एक्स्प्लोर

Ashadhi Wari: जाऊ देवाचिया गावा...

आज 10 जून 2023 पासून वारकरी संप्रदायातील असंख्य वारकरी केवळ ज्या क्षणांसाठी जिवंत असतात तो सोहळा सुरू  होत आहे. आज श्री क्षेत्र देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पालख्या यापूर्वीच आपल्या परमप्रिय पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेल्या आहेत. पालख्यांबरोबर हजारो वारकरीही विठ्ठलाचा नामघोष करत पंढरपूरकडे निघालेले आहेत. त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने तसेच खान्देशातील मुक्ताईनगरहून मुक्ताईच्या पालखीने यापूर्वीच प्रस्थान ठेवले आहे. विदर्भातून रूख्मिणीच्या पालखीनेही त्याही आधी प्रस्थान ठेवले आहे. शेगावहून गजानन महाराजही पांडुरंगाच्या भेटीला निघालेले आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वीच नरसी नामदेवहून वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभर  भागवत धर्माचा प्रचार, प्रसार करणाऱ्या संत नामदेव महाराज यांचीही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. पैठणहून संत एकनाथ महाराज देखील पांडुरंगाच्या भेटीसाठी आपल्या वारकऱ्यांसह निघालेले आहेत. आज आणि उद्या पांडुरंगाचे दोन लाडके संत आपल्या पालखीचे प्रस्थान ठेवतील. त्यांना वाटेत अनेक संत आपल्या हजारो नव्हे नव्हे लाखो वारकऱ्यांसह भेटतील आणि या आनंद सोहळ्याचे सौंदर्य दिवसागणिक द्विगुणित करतील. आपणही या आनंद सोहळ्यात आहोत तिथूनच सहभागी होत अप्रत्यक्ष का होईना वारी केल्याची अनुभूती घेऊ. 'ठायीच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा' या ज्ञानेश्वरांच्या शब्दांनुसार तुम्ही रोज आमच्या वेबसाईटवर दाखल व्हा. वारीतील प्रत्यक्ष अनुभवांचे उत्कट वर्णन करून आम्ही शब्दांच्या, छायाचित्रांच्या किंवा अगदीच चलचित्रांच्या माध्यमातून आपल्याला वारी घडवण्याचा प्रयत्न करू. वारी सुरू करण्यापूर्वी वारकरी संप्रदाय तसेच वारी परंपरा, वारकरी यांच्याबाबत काही माहिती जाणून घेऊ म्हणजे आपल्याला अनेक बाबींचे प्रयोजन कळू शकेल. 

वारी म्हणजे काय? 

वारी म्हणजे एका अर्थाने फेरीच. वारकरी संप्रदायातील असंख्य वारकरी संतांना किंवा देवाला भेटायला शेकडो मैल चालून येतात आणि त्यांच्या मुखकमलाचे दर्शन घेतात. यालाच वारी घडणे म्हणतात. एका महिन्यात दोन एकादशी असतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एकादशीची वारी ही संतांची वारी तर दुसऱ्या एकादशीची वारी ही देवाची वारी मानली जाते. देवाच्या वारीला वारकरी देवाचे म्हणजेच आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पंढरपुरात जाऊन चंद्रभागेत स्थान करून आपल्या देवाचे दर्शन घेत पंढरपुरात रममाण होतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या घराकडे निघतात. संतांच्या वारीला वारकरी संतांच्या गावी, संतांच्या समाधीस्थळी जात त्यांची भेट घेतात. पहिल्या एकादशीला देवाचे दर्शन घेऊन तेथून निघाल्यावर संतांच्या दर्शनासाठी वारकरी जातात. प्रत्येक महिन्याचा हा नित्यनेम पूर्वी किंवा आजही काही अंशी चालू आहे. या वारकऱ्यांना महिन्याचे वारकरी म्हणतात. हे ज्या वारकऱ्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी वर्षातील चार महत्वाच्या वाऱ्या असतात. चैत्र, माघ, कार्तिकी आणि आषाढी या चार वाऱ्याही अनेक वारकरी करत असतात. या वाऱ्याही ज्यांना शक्य नसतील ते आषाढी आणि कार्तिकी अशा दोन वाऱ्या करतात. हेही शक्य नसेल तर वर्षातून एक वारी तर करावीच अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. आषाढी वारी म्हणजेच देवशयनी एकादशीची वारी ही वारकरी संप्रदायात सर्वात महत्वाची मानली जाते. या वारीला लाखोंचा समुदाय एकत्र येत आपल्या आराध्याचे दर्शन घेतो. 

आता ही वारी पायीच का चालतात तर वारी ही काही आता सुरू झालेली नाही. तिला साडे आठशे वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. त्याआधीही कित्येक शतके ही सुरू असल्याची प्रमाणे संतांच्या वचनात सापडतात. दळणवळणाच्या साधनांच्या अनुपलब्धतेमुळे ही पायी वारी सुरू झालेली आहे. पुढे ती परंपरा पडत गेली म्हणून आजही वारकरी पायी हे अंतर पार करतात. अलिकडच्या काळात काही हौशी सायकलस्वारही वारीत सायकली घेऊन सहभागी होतात आणि पंढरपूरपर्यंत सायकलीवरून जातात. त्यालाही नक्कीच वारी म्हणता येईल.  

