एक्स्प्लोर

एक राजा जेव्हा प्यादं बनतो

एम एफ  हुसेन त्याच्या प्रिय मातृभूमीपासून दुर लंडनमध्ये वारला  . . चार्ली चॅप्लिनला आक्रमक उजव्या राष्ट्रवादी लोकांनी 'कम्युनिस्ट ' ठरवून देशनिकाला दिला होता . तस्लिमा नसरीनची मातृभूमीची परतीची वाट कायमची बंद झाली आहे .  आयुष्यात काहीही चमकदार न केलेली माणसं आणि 'आम्ही कर भरतो ' ही देशभक्तीची व्याख्या असणारी लोकं आपल्या जातीची , धर्माची , राष्ट्रवादाची 'कलेक्टिव' जबाबदारी एखादा कलाकार , साहित्यिक किंवा खेळाडुच्या खांद्यावर का टाकत असावीत हा प्रश्न मला कायमचं पडत आला आहे  . हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे या आठवड्यात पाहण्यात आलेला बॉबी फिशर या विक्षिप्त जिनियस असणाऱ्या बुद्धिबळ खेळाडूवरचा 'पॉन सॅक्रीफाईस ' हा सिनेमा . बॉबी फिशर हा जितका जिनियस खेळाडू होता तितकाच विक्षिप्त माणूस होता . लहरी आणि तापट फिशर , बुद्धिबळातली अभेद्य रशियन मक्तेदारी मोडून काढणारा फिशर , शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन राष्ट्रवादाच प्रतिक बनलेला फिशर , मोठ्या सामन्यांना उशिरा येणारा फिशर , सामना संपल्यावर बोरीस स्पास्कीला घड्याळ भेट देणारा  फिशर , स्वतःच्या देशातून हद्दपार झालेला फिशर , अमेरिकन भुमिवरील ९/११ च्या हल्ल्याचं समर्थन करणारा फिशर अशा असंख्य वेगवेगळ्या छटा या फिशर नावाच्या विक्षिप्त अवलियाच्या व्यक्तिमत्वाला होत्या . यापूर्वी पण बॉबी फिशरवर काही चित्रपट बनले आहेत . . पण 'पॉन सॅक्रीफाइस'  ह्या सगळ्यामध्ये निर्विवादपणे उजवा आहे . ह्याच श्रेय अर्थातच दिग्दर्शक एडवर्ड झ्विक आणि मुख्य भुमिकेत असणाऱ्या टोबी मॅग्वायर या कलाकाराचं. दिग्दर्शक एडवर्ड झ्विक एका मुलाखतीत म्हणाला की ,'इतिहासाच्या एका टप्प्यावर बॉबी फिशर हा पृथ्वीतलावरचा सर्वाधीक लोकप्रिय मनुष्य होता . फिशर हा जीनियसपणा आणि वेडेपणा यांच्या दरम्यानच्या कुठल्यातरी टप्प्यावर रेंगाळत राहिला ." दुसऱ्या वाक्यात झ्विकने फ़िशरचे विश्लेषण जे केले आहे त्याभोवती चित्रपट फिरतो . बॉबी फिशरचे  (टोबी मॅग्वायर) बालपण , त्याच्या आईसोबत (लिली राबे ) असणारी त्याची लव -हेट रिलेशनशिप ,फिशरच्या बालपणापासून सुरु झालेली बुद्धिबळामधली हेवा वाटण्यासारखी कारकीर्द , त्याचं भीती आणि संशयान भरलेलं उत्तरायुष्य अशा अनेक महत्वाच्या टप्प्यांना चित्रपट स्पर्श करतो . पण चित्रपटाचा हायलाईट आहे तो 'फाईट ऑफ द सेन्चुरी ' म्हणून इतिहासात नोंद झालेली बॉबी फिशर - बोरीस स्पास्की यांच्यात आईसलंडमध्ये झालेली जगतज्जेतेपदासाठी  लढत .   जेंव्हा ही लढत सुरु होणार होती तेंव्हा सोवियेत युनियन आणि अमेरिका यांच्यादरम्यान शीतयुद्ध एन भरात होते . बुद्धिबळामधल विश्वविजेतेपद ही रशियन खेळाडुंची मक्तेदारी समजली जात होती . जेंव्हा बॉबी फिशरने बोरीस स्पास्कीला लढतीसाठी आव्हान दिले तेंव्हा ह्या लढतीला या दोन महासत्तामधल्या  आणि दोन विचारसरणीमधल्या लढाईचे   स्वरूप प्राप्त झाले . अवघ्या जगाचे डोळे या लढतीकडे खिळले होते  . चित्रपटात ह्या लढतीअगोदर आणि लढतीदरम्यान झालेल्या पडद्याआडच्या हालचाली मोठ्या प्रभावीपणे दाखवल्या आहेत . फिशरला एक यंत्रणा कशी राष्ट्रवादाच्या घोड्यावर सवार करते , ह्या दरम्यान फ़िशरचि असणारी अस्थिर आणि दोलायमान मनस्थिती , खेळाच्या स्पर्धेत राजसत्तेचा होणारा हस्तक्षेप या गोष्टी अप्रतिमपणे दाखवल्या जात आहेत . वास्तविक हा जितका चित्रपट जितका टोबी मॅग्वायरचा आहे तितकाच बोरीस स्पास्कीच्या भुमिकेमधल्या लिव श्रायबर या अफलातून अभिनेत्याचापण आहे . निव्वळ  प्रतिस्पर्धी गोटातला असल्यामुळे बोरीस स्पास्कीला  दिग्दर्शकाने आणि पटकथाकारांनी खलनायक बनवण्याच कटाक्षाने टाळले आहे . आपण इतिहासातील एका महत्वाच्या घटनेचे चित्रीकरण करत आहोत आणि ते ऑथेण्टिक असणे ही आपली जबाबदारी आहे याची दिग्दर्शकाला असणारी जाणीव ठाई ठाई दिसते . अतिशय कमी संवाद असुनपण आपल्या देहबोलीतून आणि नजरफेकीतून थंडगार व्यवसायीक खेळाडू लिव श्रायबरने ज्या नजाकतीने साकारला आहे त्याला तोड नाही . स्पास्कीविरुद्ध लढत जिंकण हे फिशरच्या आयुष्यातल शिखर असेल तर फ़िशरचे पुढचे सगळे आयुष्य म्हणजे न संपणारा उतार आहे . काही कारणांमुळे तो अमेरिकाविरोधी बनत गेला . सरकारनेपण त्याच्याविरुद्ध नख्या काढल्या . जे प्राक्तन हुसेन , तस्लिमा नसरीन च्या नशिबी आलं तेच फिशरच्या पण वाट्यालापण आलं . आपली हेरगिरी होत आहे या भीतीने तो पछाडला . फिशरच्या आयुष्यातला हा डार्क पिरीयड पडद्यावर अस्वस्थ करतो . काही भूमिकांवर नटाचा ठसा उमटतो तर काही नटांवर त्यांच्या एका भूमिकेचा ठसा उमटून राहतो .  टोबी मॅग्वायर हा गुणी अभिनेता दुसऱ्या प्रकारात मोडतो . स्पायडरमॅनच्या भूमिकेचा ठसा या गुणवान नटाला अंगावर वागवावा लागणार असे वाटत असतानाच त्याने साकारलेल्या अप्रतिम बॉबी फिशरच्या भूमिकेने  त्याच्या टीकाकारांना उत्तर दिल आहे . हा चित्रपट पाहताना तुम्हाला बुद्धिबळाचे तांत्रिक ज्ञान असण्याची काहीही गरज नाही ही  अजून एक महत्वाची बाब . दिग्दर्शक एडवर्ड झ्विकने यापूर्वी 'द लास्ट सामुराई ' , 'डिफायंस' सारखे काही चांगले चित्रपट दिले आहेत . अप्रतिम चित्रित केलेले युद्धप्रसंग हे त्याच्या चित्रपटाच सामाईक वैशिष्ट्य . पण ६४ घरांच्या युद्धाचे प्रसंग पण चांगले चित्रित करून त्याने आपण किती प्रतिभावान दिग्दर्शक आहोत हे त्याने सिद्ध केले . एकूणच  'पॉन सॅक्रीफाइस'  हा आदर्श असा चरित्रपट आहे . मुळीच चुकवु नये असा . जाता जाता आपल्याकडे बनणाऱ्या चरित्रपटांची तुलना हॉलीवूडमध्ये बनणाऱ्या  चरित्रपटांशी करण्याचा मोह आवरत नाही . आपल्याकडचे चरित्रपट मेरी कोम , भाग मिल्खा भाग हे चरित्र नायक किंवा नायिकेचे प्रमाणाबाहेर उद्दातीकरण  करण्यात धन्यता मानतात . मुख्य पात्रांच्या सम्यक चित्रीकरणात आपल्या दिग्दर्शकांना फारसा रस नसतो . पण त्यामुळे हे चरित्रपट कमी आणि प्रपोगंडापट जास्त  बनतात . व्यक्तिपूजा हा ज्या देशाचा स्थायीभाव आहे तिथे काही वेगळे घडण्याची अपेक्षा पण देशातील सुजाण प्रेक्षकांनी ठेवू नये का हा प्रश्न 'पॉन सॅक्रीफाइस' पाहिल्यानंतर पडायला लागतो.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget