एक्स्प्लोर

मुकद्दर का सिकंदर... कादर खान

हालाखीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुलानं पाचव्या वर्षी मजुरीला जायचं ठरवलं. घराबाहेर पडणाऱ्या त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईनं हात ठेवला. ती म्हणाली, "मै जानती हुं तू कहा जा रहा है, तू तीन चार रुपये कमाने जा रहा है, ताकी घर की गरीबी ना रहे, तेरे घर मे मुफलिसी ना रहे, भुक ना रहे, लेकिन बेटा इस गरीबी से टकराने के लिए मै हुं, तू एक काम कर तू सिर्फ पढ़़ "

अफगाणिस्तानच्या काबुल जवळच्या खेड्यात त्या मातेची तीन मुलं दगावली. चौथा मुलगा झाला तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, इथलं वातावरण काही बरं नाही, आपण हा देश सोडून जाऊया. नवरा बायको अन ते बाळ पाकिस्तानमार्गे भारतात आले. सरतेशेवटी मुंबईतल्या सर्वात गलिच्छ झोपडपट्टीत कामाठीपुरात वास्तव्य जिथे दारूडे, चोरटे, बदफैली, दिवसाढवळ्या वेश्या व्यवसाय, दरोडे, खून होत अशा वातावरणात हे कुटुंब कसेतरी आपले दिवस ढकलंत होतं, या अशा परिस्थितीत नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली. याचा शेवट तलाकने झाला, या छोट्या बाळाच्या मनावर काय परिणाम होत असेल कल्पना करा.. तरुण पठाणी स्त्रीला अशा गढूळ वस्तीत एकटं टिकणं अवघड होतं, पाकिस्तानातून तिचे आई आणि भाऊ आले, आणि त्यांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं. त्या कमनशिबी मुलानं आईचं दुसरं लग्न बघितलं, पण नशिबाचे भोग त्याहून वाईट होते. त्या छोट्या बाळाचा सावत्र बाप दमडी कमवत नव्हता. त्या छोट्या मुलाला तो त्याच्या पहिल्या बापाकडे पैसे मागायला पाठवायचा. तो छोटा मुलगा कामाठीपुऱ्यापासून तीन किमी बापाकडे चालत जात एका दोन रुपयाची भीक मागायचा, त्याचे वडिल म्हणायचे "बेटे मै कहा से पैसे दुं, मै खुद मस्जिद मे पेशेमाम हुं," पण कुठूनतरी ते दोन रुपये उसने घेऊन त्या मुलाला परत पाठवत, त्या दोन रुपयाच पीठ, डाळ विकत घेऊन आठवड्यात तीन दिवस जेवायचं आणि चार दिवस उपाशी राहायचं. या हालाखीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुलानं पाचव्या वर्षी मजुरीला जायचं ठरवलं. घराबाहेर पडणाऱ्या त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईनं हात ठेवला. ती म्हणाली, "मै जानती हुं तू कहा जा रहा है, तू तीन चार रुपये कमाने जा रहा है, ताकी घर की गरीबी ना रहे, तेरे घर मे मुफलिसी ना रहे, भुक ना रहे, लेकिन बेटा इस गरीबी से टकराने के लिए मै हुं, तू एक काम कर तू सिर्फ पढ़़ " आईचे ते शब्द त्या मुलानं लक्षात ठेवले, आणि डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आयुष्याच्या हाल अपेष्टांनी या मुलाला जीवनाचं सार कळलं. आजूबाजूची लोकं बघून तो लिहू लागला, नक्कल करू लागला. दिवसभरात सुचलेलं कागदावर उतरवून ते घराजवळच्या कबरस्तानमध्ये जाऊन मोठ्यानं वाचू लागला. एके