वारी ही एकत्रित सुरू होण्यापूर्वी अनेक विभक्त दिंड्या आपापल्या ठिकाणाहून पंढररपूरकडे रवाना व्हायच्या ज्यांना एकत्रित आणण्याचे श्रेय वारकरी नारायण महाराजांना देतात. तुकाराम महाराजांच्या निघून जाण्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच 1685 मध्ये नारायण महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे विनंती करून वारीला राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तो फळाला आला. त्यानंतर त्यांनीच महाराष्ट्रातील सर्व दिंड्यांना देहू आणि आळंदीत जमण्याचे आवाहन करत एकत्रित वारीत सहभाग घेण्याचं नियोजन केलं आणि या वारीला सोहळ्याचं स्वरूप आलं. 

 वारकरी कोण असतो?

 वर उल्लेख केलेल्या काही वाऱ्यांपैकी कोणत्याही वारीत जो प्रत्यक्ष सामील होऊन चालत जातो तो वारकरी. वारकरी होण्याला किंवा वारकरी संप्रदायाचे अनुयायित्व घेण्यासाठी काही विशेष पदव्या किंवा शिक्षण किंवा धार्मिक विधी करावा लागतो का? तर नाही. कोणत्याही जेष्ठाच्या हातून १०८ मण्यांची तुळशी माळ गळ्यात घातली आणि रामकृष्ण हरि हा मंत्र म्हटला की तो झाला माळकरी. आता हा माळकरी विठ्ठलाचा अनुयायी होतो. विठ्ठलाचे नाम हेच त्याच्या जीवनाचे काम होते. संप्रदायात आल्यावर  मांसाहार, व्देषभावना त्यागून सात्विक जीवन जगणे एवढीच वारकरी झाल्यानंतरची नियमावली. 

 वारकरी संप्रदाय म्हणजे काय? 

वर आपण जाणून घेतलेला वारकऱ्यांचा समुदाय म्हणजेज वारकरी संप्रदाय. हा संप्रदाय लाखोंची संख्या असलेला संप्रदाय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा संप्रदाय पोहोचलेला आहे. कर्नाटकातही वारकरी संप्रदायाचे अनेक अनुयायी आहेत. मुख्यत: कष्टकऱ्यांची संख्या या संप्रदायात अधिक आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम हे प्रमुख संत होऊन गेले. या बरोबरच संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत कर्ममेळा, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मु्क्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाईृ, संत निळोबा महाराज या संतांचेही मोठं योगदान आहे. या सर्व संतांनी आपल्या अभंग, ओव्यांमधून विठ्ठलाचे वर्णन, विठ्ठलाबाबतचे प्रेम व्यक्त केले आहे. त्या त्या काळात झालेल्या या संतांनी समाजाला मोलाची शिकवणही दिली. विशेषत: संत एकनाथ यांनी आपल्या भारूडांमधून अत्यंत विनोदी शैलीत समाजाला जागं करण्याचं आणि डोळस करण्याचं काम केलं आहे. आजही या संतांचा एखादा अभंग घेऊन त्याचा अर्थ उलगडत समकालात आदर्श समाज कसा असावा याचं चिंतन ज्या व्यासपीठावरून जाणकार करतात त्याला  कीर्तन म्हणतात. संबंधित जाणकाराला कीर्तनकार म्हणतात. याच कीर्तनकारांवर आपल्या संप्रदायाचे तत्वज्ञान आणि संप्रदायाच्या प्रचार प्रसार करण्याची जबाबदारीही असते.

 या संप्रदायाबाबत, त्यामधील लोकांबाबत आणि मुख्यत: या परंपरेबाबत आपण जाणून घेतलेच आहे. आता आजच्या सोहळ्याबाबत बोलू. आज तुकारामांच्या पादुकांना पहाटे इंद्रायणीत स्नान घालून, त्यांचे पूजन करत, त्यासमोर कीर्तन होईल आणि दुपारून वारीचे प्रस्थान होईल.  वारीला आरंभ होईल. उद्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान होईल त्याबद्दल उद्या बोलूच. अगदीच सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे वारकरी ज्या क्षणांसाठी जिवंत असतात तो क्षण येऊन ठेपला आहे. या वारीसाठी ते आपल्या परमप्रिय पांडुरंगाला वर्षभर साकडं घालतात. 'पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदि हरि' पांडुरंगाला अशी विनंती, आर्जव, साकडं घालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यातील आजचा हा सोनियाचा दिनु उगवला आहे. आजपासून या आनंद यज्ञाला प्रारंभ होत आहे. आपणही या यज्ञातून थोडा थोडा आनंद रोज चोरून घेत जाऊच. तूर्तास रामकृष्ण हरि.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget