एक्स्प्लोर

ब्लॉग : अ मोस्ट रोमॅण्टिक मॅन

आपल्या शब्दसंपन्नतेनं त्यानं लहान थोर साऱ्यांच्या काळजाला हात घातला.. कित्येकांच्या विरह जखमेवर त्यानं आपल्या ओळींनी अलगद पट्टी बांधली.. त्याच्या दोन ओळींनी एकत्र आणून अनेकांचा संसार फुलला.. क्वालिटीबाज सोबतच तो भरपूर क्वांटिटीत लिहित होता.. इतकं की गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं त्याच्यासाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार केली..

पित्याची इच्छा नसतानाही त्यानं स्वप्ननगरी गाठली.. दीड वर्ष मुंबईच्या रस्त्यावर भटकला. पण यश सोडा... बुडत्याला काडीचा आधारही मिळाला नाही.. वाराणसीला घरी आल्यावर उपाशी तापाशी मुंबईत स्ट्रगल केलेल्या मुलाला आईनं बघितलं आणि तिला रडू कोसळलं.. तिने तात्काळ नवऱ्याला पत्र लिहिलं.. तुमचा मुलगा दीड वर्ष मुंबईत भटकतोय.. तुम्ही साधी विचारपूसही केली नाही.. त्यावर ते म्हणाले की तुझा मुलगा काय माझ्या स्वप्नात येत नाही.. मला कसं कळणार तो मुंबईत फिरतोय ते.. त्यानंतर त्या पित्याने आपल्या मुलाला लिंकिंग रोडवरच्या एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावलं. चर्चगेटवरून 10 रुपयांचा शर्ट खरेदी करून आपल्या पित्याला भेटण्यासाठी पोहोचला. वडिलांनी पहिलाच प्रश्न विचारला.. "तू कोणावर प्रेम केलंस का?" मुलाला आश्चर्य वाटलं.. परिस्थिती काय, आपले वडील विचारताय काय? पण तरीही त्यानं उत्तर दिलं.. "हो केलंय.." "काय विचार करून प्रेम केलंस..?" वडिलांनी दुसरा प्रश्न विचारला.. त्यावर मुलगा म्हणाला "विचार करून प्रेम करता येत नाही.. वाटलं म्हणून केलं.. परिणामांची पर्वा कोण करणार" उत्तर ऐकून वडील खूश झाले आणि त्यांनी मुलाला सिने जगतात पाऊल ठेवायची परवानगी दिली.. आणि असा विचित्र प्रश्न का विचारला याचं उत्तरही दिलं.. ते म्हणाले, "बेटा, ही सिनेसृष्टी म्हणजे एका प्रेयसीसारखी आहे.. ती प्रेमही देते आणि दूरही सारते.. तरीही तुम्ही तिच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे.. परिणाम काहीही असले तरी.." पित्याचं ते बोलणं ऐकून तो क्षणभर स्तिमीत झाला.. त्यानं ठरवलं, आता मागे वळून पाहायचं नाही.. पुढची ३५ वर्ष तो अखंड लिहित राहिला.. आपल्या शब्दसंपन्नतेनं त्यानं लहान थोर साऱ्यांच्या काळजाला हात घातला.. कित्येकांच्या विरह जखमेवर त्यानं आपल्या ओळींनी अलगद पट्टी बांधली.. त्याच्या दोन ओळींनी एकत्र आणून अनेकांचा संसार फुलला.. क्वालिटीबाज सोबतच तो भरपूर क्वांटिटीत लिहित होता.. इतकं की गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं त्याच्यासाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार केली.. सर्वात जास्त चित्रपटांसाठी सर्वाधिक गाणी लिहिणारा म्हणून त्याचा खास गौरव केला.. त्या रेस्टॉरंटमध्ये आपल्या मुलाची परीक्षा घेणारा तो पिता म्हणजे गीतकार अंजान आणि नवे कीर्तीमान ज्यासमोर नतमस्तक होतील असा त्यांचा तो मुलगा म्हणजे गीतकार समीर अंजान गीतकार अंजान यांचं साठ आणि सत्तरच्या दशकात चांगलंच प्रस्त होतं.. खईके पान बनारस वाला खुल जाएं बंद अकल का ताला असं लिहिणारे दिलखुलास अंजान.. कदाचित तेच समीर यांनी अमलात आणलं... वाराणसीतून समीर यांनी थेट मुंबईची वाट धरली.. खरंतर समीर यांनी सिनेसृष्टीत येऊ नये असं अंजान यांना वाटायचं. आपल्या कारकीर्दीतली सुरूवातीची १७ वर्ष अंजान यांनी स्ट्रगलमध्ये काढली.. हा जीवघेणा स्ट्रगल आपल्या मुलाला नको, एवढी निर्मळ इच्छा अंजान यांची होती.. पित्याच्या इच्छेखातर समीर यांनी एम. कॉम पूर्ण करून बँकेत नोकरी सुरू केली.. पण नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी बँकेला रामराम ठोकत मुंबई गाठली.. पित्याच्या इच्छेविरोधात मुंबईत आलो म्हटल्यावर त्यांनी दीड वर्ष अंजान यांना कळू न देता अनेक निर्मात्यांचे, दिग्दर्शकांचे त्यांनी उंभरठे झिजवले.. वय वर्ष २१ असताना त्या जवानीच्या जोशात त्यांनी अगदी उपाशी राहून, चाळीत राहून दिवस काढले पण यश मिळालं नाही.. अखेर आईच्या मध्यस्तीनं दोघे पिता-पुत्र भेटले.. त्यानंतरही वर्षभर अंजान यांनी समीर यांना गाणं, धून,  चित्रपटातला सिक्वेन्स त्यातून रचना कशी करायची याचे धडे दिले.. १९८३ साली समीर यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली.. पण विशेष काही हाती आलं नाही.. तब्बल ९ वर्ष हा स्ट्रगल सुरू होता.. अखेर सोनं चकाकलं. हमने घर छोडा है, रस्मों को तोडा है. दूर कहीं जाएंगे, नई दुनिया बसायेंगे.. समीर यांना जणू आपलीच कहानी या गीतांमध्ये भरली.. दिल चित्रपटातलं हे गाणं असू दे, किंवा मुझें निंद ना आयें, मुझे चैन ना आये.. कोई जाएं जरा ढुंढके लाएं.. न जाने कहां दिल खो गया.. न जाने कहां दिल खो गया.. या गाण्यांनी तर लोकप्रियतेचे नवीन मापदंड आखले.. समीर रातोरात स्टार झाले.. पण समीर यांना खरी ओळख दिली ती महेश भट यांच्या आशिकी चित्रपटानं.. बेताबी क्या होती है, पुछों मेरे दिल से.. तनहा तनहा लौटा हुं, मै तो भरी मेहफिल से.. हे असं लिहिण्यासाठी आघातांनी रक्ताळलेलं हृदयच लागतं.. समीर साहेब एका ठिकाणी सांगतात, की वाराणसीमध्ये असताना त्याचं एका मुलीवर प्रेम होतं.. पुढे मुंबईत आल्यावर तीन वर्षांनी त्यांच्या प्रेयसीचा अकाली मृत्यू झाला.. त्या विरहातच आशिकीची गाणी लिहिली गेली.. म्हणूनच यशाच्या त्या टोकावरही त्यांना तिचं नसणं आजही जाणवतं... ते लिहितात.. मंजिले हासिल है, फिर भी एक दुरी है.. बिना हमराही के, जिंदगी अधुरी है.. मिलेगी कहीं कोई रहगुजर.. तनहा कटेगा कैसे ये सफर.. मेरे सपने है जहां, ढुंढू मै ऐसी नजर चाँद की जरूरत है जैसे चाँदनी के लिएं.. बस एक सनम चाहिएं, आशिकी के लिएं.. या गाण्यांनी आशिकीला सुपर से भी ऊपर म्हणतात तसं हिट केलं.. आशिकीपासून सिनेसृष्टीनं नवीन कुस बदलली.. संगीताची भाषा बदलली आणि नाईन्टीजचा तो सांगितीक सुवर्णकाळ सुरू झाला.. सुरूवातीला आशिकी फक्त म्युझिकल अल्बम होता.. गुलशन कुमार यांना कोणीतरी पिन मारली की अरे ही गाणी म्हणजे पाकिस्तानी सुफी म्युझिक वाटतंय, अजिबात चालणार नाही.. गुलशन कुमार यांनी तो अल्बम थांबवण्याचा निर्णय घेतला.. त्यानंतर महेश भट यांनी गुलशन कुमार यांची समजूत काढली.. हा अल्बम करीअरचा गेमचेंजर आहे, चालला नाही तर दिग्दर्शन सोडेन असं भट यांनी गुलशन कुमार यांना कागदावर लिहून दिलं.. आणि त्यानंतर काय झालं.. ते नव्यानं सांगायची गरज नाही. नजर के सामने जिगर के पास.. कोई रहता है, वो हो तुम.. या गाण्यासाठी समीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.. अनुराधा पौडवाल, कुमार सानु, नदीम-श्रवण यांना फिल्मफेअर मिळालं.. त्यांनंतर पुढचा दशकभर नदीम-श्रवण