रात्री असंच अचानक त्या मुलाच्या चेहऱ्यावर कोणीतरी टॉर्च चमकवला, त्याला बोलावत विचारलं की "तू काय करतोस",  मुलगा म्हणाला "मी हे स्वतः लिहितो आणि इथे वाचत बसतो", समोरच्या व्यक्तीनं विचारलं "ड्रामा मे काम करते हो क्या?" तो मुलगा म्हणाला, "ड्रामा म्हणजे काय?" त्या व्यक्तीनं त्या मुलाला बंगल्यावर बोलवून त्याला 200 रुपये दिले आणि आशीर्वाद दिला, "की या 200 रुपयांचे उद्या 2 लाख , दोन कोटी होतील, आणि झालंही तसंच" ज्या मुलाच्या आयुष्याचा अंधार अंगावर काटा उभा करतो, बदनशिबीपणा आपल्याला कावरंबावरं करुन सोडते, भूक, गरीबी, लाचारीचं हे जगणं आपण खचितच कुठे पाहिलं असेल, ऐकलं असेल. पण हा संघर्ष तुडवत नशिबाला लोळवत तो पुढे गेला. आपल्या आईचं दुःख तो लिहीत गेला. त्याच सच्चेपणातून हा लेखक घडला आणि त्याच सच्च्या संवादांनी त्याला महान अभिनेता बनवलं.. ते होते कादर खान साहेब.. अपघातानं का होईना कादर खान नाटकांशी जोडले गेले. सोबतच इंजिनिअरींग पूर्ण केलं, आणि भायखळ्यात एम एच बाबू सिद्दीकी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये  ते शिकवायला जात. पगार महिना तीन रुपये, तेव्हा तीन रुपये खूप होते. नोकरी करताना खूप वाचन सुरु होतंच. त्यातून लेखणी बहरली. कॉलेजमध्ये त्यांनी नाटक बसवलं. अभिनय, लेखन, दिग्दर्शन असे तिन्ही पुरस्कार कादर खान यांना मिळाले, या नाटकाला दिग्दर्शक नरेंद्र बेदी उपस्थित होते, ते म्हणाले "तुम इतने पढ़े लिखे हो, अदाकारी के साथ साथ लिखने का फ़न भी जानते हो, फिल्मों में क्यों नहीं आते?"  कादर खान यांना चालून आलेली ही पहिली ऑफर होती. त्यानंतर ताश के पत्ते नावाच्या नाटकाला आगा साहाब नावाचे विनोदी कलाकार उपस्थित होते. त्यांनी कादर साहेबांची महती थेट दिलीप कुमार यांच्यापर्यंत पोचवली, दिलीप कुमार यांनी थेट कादर खान यांना फोन केला, मी नाटकाला येतोय असं सांगितलं, कादर खान यांना त्या गोष्टीचं दडपण आलं, त्यांनी दिलीप कुमार यांना विनंती केली की नाटक पूर्ण बघूनच बाहेर पडा, दिलीप कुमार यांनी नाटक बघितलं, बॅकस्टेजला जाऊन कादर साहेबांना मिठी मारत म्हणाले, "मै कादर खान को बधाई देता हुं और अपनी आनेवाली फिल्म बैराग मे एक रोल ऑफर करता हुं, इस फिल्म मे दो दिलीप कुमार होगे, दुसरा दिलीप कुमार कादर खान होगा।" मुकद्दर का सिकंदर... कादर खान आयुष्यात जेव्हा सगळी दारं बंद होतात, तेव्हाच नशिबाचं दार किलकिलं होतं, कबरस्तानमधली ती व्यक्ती भेटणं असेल किंवा स्टेजवर दिलीप कुमार यांची भेट होणं, कादर खान यांचं आयुष्य पालटून गेलं. नरेंद्र बेदी यांचा चित्रपट जवानी दिवानी आणि रफू चक्कर, रवी टंडन यांचा खेल खेल मे असे तीन सिनेमे हिट झाले आणि लेखक, संवाद लेखक म्हणून कादर खान यांचं नाव गाजू लागलं. मनमोहन देसाई, प्रकाश मेहराचे सिनेमे अमिताभ बच्चन हीरो आणि संवाद कादर खानचे.. हा सुवर्ण काळ होता कादर खान यांचा.. शिट्ट्या, टाळ्यांनी थिएटर दणाणून जाई.. मनमोहन देसाईंसोबतचा कादर खान यांचा किस्सा खूप मजेशीर आहे. मनमोहन देसाई फटकळ, तोंडावरच लाज काढायचे, सुरुवातीच्या दिवसात मनमोहन देसाई कादर खान यांना म्हणाले, "मेरे को मालूम है, कि तुम मियाँ भाई लोगों को लिखने को आता नहीं है। तुम या तो शायरी लिखते हो या मुहावरे वगैरह। मुझे शेर ओ शायरी नहीं चाहिए। डायलॉग चाहिए। क्लैप ट्रैप डायलॉग चाहिए। तालियां बजना चाहिए। लिख सकता है? बकवास लिख के लाएगा तो मैं उसको फाड़ के वो उधर नाली में फेंक दूंगा। " त्यावर कादर खान म्हणाले, "अगर अच्छा लिख कर लाया तो? त्यावर मनमोहन देसाई म्हणाले "तो फिर मैं तुझे सिर पे बिठा के नाचूँगा, जैसे लोग गणपति को लेकर नाचते हैं।" ठरलं, मनमोहन देसाई यांनी आपला पहिला चित्रपट रोटी (राजेश खन्ना, मुमताज़) चा क्लायमॅक्स लिहिण्याचं काम कादर खान यांना दिलं, आव्हान म्हणून रात्रभर बसून कादर खान यांनी संवाद लिहिले. दुसऱ्या दिवशी लम्ब्रेटा स्कूटरवर बसून ते मनमोहन देसाई यांच्या चर्नी रोडच्या घरी पोहोचले. पाहातो तर काय मनमोहन देसाई मुलांसोबत क्रिकेट खेळत होते. कादर खान यांना बघून ते ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटले. कादर खान जवळ जाऊन म्हणाले, "आपने मुझे गाली दी? सर, मैं बुदबुदाते हुए होठों को दूर से पढ़ लेने का हुनर जानता हूँ।“ (कादर खान यांची ही खासियत बघून प्रभावित झाले होते, अनेक वर्षांनंतर नसीब या सिनेमात त्याचा वापर केला होता. नसीबमध्ये दुर्बिणीतून बघणारी नायिका खलनायकाच्या ओठांच्या हालचालिवरून तो काय म्हणतोय ते ओळखायची ) मनमोहन देसाई यांनी शिवी दिल्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांनी रोटी सिनेमाचा क्लायमॅक्स वाचला आणि ते इतके खूश झाले की त्यांनी हातातलं सोन्याचं ब्रेसलेट कादर यांना दिलं, एवढंच नाही पन्नास हजार रोकड आणि टीव्ही सुद्धा दिला. देसाईंनी कादर खान यांना विचारलं, "कितने पैसे लेता है लिखने के?" कादर खान म्हणाले, "पच्चीस हजार" विशुद्ध व्यावसायिक बुद्धि वाले गुजराती भाई मनमोहन देसाई यांनी लगेच 25 हजार देऊन विषय मिटवला असता, पण त्यांनी तसं केलं नाही, मनमोहन देसाई यांनी कादर खान नावाच्या हिऱ्याला ओळखलं.. ते रागावून म्हणाले, "रायटर है या हज्जाम? मैं तेरे को एक लाख रुपये देगा। मस्त डायलॉग लिखना प्यारे।" आणि त्यानंतर.. कादर खान यांनी अडीचशे सिनेमे लिहिले. ज्यामध्ये सुहाग, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथोनी, शराबी, कुली, सत्ते पे सत्ता, देश प्रेमी, गंगा जमुना सरस्वती, परवरिश, मिस्टर नटवरलाल, खून पसीना, दो और दो पांच, इंकलाब, गिरफ्तार, हम, अग्निपथ, हिम्मतवाला, कुली नंबर 1, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, कानून अपना अपना, खून भरी मांग, कर्मा, सल्तनत, सरफ़रोश, जस्टिस चौधरी, धरम