रेड घ्यायला गेलं तर साधा गार्लिक ब्रेड, चिज गार्लिक ब्रेड, टोमॅटो ऑलिव्ह पेस्तो गार्लिक ब्रेड असे तीन चार पर्याय असतात आपल्यापुढे..बर्गर सिलेक्ट करायचा झाला तर बर्गरच्या पावाचेही साधा बर्गर बन आणि बॅगेल बर्गर असे दोन प्रकार पुढे येतात..म्हणजे आधी बर्गरचा ब्रेड ठरवायचा आणि त्यानंतर बर्गरचा प्रकार..पदार्थातली इतकी विविधता तरुणाईला ‘डीक्रेप्स’कडे आकर्षित करते..डी क्रेप्सचा पास्तासुद्धा जबरदस्त आणि फेमस – इथल्या मेन्यूकार्डमध्ये मेक युवर ओन पास्ता असं ऑप्शन असल्याने तर आपल्याला हवा तसा पास्ता तयार करवून तो खाणं अनेक खवय्ये पसंत करतात.. Cake Cops-compressed याशिवाय सॅण्डविचेसचे कितीतरी प्रकार, पिझ्झाचे व्हेज नॉनव्हेज प्रकार, लेबनिज हुम्मस पिटा ब्रेड, मेक्सिकन नॅचोज अशाप्रकारचा यंगस्टर्सच्या आवडीचा सगळा मेन्यू डी क्रेप्समध्ये मिळतो आणि सगळ्यांना तो आवडतोही..पण या पदार्थाबरोबर इथे गर्दी होते ती इथल्या डेझर्ट्ससाठी ‘ऑस्ट्रीयन मड पाय’ नावाची पेस्ट्री इथला खाल्लीच पाहीजे असा पदार्थ..चॉकलेट लव्हर्सने तर मिस करायलाच नको..तसंच लहान मुलांसाठी मिळणारा एक छानसा आणि छोटासा पदार्थ म्हणजे ‘केकपॉप’..लॉलीपॉपसारखा काडीला टोचलेला चॉकलेट केक आणि केकवरही चॉकलेटचं किंचित कडक आवरण असा हा केकपॉपही न चुकता खावा असाच हा पदार्थ. त्याशिवाय पारंपरिक युरोपियन टार्टस, पाय, पेस्ट्रीज यांचीही अगदी रेलचेल असते डी क्रेप्समध्ये.. इथलं इंटिरियरही अगदी फ्रेश, संपूर्ण पांढरा रंग असल्याने टवटवीतपणा..त्या पांढऱ्या रंगाच्या एका भिंतीवर एक उघडं बुकशेल्फ आणि त्या बुकशेल्फवर बेस्टसेलर इंग्लिश पुस्तकं आणि काही न्युजपेपर्स, कुठलंही पुस्तक उचलून वाचत बसलं तरी कुणी घड्याळाकडे बघणार नाही किंवा उठवणारही नाही.. जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे बरं प्रत्येक टेबलवर कटाक्षाने ठेवलेली सॅनिटायझरची बाटली आणि स्वच्छ कटलरी पाहून हा कॅफे आणखीच आवडतो..मायनस पॉईंट एकच कुठलाही पदार्थ मागवला की तो लगेच येत नाही..खूप खूप वेळ वाट बघितल्यानंतर आपण दिलेली ऑर्डर आपल्यासमोर येते. अर्थात यंगस्टर्सची हॅंगआऊट प्लेस असल्याने कदाचित ही सवय लागली असेल, कारण मुलांच्या गप्पा रंगल्यावर डिश लगेच आली की नाही याचं भान थोडीच असतं..तेव्हा क्रेप्स नावाचा युरोपियन पदार्थ चाखण्यासाठी आणि यंग ग्रुप्ससाठी तर जायलाच पाहीजे अशी ही जागा आहे असं म्हणायला हरकत नाही... 'जिभेचे चोचले'मधील याआधीचे ब्लॉग : जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई  जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tarakka : घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tarakka : घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
घनदाट जंगलात कसं फुललं तारक्काचं प्रेम? आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षली पतीला साद
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
High Court Names : शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
Embed widget