आणि समीर या जोडीनं अक्षरश: धुमाकूळ घातला.. समीर यांच्या इच्छेखातर पहिला फिल्मफेअर पित्याच्या हातून देण्यात आला.. पाणावलेल्या डोळ्यांनी अंजान तेव्हा म्हणाले की, “यह समीर का सन्मान नही है, यह अंजान के दुसरी यात्रा की शुरूआत है.. और मै वादा करता हुँ के अबतक जो मुझे इंडस्ट्री ने नही दिया.. मेरा बेटा समीर मुझे देगा..” आशिकीच्या यशानंतर समीर यांच्याकडे निर्माते, दिग्दर्शकांची रांग लागली.. देखा है पहेली बार, साजन की आँखों मे प्यार.. शब्दांमधून संगीत वाजायला लागलं.. 91 मध्ये साजन आला.. समीर यांनी पुढचं पाऊल टाकलं होतं.. साजनचं टायटल ट्रॅक सिनेमा प्रदर्शनावर असताना समीर यांनी लिहिलं.. नदीम यांनी सुधाकर बोकाडेंना फोन करून सांगितलं.. “साजनचं टायटल ट्रॅक सापडलंय.. रेकॉर्डिंग करायचंय..” निर्माते बोकाडे म्हणाले “अरे सिनेमा रिलिज होतोय.. आता त्यात हे मध्येच काय..?” नदीम म्हणाले “एकदा गाणं ऐका मग ठरवा..” दुसऱ्या दिवशी सलमान आणि माधुरीनं ते गाणं ऐकलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी ऊटी ला जाऊन गाणं शूट केलं.. समीर यांच्या शब्दांनी गाण्याचं सोनं झालं.. अर्थात नदीम श्रवण यांच्या सुरावटीनं त्यावर कायम साज चढवला.. मेरा दिल भी कितना पागल है.. ये प्यार तो तुमसे करता है.. पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है.. किंवा... बहोत प्यार करते है, तुमको सनम.. तू शायर है, मै तेरी शायरी... तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है.. ही गाणी असो.. किंवा सगळ्यांच्या अगदी जवळचं.. जिए तो जिए कैसे, बिन आपके.. लगता नहीं दिल कहीं, बिन आपके.. हे गाणं असो.. आपल्या सगळ्यांना संगीतासोबतच शब्दांवर प्रेम करायला समीर यांनी शिकवलं.. त्यानंतर १९९२ मध्ये बेटा आणि दिवानाची गाणी समीर यांनी लिहिली.. कोयल सी तेरी बोली.. हे सुचण्यासाठी मनही पक्षी असावं लागतं.. ऐसी दिनावगी. कोई ना कोई चाहिएं प्यार करने वाला.. पायलिया हो हो हो हो.. सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही तेरे दर्द से दिल आबाद रहा, कुछ भुल गए कुछ याद रहा.. दिवानाची सगळीच गाणी सुपरहिट झाली.. तेरी उम्मीद, तेरा इंतजार करते है.. ऐ सनम हम, तो सिर्फ तुमसे प्यार करते है.. या गाण्याला १९९३ साली सर्वोत्कृष्ट गीतकाराचा सन्मान समीर यांना जाहीर झाला.. भरल्या सभागृहात नॉमिनेशनसाठी जो जिता वही सिकंदर साठी मजरूह सुल्तानपुरी आणि दिवाना साठी समीर यांची नावं आली.. नॉमिनेशनची नावं पुकारली गेली मजरूह साहेबांना वाटलं आपल्याला पुरस्कार मिळाला.. ते स्टेज कडे चालत गेले.. मात्र त्यानंतर घोषणा झाली.. the award goes to Sameer Ajaan for the song 'तेरी उम्मीद..' समीर यांना पेचप्रसंग होता.. ही वेळ कशी मारून न्यायची.. त्यावेळी त्यांना स्टेजवर जाऊन मजरूह सुल्तानपुरी साहेबांचे पाय पकडले.. समीर म्हणाले, “माझी इच्छा होती पहिला अवॉर्ड पित्याकडून घ्यावा आणि दुसरा गुरूकडून.. मजरूह साहेब इथे आहेत त्यांनी हा पुरस्कार द्यावा..” आणि मजरूह साहेबांनी तो फिल्मफेअर समीर यांना दिला.. साजन, दिवाना, साथी, अफसाना प्यार का, लाडला, अंजाम, जमाना दिवाना, असे ब्लॉकबस्टर सिनेमे येत गेले.. गाण्यांवरच सिनेमा हिट होत असे... समीर यांच्या लिखाणातला साधेपणा, कुठेही अवजड, अवघड, न समजणारे शब्द त्यांच्या गाण्यात कधीही नसत.. त्यामुळे ही गाणी सगळ्यांच्या जवळची होती.. १९९१ साली आलेल्या दिल है के मानता नही या सिनेमातली अनेक गाणी त्यांनी लिहिली.. मैनुं इश्कदा लगिया रोग, मेरे बचने की नैयो उम्मीद.. ओ मेरे सपने को सौदागर असो, किंवा आजही एखाद्याचा प्रेमभंग झाला की तो तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है.. तू पसंद है किसी और की तुझें चाहता कोई और है.. हे गाणं नक्की ऐकतो.. आपल्याला जगण्याला समृद्ध करणारी गाणी समीर आजही लिहिताहेत.. समीर यांनी गाजवलेला आणि आवर्जून उल्लेख करावा असा सिनेमा म्हणजे १९९३ साली आलेला रंग.. तुम्हे देखे मेरी आँखें, इसमे क्या मेरी खता है.. हाल क्या है मेरे दिल का, यह तो बस मुझको पता है.. किंवा मग ते तुझे ना देखुं तो चैन मुझे आता नहीं है, इक तेरा सिवा कोई और मुझे भाता नही है. सोबतच, दिल चिर के देख तेरा ही नाम होगा... अशी सरळसोट भाषा.. किंवा थोडंसं अवखळ वाटणारं.. नेहमीपेक्षा वेगळं वाटणारं गाणं म्हणजे.. हम तुम पिक्चर देख रहे हो, किसी थिएटर के अंदर. और बिजली चली जाएं. अंधेरा ही अंधेरा हो. और हाथों मे तेरे सनम हाथ मेरा हो.. अशा गाण्यांमधून समीर यांनी लिखाणात तारूण्य कायम ठेवलं.. १९९४ दिलवाले काही बोलायचं बाकीच राहिलं नाही.. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें.. सातो जनम मे तेरे मै साथ रहुंगा यार.. मौका मिलेगा तो हम बताएंगे, तुम्हे कितना प्यार करते है सनम.. जिता था जिसके लिएं, जिसके लिए मरता था.. एक ऐसी लडकी थी, जिसे मै प्यार करता था.. समीरचे बोल आणि नदीम-श्रवणचं म्युझिक म्हणजे सिनेमा सुपरहिट... सगळी व्यावसासिक गणितंच या जोडीनं बदलली.. हम है राही प्यार के हम से कुछ ना बोलिएं.. जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए.. ही एवढं सगळं मजरुह सुल्तानपुरी १९५८ साली सांगून गेले... पण १९९४ मध्ये समीर यांच्यापुढे पुन्हा हम है राही प्यार के लिहिण्याचं आव्हान आलं.. आणि समीर आपल्या शैलित लिहितात.. हम है राही प्यार के, चलना अपना काम, पलभर मे हो जायेंगी, हर मुश्किल नाकाम, हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे.. युहीं कट जायेंगा सफर साथ चलने से, के मंजिल आयेगी नजर साथ चलने से.. पुन्हा एक सुपरहीट.. ओ मेरी निंद मेरा चैन मुझे लोटा दो, असं म्हणत असतानाच.. घूँघट की आड से दिलबर का दीदार अधूरा रहता है.. जब तक ना पडे, आशिक की नजर सिंगार अधूरा रहता है.. या गाण्यासाठी समीर यांना तिसरा फिल्मफेअर मिळाला.. साल १९९५ चित्रपट राजा हिंदुस्तानी.. फूलों के मौसम में मिलने आते हैं पतझड़ में पंछी बनकर उड़ जाते हैं हँसती आँखों को आँसू दे जाते हैं वादा करके भी न वापस आते हैं परदेसी मेरे यारा गुज़रा ज़माना उसे याद रखना कहीं भूल न जाना परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के, मुझे छोड़ के मुझे समीर अक्षरश: शब्द जगले, आपल्यालाही जगायला शिकवलं.. मन का नगर था खाली सूखी पड़ी थी डाली होली के रंग फीके बेनूर थी दिवाली रिमझिम बरस पड़े हो तुम तो फुहार बन के मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार प्यार बन के आए हो मेरी ज़िन्दगी में तुम बहार बन के ही गाणी रिक्षा, टॅक्सी, बस स्टॅण्डवरच्या टपऱ्या, गुरं चारणाऱ्यांच्या पॉकेट रेडिओत आणि शेतात झाडाला टांगलेल्या बॉक्स रेडिओपासून आजच्या मुलांच्या मोबाईल प्लेलिस्टमध्ये अखंड वाजताहेत.. पण राजा हिंदूस्तानीनं समीर साहेबांना ते दिलं.. ज्याची प्रतिक्षा गेली कित्येक वर्ष करत होते.. आशिकी, दिल, साजन, दिवाना अशी सुपरहिट गाणी लिहूनही आनंद बक्षी साहेबांकडून समीर यांना कधीच दाद मिळाली नाही.. समीर यांनी विचारल्यावर ते कायम म्हणायचे.. “बेटा अच्छा कर रहे हो, लेकिन तु्म्हे और अच्छा करना है..” आणि एक दिवस रात्री आनंद बक्षी यांचा समीर यांना फोन आला.. बक्षी साहेब म्हणाले, “जा साला आज मैने तुझे दिलसे आशीर्वाद दिया.. आज मै तेरी एक पिक्चर देख के आया हुँ, राजा हिंदुस्तानी.. तबियत खुश हो गई..” समीर यांना वाटलं, परदेसी परदेसी, आए हो मेरी जिंदगी मे वगैरे हे आवडलं असेल.. पण उत्सुकता म्हणून त्यांनी विचारलं “पापाजी कौनसा गाना आपको पसंद आया..” बक्षी साहेब म्हणाले “तु ओ सब तो लिखता रहता है.. लेकिन तेरे इश्क मे नाचेंगे, ये गाना मैने सुना और मुझे आज लगा की अब फिल्म इंडस्ट्री को और एक गीतकार मिल गया है.. उसमे भी तेरी ओ लाईन.. तेरी तिजोरी का सोना नही, दिल है हमारा खिलौना नही.. कैसे खरीदोगे तुम प्यार मे, बिकते नही दिल ये बाज़ार मे वो चीज़ नही है हम, जो यु बिक जायेगे हम तो टकरायेगे, तेरे इश्क मे नाचेगे.... बेटा मैने बोला की अब ओ गीतकार आ गया, जो करेक्टर जिना सिख गया है, अब इसे रोकना मुश्कील है..” बक्षी साहेबांच्या या प्रेमानं समीर भरून पावले.. हे शब्द त्यांना ऑस्करपेक्षाही मोठे वाटतात.. समीर यांच्या यशात मोलाचा वाटा नदीम - श्रवण या जोडीचा आहे.. नदीम कायम म्हणायचे, “समीर जो बात जहा से कहोंगे वहा असर करेंगी, दिमाग से करोगे तो दिमाग पे लगेगी, दिल से करोगे तो दिल पे लगेगी और रूँह से करोंगे तो रूँह पे जा के लगेंगी.. वहाँ तक डुबना पडेंगा..” नदीम हे समीर यांचं लिखान सुरावटींनी सजवून टाकत.. नव्वदच्या दशकात समीर हे मोस्ट डिमांडेड गीतकार होते.. आंटी नंबर वन, बिवी नंबर वन, नसीब, जिद्दी, जानवर, या चित्रपटांची गाणी हिट झाली.. आमीर खानच्या मन सिनेमातलं चाहा है तुझको, चाहुंगा हर दम मरके भी दिलसे, यह प्यार न होगा कम.. या गाण्यानं घायाळ प्रेमी मनाला पुन्हा सहारा दिला.. आवर्जून उल्लेख करावा असा चित्रपट म्हणजे सिर्फ तुम.. या सिनेमात नायक नायिकेला शेवटपर्यंत भेटत नाही.. पण त्यांच्या मनातलं प्रेम गाण्यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम समीर यांनी पेललं.. काश मेरा दिल भी कोई कागज़ का टुकड़ा होता, रात को तेरी बाहों में तकिये के नीचे सोता, हो केरल में गर्मी है नैनीताल से सर्दी भेजो, जो राहत पहुँचाए ऐसा कुछ बेदर्दी भेजो बिन तेरी यादों के इक पल जीना है मुश्किल कैसे लिख दूं कितना तुझको चाहे मेरा दिल अपनी इक तस्वीर लिफ़ाफ़े में रखकर भिजवा दो मैं खुद मिलने आऊंगी कुछ दिन दिल को समझा दो हे एवढं तरल आणि संवादात्मक गाणं फार ऐकायला मिळत नाही.. सिर्फ तुम मधील एक मुलाकात जरूरी है सनम हे गाणं त्याचंच एक उदाहरण.. यशाच्या परमोच्च शिखरावर असणाऱ्या समीर यांना १९९७ पर्यंत जवळपास एक दशकभर काळ इंडस्ट्रित झाला होता.. पण पण त्याच वर्षी काही घटना अशा घडल्या की ते पुरते ढासळले.. समीर यांचे वडील गीतकार अंजान यांचं निधन झालं, ९७ सालीच गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या झाली, नदीम काही काळासाठी भारत सोडून गेले.. त्यामुळे समीर यांचे पाठीराखे अचानक नाहिसे झाले.. त्यामुळे ते पुरते ढासळले.. अंजान यांच्या निधनानंतर त्यांनी वाराणसीमध्ये राहणं पसंत केलं.. परत यायचं की नाही असा नकारार्थी विचारही ते करत होते.. काही कामानिमित्त समीर मुंबईत आले असताना त्यांना एक फोन आला.. हा फोन त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला.. तो फोन होता दिग्दर्शक यश चोप्रा यांचा.. यश चोप्रा यांनी समीरला बंगल्यावर बोलावलं आणि एका युवा दिग्दर्शकाची ओळख करून दिली.. तो युवा दिग्दर्शक म्हणजे करण जोहर.. आणि तो सिनेमा होता.. कुछ कुछ होता है.. आणि इथून पुढे समीर यांची दुसरी इनिंग खऱ्या अर्थानं सुरू झाली.. कारण आता संगीत बदललं लोकांची आवड निवड बदलली.. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर समीर यांना नव्या दमाची गाणी लिहिण्याचं आव्हान होतं.. कुछ कुछ होता है ची गाणी जावेद अख्तर साहेबांनी लिहावं असं करण जोहर यांना वाटत होतं.. पण जावेद साहेबांना कुछ कुछ होता है.. हे शिर्षक अश्लिल वाटलं.. ते म्हणाले “शिर्षक बदला मी गाणी लिहितो..” पण करण जोहर यांनी तसं केलं नाही.. त्यामुळे समीर यांच्यावर ही जबाबदारी आली.. समीर यांना वाटलं जावेद साहेबांसारखी शायरी वगैरे करणला अपेक्षित असेल.. म्हणून त्यांनी बळंच आपली  शायरी लिहिण्याचा प्रयत्न केला.. ते ऐकून करण जोहर म्हणाले “समीर जी आप कॉलेज के लडकों के लिए गाने लिख रहे है.. हमे समीर के गाने चाहिएं.. जावेद साहाब के नही..” आणि त्यानंतर समीर लिहितात.. तुम पास आए, यूँ मुस्काराए तुमने ना जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल, जागे ना सोता है क्या करूँ हाय, कुछ कुछ होता है या गाण्यानं आशिकीनंतर दुसरा धमाका झाला.. लडकी बडी अंजाना है, सपना है सच है कहानी है.. यह लडका है दिवाना है दिवाना. कोई मिल गया, मै तो हिल गया, क्या बताऊं यारों. साजनजी घर आएं, दुल्हन क्युं शरमाएं. असं युवापिढीचं गाणं आकार घेत होतं.. कुछ कुछ होता है च्या प्रत्येक गाण्यात कुठेही थेट प्रेम व्यक्त करायचं नाही, पण प्रत्येक ओळीत प्रेम असावं अशी इच्छा करण जोहरची होती.. नायिका नायकाला शेवटपर्यंत आय लव्ह यू म्हणत नाही.. मात्र गाण्याच्या प्रत्येक ओळीत प्रेम व्यक्त करते.. वो चाँद मेरे घर-आँगन अब तो आएगा तेरे सूने इस आँचल को वो भर जाएगा तेरी कर दी गोद भराई किसी से अब क्या कहना. तुझे याद ना मेरी आई, किसिसे अब क्या कहना. सिनेमाच्या क्लायमॅक्सला रडवणारी गाणी फक्त समीरच लिहू शकतात.. कुछ कुछ होता है च्या गाण्यांनी प्रेमाची नवी परिभाषा लिहून काढली.. यानंतर शिकारी सिनेमातल्या बहोत खुबसुरत गजल लिख रहा हुं. तुम्हे देखकर आज कल लिख रहा हुं.. असं म्हणत समीर पुन्हा लिहू लागले.. त्यानंतर हर दिल जो प्यार करेगा आणि धडकन या लागोपाठ आलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर पुन्हा म्युझिकल कब्जा मिळवला.. तुम दिल की धडकनमे, रहते हो रहते हो.. मेरी इन सासों से कहते हो, कहते हो.. या गाण्यानं अनेकांची लग्न जुळली.. अन त्याच लग्नात दुल्हे का सहेरा, सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दिवाना लगता है.. अशी गाणीही वाजली.. ही जादू होती समीरच्या शब्दांची आणि नदीम-श्रवणच्या संगीताची.. २००१ मध्ये कभी खुशी कभी गमची गाणी समीर यांनी लिहिली.. त्यातलं शावा शावा माहिया वे शावा शावा हे गाणं अधिक आव्हानात्मक होतं.. अमिताभ, शाहरूख, काजोल, ऋतिक रोशन, करीना, जया बच्चन या सगळ्यांसाठी या गाण्यात वेगवेगळे मूड्स होते.. पण त्याला समतोल साधत समीर यांनी ते दिव्य पार केलं.. आशिक, एक रिश्ता, मुझे कुछ केहेना है.. आणि त्यानंतर पुन्हा एकदा समीर यांची गाणी जागोजागी वाजू लागली.. चित्रपट होता राज आपके प्यार मे हम सवरने लगे, देख के आपको हम निखरने लगे इस कदर आपसे हमको मोहब्बत हुई, टुँट के बाजुओं मे बिखरने लगे.. प्रेम व्यक्त करावं तर ते समीर यांनीच. यातच समीर पुढे लिहतात.. जो भी कस्मे खाई थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जिवनमे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है समीर लिहायला लागले की संगीताला पाझर फुटतो.. मै अगर सामने आ भी जाया करूं.. किंवा मग इतना मै चाहुं तुझे, कोई किसी को ना चाहे.. तु भी मुझसे प्यार करें, काश ओ दिन भी आएं.. पुढच्याच गाण्यात ते लिहितात.. कितना प्यारा है यह चेहरा जिस पे हम मरते है.. राज मधली गाणी आशिकी, राजा हिंदुस्तानी, कुछ कुछ होता है या सिनेमाच्या तोडीस तोड होती.. या प्रत्येक सिनेमात साधारण अनुक्रमे चार ते पाच वर्षांचं अंतर.. बदलतं संगीत, लोकांची आवडनिवड सांभाळत समीर आजही तेवढ्याच ताकदीचं लिहित होते.. राज मध्येच एक गाणं आहे.. यह शहर है अमन का, यहा की फिजा है निराली.. यहां पे सब शांती शांती है.. यहा पे सब शांती शांती है.. बदललेल्या काळात कथेला साजेसं लिखाण कसं असावं याचं विद्यापीठ म्हणजे समीर अंजान.. वाढत्या वयासोबत समीर आणखी तरूण होत आहेत.. नाचुं ओढनी ओढ के यार, के दिल परदेसी हो गया.. हमे तुमसे हो गया प्यार, के दिल परदेसी हो गया.. समीर फिर छा गएं.. चित्रपटाचं नाव सांगायची गरज नाही.. तेरे नाम.. नैनो से बहते अश्को के धारों मे हमने तुमको देखा चांद सितारों मे बिरहा की अग्नी मे पल पल तपती है अब तो साँसो तेरी माला जपती है तेरे लिए इस दुनिया का हर सितम है गवारा सनम.. तेरे नाम हमने किया है, जीवन अपना सारा सनम.. या सिनेमानं माहेरच्या साडीसारखं सगळ्यांना रडवलं.. क्यु किसी को वफा के बदले वफा नही मिलती.. यह प्यार क्यु होता है.. नारळ फोडावा तसं हुंदका फोडायला लावणारी ही गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.. पण व्यावसायिक गणितांमध्ये तेरे नाम अपयशी ठरला.. यानिमित्तानं हिमेश रेशमिया सारखा उमदा संगीतकार इंडस्ट्रीला मिळाला.. पण या अशा गाण्यांनी गल्ला जमवता येत नाही हे हिमेश रेशमिया यांनी ओळखलं.. आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चात पाश्चिमात्य मिश्रित गाण्यांकडे वळवला.. आशिक बनाया आपने, तेरा सरूर अशा गाण्यांनी हिमेश रेशमिया यांना तारलं.. २००६ साली अक्सर साठी समीर यांनी गाणी लिहिली.. झलक दिखला जा, लागी लागी, सोनिये.. ही अशी गाणीही त्यांनी लिहिली.. २ वर्षांआधीच्या तेरे नाम आणि आताच्या अक्सरमध्ये ३६० डिग्रीचा फरक होता. पण बदल स्वीकारत समीर लिहित होते.. त्यानंतर धूम, भुल भुलैया या सिनेमांसाठा समीर यांनी गाणी लिहिली.. डोली मे बिठा के सितारों से सजाके जमाने से चुराके ले जायेंगा, सावरिया.. असं म्हणत समीर यांना भंसाळींच्या सावरियानं समीर यांना पुन्हा सावरलं.. कारण आता हिंदी सिनेमा अती प्रोफेशनल झाला होता.. रेस, सलाम ए इश्क मधली गाणी लिहून समीर अजूनही या स्पर्धेत टिकून होते.. त्यांच्या सोबतच्या अनेकांचं करीअर आतापर्यंत संपलं होतं.. पण बदलत्या काळाची पावलं समीर यांनी ओळखली.. आता दोन दशकं झाली.. समीर यांनी २००९ मध्ये जी गाणी लिहिली त्यावर आपला विश्वास बसणार नाही.. विलायती पी गए बा देसी अभी बाकि है हेलो मिस्टर डीजे, मेरे गाने प्लीज प्ले आज नो वाइन आज नो लागा, आज पियेंगे शम्पियन बा बा बा बूजिंग, डांसिंग एंड वी क्रुजिंग बाउंसर पंगा लेता है तो, गोटा कीप इट मूविंग चार बज गए लेकिन चार बज गए लेकिन पार्टी अभी बाकि है बा बा बा, विद दी बुजे ऐ टल्ली गिर गए लेकिन पार्टी अभी बाकि है आजपर्यंतच्या समीर यांच्या प्रतिमेला तडा देणारं हे गाणं होतं.. सागर के पानी मे मौजे है जितनी हम को भी तुमसे मोहब्बत है उतनी.. हे असं लिहिणारा गीतकार आलतू जालतू, आई बला को टाल तू.. टेन्शन वेन्शन छोड दे बच्चा हो जा फुल्ली फालतू.. असं काहीतरी ते चित्रविचित्र लिहू लागले.. पण डिमाण्ड तसा सप्लाय नियम पाळला नाही तर तुम्ही लगेच आऊट होता.. समीर यांना अजून खेळपट्टीवर खेळायचंय.. त्यामुळे त्यांच्या या गाण्यांनी भुवया जरी उंचावल्या तरी लोकप्रीयता कायम ठेवली.. आणि हो मी हे सुद्धा लिहू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं.. दुनिया चले पिछाडी, तो मै चलुं अगाडी सब खेल जानता हुँ, मै हुं बडा खिलाडी सुमडी मे लेके जाऊं, और सबको मै बताऊं क्या.. चिंता ता चिता चिता.. चिंता ता ता.. हे असं काहीतरी भन्नाट घेऊन समीर रावडी राठोड झाले.. बक्षी साहेबांनी सांगितल्या प्रमाणे समीर कॅरेक्टर जगत होते.. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गयां.. ,  छम्मक छल्लो, आ रे प्रीतम प्यारे.. अशी भन्नाट गाणी हिट झाली.. २०१३ साली दबंग -2 आला.. दगाबाज़ रे … हाय दगाबाज़ रे तोरे नैना बड़े दगाबाज़ रे कल मिले .. हा कल मिले हाय कल मिले इ हमका भूल गए आज रे.. पुन्हा एकदा समीर यांचा जलवा.. आता ३० वर्षांचा काळ लोटून गेला होता.. पण समीर यांच्या गाण्यांमधला इनोसन्स अजूनही कायम होता.. तेरे नैना बडे कातिल मार ही डालेंगे... काय म्हणावं या माणसाला रोमारोमात याच्या रोमान्स आहे.. तो एकीकडे, दर्द दिलों के कम हो जाते.. मै और तुम गर हम हो जातें.. असं काहीतरी सेन्टी लिहित असतो.. तर दुसरीकडे.. तु खिंच मेरी फोटो, तु खिंच मेरी फोटो पिया... असं अॅन्ड्रॉईड गाणंही तितक्याच दिलखुलासपणे लिहितो.. खरंतर अशा पाच दहा हजार शब्दांमध्ये या माणसाला सामावून घेणं केवळ अशक्यप्राय आहे.. ७०० पेक्षा अधिक चित्रपट आणि सुमारे साडे चार हजार पेक्षा अधिक गाणी लिहिणारा हा अवलिया माणूस जगात एकमेव आहे.. ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ झालाय.. त्यांच्यासोबतच्या अनेकांचं करीअर संपलंय.. पण समीर आजही लिहिताहेत.. त्यांच्यातला तो घायाळ प्रेमी आज वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर आहे.. म्हणूनच ते मोस्ट रोमॅण्टिक मॅन इन द वर्ल्ड ठरतात.. समीर साहेब, तुम्हाला दोन्ही हातांनी मुजरा आणि खूप शुभेच्छा..
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special ReportJayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.