वीर। अग्निपथ आणि नसीब चित्रपटाचे स्क्रीन प्ले लिहिले. पण कादर खान यांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली ज्या व्यक्तीनं कादर खान यांच्यातल्या लेखकासोबत अभिनेत्याला पारखलं होतं. ती तिसरी व्यक्ती महानायक अमिताभ बच्चन.. अदालत चित्रपटात इन्स्पेक्टर खानचा रोल एखाद्या अभिनेत्यानं करावा असं  दिग्दर्शकाला नाटक होतं. पण तो रोल कादर खान यांना अमिताभ बच्चन यांनी मिळवून दिला. त्यानंतर प्रकाश मेहरांच्या खून पसिनामध्ये ते खलनायक होते. हे दोन्ही सिनेमे एका लागोपाठच्या आठवड्यात प्रदर्शित झाले. खलनायक म्हणून ते लोकांना जास्त पसंत पडले, त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमात खलनायक साकारला. पण खलनायकाच्या या इमेजमधून त्यांना बाहेर पडायचं होतं, त्याला कारणही तसंच होतं. एकदा कादर खान यांचा मुलगा शाळेतून मारामारी करून घरी आला.. कादर साहेबांनी विचारलं "काय रे काय झालं", तर मुलगा म्हणाला, "शाळेतली मुलं चिडवतात की तुझे बाबा सिनेमात मार खातात," त्यानंतर कादर खान यांनी हिम्मतवाला सिनेमा लिहिला, त्यामध्ये मुनिम या विनोदी पात्राचे डायलॉग्ज स्वतः लिहिले, आणि ते विनोदी पात्र त्यांनी साकारलं, ते लोकांनी डोक्यावर घेतलं. पहिल्या आठवड्यात पोस्टरवर श्रीदेवी आणि जितेंद्र होते, पण दुसऱ्या आठवड्यात पोस्टरवर कादर खानही आले. मुकद्दर का सिकंदर... कादर खान कादर खान यांचे संवाद आणि अभिनय बघून अनेकांचं लहानपण आणि तारुण्य गेलं, जितेन्द्र, राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती, श्रीदेवी, जयाप्रदा, अरुणा ईरानी, असरानी, शक्ति कपूरसोबतचे सिनेमे तर रेकॉर्डतोड होते, उत्तरार्धात डेव्हिड धवन आणि गोविंदासोबतची त्यांची केमिस्ट्री ही सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा होता, विनोदातला तो साधेपणा आता मात्र हरवून बसलाय. कादर खान शूटिंग, लिखाण, वाचनात दिवसरात्र व्यस्त असायचे, तरीही त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अरबी भाषेतून एमए केलं, लोक हैरान असायचे, हा माणूस झोपतो कधी? कादर खान यांनी लिहिलेल्या अनेक सिनेमांमधल्या आईच्या पात्रामध्ये ते आपल्या आईला पाहात असत, जे डायलॉग ऐकून आपले डोळे पाणावतात, पण हा फलसफा त्यांना लहानपणीच्या खडतर आयुष्यानं शिकवला, मुकद्दर का सिकंदर सिनेमामधला हा डायलॉग त्याची साक्ष देतो "इस फकीर की  इक बात याद रखना, जिंदगी का अगर लुत्फ उठाना है, तो मौत से खेलना सिखों, सुख को ठोकर मार, दुख को अपना, अरे सुख तो बेवफाँ है। चंद दिनों के लिए आता है और चला जाता है। मगर दुख, दुख तो अपना साथी है। पोंछ ले आंसु, पोंछ ले, दुख को अपनाले, अरे तकदीर तेरे कद्मो मे होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा। होय, कादर खान होतेच मुकद्दर का सिकंदर....
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget