एक्स्प्लोर

ट्रम्प यांची निवड आणि अमेरिकेतील विचार स्वातंत्र्य

लोकशाहीच्या अनेक व्याख्या केल्या जातात. पण लोकशाहीचं सर्वात मोठं लक्षण आहे, ते विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचं स्वातंत्र्य आणि सर्वसामान्यांना विचार स्वातंत्र्य मिळणं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेत याच विचार स्वातंत्र्यावर गदा येईल की काय अशी भीती अनेकांना वाटते आहे. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्सच्या पुरस्कार सोहळ्यात सीएनएनची दिग्गज पत्रकार ख्रिस्तियन अमानपोरनं तर म्हटलंच आहे, “अमेरिकेत पत्रकारांच्या विचारस्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची मागणी करण्याची वेळ माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं.” ख्रिस्तियनच्या मनातली भीती अनेकांनी बोलून दाखवली, विशेषतः न्यूयॉर्कमध्ये. पण त्याचवेळी त्या भीतीचा सामना करण्याची ताकदही अमेरिकेत आहे, असा आशावादही दिसून आला. न्यूयॉर्कची ओळख असलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहायला गेले होते, तेव्हाची गोष्ट. हडसन नदीच्या खाडीत लिबर्टी बेटावरचा हा भव्य पुतळा म्हणजे फ्रान्सनं अमेरिकेला दिलेली भेट आहे. अमेरिकन राज्यक्रांतीनंच फ्रेन्च राज्यक्रांतीला प्रेरणा दिली होती आणि या दोन देशांमधल्या क्रांतीनंच आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाया घातला होता. आज अमेरिकेत आणि फ्रान्समध्येही लोकशाहीचा पाया डळमळीत झाल्याचं चित्र असताना या पुतळ्याविषयी लोकांना काय वाटत असावं असा प्रश्न पडला. ट्रम्प यांची निवड आणि अमेरिकेतील विचार स्वातंत्र्य मॅनहॅटन मागे सोडून बोट जशी या पुतळ्याकडे जाऊ लागते, तसं आपणही इतिहासात मागे जात असल्यासारखं मला वाटलं. पुतळ्याच्या भव्यतेनं थक्क व्हायला झालंच, पण त्याहीपेक्षा लक्ष वेधून घेतलं ते तिथं जमलेल्या गर्दीनं. दररोज जगाच्या कानाकोपऱ्यातले हजारो लोक या पुतळ्याला भेट देतात. माझ्यासोबतच्या गटातली माया मॅनहॅटनची रहिवासी आहे आणि एका आर्ट गॅलरीसाठी काम करते. माया आपल्या मुलाला हा पुतळा दाखवण्यासाठी घेऊन आली होती. “मला येता-जाता अनेकदा हा पुतळा दिसतो. पण रोजची सवयीची झालेल्या गोष्टीचं महत्व अचानक लक्षात येतं, तसं झालं आहे. म्हणूनच माझ्या मुलाला मुद्दाम घेऊन आले आहे. You know, she looks stunning on stormy days. वादळादरम्यान या पुतळ्याचं खरं सौंदर्य दिसून येतं. कदाचित न्यूयॉर्कचा आणि आमच्या देशाचा पाया किती मजबूत आहे, हे आता दिसून येईल.” एका जमान्यात जगभरातले लोक न्यूयॉर्कमध्ये, नव्या जगात नवं आयुष्य उभं करण्याच्या इराद्यानं पाऊल टाकायचे, तेव्हा त्यांना याच पुतळ्याचं दर्शन व्हायचं. "तुमचे थकलेले, गरीबीनं गांजलेले आणि स्वातंत्र्याच्या शोधात भटकणारे आत्मे मला द्या. मी सोन्याच्या दरवाज्याजवळ माझा दिवा उंचावून उभी आहे." अशा आशयाच्या ओळी या पुतळ्याच्या पायथ्याशी आहेत. पण आजच्या अमेरिकेत निर्वासितांचं असं खुल्या दिलानं स्वागत होईल का हा प्रश्नच आहे. लिबर्टी बेटापासून जवळच एलिस आयलंड आहे. न्यूयॉर्कमध्ये येणाऱ्या निर्वासितांच्या आणि स्थलांतरीतांच्या बोटी याच बेटावर येत असत. 1892 ते 1954 या साठ वर्षांच्या कालावधीत जवळपास सव्वा कोटी निर्वासितांनी या बेटावरुन अमेरिकेत प्रवेश केला. आज त्या जागी उभं राहिलंय म्युझियम ऑफ इमिग्रेशन. त्या काळात लोक कसा प्रवास करत असत, त्यांना कुठल्या वैद्यकीय तपासण्यांना आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागायचं, काळासोबत ही प्रक्रिया कशी बदलत गेली, जगभरातील निर्वासित आणि स्थलांतरीत नागरिक आपला देश का सोडतात याविषयीची माहिती इथं मिळते. Registry Room at Elis Island-compressed याच संग्रहालयात माझी पॉलशी ओळख झाली. पॉलनं वयाची साठी गाठली आहे. “माझे आजी-आजोबा गेल्या शतकाच्या सुरूवातीला आयर्लंडमधून न्यूयॉर्कला आले होते. काही वर्षांपूर्वी मी इथल्या रजिस्ट्रीमध्ये त्यांची नावंही शोधून काढली. तेव्हापासून, म्हणजे जवळपास 20 वर्षांपासून मी दरवर्षी एकदा तरी इथं येतो. आता यावर्षी मुद्दाम माझ्या नातवंडांना घेऊन आलो आहे. They should always remember – America is country of immigrants.” अमेरिका स्थलांतरितांनी उभारलेला देश आहे, हे पुढच्या पिढीला सांगण्याची आता जास्त गरज आहे असं पॉलला वाटतं. ट्रम्प सत्तेत आल्यानं अमेरिकन संस्कृतीचा खुलेपणा हरवत जाईल अशी भीती त्याला वाटतेय. न्यूयॉर्कर्स असे खुल्या दिलानं आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. पण न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका नाही, असं आमच्यासोबतच्या एका शिक्षिकेनं निक्षून सांगितलं. कॅथरिन मूळची साऊथ कॅरोलिनाची. तिनं ट्रम्प यांच्या बाजूनं मतदान केलं होतं. कॅथरिनच्या मनात कशाचा तरी राग, घृणा असल्याचं जाणवलं. मी पर्यटनासाठी आले आहे आणि भारतीय आहे म्हटल्यावर ती जरा निवळली. “अमेरिकेनं आजवर जगाचा विचार केला. जरा स्वतःपुरता विचार केला, तर काय बिघडतं, असा सवाल तिनं केला”. कॅथरिनच्या या प्रश्नावर माझ्याकडे तरी उत्तर नव्हतं. पॉलनं फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि खांदे उडवले. “स्वतःपुरता विचार करताना आपण आपल्याच घरात फूट पाडतो आहोत, कधीही कोसळेल सगळं, तेव्हा जरा काळजी घ्या.” पॉलच्या या टिप्पणीवर कॅथरिन चिडून निघून गेली. मला काय बोलावं कळत नव्हतं. पॉलनं मग भारताविषयी बोलण्यास सुरुवात केली. “I love India. मी भारतात काही महिने राहिलो होतो. तुमचा देश मला जास्त सुधारलेला वाटतो. एवढे भेदाभेद असतानाही तुम्ही टिकून आहात. ब्रिटननं तुमच्यावरही अन्याय केला, पण तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली. सगळे लोक एकमेकांसोबत कसे मिळून मिसळून राहता. एवढा मोठा देश म्हटल्यावर भांडणं होणारच. भारतातही असतील, अमेरिकेत तर आहेतच. पण एकमेकांविषयी इतकी घृणा का वाटते आहे लोकांना?” पॉलच्या मनातलं भारताविषयीचं चित्र बदलावंस मला अजिबात वाटलं नाही आणि त्याला पडलेल्या प्रश्नावरही मी काही बोलू शकले नाही. ट्रम्प यांची निवड आणि अमेरिकेतील विचार स्वातंत्र्य आमची बोट मॅनहॅटनला परतल्यावर मी नाईन इलेव्हन मेमोरियलला भेट दिली. 11 सप्टेंबर 2001 रोजी इथंच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवर्सवर अल कायदाच्या अतिरेक्यांनी विमानं धडकवली होती. आज त्या दोन टॉवर्सची आठवण म्हणून इथं दोन छोटे चौकोनी तलाव उभारण्यात आले आहेत. तळ्याच्या चारही बाजूंनी सतत पाणी संथपणे झुळझुळत राहतं आणि तळ्याच्या मधोमध असलेल्या खोल भागाकडे वाहात राहतं. चारही बाजूंच्या कठड्यांवर 9/11च्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची नावं कोरण्यात आली आहेत. एखाद्याचा वाढदिवस असेल तेव्हा तिथं फुलं अर्पण केली जातात. शेजारीच 9/11च्या हल्ल्यातून बचावलेलं एकमेव झाड उभं आहे. वाहत्या पाण्याचा आवाज, मावळत्या सूर्याचा प्रकाश आणि तळ्यांच्या मागे उभा राहिलेला वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नवा टॉवर अर्थात फ्रीडम टॉवर... उध्वस्त झालेल्या ग्राऊंड झीरोवर आज इतकं सुंदर स्मारक उभं राहिलं आहे. ट्रम्प यांची निवड आणि अमेरिकेतील विचार स्वातंत्र्य एवढ्या मोठ्या संकटातून अमेरिकेनं स्वतःला सावरलं, पुन्हा टॉवर उभे केले. हा देश इतक्यात मोडणारा नाही. 9/11नंतर अमेरिका बदलली. जगही बदलत गेलंय. कदाचित येत्या काळात आणखी वेगानं बदल होतील. कदाचित चांगलं, कदाचित वाईट. पण त्या प्रत्येकातून सावरण्याची ताकद मानवतेला मिळू दे, अशीच प्रार्थना करावीशी वाटते.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Embed widget