एक्स्प्लोर

Animal Movie: ॲनिमल आणि अनहेल्थी रिलेशनशीप

Animal Movie: अमेरिकन सायको-थेरपिस्ट अल्बर्ट एलिस यांनी ‘रिलेशनशीप’वर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. यातलं How to Stop Destroying Your Relationships: A Guide to Enjoyable Dating, Mating & Relating हे महत्त्वाचं पुस्तक आहे. 2001 ला हे पुस्तक आलं. त्यानंतर 2003 ते 2016 पर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रति विकल्या गेल्या.  या पुस्तकासोबत अल्बर्ट एलिस रिलेशनशीपबद्दल अनेक सायन्टिफिक पेपर लिहिले. त्यातला Unhealthy Love : Its Causes ad Treatment हा पेपर गाजला. यात स्त्री-पुरुषांच्या संबंधांबाबत विवेचन केलंय. जोडीदाराची निवड, रिलेशनशीपमध्ये जातानाची मानसिकता, याबाबत स्त्री आणि पुरुषाचा दृष्टीकोन यावर त्यांनी भाष्य केलंय. रिलेशनशीपमध्ये जातो म्हणजे आपण नक्की काय करतो, याचं ‘रॅशनल’ विश्लेषण अल्बर्ट एलिस यांनी केलं आहे. 

या पेपरमध्ये अल्बर्ट एलिस यांनी ‘अनहेल्थी लव’ म्हणजेच नक्की काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याआधी जोडीदाराची निवड कशी करतो, या मागची सायकोलॉजी  स्पष्ट केलीय. माणसाच्या विशिष्ट अपेक्षांमुळं रिलेशनशीपमध्ये संघर्ष होतो. नैसर्गिकरित्या माणूस प्रेमात पडतो म्हणजे काय? तर ते फक्त आकर्षणाचा भाग नसतं. समोरच्या व्यक्तीकडून तो विशिष्ट अपेक्षा, त्याच्यावरचा हक्क अश्या वेगवेगळ्या अंगानं हे प्रेम होतं. ही निरंकुश भावना असते. ती कशी तयार होते तर त्याची काही कारणं आहेत. (1) भिन्न लिंगी व्यक्तीचं आकर्षण, (2) त्या व्यक्तीशी आपण चांगलं वर्तणूक करतो (3) त्या व्यक्तीनं कायमस्वरुपी फक्त आणि फक्त आपल्यावरच प्रेम करावं, (4) आपण त्या व्यक्तीच्या अति-प्रचंड प्रेमात पडतात. हे सर्व घडत असताना निवडलेल्या जोडीदारानं फक्त आपल्यासाठी उपलब्ध राहावं, आपल्यावरच प्रेम करावं आणि लैंगिक पातळीवरही स्वत:ला आपल्यासाठीच ठेवावं. ही ‘डिमांडनेस’ असते. 

ॲनिमल सिनेमात रणविजय (रणबीर कपूर) आणि गितांजली (रश्मिका) यांच्या नात्यात असाच डिमांडनेस येतो. ठरलेलं लग्न मोडून गितांजली रणविजयला निवडते. याला कारणीभूत ही तोच आहे. ती त्याला लहानपणापासून ओळखतेय. त्याच्याबद्दल यापुर्वी कधीच प्रेम भावना नव्हती. इनफॅक्ट त्याला ती भैया म्हणते. तिच्या साखरपुड्याला रणविजय बॉम्ब टाकतो. तिला काही प्रश्न विचारतो. तिच्या मनात काहूर माजवतो. यातूनच मग वर दिलेली आकर्षण आणि इतर सर्व कारणं एकत्र येतात. गितांजली थेट त्याच्या घरी येते. 

संपूर्ण सिनेमात हे नात या डिमांडनेसच्या संकल्पनेतूनच पुढे जात राहतं. त्याचं श्वापदासारखं असणं तिनं अनुभवलंय. याचा स्विकारही केलाय. घरचा ‘कर्तापुरुष’ बनल्यावर ते जास्त वाढतं. आता तो फक्त तिचा राहत नाही. तो सर्व कुटुंबाचा होतो. हे देखिल तिला खटकतंय. फक्त कधी बोलून दाखवत नाही. तो दुसऱ्या बाईसोबत असल्याची याची जाणिव तिला होते. तो त्याची कबुलीही देतो. तेव्हा तिचा स्फोट होतो. ती डिमाडनेसच्या सर्वोच्च पातळीवर जाते. तिच्याबरोबर झोपलास का? संभोग करताना काँडम वापरलास का? अश्या  प्रश्नांची थेट नाही अशी उत्तरं येतात. ती तापते आणि सरळ डिव्होर्सची मागणी करते. एव्हढं स्ट्राँग स्त्री पात्रं अलिकडच्या काळात दिसलेलं नाही. वांगाच्या सिनेमातली स्त्री पात्रं प्रचंड इमोशनल आणि त्याचवेळी तेव्हढीच स्ट्राँग आहेत. त्यांना स्वत:चं मत आहे. ‘ॲनिमल’ असलेल्या पुरुषांवर प्रेम करण्याचा निर्णय त्यांचा स्वत:चा आहे. तो तिने जाणिवपुर्वक आणि सारासार विचार करुन घेतला गेलाय. 

रणविजयचा खात्म करायला आलेली जोया ही तशीच डिमांडनेसच्या फेऱ्यात अडकलेली आहे. ती त्याची बायको नाही, कायदेशीरपणे हक्क गाजवू शकत नाही. पण त्यानं आपल्याला स्विकारावं अशी तिची अपेक्षा आहे. तिचा डिमांडनेस इमोशन आणि सेक्सच्या मार्गाने सॉफ्टपॉवरसारखा आलाय. प्रेम सिध्द करण्यासाठी तो तिला बूट चाटायला लावतो. ती उद्विग्न होऊन खाली बसते. ती त्याला पूर्ण सरेंडर जात नाही. ती रडता रडता विचार करतेय. तो थेट निघून जातो. याच सीनवरुन भारतात नाहक गदारोळ सुरु आहे. 

ॲनिमल सिनेमात स्टाँग सबटेक्स्ट आहेत. सोशिओ-पॉलिटिकल, पॉलिटिक्स ऑफ फॅमिली, त्यातलं टोरंटिनो आणि कोरीयनस्टाईल पोएटिक व्हायलंस(?) आणि फेमिनिजम अश्या वेगेवेगळ्या लेन्सेनं ॲनिमलचा सखोल अभ्यास होऊ शकतो. या सर्वच लेन्सेच्या आऊटकमचा विचार केल्यास ॲनिमल फारच वरचा सिनेमा ठरू शकतो.

 नरेंद्र बंडबे यांचा हा ब्लॉग देखील वाचा-

Fallen Leaves : फॉलन लिव्स (2023) - आभाळ येण्याआधीची पानगळती

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओABP Majha Headlines : 09 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Thane Full Speech :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल,व्हिडिओ लावून उद्धव ठाकरेंवर टीकाNaresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget