एक्स्प्लोर

BLOG | अठराशे रुपयांची जबाबदारी कोणाची?

तुमचा मोठेपणा तुम्ही समोरच्याला कशाप्रकारे समजावून सांगता, समजून घेता त्यावरून सिद्ध होतो. एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा व्हिडीओ काढून आणि तो व्हायरल करून नव्हे.

अठराशे रुपयांवरून एका काकूंचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. सगळ्यांनी खूप मजा घेतली. त्या काकूंच्या अशिक्षितपणाची टरही उडवली गेली.

पण सुशिक्षित अडाणी इथे कोणालाच दिसले नाहीत. आता हे सुशिक्षित अडाणी कोण तर त्या मावशींसोबत हुज्जत घालणारी मुलं.

कोरोनाकाळात त्या मावशींनी या मुलांच्या घरी काम केलं. त्या नसत्या तर त्या मुलांच्या घरात इकडचं पान तिकडे हललं नसतं.

ठीक आहे त्यांना आकडेमोड नाही कळत पण त्यांना ती समजावून सांगण्याची जबाबदारी त्या मुलांची होती. आपल्या शिक्षणाचा किंवा समजूतदारपणाचा कधी माज नसावा. समोरच्या व्यक्तीला त्याच्या लेव्हलला जाऊन कोणतीही गोष्ट शिकवता यायला हवी.

शाळेत असताना आपल्याला काही शिक्षक/आई बाबा कशाप्रकारे समजून सांगायचे. अगदी समजावून. कारण ते आपल्या लेव्हलला येऊन गोष्टी समजावून सांगायचे. मग तो एखादा व्यवहार असुदे, काही माहिती असुदे. त्यामुळे अशा लोकांसाठीचा रिस्पेक्ट वेगळा असतो. तुमचा मोठेपणा तुम्ही समोरच्याला कशाप्रकारे समजावून सांगता, समजून घेता त्यावरून सिद्ध होतो. एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा व्हिडीओ काढून आणि तो व्हायरल करून नव्हे.

असंही नाही की ती मुलं अतिशिकलेली महान होती. आपल्या पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचं पॅकेज मधे करोनाकाळात जाहीर केलं होतं, त्या 20 वर किती शून्य होते हे सांगायला पण त्याचं घेतलेलं शिक्षण कामाला आलं असतं.

स्पायडरमॅन सिनेमातील पीटर पारकरचं एक तत्त्व आहे. With Great Power Comes Responsibility

इथे या तरुणांकडची पॉवर म्हणजे त्यांच्याकडे असलेला सोशल मिडिया. पण तो वापरायचा कसा, त्याची रिस्पॉन्सीबिलिटी काय हे जाणून घेण्यात ते असमर्थ ठरतायत. आपण शिकलेले आहोत आणि ती जबाबदारी आपण समजून घ्यायला हवी त्याचा योग्य वापर करायला हवा. शिक्षण हे फक्त स्वतःकडे घेऊन ठेवण्याची गोष्ट नाही. ते दुसऱ्याला दिल्याने आपणही तितकेच समृद्ध होतो.

याच मावशींच्या जागी स्वतःची आई असेल, तर असा चेष्टेचा व्हिडीओ व्हायरल करायची हिम्मत कोणत्याची व्यक्तीची झाली नसती. अजून काही वर्षांनी कोणाला विचारलं तर चारआणे-आठआणे-बाराआणे म्हणजे काय हे सुद्धा विस्मरणात जाईल. इंग्रजी मीडियमच्या बऱ्याच मुलांना आत्ता बाराआणे म्हणजे किती विचारलं तर ते नाही सांगता येणार. मग ही तर 1800 ची गोष्ट.

माझी आजी गावी असते. शिक्षणाशी तिचा असा काही संबंध नाही. पैशाचे व्यवहार तिला जमतात, पण अंकांच्या बाबतीत 20 पर्यंतचे अंकच तिला येतात. दिवाळीत एकदा आम्ही खूप सारे लाडू केले. त्या लाडवाचे ती 20-20 चे गठ्ठे मोजून सगळे डब्यात ठेवत होती. म्हणजे अंकगणिताशिवात तिचं काही अडलं नाही. तिच्या गरजेपुरतं तिला येत होतं. तिने ते शिकून घेतलेलं. व्यवहारात ती पक्की आहे. पण अजूनही खूप मोठे आकडे आले की ती आम्हाला विचारते आणि तिने ज्यापद्धतीने आम्हाला लहानपणापासून जगणं समजावून शिकवलं तसंच आम्हीही तिला ते समजावून सांगतो.

एक फेमस कॉमेडी शो आहे, ज्यात अनेक कलाकार येत असतात. त्यात एका जोडप्याला विचारलं गेलं, केळी डझनने मिळतात की किलोने??? कांद्याची किंमत काय आहे??? आणि अशा प्रश्नांची मिळालेली उत्तरं इतकी हास्यास्पद होती. पण ते व्हिडीओ का बरं व्हायरल नाही झाले??? पण या गरीब काकू आपल्या हक्काच्या पैशांबाबत बोलतायत तर त्याचा व्हिडीओ मात्र भरधाव वेगाने व्हायरल होतो. नसेल कळत त्यांना हिशोब. त्यांना समजावणं तुमची जबाबदारी होती.

अजून उदाहरण घ्यायचं तर बरीच मुलं खेड्यातून शहरात शिकायला येतात, वेगवेगळे कोर्स करतात. पण बऱ्याच जणांच्या आईबाबांना नाही सांगत येत त्यांचा मुलगा किंवा मुलगी नक्की काय करते. चांगल्या कंपनीत आहे इतकंच माहिती असतं. कोर्सची नावं, त्यांचे लाँगफॉर्म आणि मराठी अर्थ इतके कठीण असतात. त्यामुळे कंपनी चांगली आहे. आपला मुलगा/मुलगी सुखरूप आहे. यातच ते समाधानी असतात. आणि यात त्यांची काही चूक नसते. हे साहजिक आहे. त्यामुळे कोणाचीही कशीही चेष्टा करून आपलाच शिक्षण घेऊनही राहिलेला अडाणीपणा दिसून येतो.

सोशल मीडिया हा लिहिण्याचा वेगळा विषय आहे. त्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा हेच जर कळत नसेल. आणि ते ही दिवसातले 15 तास सोशल मीडियावर घालवणारेच असं वागत असतील. तर जबाबदारीची जाणीव करून देण आपलं कर्तव्य आहे.

1800 रुपायांच्या आकड्यांवरून जर आपण एखाद्या साध्या बाईला इतकं ट्रोल करत असू तर कोरोनाचं संकट जे जगभर आहे त्याला देवाची करणी म्हंटलं जातं, कांदा शंभरीपार गेल्यावर आमचे कुटुंबीय कांदा, लसूण सारखे पदार्थ जास्त खात नाहीत, ऑटो सेक्टर मध्ये मंदीचं कारण शहरी भागात वाढलेला ओला उबेरचा प्रभाव अशी उत्तरं मिळतात, आणि अशी उत्तरं देणारी व्यक्ती आपली अर्थमंत्री असते, जिथे आकड्यांमध्ये खेळणारी अर्थव्यवस्था मायनस मध्ये डगमगतेय. पण ठराविक सोडले तर यावर कोणी बोलत नाही.

पण या मावशी त्यांच्या 1800 रुपयांसांठी झगडतायच. ते ही त्यांच्या हक्काचे, कष्टाचे 1800 रुपये. इथे शिक्षण किंवा पैसे किती हे मॅटर नाही करत, मॅटर करतंय ते त्या व्यक्तिचं कष्टाच्या मोबदल्याचं डेडिकेशन. 1800 रुपयांसाठी त्या काकू आणि मुलांमध्ये वाद-प्रतिवाद करताय, त्याचं किती बरोबर किती चूक त्यांना नाही कळत आहे. पण त्यांच्या कामाबद्दलचं, घामाबद्दलचं मोल त्या मागतायत. पण इथे देशावर इतकं मोठं कर्ज आहे... जीडीपी मध्ये प्रचंड घट आहे. कोरोनाची महामारी आहे या गोष्टींना ऍक्ट ऑफ गॉड असं गोंडस नाव दिलं जातं. एखादी व्यक्ती 1800 रुपयांसाठी लढू शकते, झगडू शकते, कन्फ्युज होऊ शकते. पण देशाच्या अर्थव्यववस्थेबाबत इतका गंभीर विचार नाही केला जात. 1800 रुपयांसाठी त्या काकू ज्या जिवाच्या आकांताने भांडतायत त्यातला थोडा जरी उत्साह अर्थव्यवस्था नीट राहण्यासाठी केला तरी देशाच्या फायद्याचं आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
ABP Premium

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget