एक्स्प्लोर

जाखणगावातल्या जलरागिणी

ही गोष्ट आहे सीमाताईंची. सीमा हिरे, जाखणगावच्या रहिवासी. 1996 साली सीमाताई लग्न करून जाखणगावात आल्या. नवी नवरी, त्यामुळे स्वाभाविक डोळ्यात नवी स्वप्नं आणि आशा. पण जाखणगावातल्या पाण्याच्या टंचाईने लोक बदलले आणि पाण्याने परिवर्तन घडवलं. एखाद्या पिक्चरमध्ये शोभेल अशी ही स्टोरी. पण हे वास्तव आहे मुंबई-पुण्यापासून अवघ्या काहीशे किलोमीटर्सवर असलेल्या सातारा जिल्ह्यातलं. नव्याचे नऊ दिवस कधी संपले हेच समजलं नाही. सीमा ताई साताऱ्यातल्या जिहे-कटापूर गावच्या. गावातून कृष्णा नदी वाहते. त्यामुळे पाण्याची टंचाई काय असते हे सीमाताईंना लग्न होईपर्यंत माहितच नव्हतं. माहेरी अमाप पाण्यामुळे तशी पाण्याची किंमत समजलीच नव्हती. पण लग्न झालं आणि जाखणगावानं पाण्यासाठी परीक्षाच घेतली. खरतरं सीमाताईंनी लहानपणापासून पाण्याची टंचाईच पाहिली नव्हती. त्यामुळे सीमाताईंना जरा जास्तच पाणी उपसण्याची सवय. घरातले लागले ओरडायला. संसारात रुळतात न रुळतात तोच हंडे-कळशा घेऊन पाण्याच्या रांगेत. खरंतर गावात डिसेंबरपासूनच टँकर बोलवायला लागायचा. पण एक टँकर थोडाच गावाला पुरतो. गावात एक मंदिर आहे, या मंदिराच्या नळाला जरा पाणी यायचं. रेशनच्या दुकानावर लावतो तशा रांगा सीमाताईंनीही लावल्या. दिवस-रात्र पाण्यासाठी रांगेत उभं राहिल्यावर कुठे थोडं-फार पाणी मिळायचं. त्या रांगेत सीमाताईंना अनेकदा माहेरच्या गावी खळाळत वाहणाऱ्या कृष्णामाईची शंभरदा आठवण यायची. इथला नेमलेला माणूस सर्वांना पाणी मापून द्यायचा. थोडं कमी जास्त झालं, नंबर मागे पुढे झाले की एकमेकांना शिव्या हासडत, झिंज्या उपटत बायकांची भांडणं ठरलेली. अगदी WWE चा आखाडाच रंगायचा.. गमतीचा भाग म्हणजे जाखणगावातल्या मुलांचे या पाण्याने हालच केले. जाखणागावात कुणी आपली मुलगीच द्यायला तयार होईना. लग्नाळू मुलं बिचारी वेगळ्याच अडचणीत सापडली. जाखणगावातल्या जलरागिणी घरातली जनावरं चारा नसल्यानं विकावी लागली. शेती नाही, उद्योग नाही. घर नीट चालावं आणि रोजगारासाठी सीमा ताईंच्या मिस्टरांनीही घर आणि गावं सोडलं आणि शहरात आले. पाण्याच्या प्रश्नानं अख्ख्या घराची ताटातूट केली. साधारण 2010 नंतर हे चित्र बदललं. गावात श्रमदानातून पाणी आलं. आता सीमाताईंचं शेत-शिवार उत्तम आहे आणि त्यांचे कारभारीही गावात परतलेत. या गावात पाण्यासाठी माणसं माणसांच्या जीवावर उठलेली, भावकीत उभी भांडणं, गावातून होत असलेलं स्थलांतर.. या संकटांवर मात करत या गावाने आता महाराष्ट्रासमोर पाणी कमावण्याचा नवा आदर्श ठेवलाय. आणि अशा जाखणगावात आम्ही 15 जणी पोहोचलो. निमित्त होतं जागतिक महिला दिनाचं. खरंतरं एखाद्या कामासाठी गावात जाण्याची किंवा तिथे राहण्याची काही पहिली वेळ नव्हती. माझं गाव कोकणात असूनही घरात नळाला पाणी आल्याचं मला आठवत नाही. हंडा-कळशा घेऊन सकाळी सगळ्यांची वरात विहीरीवर जायची. मिळेल तसं पाणी मिळवायचो. गणेशोत्सवाच्या काळात घरात गणपती असायचा. पण एक तास हा बाप्पा घर सांभाळत एकटाच बसायचा. कारण आम्ही सगळे मिशन पाण्यावर. हा रोजचा दिनक्रम. मे महिन्याच्या सुट्टीत मी कधीच गावी गेले नाही. याला कारण म्हणजे घरातल्यांकडून पाणी टंचाईच्या ऐकलेल्या भीषण कहाण्या. त्याचा धसकाच घेतला. इतका की घरचे आंबे खाण्याचा मोहही त्यापुढे आवरला. पुढे सासरी आल्यावरही काही वेगळं चित्र नाही. सासरी तर गावात नदी असूनही पाण्याचा तुटवडा. सो, हीच परिस्थिती सर्वात भयंकर असा माझा समज. पण जाखणगावात गेल्यावर समजलं की "पाण्यासाठी दाही दिशा" म्हणजे नेमकं काय.. जाखणगावातल्या जलरागिणी जाखणगावात खरंतर आम्ही खूप रात्री पोहोचलो, गावाची निवांत झोपेत जाण्याची वेळ आणि आमचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्वागत झालं, जेवण झालं. जेव्हा गावातल्याच ताई-वहिनी आमच्यात मिसळल्या तेव्हा दोघांच्याही मनात प्रश्न नक्कीच होता की आपण नक्की पुढचे काही तास एकमेकींशी जुळवून घेऊ शकू ना.. पण पाणी फाऊंडेशनच्या वेगवेगळ्या खेळांनी आणि मोकळ्या वातावरणाने हा प्रश्न लगेचच सोडवला.. आम्हा शहरातल्या मुलींना वाटतं की आमचं आयुष्य किती दगदगीचं, मेहनतीचं आहे. रोजचा तास-दोन तासांचा प्रवास, ऑफिसमधली स्पर्धा, शारीरिक-मानसिक थकवा आणि बरंच काही. पण गावाकडल्या या सर्वजणींची आव्हानं आमच्यापेक्षा नक्कीच मोठी आणि कठीण आहेत. खरं तर घरात पाण्याची सर्वाधिक गरज ही स्त्रीला असते. नळावर होणाऱ्या भांडणांचा सामनाही तीच करते. सो, पाण्यासाठी ती जोवर काही गोष्टी सिरीअसली घेत नाही तोपर्यंत गावात पाणी खेळणार नाही याचा अंदाज पानी फाऊंडेशनने कदाचित घेतला असावा. कारण गावात स्वकष्टाने पाणी आणल्यानंतरचा या गावातल्या महिलांचा आत्मविश्वास नक्कीच दखल घेण्यासारखा होता. ज्या पद्धतीने त्या आमच्यात मिसळल्या, आमच्यासोबत खेळ खेळल्या, बोलल्या, हसल्या आणि भटकल्या त्यात कुठेही रुढी-परंपरांचं जोखड त्या मिरवत नव्हत्या. जाखणगावातल्या जलरागिणी खरोखर, ऑफिस, घर, मॉल, हॉटेल मी कुठेही गेले तरी पाणी कायमच सोबत होतं. मला आठवतंय गेल्या वर्षी पाण्याच्या प्रचंड कमतरतेमुळे घरी केवळ अर्धा तासच पाणी यायचं. त्या अर्धा तासातली धावपळ, चिडचिड मला नकोशी झाली होती. मी तर हे सगळं दोनच महिने सहन केलेलं. पण अजून अशा अनेकजणी आहेत ज्यांच्या आयुष्यातली पाण्याची वणवण थांबता थांबत नाहीए.. आपल्याकडे एखाद्या गोष्टीला जोवर ग्लॅमर व्हॅल्यू मिळत नाही तोवर ती बाब लोकांच्या डोक्यातच शिरत नाही असं वाटतं. पानी फाऊंडेशन आणि आमीर खानच्या पुढाकारानं आणि सहभागानं कदाचित हाय क्लास सोसायटीला घरात आणि परिसरात पाणी नसणं म्हणजे काय, पाण्याच्या अभावानं अनेकांचं आयुष्य थांबू शकतं हे थोड्याफार प्रमाणात तरी समजलं असावं आणि पाणी वाचवण्याचा किमान विचार तरी त्यांच्या मनात यामुळे आला तरी खूप. याऊपर त्यांनी दुष्काळ निवारणासाठी काही ठोस पावलं उचलली तर त्यांचे मनापासून आभार. जाखणगावातल्या जलरागिणी जाखणगावानं मला काय शिकवलं? नक्कीच आयुष्यात पाण्याचं मूल्य नव्यानं वाढवलं पण गावातला एक बदल अनेकींच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडवू शकतो आणि स्त्रीला आपल्या शक्तीची नव्यानं जाणीव करून देऊ शकतो हे ही दाखवून दिलं.. दोन दिवसांची मजा करून, गावाला दुष्काळमुक्त करण्यात खारीचा वाटा उचलून आम्ही मुंबईत परतलो. पण जाखणगावातला महिला वर्ग तिथेच आहे. जलरागिणी म्हणून आम्ही मिरवलं खरं पण गावात पाणी कमावून, पाण्यासोबत गावातले तंटे मिटवणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं पुरुषांच्या जगात स्वतःचं अस्तित्व कमावणाऱ्या जाखणगावसारख्या अनेक "जलरागिणी" या माझ्या आयुष्यात कायमच "रणरागिणी" बनून राहतील.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवादABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
Embed widget