एक्स्प्लोर

विघ्नहर्ता....बिहाईन्ड द सीन्स....

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव नुकताच आपण साऱ्यांनी साजरा केला, यानिमित्ताने यावेळी फक्त उत्सव साजरा न करता आजूबाजूला वावरणारे विघ्नहर्ता शोधून त्यांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही एबीपी माझावर केला. आपण समाजात वावरताना असे अनेक घटक आजूबाजूला असतात, जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तुमच्याआमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान देत असतात, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन म्हणावं तसं काऊंट होत नाही, अशाच आपल्यातल्याच पण विघ्नांचं हरण करणाऱ्या, अडचणी दूर करणाऱ्यांबद्दल ही मालिका सादर केली आणि एक वेगळं आत्मिक समाधान मिळालं. हे 10 विघ्नहर्ता होते, पोलीस, फायर ब्रिगेड, हॉस्पिटलमधील नर्सेस, ड्रेनेज सफाई करणारे पालिका कर्मचारी, रस्ते सफाई करणारे पालिका कर्मचारी, बीईएसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर, रेल्वे गँगमन, मुंबईचे डबेवाले, पाणी सोडणारे पालिकेचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे समुद्रावर तैनात असणारे लाईफगार्डस.....प्रत्येक क्षेत्र निराळं.....प्रत्येकाची आव्हानं, कार्यशैली निराळी, यातली पोलीस, फायर ब्रिगेड आणि मुंबईचे डबेवाले ही तीन मंडळी आपल्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचलीयेत. त्यांचं कामही आपल्याला माहिती आहे. मात्र जे बाकीचे सात घटक आहेत, त्यांच्याबद्दल ही मालिका सादर करताना म्हणजे ती शूट करतानाच मला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. या प्रत्येकातला समान दुवा अर्थातच यातला प्रत्येक घटक समाजासाठी अतिशय महत्त्वाचा, अपरिहार्यच म्हणा ना...सगळ्यात आधी ड्रेनेज सफाई, रस्ते सफाई करणाऱ्यांबद्दल....ही मंडळी तुम्ही आम्ही केलेली दुर्गंधी स्वच्छ करण्यासाठी जीवाचं रान करतात, दूषित वायू असलेल्या ड्रेनेजमध्ये उतरतात, ओल्या,सुक्या कचऱ्याच्या ढिगाने भरलेल्या कचराकुंडीच्या बाजूला अविरत काम करतात.  मी जिकडे शूट केलं तिकडे तर आणखी धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, कचराकुंडी अर्धी रिकामी, या रिकाम्या कचरा कुंडीच्या बाजूला टाकलेला कचरा....गंभीर आणि तितकंच चीड आणणारं चित्र. ‘आम्ही सांगूनही कुणी ऐकत नाही, आम्ही सोसायट्यांना नोटीसा पाठवतो, लोक एकदा दंड भरतात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या...’ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली ही व्यथा लाज आणणारी आहे. आपण शाळेत असताना नागरिक शास्त्र, सामुदायिक जीवन हे विषय शिकलोय. ते फक्त पुस्तकातच राहिले का? असं वाटून गेलं. बरं इतकं सामाजिक भान पाळायला डबल ग्रॅज्युएट व्हायची गरज नाहीये, बेसिक शिक्षण घेऊनही ही गोष्ट कळायला आणि ती अंगी बाणायला हवी, तरीही आपल्यातलेच काही जण अशा प्रकारे रस्ते अस्वच्छ करतात, बसचं तिकीट प्रवास झाल्यावर बाहेर फेकतात, तोंडात माव्याचे तोबरे भरून थुकतात तेही रस्त्यावरच. हातावर उंची घड्याळं, परफ्युमचा घमघमाट, उंची ब्रँडेड कपडे घालून काही मंडळी हे बिनबोभाट करताना दिसतात, पालिकेच्या या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं वास्तव चीड आणणारं होतंच, त्यासोबत माणूस म्हणून मान खाली घालायला लावणारं. आपलं घर आपल्याला टापटीप लागतं, तिकडे लादी पुसायला दिवसातून दोनदा माणूस, टाईल्स इतक्या चकाचक हव्यात की, आपलं प्रतिबिंब दिसावं आणि तीच माणसं बाहेर आल्यावर अशी वागतात, काय हे दुर्दैव. याचसोबत या रस्ते सफाई करणाऱ्या मंडळींनी सांगितलं की, कुत्र्यांना फिरवायला येणाऱ्या मंडळींचाही आम्हाला खूप त्रास आहे, ही कुत्री रस्त्यातच त्यांचे नैसर्गिक विधी उरकतात, तेही आम्हीच साफ करतो. आता जिथे सर्वसामान्य माणसाला दोन वेळच्या जेवणासोबत अन्य खर्च भागवतानाच जीव मेटाकुटीला येतो, तिथे ही कुत्री पाळण्याची हौस कोण करत असेल हे वेगळं सांगायला नको.....या मंडळींनी खरोखरंच गांभीर्याने कुत्रे पर्यटनाच्या या आवडीचा विचार करावा….आणि आपल्या आवडीचा समाजाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.... ड्रेनेज सफाईच्यावेळी माणूस ड्रेनेजमध्ये उतरताना पाहिला, मन गलबलून आलं. तुमच्याआमच्यासारखा माणूस ड्रेनेजमध्ये उतरून मग भले त्याच्याकडे जॅकेट, मास्क अशी उपकरणं असतील तरीही त्या घाणीत उतरून ती साफ करत होता, तुमच्याआमच्यासाठी. आपल्यामध्ये भिनलेली अस्वच्छतेची, बेशिस्तीची घाण कोण साफ करणार, हा विचार मनात आला... का नाही लावून घेत आपण चांगली सवय. सुका कचरा, ओला कचरा निरनिराळा ठेवण्याची, आपण आपल्या परीने तसं करूया आणि मग पालिकेकडून अपेक्षा करुया या विघटनासाठी अधिक शिस्तबद्ध विल्हेवाट प्रक्रियेची. असाच थोडाफार अनुभव रेल्वे गँगमनचा. दोन्ही बाजूने रेल्वे जातायत, मध्ये ही मंडळी काम करतायत....जिकीरीचं आणि काहीसं जीवाची जोखीम असलेलं त्यांचं कामाचं लोकेशन.....त्यांच्या टीममधील एक सहकारी त्यांना इशारा करायला शिट्टी घेऊन असतो, तरीही...काम खूपच जोखमीचं....त्यातच या मंडळींनीही काही विदारक अनुभव सांगितले, रेल्वेतले प्रवासी आम्हाला लाथा मारतात, आमच्यावर काम करत असताना थुंकतात, टपल्या मारतात. एकेक वाक्य ऐकताना तळपायाची आग मस्तकात जात होती, कुठून येते ही मस्ती अंगात? कुठून येतो हा माज? पावसापाण्यात, उन्हातान्हात तीन-तीन किलोमीटर हातामध्ये लोखंडी सामान तेही साधारण 30-40 किलो वजनाचं घेऊन ही मंडळी येतात, त्यांचं काम करत असतात, त्यांना आपल्यातलेच काही अशी वागणूक देतात, शेमफुल बिहेवियर....खरंच....याशिवाय आणखी एक गोष्ट या गँगमननी सांगितली मला, ती म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची विष्ठाही बाजूला करून आम्हाला खडी साफ करत काम करावं लागतं....त्यांच्या जिद्दीची, कर्तव्यनिष्ठेची कमाल वाटली...... आपल्या पाणीपुरवठ्यासाठी राबणारेही पहाटे तीनसाडेतीन पासून कार्यरत, त्यांच्याकडेही असलेल्या लोखंडी चाव्या, 10,20 किलोच्या....शारीरिक आणि मानसिक सक्षमतेची कसोटी पाहणारं हे काम....यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत आपण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून करायला हवी. सार्वजनिक वाहतुकीचा मुंबईतील सर्वात सोपा पर्याय, अर्थातच बेस्टच्या बसेस, त्या ड्रायव्हर्सनीही सांगितलं, बाईकवाले खूप त्रास देतात गाडी चालवताना. मुंबईच्या गर्दीतून, चिंचोळ्या गल्ल्यांमधून गाडी चालवण्यासाठी राहुल द्रविडला आऊट साईड द ऑफ स्टंप चेंडू सोडायचं जितकं परफेक्ट जजमेंट होतं, तितकं परफेक्ट जजमेंट हवं, हॅट्स ऑफ टू बीईएसटी ड्रायव्हर्स. याच बसमधील कंडक्टरचं काम सतत उभं राहून तिकीट देत राहणं....त्यात प्रवाश्यांच्या नाना तऱ्हा....सुट्या पैशांसाठी कुणी वाद घालणार तर कुणी बस पुढेमागे थांबवली म्हणून.... यात प्रत्येक वेळी चूक प्रवाश्याचीच असेल असं नाही, तरीही या कंडक्टर्सचीही काम वाटतं तितकं सोपं अजिबात नाही. आता मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल.....मॅनेजमेंट गुरु म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या मुंबईच्या डबेवाल्यांशीही यानिमित्ताने संवाद साधला. त्या त्या घरातला डबा, त्या त्या घरातल्याच व्यक्तीला जातो, न चुकता आणि वेळेत. या मंडळींकडून आपण खरंच टाईम मॅनेजमेंट आणि अन्य ठिकाणीही गोष्टी सुनियोजित कशा कराव्यात हे शिकायला हवं. हॉस्पिटलच्या नर्सेसनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो, त्यांच्याशी बोलताना पेशंट्सच्या नातवाईकांनी त्यांना कसं सहकार्य करायला हवं हे त्यांनी सांगितलं, एखादा आजार लवकर बरा होण्यासाठी औषधांसोबतच पॉझिटिव्ह, प्लेझंट शब्दांच्या टॉनिकचीही गरज असते, ते टॉनिक ही मंडळी देतात, शिफ्ट ड्युटीजचा ताण, त्यात वॉर्ड हेवी असेल म्हणजे पेशंट्सची संख्या जास्त असेल किंवा काही इमरजन्सी असेल तर असणारा शारीरिक आणि मानसिक ताण आणखी निराळा. इतकं करुन घरची आघाडीही समर्थपणे सांभाळणाऱ्या या नर्सेसनाही मनापासून सलाम. जाता जाता लास्ट बट नॉट द लिस्ट. पोलीस, फायर ब्रिगेड, लाईफगार्ड्स. हे तिघेही तुमचे आमचे रक्षणकर्ते....इमारत दुर्घटना, आगीची घटना, अगदी मुंबईवरच्या हल्ल्याची घटना असो, त्याला नीडरपणे सामोरे जाणारे....फायर ब्रिगेडचे जवान. आगीशी दोन हात करण्याची आग त्यांच्या मनात सतत प्रज्ज्वलित असते, त्यातून मार्ग काढून अनेकांचे जीव वाचवणारे....यांचं योगदान प्राईजलेस आहे....तीच गोष्ट पोलिसांची, टीम इंडिया जेव्हा टी-ट्वेन्टीचा वर्ल्डकप जिंकली होती, त्या वर्षी म्हणजे 2007 मधली ही गोष्ट. अनंतचतुदर्शीच्या दुसऱ्याच दिवशी या टीमची जंगी मिरवणूक मरिन ड्राईव्हवरून वानखेडे स्टेडियमपर्यंत निघणार होती आणि पुढे होता सत्कार सोहळा. अनंतचतुर्दशीच्या बंदोबस्ताला तैनात असलेले हे पोलीस आणि पुढे टीमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेलेही हेच पोलीस. हॅट्स ऑफ टू देअर स्टॅमिना अँड डेडिकेशन. लाईफगार्ड्सचं कामही तितकंच थरारक. आम्ही जुहू चौपाटीवर याचं शूट केलं, तेव्हा तो अनुभव मी घेतला. सोसाट्याचा वारा, पावसानेही एन्ट्री घेतलेली, समोर उधाणलेला समुद्र. मोठी भरती नव्हती, तरीही लाटा खळाळत किनाऱ्याकडे झेपावत होत्या, शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरतेची कसोटी पाहणाऱ्या सिच्युएशनमध्ये ही मंडळी काम करत असतात. समुद्राच्या लाटा या चित्रपटात किंवा कॅमेऱ्यात बघायला छान छान वाटतात. फार तर किनाऱ्यावरुन बघायलाही....पण, त्याच लाटांवर स्वार होऊन समुद्रात फसलेल्या एखाद्याला बाहेर काढणं, खरंच हृदयाची धडधड वाढवणारं आहे..... यातला प्रत्येक ‘विघ्नहर्ता’ खरं तर इमर्जन्सी सर्व्हिसच आहे, म्हणजे कोणताही सण असो, एखादा सुट्टीचा दिवस असो, ही मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित असतातच. प्रत्येकाची आव्हानं निराळी, कार्यशैलीही तितकीच वेगळी. तुमच्या आमच्या वाटेतली अनेक विघ्नं दूर करण्यासाठी ही मंडळी जिवाचं रान करतात, त्यांच्याबद्दल खरंच माणूस म्हणून विचार करुया आणि त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता बाळगूया.....किमान इतकं तरी आपण करू शकतो नाही का ?
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case :  115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget