जिभेचे चोचले : अजब गजब ‘सोशल्स’
नेहमीच्या रेस्टॉरन्टच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न ही सोशल्स करतात, त्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारची सजावट, मेन्यूतही अतिशय वेगळे बदल करुन तरुणाईच्या ग्रुप्सना हवं तसं वातावरण इथे निर्माण केलं जातं..तसंच अतिशय आरामशीर आसनव्यवस्था आणि सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या देशीविदेशी पदार्थांवर केलेल नवनविन प्रयोग यामुळे तर हा सोशल्सच्या प्रयोगाला युवावर्गानी अगदी डोक्यावर घेतलंय..

मुंबईत तर थेट दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगरात गोरेगावपर्यंत, तर पूर्व उपनगरात विक्रोळीपर्यंत विविध ठिकाणी ९ ते १० सोशल्स आहेत.. बरं या सोशल नावाच्या रेस्टॉरन्टच्या पुढे ‘रेस्टॉरन्ट’ हा शब्दही वापरायचा नसतो, केवळ चला सोशलला जाऊ, असं म्हणण्याची पद्धत आहे, त्यानंतर मग दुसरा प्रश्न असतो कुठल्या सोशलला.. हा प्रश्न मुंबईत विचारला गेला असेल तर आपण ज्या भागात राहतो किंवा ज्या भागात कामाला जातो त्यानुसार पर्यांय आता मुंबईत उपलब्ध आहेत, म्हणजे कुलाबा सोशल, खार सोशल, तोडी मिल सोशल पॅलेडीयम सोशलपासून ते थेट गोरेगाव सोशल, फन रिपब्लिक सोशल, विक्रोळी सोशलपर्यंत वेगवगेळ्या भागातल्या सोशल्सचे पर्याय युवावर्गासाठी मुंबईत उपलब्ध आहेत..
या सोशल्समधे सगळं काही वेगळंच असतं.. सगळ्यात वेगळं असतं ते प्रत्येक सोशलचं इंटिरियर..रॉ लुकचं इंटिरियर असं त्याचं वर्ण तरुणाईकडून केलं जातं..म्हणजे..आत गेल्यावर कुठल्याही भिंतीला तुम्हाला चांगला चकचकीत रंग लागलेला दिसणार नाही..उलट अगदी प्लॅस्टरिंगही न केलेल्या विटांच्या भिंती दिसतील.. टेबलं पण अगदी साधे, एखाद्या ढाब्यावर ठेवलेली टेबलं वाटावी अशी..त्यावर काचेचे ग्लासही थेट कंटीग चहाला जे ग्लास वापरले जातात अगदी तेच ग्लास इथे ठेवलेले दिसतात.. कुठे रंगसंगती साधण्यासाठी लोखंडी जाळ्याच दिसतात, तर कुठे भली मोठी अगदी जुनाट अशी लाकडी खिडकी, डेकोरेशन म्हणून जुन्या पद्धतीच्या टिनाच्या फोल्डींग खुर्च्यासुद्धा इथे भिंतीवर लटकवून ठेवलेल्या दिसतात ..एका कोपऱ्यातल्या टेबल आणि सोफ्यासमोर तर थेट पाळणाच टांगलेला दिसतो आणि तो नुसता शोभेचा नाही तर ग्रुपमधल्या एकाला बसण्यासाठी टांगलेला आहे.
रेस्टोबार असल्यानं ड्रिंक्स हा महत्त्वाचा भाग आहे मेन्यूतला, पण ते ड्रिंक्स सर्व्ह करण्याची पद्धत तर सर्वात भन्नाट, एकेठिकाणी तर ड्रिंक्सच्या बाटल्या छतावरच लटकवलेल्या दिसतात..आपण मागवलेलं ड्रिंक चित्रविचित्र रव्हिंग ग्लासेस आणि बाटल्यांमधून आपल्यापर्यंत येतंच पण # टॅगच्या जोडीनं हिंदीत लिहीलेली नावं तर अतिशय रंजक असतात..म्हणजे तुम्ही मागवलेलं हार्डड्रिंक असेल तर त्या ग्लासावर #पौवा असं देवनागरीत लिहीलेलं असतं..मॉकटेल वगैरे असेल तर #ठंडा असं लिहीलेल्या ग्लासात किंवा थेट बाटलीतच ते ड्रिंक सर्व्ह केलं जातं...खाद्यपदार्थ सर्व्ह करण्याचाही पद्धत अशीच वेगळी, पारंपरिक रेस्टॉरेन्टच्या बाऊल आणि प्लेट्सना पूर्णपणे फाटा देणारी.. इथे पदार्थ सर्व्ह केले जातात एकतर थेट भल्यामोठ्या लाकडी ट्रेमध्ये किंवा आपल्या घरी जरी स्टीलचे मोठे वाडगे असतात तशा वाडग्यात किंवा थेट कागदात..एकतर रेस्टोबार असल्यानं इथल्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूकार्डात फिंगर फुड प्रकारात मोडणाऱ्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश केलेला दिसतो..
फ्रेंच फ्राईस, टॉस केलेल्या भाज्या किंवा टस केलेलं चिकन हे तर थेट कागदाच्या पुंगळीत सर्व्ह केले जातात.. आपण रस्त्यावर सुखी भेळ ज्या पद्धतीनं कागदाच्या पुंगळीतून खातो तसंच इथे कितीतरी पदार्थ खास सोशल्स स्टाईलने कागदात भरुन आपल्यापुढे येतात..इथे काही वैशिष्ट्यपूर्ण थाळी किंवा मिल्स मिळतात जे तरुणांच्या ग्रुप्समध्ये प्रचंड फेमस आहेत.. त्यांची लेबनिज पदार्थांची थाळी किंवा त्याला मॉडर्न भाषेत प्लॅटर म्हणता येईल, ती तर थेट पितळेच्या ताट वाटीतून सर्व्ह केली जाते, पितळेच्या ताटात फलाफल आणि पिटा ब्रेडसारखे पदार्थ खाणं हासुद्धा वेगळा अनुभव आहे..
पण सगळ्यात गमतीदार पदार्थ आहे तो पावाच्या ऐवजी पिटा ब्रेडमध्ये घालून सर्व्ह केला जाणारा वडा पाव..तिथे पावच नसल्याने त्याला ‘पिटा बाव वडा’ असं म्हंटलं जातं.. इथे दिवसाच्या कुठल्याही वेळी खाता येतील असे ब्रेकफास्टचे विविध प्रकारही सगळ्या खवय्यांमध्ये चांगलेच लाडके आहेत..
पंजाबी ब्रेकफास्ट, ब्रिटीश ब्रेकफास्ट, अमेरिकन ब्रेकफास्ट असा त्या त्या पद्धतीच्या नाश्त्याचा अख्खा ट्रे येतो आपल्यासमोर आणि विशेष म्हणजे हा ब्रेकफास्ट दिवसाच्या कोणत्याही वेळी मिळतो..म्हणून त्याला ऑल डे ब्रेकफास्ट असं म्हंटलं जातं.. नेहमीच्या रेस्टॉरन्टच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न ही सोशल्स करतात, त्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारची सजावट, मेन्यूतही अतिशय वेगळे बदल करुन तरुणाईच्या ग्रुप्सना हवं तसं वातावरण इथे निर्माण केलं जातं..तसंच अतिशय आरामशीर आसनव्यवस्था आणि सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या देशीविदेशी पदार्थांवर केलेल नवनविन प्रयोग यामुळे तर हा सोशल्सच्या प्रयोगाला युवावर्गानी अगदी डोक्यावर घेतलंय.. दिवसभर भरपपूर काम करायचं आणि संध्याकाळी मात्र ‘एन्जॉय’ करायचं असा सध्याच्या यंग प्रोफेशनल्सचा दिनक्रम असतो. त्या लाईफस्टाईलला अगदी पूरक अशी ही सोशल्सची चेन आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही..
संबंधित ब्लॉग :
जिभेचे चोचले : जे डब्ल्यू कॅफे – आलिशान बुफे
जिभेचे चोचले : बडोदा – शेव उसळीचं शहर
जिभेचे चोचले - स्पँनिश च्युरोज जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश जिभेचे चोचले : चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’ जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो…
जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी ‘ग्रॅण्डमामाज् कॅफे’ जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे जिभेचे चोचले – सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी – ‘द जे’ जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

























